यत्न तो देव जाणावा मराठी निबंध | YATNA TO DEV JANAVA ESSAY IN MARATHI

 यत्न तो देव जाणावा  मराठी निबंध | YATNA TO DEV JANAVA ESSAY IN MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  यत्न तो देव जाणावा  मराठी निबंध बघणार आहोत. लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती। कोशीश करनेवालों की कभी हार नहीं होती। पन्नास वर्षांचे विनोद पुनमिया यांनी 'पुणे ते डोंबिवली' हे सुमारे १४० कि.मी. अंतर सायकलीवरून पार केले अन् तेही डेक्कन क्विनला पार करीत. 


डोंबिवली स्थानक आणि आजूबाजूचा परिसर कसा माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. आणि 'विनोद साहेबां'ची सायकल पोहोचल्यावर तर, साया आसमंतात एकच जयजयकार झाला. सर्वांचे चेहरे उत्साह अन् आनंद यांनी ओसंडून वाहत होते. 


त्यासाठी विनोदसाहेब सलग तीन-चार महिने मुंबई-पुणे-मुंबई अगदी वाऱ्याच्या वेगाने सायकलीवरून जाण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत होते. 'डेक्कन क्वीन'ला सायकलीवरून हरवायचे असा एकदा निश्चय नंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. 


आपले प्रयत्न, आपला सराव आणि आपली श्रद्धा या तिन्हींच्या जोरावर एवढे मोठे शिवधनुष्य त्यांनी सहज उचलले. अशक्य ते शक्य करून दाखविले आणि पुनमियांच्या विजयाने सिद्ध झाले की, 'God helps those who helps themselves' म्हणजेच प्रामाणिक प्रयत्न केल्याने कार्यसिद्धी होतेच.


आपल्या अवतीभवती नेमके उलट चित्र दिसते. लोक प्रयत्नांपेक्षा दैवावर जास्त विसंबून राहताना दिसतात. यश मिळत नाही, म्हणून नशिबाला दोष देतात, आणि असे लोक मग भोंदू बाबांच्या नादी लागतात. मनाच्याविरुद्ध घडल्याने मनाला यातना होणे हे स्वाभाविक आहे, 


तेवढेच अपयशाचे यशात रूपांतर करण्यासाठी नवीन सुधारक प्रयत्न करणे, हे तितके सयुक्तिक आहे.बुद्धिमत्ता, हुशारी आणि प्रतिभा असूनही दैवावर अधिकच अवलंबून राहिल्यामुळे नकारार्थी दृष्टिकोनातून जग बघणारी माणसे अपयशी होऊन, निराश होताना आढळतात. 


याउलट इतकी अलौकिक बुद्धिमत्ता नसणारे, साधारण श्रेणीचे लोकही बऱ्याच वेळा अतिशय मेहनत करून, प्रामाणिकपणाचा ध्यास घेऊन पुढे जाताना, यशस्वी होताना दिसतात. साहजिकच प्रश्न पडतो की, फक्त प्रयत्नच आवश्यक असतात का ? की त्यासोबत हुशारी, बुद्धिमत्ता देखील हवी ना ! 


परंतु मित्रहो, सातत्याने तुम्ही जर प्रयत्न करीत राहिला तर तुमच्या बुद्धिमत्तेला एकप्रकारची धार चढते, अन् सामान्य दर्जाचा माणूस असामान्य काम करीत असताना दिसतो. प्रयत्न हा परमेश्वर - यत्न तोच देव जाणून अहर्निशपणे प्रयत्न करून, अभ्यासात स्वतःला झोकून देणारे, जातीयवादाचे चटके सहन करणारे आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित ठरले. 


नशिबाच्या भरवशावर राहिले असते तर त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य घडले असते का? 'स्टीफन हॉकींग' यांना तर वयाच्या २१ व्या वर्षी मोटार न्यूरॉन डिसिज नावाची व्याधी जडली होती. त्यांच्यासोबत कायमची 'व्हीलचेअर' आली आणि तेही कायमच्या अपंगत्वाला घेऊन. 


परंतु आपल्या श्रेष्ठ मनोबलाने संशोधन आणि निरंतर अभ्यास चालू ठेवला अन् जगाला थक्क करणारे सिद्धांत मांडले. हे सर्व हॉकींग' यांच्या केवळ प्रयत्नवादी धोरणानेच.फ्रान्सचा 'लान्स आर्मस्ट्रॉग' हा तर प्रयत्नांचाच पुजारी. त्यांनी फ्रान्समधील 'ट्रर द फ्रान्स' ही विख्यात सायकल शर्यत सातवेळा जिंकली. वृषणांचा कर्करोग झाल्यानंतरही न डगमगता त्यांनी सराव चालूच ठेवला. 


'कर्करोगा'सारखा महारोग झाल्याने आपले आता आयुष्य काही जास्त नाही, असा विचारही त्यांच्या डोक्यात आला नाही. स्वतःचा स्वतःवरच विश्वास गाढा होता. वीस वर्षाचा न्यूझीलंडचा साहसपटू एव्हरेस्ट शिखर काबीज करण्यात अपयशी ठरून परत आला. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. 


परंतु जिद्द एवढी प्रचंड होती की, २० वर्षानंतर आता कृत्रिम पायांनी पुन्हा एव्हरेस्ट चढून गेला अन् एव्हरेस्ट काबीज करणारा पहिला अपंग ठरला. हे केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती अन् प्रयत्न. वयाच्या ५६व्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारे 'अब्राहम लिंकन' कानाने बहिरा आहे. 


म्हणून शाळेतून प्रवेश नाकारलेला एडिसन गुलाम आईच्या पोटी येऊनही स्वकर्तृत्वाने नाव कमावणारा डॉ. कार्व्हर 'अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा। किनारा तुला पामराला॥ असे गर्वगीत गाणारा कोलंबस, अपघातात पाय गमावूनही उत्तम नृत्यांगना म्हणून नावारूपाला येणारी सुधा चंद्रन, 


अनाथांची आई बनलेल्या सिंधुताई सपकाळ, कुष्ठरोग्यांना नवजीवन देणारे बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंब, किती उदाहरणे सांगावीत. जे स्वतःच्या अथक अशा प्रयत्नानीच यशोशिखरावर पोहोचले आहेत."I am the captain of my soul, I am the master of my fate."अशा प्रकारची उच्च विचारसरणी आणि प्रयत्नासाठी सदैव सज्ज राहिलेले


अनेक समाजसुधारक अण्णा नाशिकच्या झोपडपट्टीतील दलित रूपाशी एकरूप झालेल्या शारदा निकम रात्रंदिवस प्रयत्न करून IAS बनल्या. त्या सवाच्या वाटेवरचा त्याचा सोबती होता. फक्त प्रयत्न - खास यत्न आणि ते ध्येय, अशा लोकांना यश हे हुलकावणी देणे केवळ अशक्यच. 


'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी।' असे म्हणून यशाच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे, यश कधी आपल्याला सोडून गेले हे समजूच शकत नाहीत. यश ते कोणत्याही क्षेत्रातील असो, ते साध्य करण्यासाठी गरज आहे, ती अथक प्रयत्नांची. अपयश आले तरी अधिक तीव्रतेने प्रयत्न करणाऱ्यासमोर यशदेखील नतमस्तक होते. आठवतात त्या पुढील पंक्ती -


"तू म्हणालास, माथा रक्ताळला, मी म्हणालो,

हातावर विश्वास ठेव, मनगटावर विश्वास ठेव !"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद