डॉक्टर मराठी निबंध | Doctor essay in marathi

डॉक्टर मराठी निबंध | Doctor essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉक्टर मराठी निबंध बघणार आहोत. ज्याप्रमाणे सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतो त्याप्रमाणे डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. प्राध्यापक, इंजिनियरप्रमाणेच डॉक्टरचे समाजात एक महत्त्वाचे स्थान असते. डॉक्टरांकडे समाज आदराच्या दृष्टीने पाहतो. 


आपल्या देशात विभिन्न प्रकारच्या चिकित्सा पद्धती आहेत. उदा. आयुर्वेदिक, अॅलोपॅथिक इत्यादी. प्रत्येक चिकित्सा पद्धतींचे डॉक्टर वेगळे असतात. डॉक्टरचे काम रोगाचे निदान करणे हे असते. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टरकडे जातो. किरकोळ तापापासून गंभीर आजारापर्यंतचे सर्व प्रकारचे रोग डॉक्टर दूर करतात.


सामान्य रोगांवर कोणतेही डॉक्टर इलाज करू शकतात. परंतु अपघातग्रस्त झाल्यावर, किडनी खराब झाल्यावर, डोळे अधू झाल्यावर आपल्याला शल्यचिकित्सकांची किंवा तज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. डॉक्टर शल्यक्रियेद्वारे आपणास नवजीवन प्रदान करतात. अनेक मोठमोठे आजार डॉक्टर प्रयत्नपूर्वक बरे करतात.


डॉक्टरचे जीवन म्हणजे सेवा व साधना. कित्येकदा ऑपरेशनच्या वेळी अनेक तास त्यांना काम करावे लागते. शांतपणे झोपताही येत नाही. इस्पितळात डॉक्टरांना अनेक रोग्यांना तपासावे लागते. रोग्याची स्थिति गंभीर असल्यास रात्रीसुद्धा रोग्याला अनेकदा तपासण्यास जावे लागते. डॉक्टर मनुष्याला जीवनदान देऊन त्याच्यावर उपकार करतात. 


डॉक्टर मृदू स्वभावाचा असावा. डॉक्टरने आपल्या रोग्यांना दिलासा द्यावा. त्यांच्या मनांत स्वत:बद्दल विश्वास निर्माण करावा. आपल्या सुहास्य मुद्रेने रोग्याच्या वेदना दूर कराव्यात. केवळ पैसे कमावणे हा डॉक्टरचा उद्देश असू नये.


अनेक डॉक्टर धर्मार्थ इस्पितळात जाऊन रोग्यांची सेवा करतात. ते खूप कमी पगार घेतात. असे डॉक्टर प्रशंसा पात्र आहेत. ते खऱ्या अर्थाने मानवतेचे सेवक आहेत. मला मोठे झाल्यावर डॉक्टर बनायचे आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत