साहित्य आणि समाज मराठी निबंध | Sahitya Ani Samaj Essay In Marathi

 साहित्य आणि समाज मराठी निबंध | Sahitya Ani Samaj Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण साहित्य आणि समाज मराठी निबंध बघणार आहोत. संस्कृती आणि समाज हे मानवतेच्या विकासाचे दोन स्तंभ होत. मानव हा एक समाजशील प्राणी आहे. समाजाअभावी त्याचे जीवन व विकास याची कल्पनाच करता येत नाही. संस्कृती हे व्यक्तीचे जीवन उन्नत करण्याचे एक साधन आहे.


जन्मापासून मृत्यूपर्यंत जे संस्कार केले जातात त्यालाच संस्कृती म्हणतात. रामधारी सिंह दिनकर यांच्या मते "संस्कृती ही जीवन जगण्याची एक पद्धत आहे. शेकडो वर्षांपासून तिचा समाजावर प्रभाव आहे. ज्या समाजात आपण जन्म घेतो. 


ज्या समाजात व्यक्ती जगते त्या समाजाची संस्कृती हीच व्यक्तीची संस्कृती असते. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण आपल्या जीवनात जे संस्कार ग्रहण करतो ते पिढ्यान्पिढ्या एका कुलपरंपरेत, एका वातावरणात, एका जातीच्या, संस्कारांच्या वारश्याच्या रूपाला व्यापून टाकतात. 


यातूनच राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा दृष्टिगोचर होता. एक संस्कृती म्हणून याचीच आठवण केली जाते. दुसऱ्या शब्दात एका विशिष्ट वेळी समाजाद्वारे ग्रहण केलेले संस्कार दुसऱ्या कालखंडात भूतकाळाच्या वारशायाच्या रूपात जेव्हा स्वीकारले जातात तेव्हा तीच संस्कृती होते. 


फरक केवळ इतकाच आहे की वर्तमानात भावना आणि विचारांचे मंथन करून जो व्यवहार निर्माण होतो त्यालाच संस्कृती म्हणतात. तोच भूतकाळ होतो व त्याला संस्कृती म्हणतात. सारांश, "वर्तमानातील संस्कार भूतकाळ होऊन संस्कृती बनतात."


एस. हमीद हुसेन संस्कृतीची व्याख्या करतांना म्हणतात, "संस्कृती ही एखाद्या समाजात सापडणाऱ्या उच्चतम मूल्यांची ती चेतना आहे जी सामाजिक प्रथा, व्यक्तींच्या चित्तवृत्ती, भावना, मनोवृत्ती यांच्या आचरणाबरोबरच त्याच्या भौतिक पदार्थांना विशिष्ट स्वरूप दिले जाण्यात अभिव्यक्त होते.


" के. एम. मुन्शी यांच्या मते,' मनुष्य वेगवेगळ्या ठिकाणी राहत असला तरी विशिष्ट प्रकारचे सामाजिक वातावरण, संस्था, प्रथा, व्यवस्था धर्म, तत्त्वज्ञान, लिपी, भाषा, कलांचा विकास करून आपली विशिष्ट संस्कृती निर्माण करतो."


"आपल्या राहणीमानामागे जी आपली मानसिक अवस्था जी मानसिक प्रवृत्ती आहे जिचा उद्देश आपले जीवन विकसित करून शुद्ध आणि पवित्र बनविणे हा आहे, आपल्या मनाची प्रगती करणे असा आहे. हीच संस्कृती होय." टायलरच्या मते," सर्व व्यवहार प्रतिमानांच्या समग्रतेला संस्कृती म्हणतात. संस्कृती हा सामाजिक आविष्काराचा परिणाम आहे."


संस्कृती ही काही जड वस्तू नसून एक निरंतर विकास पावणारी प्रक्रिया आहे. समाजाच्या मान्यता, मानवतावादी आदर्श, मूल्यांचे संघटन आहे. वेळोवेळी होणाऱ्या परिवर्तनांना आत्मसात करीत तिचा प्रवाह चालू असतो. संस्कृतीच्या या प्रवाहाला रोखणे हास्यास्पद ठरेल.


आज जग सतत बदलत आहे. या परिवर्तनापासून समाज दूर राहू शकत नाही. संस्कृती सदैव नवी सभ्यता आणि नव्या मान्यतांच्या शोधात असते. समाज बदलासाठी सतत तरसत राहतो. ज्या समाजाने या बदलांची अपेक्षा केली त्यांचे पतन झाले याला इतिहास साक्ष आहे.


संस्कृती आपणास उदार करते. आस्तिकतेच्या छायेत आपले पालन करते. पुरुषार्थायोग्य बनविते. आंतरिक शक्तीला जागृत करण्याची प्रेरणा देते ती आपणास सर्व मानवतावादी गुणांना स्वीकारण्याची प्रेरणा देते. ज्यामुळे आपण श्रेष्ठ जीवन जगू शकू. परोपकार करू शकू. शाश्वत शांती मिळवू शकू. धर्माप्रमाणे आचरण करू शकू.


या संस्कृतीचा स्वीकार करूनच आपण सुसंस्कृत बनू शकतो. - भारताला त्याच्या थोर संस्कृतीमुळे जगद्गुरू म्हणतात. त्याने संपूर्ण जगाला आपल्यासमोर नतमस्तक केले. आपल्या शौर्यामुळे त्याने इथे चक्रवर्ती सम्राट बनविले. 


आपल्या ज्ञान विज्ञानाचा प्रकाश त्याने संपूर्ण जगात पसरविला. धरतीला त्याने 'स्वर्गादपि गरियसी' म्हणून गौरविले, समाजात सुव्यवस्थित शासन स्थापिले. त्याने शिक्षण, चिकित्सा, शिल्प, व्यवसाय कृषि व पशुपालन क्षेत्रात मार्गदर्शन केले. 


याच पावन भूमीवर आत्मजयी योद्धे, गर्भावस्थेतच युद्धशास्त्र शिकणारे अभिमन्यूसारखे वीर, दानवीर कर्ण, चौसष्ट कलांमध्ये पारंगत असलेले, योगिराज कृष्ण, द्रोणाचार्य क्विामित्र, परशुरामासारखे वीर व ज्ञानी ऋषी होऊन गेले. इथेच विश्वकर्मा शतोधनसारखे शिल्पकार होऊन गेले. 


चाणक्य, याज्ञवल्क्यासारखे आचार्य, विदुरासारखे चतुर मुत्सद्दी नीतिमान जन्माला आले. या सर्वांनी भारतीय संस्कृतीचे निरनिराळे पैलू प्रकाशित केले. हे सर्व आपले प्रेरणास्रोत आहेत. संस्कृती आणि समाज परस्परावलंबी असतात. संस्कृतीनुसारच समाजाची जीवनशैली विकसित होते. 


जर समाज उन्नत झाला तर संस्कृतीची ध्वजा फडकेल. जर समाज पडला तर संस्कृती लुप्त होईल. तिचे नामोनिशाणही राहणार नाही. काळाचे क्रूर हात संस्कृती समूळ नष्ट करून टाकतील. म्हणूनच संस्कृतीला समाजाचा अंतरात्मा म्हटले जाते. 


संस्कृतीची निर्मिती शेकडो युगांच्या प्रक्रियेनंतरच होत असते. मानव जी काही आध्यात्मिक, वैज्ञानिक, तात्त्विक प्रगती करतो त्याचा संबंध आपल्या संस्कृतीशी असतो. प्राचीन काळापासून आपण जी जीवनपद्धती स्वीकारली ती आज मानवाच्या विकसित संस्कृतीची परिचय करून देणारी आहे.


संस्कृती म्हणजे जीवनाचा प्रकाश आणि कोमलता आहे. संस्कृती ती जटिल समग्रता आहे ज्यात ज्ञान, विश्वास, कला, आचार, कायदा, प्रथा, यासारखा अन्य क्षमता आणि सवयींचा समावेश असतो. मनुष्य समाजाचा सदस्य असतो. या नात्याने या सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो. 


भारतीय संस्कृती ही जिवंत संस्कृती आहे. ती अजरामर आहे. ती सतत चालत राहण्याचा संदेश देते. भारतीय संस्कृती आणि समाजाचा विकास संघर्ष आणि


परिवर्तनातच झाला आहे. संघर्षाने संस्कृतीला अमरत्व प्रदान केले आहे. आपण आपल्या प्राचीन परंपराही सोडल्या नाहीत व आधुनिकतेच्या उपयुक्ततेलाही नाकारले नाही. विवाह वैदिक पद्धतीने संपन्न होतात व विवाहाचे भोजन प्लेटमध्ये घेऊन चमच्यांनी होते. 


धार्मिक कृत्ये करताना सोवळे नेसतो तर कार्यालयान जाताना कोट, पँट घालतो. आपण पूजा झाल्यावर कपाळावर चंदनाचा टिळा लावतो तर गळ्यातही आनंदाने टाय बांधतो. घरात दिवाळीला दिवे लावतो तर ईदच्या दिवशी एकमेकांची गळाभेट करतो. कवि इकबालच्या शब्दांत


यूनान मिश्र रोमां, सब मिट गए जहाँ से।

कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी॥ 


समाज आणि संस्कृती दोन्ही मानवासाठीच आहेत. दोघांच्या समन्वयात पूर्णत्व आहे. दोन्ही मिळूनच परिपूर्णता निर्माण करू शकतील व आजचा मानवही परिपूर्ण बनेल. दोघांच्या समन्वयाच्या प्रयत्नामुळेच एक असा भारत बनेल जो स्वार्थापलीकडे जाऊन 'बहुजन हिताय बहुजन सुखाय'चा विवेकी संदेश देईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद