जलसंधारण मराठी निबंध | Water Conservation Essay in Marathi

 जलसंधारण मराठी निबंध | Water Conservation Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  जलसंधारण मराठी निबंध बघणार आहोत. पाणी, पाणी आणि पाणी आहे तरी काय हे पाणी ? खरे तर पाण्याइतके महत्त्व दुसऱ्या कशालाच देता येणार नाही पण तेव्हा जेव्हा पाण्याचे उपयोग, गरज कशाप्रकारे होते हे समजल्यावर त्याचे महत्त्व कळू लागेल. 


तसेच मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार जेव्हा पाण्याचा पुरवठा मुबलक होतो, तेव्हा पाण्याचे महत्त्व कळत नाही. पण जेव्हा दुष्काळ पडतो. पाण्याचा अपुरा पुरवठा होतो, तेव्हाच पाण्याचे महत्त्व कळून येते. शहरात जर एका दिवशी नळाला पाणीच आले नाही तर काय होईल ही कल्पना न केलेलीच बरी ! 


जिथे पाण्याचा वापर होत नाही असे एकही क्षेत्र सध्या नाही. दुसरे म्हणजे पिण्यासाठी तर पाणी आवश्यकच आहे पण पाण्याच्या कमतरतेमुळे इतर ही क्षेत्रात पाण्याचे महत्त्व वाढत आहे.सध्या पावसाचे प्रमाण खूपच घटले आहे. उद्योग व इतर कारणांमुळे नद्यांतील पाणी दूषित झाले आहे.


त्या पाण्याचा पिण्यासाठी व इतर कारणासाठी वापर होऊ शकत नाही. म्हणजे जस जसे उद्योग वाढतील तसतसे जलप्रदूषणात वाढ होईल व पाण्याचे महत्त्व पाण्याच्या होणाऱ्या अल्प उपलब्धतेमुळे वाढतच जाणार आहे. सध्या बाजारात पाणी विकावयास येत आहे. 


मानव हा आज भौतिक सुखाच्या पाठीमागे लागला आहे. पैसा नावाच्या राक्षसाच्या प्रभावामुळे माणूस आपले कर्तव्य विसरला आहे. तो जो जगतो आहे तो केवळ पैशासाठीच म्हणून पैशाचे महत्त्व वाढले व लोकांच्या हातात जास्त पैसा खेळू लागला व त्या पैशाच्या जोरावर मनुष्य जे जे मनाला वाटेल ते ते तो खरेदी करू लागला. 


त्यामध्ये फर्निचर व इतर लाकडी वस्तूंची मागणी वाढू लागली त्यामुळे भरमसाठ जंगलतोड झाली. अतिरिक्त पैशामुळे, उद्योगधंद्यामुळे मोटरगाड्यांची संख्या वाढली व हवा प्रदूषणात वाढ झाली. त्याचा परिणाम पर्जन्यावर झाला. या व इतर अनेक मानवनिर्मित घटनांमुळे निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. पर्जन्याच्या प्रमाणात भयंकर तफावत निर्माण झाली आहे. त्याच्या वितरणामध्ये समानता राहिली.


काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी अति अल्प पर्जन्य होते. त्यामुळे पावसाच्या असमान वितरणाचा परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला आहे. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे, तेथे लोकसंख्या एकवटू लागली आहे व अल्पपर्जन्याच्या ठिकाणी लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे लोकसंख्या वितरण हे जास्त करून पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याचे आपणाला दिसून येते..


पूर्वी पावसाचे प्रमाण कसे होते हे आपल्या आजोबांकडून आपल्याला समजून येते. पूर्वी उन्हाळ्यातदेखील अल्पकाळ का होईना पाऊस पडत होता पण आता तो तेवढाही पावसाळ्यात पडत नाही. या सर्व निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलामागे माणसाचाच हात आहे. 


प्रत्येक माणूस थोडा का होईना पाण्याच्या घटत्या उपलब्धतेला जबाबदार आहे असो.पण पाण्याचे प्रमाण घटत आहे. पर्जन्याचेही प्रमाण घटत आहे. बर्फाचे डोंगर वितळत आहेत. दुष्काळात वाढ होत आहे. भूजलपातळी खालावत आहे.


तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. त्यामुळे देखील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. एकूण पर्जन्याच्या जवळ-जवळ १० ते १२% पाणी भूगर्भात जाते व इतर पाणी नद्यांद्वारे समुद्रास जाऊन मिळते. त्याचा कार्यक्षमतेने व वापर होत नाही तर अशा या परिस्थितीत आपण काय केले पाहिजे? 


परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आत आपण यामध्ये बदल घडवून आणू शकतो का ? पाण्याच्या घटत्या उपलब्धतेला कोणत्या मार्गाने आपण प्रतिबंध करू शकतो ? भूजलपातळीत कशाप्रकारे वाढ शक्य आहे ? वाढत्या तापमानात पाण्याच्या बाष्पीभवनावर आपण नियंत्रण मिळवू शकतो का ? पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी कोणते उपाय योजू शकतो? 


या सर्व प्रश्नांचा विचार शाळापातळीवर तसेच स्वयंसेवी संस्था व प्रत्येक जागरूक नागरिकाने करावयास पाहिजे नुसता विचार न करता त्यावर प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. कारण पर्जन्याचे प्रमाण घटत आहे त्या मानाने पाण्याची गरज वाढत आहे. शेतीसाठी पाणी आवश्यक आहे नव्हे, पाणी हेच शेतकऱ्यांचे रक्त आहे. जर पाणी घटले,


पाण्याची उपलब्धता घटली की समजावे शेतकरी अशक्त बनला. जर त्याला सुधारावयाचे असेल तर पाण्याच्या उपलब्धतेमध्ये वाढ केली पाहिजे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. पाणी शेतकऱ्यांचे रक्त आहे, तर मग पाणी नसेल तर शेतकरी तरणार नाही. 


त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल व भारताचे देखील स्वास्थ बिघडेल, तर मग जर देश व देशातील पर्जन्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याचे स्वास्थ्य बिघडवू द्यावयाचे नसेल तर पाण्याच्या अथवा जलसंधारणाच्या विविध योजना राबवल्या पाहिजेत.


राळेगण सिद्धी हे एक उत्तम उदाहरण आहे. त्या गावाचे जरी अनुकरण केले तरी १०० % गाव पाण्याच्या दुर्भिक्षातून मुक्त होईल. पाण्याची भूगर्भजल क्षमता वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना आपण करू शकतो. गरज आहे ती कृतीची, जलसंधारणाची, पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवले पाहिजे. 



त्यासाठी ओढे, नाले, छोट्या नद्या, ओहोळ यावर छोटेछोटे बांध बांधले पाहिजेत. मोठे बांध नको कारण त्यामुळे नदीकाठची सुपीक जमीन पाण्याखाली जाईल व नदी किनाऱ्यापासून दूर असणाऱ्या खडकाळ, बिनगाळाच्या जमिनीला जरी पाण्याचा पुरवठा झाला तरी उत्पादनात वाढ होणार नाही.


नव्या व्यापारी शेतीमुळे शेतकऱ्याच्या हातात थोडा जास्त पैसा येऊ लागला त्याची अशा वाढली. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. अशा भागात म्हणजे सोलापूर, सांगली जिल्ह्यात कूपनलिकांची संख्या वाढत आहे. शेतकरी ६०० ते ७०० फूट खोल जाऊ लागली त्यामुळे तो प्रत्येक वर्षी त्या खोलीमध्ये वाढ करू लागला आहे. 


त्यामुळे सधन शेतकरी आर्थिकदृष्ट्या जास्तच संपन्न झाले तर गरीब गरीबच राहिले. याला भूगर्भ पातळीची खालावण्याची परिस्थिती पूर्णपणे जबाबदार आहे.वावर ७१% पाणी असले तरी वापरण्यायोग्य पाणी केवळ २% इतकेच आहे. 


कूपनलिका खोदण्यावर निबंध पास, पाणा आडवा पाणी जिरवा' या योजनेची नव्याने उभारणी केली पाहिजे. असे काही लोक म्हणतात का हम सर युद्ध है केवळ पाण्यासाठीच होणार आहे. ते बरोबर आहे कारण पैसा भरपूर आहे पण पिण्यासाठी पाणीच नाही तर त्या कागदी नोटांचा काय उपयोग एक वेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल पाणी पाहिजेच.


अशा परिस्थितीत पाणी वाचवा, देश वाचवा' मोहीम सुरू केली पाहिजे. त्यासाठी मोहन धारिया यांनी विकसित केलेल्या वनराई बंधाऱ्याचा वापर वाढवला पाहिजे. ग्रामीण भागात जमाव प्रत्यक्ष शेतावरच प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्याला त्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. अण्णा हजार याच्या गावाला भेट देऊन तेथे त्यांनी राबवलेल्या योजनांचे बारीक, डोळसपणे निरीक्षण करून गावोगावी त्याचा प्रसार कला पाहिजे. अण्णा म्हणतात, 


"पळणाऱ्या पाण्याला चालायला शिकवले पाहिजे, चालणाऱ्या पाण्याला याबायला शिकवले पाहिजे व थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरायला शिकवले पाहिजे" तरच भूगर्भजलाची पातळी वाढू शकत. पडणाऱ्या पावसाचा थेंबना थेंब जमिनीत जिरवावा. जास्त पाणी लागणारी पिके उदा. ऊस याऐवजी अल्प पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. कूपनलिकांची खोदणी मर्यादित खोलीपर्यंत करावी म्हणजे भूगर्भजल पातळी ठरावीक सीमेपर्यंत राहाल. 


नद्या जोड योजना व्यापक प्रमाणावर वाढवली पाहिजे. वृक्ष लागवडीवर भर व वृक्षतोड बंदी कायद्याचा कडकपणे वापर केला जावा जेणे करून पर्जन्याचे प्रमाण वाढेल. मृदा, संधारण होईल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद