कुंभार मराठी निबंध 10 ओळी | Kubhar 10 lines essay in marathi

 कुंभार मराठी निबंध 10 ओळी | Kubhar 10 lines essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कुंभार मराठी निबंध बघणार आहोत.  मातीच्या वस्तू बनविणाऱ्याला कुंभार म्हणतात. कुंभार मातीच्या वस्तू बनवितो. 


घर बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा, कुंड्या, मातीची खेळणी, नक्षीची भांडी कुंभार बनवितो. 


मातीला हवा तसा आकार देऊन त्यावर तो कलाकुसरीचे काम करतो. प्रथम माती आणून भिजवून चांगली तुडवितो. माती मऊ झाल्यावर त्याचे गोळे करून फिरत्या चाकावर ठेवतो. 


चाक फिरत असतानाच त्याला हवे तसे आकार देतो. त्या वस्तू भट्टीमध्ये घालून भाजतो. म्हणजे त्या पक्क्या होतात.


कुंभाराचे काम खूप कष्टाचे असते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद