एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh बघणार आहोत. या निबंधामध्‍ये  मानवाने केलेली वैज्ञानिक व आर्थीक प्रगती व त्‍याबदल्‍यात त्‍याने पर्यावरणाला पोहचवलेली हानी , वाढलेली लोकसंख्‍या व इतर सामा‍जिक समस्‍या मानवापुढे कश्‍याप्रकारे समोर आल्‍या आहेत याबद्दल  स्‍पष्‍टीकरणात्‍मक दोन  निबंध दिलेले आहेत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

Ekvisavya-Shatkatil-Avhane-Marathi-Nibandh
Ekvisavya-Shatkatil-Avhane-Marathi-Nibandhएकविसावे शतक आज माणसांसमोर अनेक नवी आव्हाने घेऊन उभे ठाकले आहे. नुकत्याच सरलेल्या विसाव्या शतकाकडे दृष्टिक्षेप टाकला तर काय आढळते? चतुर मानवाने नेत्रदीपक प्रगती साधली आहे.एकविसाव्या शतकातील मानवाने आपल्या पूर्वजांपेक्षा मोठी वैचारिक प्रगती साधली आहे. आज आपण 'व्यक्तिस्वातंत्र्य' हा मूलभूत हक्क मानला आहे. कोणी कुणाचा गुलाम नाही. 

आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला स्वत:ची प्रगती साधण्याचा हक्क आहे. कुठल्याही विशिष्ट ज्ञानावर वा कामावर कुणाचीही मक्तेदारी राहिली नाही. जन्मावर 'कर्म' अवलंबून नाही, तर कर्मावर त्याचे समाजातील स्थान' अवलंबून आहे. म्हणून तर दलित समाजातील व्यक्तीही राष्ट्रपतिपद भुषवू शकते.

एकविसाव्या शतकातील सगळ्यात बिकट आव्हान आहे ते म्हणजे 'लोकसंख्येच्या विस्फोटाचे. भारताची लोकसंख्या अब्जांची मर्यादा ओलांडून पुढे गेली आहे. विश्वातील या सर्व मानवांना मूलभूत गरजा पुरवणे हेही एक आव्हानच आहे. माणसाने हे ओळखले आहे. पण त्याचबरोबर या लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कंबर कसावी लागणार आहे. पण अंधश्रद्धा व अज्ञान हे फार मोठे अडथळे मध्ये आहेत. ते दूर करणे हेही फार मोठे आव्हान आहे.

आपल्या भारतापुढे गरिबी व बेकारी हे एक मोठे आव्हान आहे. पण आम्ही ते स्वीकारले आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती यांनी प्रत्येकाला चारा उपलब्ध केला आहे. संगणकामुळे बेकारी वाढेल असे वाटत असतानाच संगणकाने अनेक नवे व्यवसायही निर्माण केले. नव्या उद्योगधंदयांबरोबरच आमच्या अनेक परंपरागत उदयोगांचेही पुनरुज्जीवन केले जात आहे.

एकविसाव्या शतकात आज माणसांपुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा! माणसाने अविचाराने जंगलतोड केली, उभ्या केलेल्या प्रचंड कारखान्यांमुळे हवा बेसुमार दूषित झाली. माणसांना विविध आजारांना तोंड दयावे लागत आहे. त्यांत दुष्काळ, महापूर, भूकंप अशा नाना नैसर्गिक आपत्ती माणसांची कसोटी पाहायला येत आहेत. वैश्विक तापमान वाढत आहे, हे एक नवे संकट येत आहे. पण एकविसाव्या शतकातील माणूस आता याबाबतही जागृत झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात नित्य नवे शोध लावून तो या आजारांवर मात करत आहे. आता तर आमच्या संशोधकांनी माणसाच्या जनुकांचाही अभ्यास चालवला आहे. त्यातून तो माणसाला आपल्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करील.एकविसाव्या शतकात डाचणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सामाजिक विषमता! जात, धर्म, पंथ, श्रीमंती, शिक्षण अशा अनेक पातळ्यांवर भीषण विषमता आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे संघर्ष पेटलेला असतो. या संघर्षाने तीव्र स्वरूप घेतले की, त्यांतून 'दहशतवाद' बोकाळतो आणि माणसाचे जगणे मोठे कठीण होते.भारतात आणि इतर काही देशांत भ्रष्टाचाराचे एवढे साम्राज्य पसरले आहे की, आपल्या क्षुल्लक फायद्यासाठी भेसळ करणारा माणूस सहज दुसऱ्यांचे प्राण घेतो. याला कारण म्हणजे मानवी जीवनातील नैतिक मूल्यांची झालेली घसरण. हे सारे चित्र एकविसाव्या शतकातील माणसांचे जगणे असह्य, भयंकर करून टाकेल का? अशी भीती क्षणभर वाटते. पण क्षणभरच ! कारण अनेक आपत्तीत जगाच्या कानाकोपऱ्यांतून धावत आलेले मदतीचे हात आठवतात आणि ते आश्वासन देतात की, या साऱ्या साऱ्या आव्हानांना आम्ही पुरून उरू.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता व दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद

निबंध 2

 एकविसाव्या शतकाची आव्हाने 

कुठलेही राष्ट्र प्रगत आहे की अप्रगत, हे ठरवण्याचे काही निश्चित निकष सर्वमान्य झालेले आहेत. राष्ट्राची एकूण संपत्ती, त्या राष्ट्रात राहणाऱ्या जनतेचे उंचावत जाणारे राहणीमान, त्यांची होणारी प्रगती आणि जागतिक बाजारपेठेत त्या राष्ट्राची असलेली प्रतिष्ठा किंवा पत हे त्यांतले काही प्रमुख निकष आहेत. हे निकष साध्य करण्यासाठी भारताला एकविसाव्या शतकात वाटचाल करायची आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताचे भाग्य म्हणजे त्याला विविध प्रकारचे हवामान लाभले आहे. उन्हाळा, पावसाळा मुबलक. भारताने याचा जेवढा फायदा करून घ्यायला हवा तेवढा अजून करून घेतलेला नाही. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात हरितक्रांती झाली. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. याच्या पुढचे पाऊल म्हणजे 'धान्याची निर्यात'. त्यासाठी भारतातील शेतकऱ्याने परंपरागत शेतीची पद्धत बदलली पाहिजे. पाश्चात्त्य देशाच्या तुलनेने अजून आपले एकरी उत्पन्न कमी पडते. धान्याची प्रत आणि प्रमाण वाढायला हवे. धान्याबरोबरच साखर, फळे, फुले यांचीही निर्यात साधायला हवी.

 एकविसाव्या शतकातील भारताला ग्रासणारा दुसरा प्रश्न म्हणजे येथील विषमता - यातील आर्थिक विषमता हा मोठा डाचणारा प्रश्न आहे. 'गरिबी हटाव'साठी अनेक योजना आखल्या गेल्या; पण गरिबी संपली नाही. एकविसाव्या शतकात या सामाजिक दोषालाच नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी निरक्षरतेवर मात करता आली पाहिजे. जर भारतातील जनता जास्तीत जास्त साक्षर झाली तर भारतीय लोकशाही अधिक प्रभावी बनेल.

एकविसाव्या शतकात भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती व्हायला हवी. आज त्या दृष्टीने भारत पावले टाकत आहे. कारण प्रगत तंत्रज्ञान हेच आजच्या जगात कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण असते. त्यासाठी भारताला आपले आंतरिक सामर्थ्य वाढवावेच लागेल. भारताला आपली अर्थव्यवस्था भक्कम करावी लागेल. एकविसाव्या शतकातील अनेक प्रकल्पांपैकी ती एक आहे. त्यासाठीच भारताने 'मुक्त अर्थव्यवस्था' स्वीकारली आहे. देशांतर्गत व्यापारामध्येही-विशेषतः कृषी, औदयोगिक आणि सेवा या क्षेत्रांत स्पर्धात्मक वातावरण ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विशाल रस्ते तयार करून राज्ये जोडणे आणि नदया जोडणे हे प्रकल्प हाती घेतले आहेत.जगामध्ये आपण लष्करी व आर्थिकदृष्ट्या वरचढ राहणे आवश्यक आहे. १९९० पर्यंत युद्ध हे शस्त्रांनीच लढले जाई. पण आता  आर्थिक युद्धाला सुरवात झाली आहे. लष्कर, संरक्षण या क्षेत्रातही प्रगत आणि स्वावलंबी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक आपल्याकडे अधिकाधिक येईल याची काळजी घेतली पाहिजे.

जगामधील एक प्रगत आणि निडर राष्ट्र म्हणून भारताला स्थान मिळवून दयायचे असेल तर भारतातील प्रचंड युवाशक्ती एकदिलाने कामाला लागली पाहिजे. मग आपल्या सर्वांचे हे स्वप्न लवकर साकार होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत