साहित्याची उद्दिष्टे मराठी निबंध | SAHITYACHI UDHISTYE MARATHI NIBANDH

 साहित्याची उद्दिष्टे मराठी निबंध | SAHITYACHI UDHISTYE MARATHI NIBANDH 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण साहित्याची उद्दिष्टे मराठी निबंध बघणार आहोत. प्रसिद्ध संस्कृत लेखक कुंतक साहित्याला 'काव्य' म्हणतो व साहित्याची अशी व्याख्या करतो "शब्द आणि अर्थाची अभिन्न अभिव्यक्ती म्हणजे काव्य" यापैकी एक जरी निर्बल असले तरी उत्तम साहित्यनिर्मिती होऊ शकत नाही. 


विश्वनाथ काव्याची व्याख्या करताना म्हणतो "वाक्यं रसात्मकं काव्यं" जगन्नाथाने "रमणीयार्थप्रतिपादकं शब्द काव्यं" अशी काव्याची म्हणजेच साहित्याची व्याख्या केली. प्राचीन काळात काव्य आणि साहित्य हे एकाच अर्थाचे दोन शब्द होते. त्यांच्या उद्दिष्टांचा विचार करताना ही गोष्ट लक्षात घेतली आहे. 


साहित्याचे प्रयोजन काय? हे लक्षात घेऊनच लेखक साहित्य निर्मिती करतो. संस्कृत काव्यशास्त्रात काव्याच्या उद्दिष्टांवर विस्तारपूर्वक चर्चा करण्यात आली आहे. भारतीय जीवनपद्धतीत आध्यात्मिकता प्रबळ असल्यामुळे ऋषि-मुनींनी मनुष्याच्या प्रत्येक कार्याला ईश्वरोन्मुख करण्याचा सल्ला दिला आहे. 


साहित्याच्या संदर्भातही संस्कृत काव्यशास्त्रपंडितांनी धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या प्राप्तीलाच साहित्याचे प्रयोजन मानले आहे. मम्मटाने काव्याची सहा उद्दिष्टे सांगितली आहेत.


"काव्यंयशसेऽर्थकते व्यवहार विदे शिवेत रक्षतये।

सद्यः पर निवृत्तये कान्तासम्मित योपदेशयुजे।" 


अर्थात यश आणि धनाची प्राप्ती, व्यवहार, ज्ञानाची वृद्धी, रोगाचा नाश, आनंदाची प्राप्ती आणि प्रेयसीप्रमाणे मधुर उपदेश हे काव्याचे उद्देश आहेत. गीतेत असे म्हटले आहे की, "तीच व्यक्ती जिंकते जिने यशाला जिंकले." अर्थात धन आणि भौतिक यशच मनुष्याला अनंत काळ जीवित ठेवते. 


तपस्वी तपामुळे, दानी दानामुळे, शूरवीर आपल्या शौर्यामुळे यश प्राप्त करतात. त्याप्रमाणे श्रेष्ठ कवींचा उद्देशही यश मिळविणे हाच असतो. कालिदास, भर्तृहरी, भारवि, प्रेमचंद इ. सर्व लेखक कवींनी यशाच्या इच्छेनेच आपल्या साहित्याची निर्मिती केली. कुणा विद्वानाने म्हटले आहे की, "प्रसिद्धी हाच मोठ्या लोकांचा वीक पॉईंट असतो." 


धनाची तृष्णा ही मनुष्याची जन्मजात प्रवृत्ती आहे. ही तृष्णा कधीही भागत नाही. प्राचीन काळापासून आजपर्यंत मनुष्य धनसंपदेने विभूषित झाला आहे. कवी आणि लेखकही याला अपवाद नाहीत. राजाश्रय असणाऱ्या कवी लेखकांना पुरेशी धनसंपत्ती दिली जात असे. 


अशी आख्यायिका आहे की, शिवाजी महाराजांनी कवि भूषणाच्या एका कवितेवर खुश होऊन त्याला ५१ गावांची जहागीर दिली. आधुनिक काळातही नोबेल पुरस्कारापासून ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत सर्व पुरस्कार लेखकांची यशाची आणि धनाची अशा दोन्ही इच्छांची पूर्ती करतात. 


इतकेच नव्हे तर पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण इ. पदव्यांनी राष्ट्रपती त्यांचा सन्मान करतात. अशा लेखकांच्या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या जातात आणि हे सरस्वतीचे उपासक लक्ष्मीपती बनतात. अनेक लेखकांना लाखो रुपये रॉयल्टीच्या स्वरूपात दरवर्षी मिळतात.


साहित्याच्या संपर्कात राहून वाचकांना लोकव्यवहाराचे ज्ञान होते. त्यांचा विचारांचा स्तर हळूहळू उंचावतो. वेळोवेळी समाजाच्या अहित निवारणासाठी अनेक साहित्यकृती लिहिल्या गेल्या. हे एक संयुक्त उद्दिष्ट होते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद