विद्यार्थी आणि शिस्त मराठी निबंध | VIDYARTHI ANI SHIST NIBANDH IN MARATHI.

 विद्यार्थी आणि शिस्त मराठी निबंध | VIDYARTHI ANI SHIST NIBANDH IN MARATHI.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  विद्यार्थी आणि शिस्त  मराठी निबंध बघणार आहोत. पुण्याच्या एका चित्रपटगृहाची गोष्ट. तेथे एका शाळेतल्या मुलांना मोफत चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपट संपल्यावर पाहतात तर सुमारे २०० सोफा खुर्त्यांच्या बैठका ब्लेड, चाकू मारून फाडलेल्या होत्या ! 


शाळेला अडीच हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागली. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दंड वसूल केला. पालकांनी पैसे भरले, वर विनंती केली, मुलाचे नाव काढू नका आणि काढलेत तर वर्तन-वाईट असा शेरा देऊ नका.


'मुलाचे वर्तन सुधारेल अशी आम्ही हमी घेऊ' असे कोणी म्हणायला तयार नाही. अशा विद्यार्थ्याला स्वतःला तर यात काही लाजच वाटत नाही. 'आमचे कोण काय वाकडे करणार? आम्ही पैसे भरायला तयार आहोत, ही वर मिजास !पण केवळ पैसे भरून हा प्रश्न सुटतो का ? सर्वच विद्यार्थी असे नसतात. 


चांगले, विद्यार्थी, हशार अभ्यासू विद्यार्थी जसे पूर्वी होते तसेच ते आताही आहेत. त्याचप्रमाणे बेशिस्त विद्यार्थी जसे आता दिसतात तसे पूर्वीही होतेच ! पण बेशिस्त म्हणजे कसे? शिस्त म्हणजे तरी काय ? शिस्त म्हणजे वर्तनाची विशिष्ट रीत. 


मुलांना लावलेले चांगले वळण. लवकर उठणे, रोज शाळेत जाणे, रोजचा अभ्यास नियमितपणे करणे, याबरोबरच खरे बोलणे, प्रामाणिकपणा, गुरुजनांबद्दल आदर, हे सारे सद्गुण ! असतील असे नाही पण....अभ्यासूवृत्ती, विनयशीलता, जबाबदारीची जाणीव आणि प्रामाणिकपणा ही खऱ्या यशस्वी विद्यार्थ्याच्या जीवनाची चतुःसूत्री आहे.


असे आदर्श विद्यार्थीही असतात...पण हाताच्या बोटावर मोजण्याएवढे ! या उलट विद्यार्थ्याच्या बेशिस्तीचे नमुने किती सांगावेत ?शाळेत उशिरा येणे, दांड्या मारणे, मधल्या सुट्टीनंतर पळून जाणे, हे प्रकार तर भोळेभाबडेही करतात. फीचे पैस गडप करणे, 


प्रगतिपुस्तकातले मार्क बदलणे, शाळेत वा शाळेबाहेर मारामाऱ्या करणे....रोज शाळेतून मधल्या सुट्टीमध्ये पळून जाऊन पिक्चर पाहणे, . हॉटेलात पाट्या झोडणे हे त्यातले वरच्या वर्गातले प्रकार ! विद्यार्थ्याचे चित्रपट, रेडिओ सिलोन, टीव्ही (आणि आता यांच्या जोडीला व्हिडीओ व केबल टी.व्ही.) यांचे वेड किती टोकाला पोचले आहे ! 


या सर्वावर ताण क्रिकेटचे खूळ ! डोक्यात ही अनिवार्य खुळे भरलेला विद्यार्थी अभ्यास कसा करणार ?....त्याला अभ्यासाला वेळ कुठे आहे ? पण मुलाला एकट्यालाच दोष काय देणार ? नगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा इथे सध्या काय चाललेय ? पूर्वी राजकन्या पळवून नेल्या जात. 


आता आमदारांना पळवले जाते ! मोठ्यांची ही कथा ! छोट्यांना काय शिकवणार ? दुसरा मुद्दा महत्त्वाचा. शिस्त लावणाऱ्याला मुद्दाम काही खास अधिकार हवा : आणि बेशिस्त व असभ्य वर्तनाबद्दल शिक्षा हवी. जोपर्यंत बेशिस्त वर्तनाबद्दल शिक्षा होत नाही तोपर्यंत सुधारणा होणे कठीण आहे.


रस्त्यात मुलींची टिंगलटवाळी करणाऱ्या सडक-सख्याहरींना त्यांचे अर्धे केस मुंडण करून पाठविण्याची शिक्षा एक पो. सबइन्स्पेक्टर करीत असे. त्यामुळे या प्रकाराला आळा बसला होता. जालीम रोगावर उपायही जालीमच हवा ! आग जर इतर उपायांनी विझत नसेल तर ती आगीनेच मारली पाहिजे !