विज्ञान एक वरदान निबंध मराठी | Vidnyan Ak Vardan Marathi Nibandh

 विज्ञान एक वरदान निबंध मराठी | Vidnyan Ak Vardan Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञान एक वरदान मराठी निबंध बघणार आहोत.


 " घणघण घंटानाद होऊ द्या 

जाते वर्ष खुशाल जाऊ द्या

जुन ते जुने खुशाल जाऊ द्या


आणि नव्याचा रे सत्कार करा" टेनिसन यांच्या या ओळी आठवतात आणि विज्ञानाचं वरदान स्वीकारायला मन सज्ज होतं. आजचं युग हे विज्ञानयुग! गरज ही शोधाची जननी होय. विज्ञानाने जे आपल्याला दिले आहे. ती काळाची गरज आहे. 


विज्ञानाचा दुरुपयोग केला तर राख उरेल पण विज्ञानामुळे घडणारी उत्क्रांती लक्षात घ्याल तर प्रगतीची शिखरे गाठाल, असं हे विज्ञान विज्ञान हे अग्नीप्रमाणे आहे अन्न शिजवायचे की चटके सोसायचे हे आपणच ठरवायचे आहे.


थोर विचारवंत प्रो. माटे म्हणतात की, "विज्ञान ही अशी कामधेनू आहे की तिचे तुम्ही जितके दोहन कराल तेवढा तुम्हाला तिचा जास्त लाभ होईल.'' विज्ञानाची झेप उंचावत आहे. चंद्रावर उतरणारा माणूस आज मंगळाचा वेध घेण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहे. 


वीज आली- अंधार गेला.चाक आले-गती आली. विजेची उपकरणे आली , श्रम व वेळ यांची बचत झाली.त्याबरोबरच व्यक्तीगत जीवन सुधारले. औद्योगिक क्षेत्रात उलाढाल झाली.जीवनाला गती आली.वाहने हवाईमार्ग जलमार्ग येथेही पोहचली अंतराळयानाने पृथ्वीप्रदक्षिणा केली. माणूस इतर ग्रहांवर पोहोचला ही सारी किमया विज्ञानाने केली.


भारतासारख्या कृषिप्रधान देशात 'जय जवान जय किसान' या मंत्रात 'जय विज्ञान' ची भर पडली आहे. विज्ञानाची कास धरून सुधारित बी-बियाणे, नवनवीन शेतीच्या पध्दती, नवनवीन कृषिसाधने वापरून धरतीला अधिक सुजलाम् सुफलाम् करण्याचे प्रयत्न विज्ञानाने केले आहेत. 


विज्ञानामुळे उत्पादन व विनियोग या प्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. यांत्रिक शेतीमुळे बेकारी न वाढवता अधिक प्रयोग करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विज्ञानाने वैद्यकिय क्षेत्रात तर आघाडीची मजल मारली आहे. 


नवनवीन चाचण्या नवीन उपकरणाद्वारे शक्य झाल्यामुळे रोगनिदान , शल्यचिकित्सा प्रगल्भ झाली आहे. टेस्ट ट्युब बेबी , क्ष-किरण, कृत्रिम अवयव, प्लास्टिक सर्जरी, बायपास सर्जरी हे सर्व विज्ञानामुळेच शक्य झाले आहे.


स्कॅनिंगसारख्या उपचार पध्दती अस्तित्वात आल्याने 'ब्रेन ट्युमर' चे निदान शक्य झाले आहे.प्रभावी उपचार शोधण्यासाठी विज्ञान धडपडत आहे.आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक ही विज्ञानाचीच रूपे आहेत. घरबसल्या मनोरंजन व ज्ञान देण्याची किमया विज्ञानाने साधली आहे.


खर तर हल्ली दिवस उगवतो तो विज्ञानाच्या सोबतीने विज्ञानाच बोट धरून अन् मावळतो ही विज्ञानाच्या कुशीतच! विज्ञानाच्या चमत्काराने मानवाच्या बुध्दीला चालना दिली आहे.वृक्षांची पाने लपेटणारा आदिमानव ते आजचा मानव हा सारा प्रवासाचा गोवर्धन एकट्या विज्ञानाच्या करंगळीवर पेलला गेला आहे.


एवढे सर्व मिळूनही नाण्याची दुसरी बाजू म्हणते की क्षेपणास्त्रे आली, संहारक शक्तींची तीव्रता वाढली, आराम जास्त झाला, आजार वाढले , व्यायामाची गरज वाढली, रोगराई वाढली. पैशामागे धावणारा माणूस माणुसकी विसरला , स्वार्थ , सत्ता यांच्यात मग्न झाला.हा दोष विज्ञानाचा नव्हे, तो मानवाचा आहे. 


निरक्षीर विवेक जागृत ठेवून फायदे-तोटे ओळखावेत. मधमाशी काटे सोडते मध घेते तसा चांगलेपणा घ्यावा वाईटाचा त्याग करावा.तर विज्ञान वरदान ठरेल अन्यथा शापही ठरेल. आज मानवाने आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक जी प्रगती साधली आहे त्याचा पाया विज्ञानच आहे.


विज्ञानाशिवाय माणूस उभाच राहू शकत नाही. विज्ञानाच्या कक्षा अत आहेत झेपावणाऱ्या पंखाना क्षितिजे नसतात.ही अनंत विज्ञानाची भरारी प्रगतीचा आनंद देणारी आहे. लाँगफेलो यांनी म्हटलेच आहे "या काळाच्या भिंतीवर आपण कर्माचे कारागीर." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद