वर्तमान पत्र बंद झाली तर मराठी निबंध | vartman patra band zali tar essay in Marathi

 वर्तमान पत्र बंद झाली तर मराठी निबंध | vartman patra band zali tar essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वर्तमान पत्र बंद झाली तर मराठी निबंध बघणार आहोत. आज सात दिवस झाले, कोणतेही वृत्तपत्र वाचायला मिळत नव्हते; कारण वृत्तपत्रांचा संप चालू होता. आकाशवाणी, दूरचित्रवाणी यांवर बातम्या कळत होत्या, पण वृत्तपत्राच्या वाचनाशिवाय सकाळचा चहा गोड वाटत नव्हता.


वृत्तपत्र हे आजच्या युगातील, विश्वातील सर्व घटनांची माहिती देणारे फार महत्त्वाचे साधन आहे. आकाशवाणी, दूरचित्रवाणी ही सर्वांना परवडणारी अशी साधने नाहीत. पण अगदी गरिबातला गरीब माणूसही सार्वजनिक वाचनालयातील वृत्तपत्रे वाचू शकतो. 


तर निरक्षर माणूसदेखील साक्षराकडून वृत्तपत्र वाचून घेऊन जगातील घडामोडी समजावून घेऊ शकतो. वृत्तपत्रे ही समाजाचा आरसा असतात. म्हणजे समाजात घडणारी प्रत्येक गोष्ट वृत्तपत्रांत दिसून येते. वृत्तपत्रे समाज घडवतात. जेव्हा आपला देश गुलामगिरीत होता, तेव्हा वर्तमानपत्रांनी फार मोलाची कामगिरी बजावली. 


वृत्तपत्रे समाजातील वाईट रूढींवर टीका करतात. वर्तमानपत्रे नसती तर हे काम कोणी केले असते? वर्तमानपत्रे नसलेल्या देशात समाजजागृती होणार नाही. जगात घडणाऱ्या नव्या घटना, नवे शोध यांची माहिती वर्तमानपत्रांशिवाय सामान्य लोकांना कोण देणार? 


वर्तमानपत्रांमुळे आपल्याला इतरही अनेक गोष्टी कळतात. ठिकठिकाणी होणारे सोहळे, समारंभ यांच्या बातम्या वृत्तपत्रे देतात, त्याचप्रमाणे वर्तमानपत्रांतील जाहिरातीमुळे विविध गोष्टींची माहिती होते. नोकरीच्या जाहिराती, लग्नाच्या जाहिराती, 'हरवलासापडला' या सदरातील जाहिराती. वर्तमानपत्रे नसल्यास त्या कोठे प्रसिद्ध होणार?


वर्तमानपत्रांमुळे सारे जग जवळ येते. जगाच्या एका कोपऱ्यात घडलेल्या दुर्घटनेची वार्ता वर्तमानपत्रांतून ताबडतोब साऱ्या जगभर पोहोचते व साऱ्या जगातून मदतीचा ओघ येऊ शकतो. अशा प्रकारे मोठी कामगिरी वर्तमानपत्रे करतात. अशी ही वर्तमानपत्रे जर नसती तर जगाकडे पाहण्याची खिडकी कायमची बंद झाली असती.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद[शब्दार्थ : चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते-was feeling that something was missing. पोट सासती ती. खाली-खाली सा लग रहा था। मोलाची कामगिरी बजावलीdid a valuable job. भूट्यवान समगीरी वी. मूल्यवान भूमिका निभाई। पारतंत्र्याविषयी तीव्र चीड-great anger for the foreign rule. परतंत्रता भाटे तीव्र गुस्सो. परतंत्रता के बारे में तीखा गुस्सा। वाईट रूढींवर टीका-criticism of bad customs. ५२।७ ३ढियोनी टी.डी. बरी रूढ़ियों की आलोचना। समाजजागृती- social awakening. सामा४िागति. सामाजिक जागरण। सदरातील-in the column. रोमां. स्तंभ में।