हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध | Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh

 हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध | Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध बघणार आहोत. “स्त्री जन्मा तुझी कहाणी


हृदयी अमृत नयनी पाणी ।

तुझीया पोटी अवतरती नर

अन्यायच ते करिती तुजवर

दशा तुझी ही केविलवाणी । । ”



ऋषी-मुनींच्या काळापासून भारतीय स्त्रीयांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. 'माते पेक्षा दैवत दुसरे कोणतेही नाही' असे सांगितले जाते असे असले तरी खरच स्त्रीयांना एवढे सन्मानाने वागविले जाते का? एक प्रसंग, आई मला रागावत होती. ती रागाच्या भरात म्हणाली होती की त थोडीच तू माझ्या पोटची पोर आहेस? 


तुला मी भाकरीच्या तुकड्यावर विकत घेतली आहे. मला आईने भाकरीच्या तुकड्यावर विकत घेणं आजही चांगले आठवते. माझ्या या प्रसंगातला राग 'विकत घेणं' या शब्दांवर होता. ज्या माणसाचा जीव जडला आहे एखाद्या वस्तूची विक्री मग ते झाड असेल, घर असेल किंवा एखादा प्राणीही असू शकेल पण माणसाला विकत असतील म्हणजे काय? हुंडा घेणे-देणे या स्वरूपाचेच नव्हे काय?


सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजात सुद्धा मुलं मुली अत्यंत हुशारीने बाजारात आणली जातात आणि विकली जातात. इथे बाजारासारखे सर्व व्यवहार घासाघासीत करून होत असेल तरी याला सौदेबाजी न म्हणता परस्पर संमतीने होणारी 'देवाणघाण' असे म्हणतात. 


लग्न या व्यवहारात वधू आणि वर दोघेही विकली जातात. सर्वसाधारणपणे मुलीकडूनच मुलीकडे 'हुंडा' दिला जातो. मुलीकडून हुंडा मागणारा मुलगाही स्वतःची एक प्रकारे विक्रीच करीत असतो म्हणून सद्याच्या लग्न पद्धतीत. दोघांची खरेदी विक्रीच होत असते.


लग्नाच्या व्यवहारात जिची देवघेव होते मी मुलगी म्हणजे जिवंत माणूस असते या व्यवहारात देवघेवीचे नितीनियम धाब्यावर बसवून जिची देवघेव होते ती मुलगी म्हणजे माणूस असते ती वस्तू नव्हे. वस्तू घेणाऱ्यालाच वस्तू देणारा, वस्तूच्या जोडीलाच वर मोबदला देत असतो. 


साध्या बेरीज आणि वजाबाकीचा हिशोब केला तरी लग्नानंतर मुलगी सासरी जाते म्हणजेच पडते. म्हणजेच जिवंत मन, शरीर असलेल्या एक माणसाला वस्तू बनवून एक अमिष म्हणून मुलीबरोबरच हुंडा द्यायचा याचाच अर्थ असा की मुलगी एक दान देण्याची वस्तू आहे. तिची योग्यता कमी म्हणून 'हुंडा' द्यावा लागतो.


मोठमोठ्या बँकाच्या जाहिराती मुलाच्या भवितव्याचा विचार म्हणजे शिक्षणासाठी बचत तर मुलीच्या भविष्याचा विचार म्हणजे लग्नखर्चाची तरतूद असे चित्र रंगवलेलं असते हे लिहिणाऱ्याला वाचणाऱ्याला याची बोच नसते. नवरा-बायकोचे बिनसणे, 


मुलींकडून लग्नात कमी हुंडा मिळाला त्यामुळे मुलीचा छळ होणे, तिचा खून करणे पतीच्या जाचाला कंटाळून तिनेच आत्महत्या करणे. असले प्रकार तरी काय सांगतात. परंतु हे प्रकार तरी कुठपर्यंत खुशीचे आणि नाखुशीचे हे ठरविणे अवघडच आहे.


संस्कृतीने या सव अमानुष व्यवहाराला सोन्याचा मुलामा दिला आहे. त्याग, समर्पण इ. शब्दांची झुंबरे लावून स्त्रियांना मखरात बसवून त्यांची पूजा बांधली आहे. माणसाला देव्हाऱ्यात वसवणं हा माणसाचा सन्मान की माणसूपणाचे हक्क आणि संवेदनशीलता गोठवून टाकणारा तो, सुंदर तुरूंग आहे. याचा विचार स्त्री-पुरुषांनी करायला हवा आहे.


हुंड्याचे समर्थन करणारी मुले सांगतात पुढे त्या मुलीला जन्मभर पोसावे लागते म्हणून . 'हुंडा'. म्हणजे बघा, मुलीला सासरी जाताना शिकवायचं, दोन घराण्याचं मिलन, घराची तू गृहलक्ष्मी आणि प्रत्यक्षात आपलं नाव गाव सगळ मागे ठेवून घराचा घटक होणाऱ्या मुलीला आम्ही पासते हा दावा मुलानं करावयाचा. मुलांचा जन्म, संगोपन आहे नवऱ्याची देखभाल, सेवाशुश्रुषा हे सारं काम करणाऱ्या मुलीची किंमत काय तर नवरा तिला पोसतो.


मुलाच्या शिक्षणासाठी होणारा खर्च म्हणून 'हुंडा', आजकाल मुलीही शिकलेल्या असतात मग दोघं एकमेकांना शिक्षणाचा खर्च देऊ करतील काय? अहो ज्याना शिक्षणाचा फायदा मिळतो त्यानं त्याची किंमत भरावयाची हा साधा न्यायही इथे डावलला जातो.


हुंड्याचं समर्थन करणारे म्हणतात आजकाल जागेचा प्रश्न बिकट आहे म्हणून 'हुंडा' मग लग्नानंतर त्या जागेत फक्त नवरा राहणार की नवरा-बायको राहणार? जागेची अडचण म्हणून हुंडा किंवा जागेचं डिपॉझिट म्हणून हुंडा. विवाहानंतरचे सहजीवन त्यात अपेक्षित आहे त्यातला पैशाचा बोझा मुलीकडच्यावर टाकण्यात अर्थ काय ?


काही लोक 'वरदक्षिणा' म्हणून हुंडा घेतात त्याच संबंध स्त्रियांच्या वरसा हक्काशी लावतात. मुलगी आई वडिलांचे घर सोडून अली तिनं आपला न्याय वारसा हक्क सोड नये हे खरे पण हा हक्क लग्नाच्या वेळी वसूल करण्याची घाई का ?


आई-वडिलांचे मन मोडू नये यासाठी हुंडा मान्य करणारा मुलगा आणि वडिलांना परवडते म्हणून हुंड्याला हरकत न घेणारी मुलगी दोघेही वयानं लहान असली तरी अजाण बाळेच आहेत. शिवाय फ्रीज, टी.व्ही. सारख्या हजाराच्या किमतीत मूल्य करणं ही अत्यंत अपमानास्पद गोष्ट आहे. 


जिथे मानवी मने भावभावना आहेत त्या व्यवहाराचा संबंध मानवी भावनेशी निगडत आहे तिथे हुंडा देणे घेणे अन्यायकारकच आहे नव्हे अपमानास्पद आहे असेच म्हणावे लागेल ? 'हुंडा' ही वरच्या वर्गातून खाली झिरपत जाणारी सामाजिक समस्या बनली आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद