आरोग्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी मराठी निबंध | Aarogyachya Ghari Laxmi Pani Bhari Marathi Nibandh

 आरोग्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी मराठी निबंध | Aarogyachya Ghari Laxmi Pani Bhari Marathi Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आरोग्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी मराठी निबंध बघणार आहोत. वडीलमाणसांना नमस्कार केला की ती आशीर्वाद देतात 'शतायुषी व्हा!' आजी असेल तर म्हणते 'कापसासारखा म्हातारा हो.' याचा अर्थ दीर्घकाळ जगा. पण नुसता आशीर्वाद काय कामाचा? त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे 


पुष्कळ वेळा काय होते की, माणसे यंत्रांची, वाहनांची, घरातील मौल्यवान वस्तूंची खूपच काळजी घेतात. त्या घासूनपुसून, तेलपाणी देऊन तंदुरुस्त ठेवतात. पण याउलट आपल्या स्वत:च्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. हे अगदी चुकीचे आहे. 'शिर सलामत तो पगडी पचास.' आपण धड असू तरच आपल्याला सर्व गोष्टींचा उपभोग घेता येईल.


शरीर हे सुद्धा यंत्रच आहे. त्याचे अनेक अवयव आहेत. तेव्हा अशा या मौल्यावान दागिन्याची अतिशय काळजीपूर्वक जपणूक केली पाहिजे. नखांपासून ते केसांपर्यंत सर्वांची काळजी घेतली पाहिजे. नखे वेळचेवेळी कापली पाहिजेत. केस दिवसातून दोन वेळा विंचरले पाहिजेत. 


दात रोज दोनदा घासले पाहिजेत. रात्री झोपताना तर घासण्यास कधीच विसरता कामा नये. आंघोळ, सर्व अवयव घासून, रोज केली पाहिजे. दोन वेळा खाणे व दोन वेळा जेवण वेळेवर घेतले पाहिजे. ऋतुमानाप्रमाणे सर्व पदार्थ जिभेला रुचले नाहीत तरी खाणे गरजेचे आहे. रोज एक फळ खाणे चांगले. म्हणून तर म्हणतात, "An apple a day keeps to doctor away.'


समतोल आहाराइतकेच नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. शारीरिक कसरती करणे व पायी चालणे याने आरोग्य चांगले राहते. आहाराइतकेच विहाराला महत्त्व आहे. एक श्रीमंत असतो. त्याला डोळे नसतात. एकदा एक भिकारी 'देवाने मला काही दिले नाही. कोणी मला पैसे देता का? 


पोटाला द्या काहीतरी.' असे ओरडत चाललेला असतो. श्रीमंत मनुष्य नोकराकडून भिकाऱ्याला बोलावतो. श्रीमंत भिकाऱ्याला म्हणतो, 'माझ्याकडे खूप पैसा आहे, पण मला डोळे नाहीत, तुझ्याकडे पैसे नाहीत पण डोळे आहेत. तेव्हा तुझा एक डोळा मला दे. 


मी तुला तू मागशील तितके पैसे देतो.' भिकारी खूष झाला. म्हणाला, 'द्या मला पन्नास हजार.' श्रीमंत तयार झाला. भिकाऱ्याला वाटले, आपण भाव करण्यात चुकलो. तो म्हणाला, 'नाही. नाही. दोन लाख द्या.' तरी श्रीमंत तयार. शेवटी भिकाऱ्याला डोळ्याची किंमत करताच येत नाही.


देवाने आपल्याला श्रीमंती दिली नाही तरी सुदृढ अव्यंग शरीर दिले आणि हे शरीर म्हणजेच संपत्ती आहे हे त्याच्या लक्षात आले. म्हणूनच इंग्रजीत 'Health is Wealth' 'आरोग्य हेच ऐश्वर्य' असे म्हणतात ते योग्यच आहे.


असे म्हणतात की, 'निरोगी शरीरात निरोगी मन राहते.' 'हसा आणि लठ्ठ व्हा.' म्हणजेच आपण नेहमी आनंदी राहिले पाहिजे. त्यासाठी मनाला ठराविक वळण लावले पाहिजे. सद्विचारांची जोपासना करण्यास आपण शिकले पाहिजे. आपले विचार सकस असावेत. त्यासाठी चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिले पाहिजे. 


उत्तम उत्तम विचारप्रवर्तक साहित्य आपण वाचले पाहिजे. मनात सत्य, सुंदर, मंगलाची स्थापना करून ते निर्मळ, निरोगी राखण्याचे प्रयत्न जाणूनबुजून करायला हवेत. गजराशिवाय लवकर उठण्याची सवय मनाला लावली पाहिजे. पूर्वी असे म्हणत, 'लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती भेटे.'.


खरोखरच, ज्याचे मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम असते तो अभ्यास चांगल्याप्रकारे करू शकतो. खूप कष्ट करून नावारूपास येतो. यश, कीर्ती, पैसा सर्व गोष्टी त्याला साध्य होतात.दीर्घायुषी लोक सुद्धा त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना आहार व विहार यातील नियमितपणा, छंद, खेळ, वाचन, सतत उद्योग इ. गोष्टींचा उल्लेख आवर्जून करतात. 

ज्याला उत्तम आरोग्य लाभते तो चारचौघात उठून दिसतो. त्याला आरोग्याने निखळ सौंदर्य प्राप्त होते. म्हणूनच 'आरोग्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी' म्हणतात ते खरे नाही का?मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

आरोग्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी मराठी निबंध | Aarogyachya Ghari Laxmi Pani Bhari Marathi Nibandh


एका धनसंपन्न राजाची गोष्ट आहे. सतत आजारी असलेला हा राजा एकदा दिवसभर नगराबाहेरील उद्यानात बसून राहिला. तेथे त्याने काबाडकष्ट करणाऱ्या कामगाराला पाहिले, अतोनात शारीरिक कष्ट करणारा दपारी चटणी-भाकरी खाऊन तृप्त झालेला तो कामगार आरोग्याने संपन्न होता. राजाला त्याचा हेवा वाटला.


 खरोखरच आरोग्यपूर्ण शरीर ही फार महत्त्वाची देणगी आहे. जन्मत:च निरोगी असणे तर फार उत्तमच; परंतु उपजतच दुर्बल असलेल्या बालकांनाही योग्य उपचार व आहार यांच्या योगे सुदृढ करणे शक्य असते. वाढत्या वयात नियमित खाणे, खेळणे व व्यायाम यांची गरज असते. 


बाल्यावस्था, किशोरावस्था व तारुण्य या टप्प्यांनी मुलांची वाढ होत असते. केवळ - महागडी फळे, सुकामेवा खाऊनच आरोग्य राखता येते असे नाही. पेरू, बोरे, कंदमुळे, कच्च्या भाज्या, कोशिंबिरी सामान्य माणसांना परवडतात. पूर्वी ऋषी कच्ची कंदमुळे खाऊन उपजीविका करीत असत. 


त्यामुळे ते खरोखरच आरोग्याने रसरसलेले होते. आता आपण शिजवलेले अन्न खातो. अन्न शिजवले की त्याचा कस कमी होतो. दुसरे असे की मोकळ्या हवेत खेळणे, फिरणे, व्यायाम करणे, योगासने करणे याचा आरोग्यवर्धनासाठी चांगला उपयोग होतो.

आज क्रीडाक्षेत्रात गाजलेले लिंबाराम, पी.टी. उषा इत्यादी भारतीय व परदेशीय खेळाडू पाहिले तर असे दिसते की नियमित आहार-विहारामुळे त्यांचे शरीर सुदृढ झालेले आहे. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' हे वचन हेच दर्शवते की उत्तम शरीर हे धर्माचे साधन आहे. येथे धर्म म्हणजे आपले कर्तव्य. 


कोणतेही कर्तव्य, मग ते अभ्यास असो, नोकरी असो वा अन्य असो, ते पार पाडताना सुदृढ असणे जरुरीचे आहे. 'Sound mind in a sound body' हे वचनही तेच दर्शविते. वैभवाच्या राशीत लोळणाऱ्या धनिकाला जर रोगाची बाधा असेल तर त्या वैभवाचा उपयोग काय?


थोडक्यात, शरीर निरोगी असणे फार महत्त्वाचे. आरोग्याचे घरी लक्ष्मी पाणी भरी.' याचा अर्थ शब्दश: घ्यायचा नाही. आरोग्य तेथे लक्ष्मी म्हणजे आरोग्य तेथे स्वास्थ्य असते. मनाची शांतता असते. निरोगी माणसाला अनेक क्षेत्रे उपलब्ध असतात. 


'सर्वे सन्तु निरामयाः।' अशी एक प्रार्थना केली जाते, त्यामागे सामाजिक आरोग्य चिंतिलेले आहे. लागत नाहीत. म्हणून तर म्हटले आहे Money savedmoney carned: पैसे राखणे म्हणजे पैसे मिळवण्यासारखेच आहे. बचतीची सवय म्हणन तर लहानपणापासून लावणे आवश्यक बनून जाते. 


संचयिका' यासाठीच आहे. खाऊचे पैसे साठवा. संचयिकेत भरा, थेंबे थेंबे तळे . साचते यासारखेच आहे ते. बचत सर्वच क्षेत्रात करावयाची आहे. बचतीची एक नवी व्याख्या केली जाते. 'नासाडी टाळणे म्हणजेच बचत करणे होय.' याचा अर्थ उधळपट्टी थांबवणे हाच आहे. मग ते अन्न असो वा पेट्रोल.