आमचा गाव मराठी निबंध | aamcha gav marathi nibandh

आमचा गाव मराठी निबंध | aamcha gav marathi nibandh

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमचा गाव मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या गावाचे नाव रांजणे. कोल्हापूर जिल्हयातील हे एक छोटेसे गाव. गाव कसले! एखादी वाडीच! पण आमच्या गावाला अंबाबाईचा वरदहस्त लाभला आहे जणू! गावात एक छोटेसे तळे आहे. 


या तळ्याला बाराही महिने पाणी असते. त्यामुळे आमच्या गावाला मळ्याचेच स्वरूप आले आहे. सगळीकडे हिरवेगार! भरपूर झाडी, कष्टाळू गावकरी. त्यामुळे गावात नेहमीच सुखस्वास्थ्य नांदत असते.


गावाला लाभलेला दुसरा कृपाहस्त म्हणजे श्री. तात्यासाहेब सुर्वे. तात्या लष्करात होते. तेथून निवृत्त झाल्यावर ते गावातच आले आणि त्यांनी सदैव गावाच्या हिताचाच विचार केला. तात्यांनी गावाला वळण लावले. आमच्या गावात संपूर्ण स्वच्छता आहे. कोणीही कोठेही घाण करीत नाही. 


गावात खूप झाडे लावली आहेत. गावातील शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. गावाची सामाईक जमीन सर्व जण मिळून कसतात. तेथे भाजीपाला काढतात. त्यामुळे गाव धान्य, भाजी, पाणी यांबाबत स्वावलंबी आहे. तात्यांनी प्रत्येक घराला गायी, बकऱ्या व कोंबड्या पाळावयास लावल्या आहेत. 


गावातील महिलांचे बचत गट आहेत. त्यांतून स्त्रिया घराला पूरक असे उदयोग करतात. गावात दहावीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे गावातील सर्व मुले शाळेत जातात. तात्यांनी गावासाठी एक समाजमंदिर बांधले आहे. 


तेथे गावकऱ्यांचे व गावकऱ्यांसाठी कार्यक्रम होतात. पूर्ण गाव व्यसनमुक्त व तंटामुक्त आहे. असे माझे गाव हे एक आदर्श गाव आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : वरदहस्त, कृपाहस्त-a favour, blessings. Bाष्टि. कृपा। सुखस्वास्थ्य - happiness and contentedness. सुमसंतोष, सुwild. खुशहाली। सामाईक-common, owned by all. सार्वनि3. सामूहिक। कसतात- (they) cultivate. छे. खेती करते हैं। पूरक-supplementary. ५२७. अतिरिक्त। समाजमंदिर - welfare centre, community hall. सार्वनि समागड. सामुदायिक केंद्र। व्यसनमुक्त-free from vices and addiction to drugs, alcohol, etc. व्यसनमुऽत. नशामुक्त। तंटामुक्तfree from quarrels, disputes. हित, भुत. झगड़ा-फसाद से रहित।]