छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध 10 Lines Essay On Shivaji Maharaj in Marathi

 छत्रपती शिवाजी महाराज  मराठी निबंध 10 Lines Essay On Shivaji Maharaj in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज  मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १६२६ साली झाला. त्यांचे गुरू दादाजी कोंडदेव होते. 


त्यांच्या गुरूंनी व त्यांची आई जिजामाता ह्यांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. अन्याय व जुलूम याबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण केली. त्यांचे स्वदेशावर व स्वधर्मावर प्रेम होते. 


जुलमी सत्ते विरूध्द लढण्यासाठी त्यांनी माळव्यांना एकत्रित केले शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते , शूर व धाडसी होते. इ. स. १६६४ मधे रायगड येथे त्यांना मोठ्या थाटात राज्याभिषेक करण्यात आला.


थोर व पराक्रमी शिवराया इ. स. १६८० साली मरण पावले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2
 
छत्रपती शिवाजी महाराज  मराठी निबंध 10 Lines Essay On Shivaji Maharaj in Marathi


शिवाजी महाराजांचा जन्म सन १६३० मध्ये जिजाबाईंच्या पोटी झाला. त्यावेळी महाराष्ट्रातील सुलतानी राजवटीमुळे सामान्य जनता त्रासून गेली होती. त्यामुळे शिवाजी महाराज म्हणजे जनतेला अगदी देवदूतासारखे वाटत होते.


 8लहानपणापासून शिवाजी महाराजांना लुटुपुटूची लढाईखेळणे फारच पसंत होते. महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनी त्यांना दांडपट्टा खेळणे, भालेबरची चालविणे, वगैरे सर्व प्रकारचे शिक्षण दिले. जिजाबाई त्यांना रामायण-महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगत असत. 


त्यामुळे त्यांच्या बालमनावर अतिशय चांगले संस्कार ठसविले गेले. नीतिमत्तेने राजकारण कसे करावे, सावधपणे कसे राज्य चालवावे या सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना लहानपणापासून मिळाले होते. 


बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, तानाजी, येसाजी असे अनेक शूर मावळेसाथीदार म्हणून लाभलेहोते. यासवंगड्यांबरोबर त्यांनी रोहिडेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली होती. 


आपल्या शूर मावळ्यांच्या मदतीनेच महाराजांनी स्वराज्याचा भगवा झेंडा महाराष्ट्रामध्ये मोठ्या डौलाने फडकवला. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद