मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध | Mi Rashtradhwaj Boltoy Essay In Marathi

 मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध | Mi Rashtradhwaj Boltoy Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. "मित्रांनो, मी राष्ट्रध्वज बोलतोय. आज भारतीय खेळाडूंनी जागतिक विक्रम केला आहे, तेव्हा आनंदाने बेभान झालेले तुम्ही सर्वजण मला नाचवत आहात. 


तुमच्यापैकी काहीजणांनी तर आपल्या गालावर, कपाळावर मला रंगवून घेतले आहे. या तुमच्या कृतीतून तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे, हेच लक्षात येते. "मुला, माझा फार मोठा उज्ज्वल इतिहास आहे. मी या विशाल देशाचे प्रतीक आहे. 


या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी प्रयत्न केले, त्यांच्या सर्व प्रयत्नांत मी अग्रभागी असे. माझा अपमान म्हणजे राष्ट्राचा अपमान. म्हणून मला कधीही फाटक्या स्थितीत वा उलटा लावू नका. माझ्यावर कधीही पाय देऊ नका. "बरोबर शंभर वर्षांपूर्वी भारताच्या बाहेर मादाम कामा यांनी मला एका वेगळ्या रूपात निर्माण केले होते. १९२० मध्ये महात्मा गांधीजींच्या लढ्यात मी तिरंगा झालो. 


या तिरंग्यावर चरखा शोभू लागला. स्वातंत्र्यलढ्यात या तिरंग्यासाठी म्हणजे माझ्यासाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यांच्या आठवणींनी माझे मन भरून येते. "मुला, माझ्यावर जो हा केशरी रंग आहे, तो देशभक्तीचे प्रतीक आहे. 


पांढरा रंग शांतताप्रिय आणि मांगल्य सूचित करतो आणि हिरवा रंग आमच्या समृद्धतेचा दर्शक आहे. माझ्या अंगावरील हे निळे चक्र सम्राट अशोकाचे आहे. आमचे राज्य धर्म, नीती आणि प्रगती यांच्या पथावर आहे असेच ते सुचवते.


"मित्रांनो, माझा लौकिक कायम टिकवणे हे तुमच्या हातात आहे. कोणत्याही क्षेत्रात जेव्हा तुम्ही प्रगती करता, उत्तुंग यश मिळवता तेव्हा माझा लौकिक वाढतो. आज आंतरराष्ट्रीय विश्वात, प्रत्येक क्षेत्रात भारत यश मिळवत आहे; 


तेथे तेथे मी डौलाने फडकतो. आपले जवान एवढ्या कठीण परिस्थितीत भारताचे रक्षण करीत असतात तेव्हा तेथेही मी त्यांना साथ करीत असतो. कारण मी स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज आहे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

[शब्दार्थ : प्रतीक-a symbol. प्रती. प्रतीक, चिह्न। समृद्धता-prosperitv. सद्धि. समृद्धि। दर्शक - indicative. सूय5. दर्शाने वाला, सूचक। लौकिक-renuitne tion. प्रतिष्ठा. प्रतिष्ठा, ख्याति। उत्तुंग यश-towering success. भान सिद्धि. महान सफलता।]