जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध | jaya angi mothepan taya yatna kathin marathi essay.

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध | jaya angi mothepan taya yatna kathin marathi essay.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत 
 लहानपणी आमच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता आणि त्या धड्यासोबत एक सुरेख चित्रही छापलेले होते. त्या चित्रात, रत्नजडित सिंहासनावर बसलेल्या राजाच्या मस्तकावर एक धारदार तलवार केसाने टांगलेली होती. 


गोष्ट अगदी छोटी होती; पण त्यातील आशय त्या चित्रातून उत्तम प्रकारे व्यक्त झाला होता. सिंहासनावर बसणाऱ्या राजाला लाभलेले वैभव व सन्मान आपल्याला दिसतात; पण त्याचबरोबर या राजाला अनेक विवंचना असतात, याची आपल्याला जाणीव नसते. 


मोठेपणा प्राप्त झालेली माणसे आपल्याला आकर्षित करतात, पण त्यांचे कष्ट, त्यांच्या यातना आपल्या लक्षात येत नाहीत देवळातील देवाच्या मूर्तीपुढे आपण विनम्र होतो, तेथे माथा टेकतो. शिल्पकाराने ती मूर्ती दगडातून निर्माण केलेली असते त्या दगडाला देवपण प्राप्त होण्यापूर्वी टाकीचे असंख्य घाव सोसावे लागतात, याची आपल्याला कल्पना नसते. 


'चणे खावे लोखंडाचे।
 
तेणे ब्रहमपदी नाचे।।' 

या संतवचनातूनही हाच आशय व्यक्त होतो. जगापुढे ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या व 'विश्व स्वधर्मसर्ये पाहो' अशी सर्वांसाठी शुभकामना व्यक्त करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना किती हालअपेष्टा सहन करा लागल्या होत्या! एकदा तर या ज्ञानियांच्या राजाने लोकांच्या तिरस्काराला वैतागून स्वतःला झोपडीत कोंडून घेतले, तेव्हा छोट्या मुक्ताईने आपल्या या ज्ञानोबादादाला सांगितले, "संत जेणे व्हावे। तेणे जग बोलणे सोसावे।।"


वडीलधाऱ्या माणसांना वेळोवेळी आपल्या कुटुंबांसाठी त्याग करावा लागतो. स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालावी लागते. धनाने वा सत्तेने ज्यांना मोठेपणा प्राप्त होतो, त्यांनादेखील त्यासाठी अपार कष्ट उपसावे लागतात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बापूंनी स्वतःच्या सुखसर्वस्वाला तिलांजली दिली, तेव्हाच त्यांना लोकांनी महात्मा ठरवले.


कोणत्याही क्षेत्रातील मोठेपण हे सहजगत्या प्राप्त होत नाही. त्यासाठी अपार कष्ट उपसावे लागतात. चिकाटीने सतत साधना करावी लागते, लोकांची निंदा सहन करावी लागते आणि कधी कधी सुखसर्वस्वाचा होमही करावा लागतो. सर्व महात्म्यांची चरित्रे हेच सांगतात की, मोठेपणाचा मार्ग फार खडतर असतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 2


जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध | jaya angi mothepan taya yatna kathin marathi essay.



 एखादा माणूस अगदी साधा, भोळा, गरीब बिचारा असला की जुने लोक त्याला 'तुकाराम' म्हणतात. तुकरामबुवांना दुगदिवीच्या दुष्काळात फार त्रास झाला. बायका पोरे वारली. दुकान चालेना. पुढे ते अभंगातून वेदांत तत्त्वज्ञान सांगतात म्हणून त्यांच्या अभंगाच्या वह्या रामेश्वरभटाने इंद्रायणीच्या पाण्यात बुडवल्या. (पुढे त्या पांडुरंगाने काढून दिल्या हा दैवी चमत्कार। 


त्यामुळेच तुकारामबुबा म्हणाले असतील - जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण ! ही उक्ती किती खरी आहे ! रामाला चौदा वर्षे वनवास भोगवा लागला, तर पांडवानां बारा वर्षे वनवास भोगून परत वर एक वर्ष अज्ञातवास ! संन्याशाची मुले म्हणून लोकांनी निवृत्ती ज्ञानदेवादी चार भावंडांचा उपहास केला. 


त्यांना अनाथ पोरके म्हणून फिरावे लागले. एकनाथ महाराजांच्या अंगावर एक यवन ऐंशी वेळा थुकला. व शांततेचे महामेरू एकनाथ तितके वेळा नदीत स्नान करून आले. तेही तोंडातून एकही अपशब्द न काढता ! (शेवटी त्या यवनानेच त्यांचे पाय धरले.) पुढे श्रेष्ठ विभूती बनलेल्या या साऱ्यांना केवढे अत्याचार सहन करावे लागले. तुकारामांनी वेगळ्या शब्दांत लिहून ठेवलंय


 तुका म्हणे तोचि संत, सोशी जगाचे आघात ! या पुराणकथा म्हणून हिणवू नका. आधुनिक काळातही याचा प्रत्यय येतो. कुशाग्र बुद्धिमत्ता, अलौकिक काव्यप्रतिभा आणि निस्सीम देशभक्ती हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गुण केव्हा आणि कमी झाल्यावर मुक्तता झाली तरी काही काळ स्थानबद्धतेत गेला. या काळात त्यांनी एवढे मार्मिक घणाघाती लेख लिहिले की ते पचनी पडायला अजून ३०/४० वर्षे लागतील. जोतीराव फुले महात्मा कसे झाले ? 


हरिजनांसाठी त्यांनी आपल्या दारातला पाण्याचा हौद खुला केला म्हणून लोकांचा रोष पत्करला. स्त्रिया व हरिजन यांना शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या. स्वतःच्या पत्नीला शिकवून शाळेत शिक्षिका बनविले त्याचे फळ त्यांना काय मिळाले? त्यांची पत्नी व ते रस्त्याने जात असता लोक त्यांच्या अंगावर चिखलफेक, दगडफेक करीत. ते सारे उभयतांनी सोसले तेव्हा त्यांना मोठेपणा लाभला. 



आणि मुलाचे मनोरंजन करणारे सानेगुरुजी ! त्यांचे वर्णन आचार्य अत्र्यांनी 'मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी' असे केले आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे यासाठी सानेगुरुजींनी आत्मार्पण केले. मोठेपण हे असे महाकर्म कठीण आहे. 


ते मागून मिळत नाही. त्यासाठी त्याग करावा लागतो. स्वतः काया वाचा मने (केवल धने नव्हे) झिजावे लागते. क्वचित मरावेही लागते. म्हणून प्रतिभासम्राट राम गणेश गडकरी लिहितात  मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद