स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वतंत्र दिन मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये दरवषी स्वातंत्र्यदिन कश्याप्रकारे साजरा केल्या जातो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
![]() |
swatantra-din-nibandh-marathi |
मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर साजरा होतो. पंतप्रधान तिथे पोहोचल्यावर सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख त्यांना सलामी देतात.पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात. ध्वजाला २१ तोफांची सलामी सन्मानाप्रीत्यर्थ दिली जाते. राष्ट्राच्या नावे दिल्या जाणाऱ्या संदेशात पंतप्रधान देशाची प्रगती आणि भविष्यातील योजना याबद्दल राष्ट्राला माहिती देतात. या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींबरोबरच विदेशी पाहुणे पण हजर असतात. भाषण संपल्यावर तीन वेळा 'जयहिंद'च्या घोषणेनंतर राष्ट्रगीत गायिले जाते, नंतर कार्यक्रम समाप्त होतो. १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी असते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. ती पाहण्यासारखी असते. १५ ऑगस्टचा या सोहळयाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर आणी इंटरनेटवर दाखविले जाते. त्यानंतर देशभक्तिपर गीते, कविता, नाटके प्रसारित केली जातात. राज्या-राज्यात व गावा- गावात उत्साहाने ध्वजारोहण केले जाते. आपणा भारतीयांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आपल्या जुन्या चुकांचा विचार करण्यास व त्या पुन्हा न होऊ देण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले ऐक्य व अखंडतेचे रक्षण केले पाहिजे. तरच आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत असे अभिमानाने जगाला सांगू शकू. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला शाळेत जायचे, राष्ट्रध्वजाला वंदन करायचे, पाहुण्यांचे भाषण ऐकायचे हा एक ठराविक चाकोरीतील कार्यक्रम होता; पण यंदा आमचे वर्गशिक्षक म्हणाले की, "उदया झेंडावंदनाला याल, तेव्हा घरी सांगून या की आता एकदम संध्याकाळी घरी येऊ. आणि हो, येताना तुमचा दुपारच्या जेवणाचा डबाही घेऊन या, बरं का!"
१५ ऑगस्ट उजाडला. आम्ही शाळेत जमलो. ध्वजवंदन झाले. शाळेतील कार्यक्रम संपला. आता कोठे जायचे आहे, हे सरांनी काही सांगितलेच नव्हते, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली होती. सरांबरोबर आम्ही सर्वजण निघालो.
आम्ही गावाबाहेरच्या एका जुन्या घरापाशी आलो. आमचे कुतूहल वाढले होते. सरांनी कुणाला तरी हाक मारली. एक वृद्ध पण तेजस्वी व्यक्ती पुढे आली. सरांनी ओळख करून दिली, ते सरांचे 'सर' होते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते जुन्या पिढीतील एक स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. अनेक वर्षे ते भूमिगत होते आणि काही काळ त्यांनी कारावासही भोगला होता है पण आम्हांला सांगितले.
स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी त्या वृद्ध तपस्वी स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडुन स्वातंत्र्यलढ्याची गाथा ऐकण्यात आम्ही रमून गेलो. दोन तास केव्हा संपले ते कळलेच नाही. त्या स्वातंत्र्यवीराने तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवला होता.
नंतर ते तपस्वी आम्हांला जवळच्याच एका घरात घेऊन गेले. स्वातंत्र्योत्तर काळात काही अनाथ बालकांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या मुलांबरोबरच आम्ही आमचे भोजन केले. नंतर आम्ही काही वेळ गप्पागोष्टी व खेळ झाल्यावर घराकडे परत निघालो. तेव्हा एकच विचार मनात रेंगाळत होता की, स्वातंत्र्यदिन आज आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत