शब्दचित्रामक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शब्दचित्रामक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

essay on camel in marathi | उंट मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण उंट मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात उंटाबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

essay-on-camel-in-marathi
essay-on-camel-in-marathi



उंट हा एक विचित्र प्राणी आहे. हा मूळत: भारतात सापडणारा प्राणी नाही. इ. स. पूर्व चौथ्या शतकात ग्रीक आक्रमकांबरोबर खैबर खिंडीमार्गे तो भारतात आला. भारताच्या वाळवंटी प्रदेशात तो मोठ्या प्रमाणावर सापडतो. त्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. आज वाळवंटातील जीवन त्याच्याशिवाय अपूर्ण आहे.

उंटाला चार पाय, दोन, डोळे, शेपटी पाठीवर कुबड व लटकत असलेले ओठ असतात. वाळवंटात जेव्हा जोराचा वादळी वारा सुटतो तेव्हा नाकात वाळू जाऊ नये म्हणून तो नाकपुड्या बंद करून घेतो. उंटाचे गुडघे आणि मान कडक असते त्यामुळे त्याचा घर्षणापासून बचाव होतो. जाड ओठांमुळे तो वाळवंटातील काटेरी झाडा-झुडुपांची पाने खाऊ शकतो. त्याला ३४ दांत असतात.



उंट एका दिवसात ३६ लिटर पाणी पितो. जर त्याला खाण्यासाठी ताजी पाने मिळाली तर चार लिटर पाणी तो कमी पितो. उंटाच्या पोटात एक मोठी पिशवी असते तिला मदारी म्हणतात. त्यात तो अन्न व पाण्याची साठवण करतो. म्हणून खूप दिवस तो बिना अन्न पाण्याचा राहू शकतो. ताजी पाने खाल्ली तर त्याची पाण्याची गरज आणखी कमी होते. वाळवंटात उंट हे सर्वात उपयुक्त वाहन आहे.


उंटाचे केस वस्त्रोद्योगात वापरले जातात. त्यापासून लोकर, दोरी, कोट, पिशव्या इ० तयार केले जाते. ओझे वाहण्यास, स्वारी करण्यास, शेती कामात उंटाचा उपयोग होतो. युद्धातही उंटांचा उपयोग होतो. २६ जानेवारीस सैनिक उंटावर बसून येतात ते आपण T.V. व इंटरनेट वर पाहतो. समुद्रकिनारी किंवा प्राणीसंग्रहालयात उंटावरुन फेरी मारण्याचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे उंट हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

essay on camel in marathi | उंट मराठी निबंध

peacock essay in marathi | राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात मोराबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

peacock-essay-in-marathi
peacock-essay-in-marathi




मोर हा वनातील एक अत्यंत सुंदर, सावध, लाजाळू पण चतुर पक्षी आहे. भारत सरकारने १९६३ मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यास राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. सौंदर्याचे हे मूर्त रूप साऱ्या भारतीयांना फार आवडते. कवी कालिदासाने त्या काळात मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिला होता.



मोर जेव्हा बेधुंद होऊन नाचतो तेव्हा आपली शेपटी उंचावून पंख्यासारखी पसरवितो. हे दृश्य पाहुन भान हरपते. मोराचे शरीर अनेक रंगांचे असते. त्या रंगांच्या छायांचे एक अद्भुत मिश्रण असते. गळ्याचा आणि छातीचा रंग निळा असतो. गळ्याच्या निळेपणावरून संस्कृत कवी त्याला 'नीलकंठ' म्हणतात.



मोर सामान्यपणे पावसाळ्यात नृत्य करतो. खूप लांबून येणाऱ्यांचा आवाज तो ऐकू शकतो. उन्हाळ्यात मोर सुस्तावतात. मोर सापांना मारून खातो. मोर माणसाला त्रास देत नाही. हा सावध आणि भित्रा पक्षी आहे. सामान्यतः कळप करून रहातो. धान्य, किडे व काही भाज्या हे त्याचे अन्न होय. तो काही ऊंचीपर्यंत व अंतरापर्यंतच उडू शकतो. शत्रुपासून बचाव करण्यासाठी त्याला लांब, बारीक परंतु बळकट पाय मिळालेले आहेत.


मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. असा हा आपला राष्ट्रीय पक्षी आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अनेक मंदिरात देवाला मोरपिसे वाहतात. सजावटीसाठी मोरपिसांना मागणी असते. फुलदाणीत ही मोरपिसे लावतात. त्याचे पंखेही बनवितात. त्याने वारा घेता येतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

peacock essay in marathi | राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध

 lion essay in marathi | जंगलचा राजा सिंह मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलचा राजा सिंह मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात सिंहाबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

lion-essay-in-marathi
lion-essay-in-marathi



सिंह हा मांजराच्या कुलातील जंगलात रहाणारा हिंस्त्र प्राणी आहे. फिकट तपकिरी रंगाचा हा प्राणी खरोखरच जंगलचा राजा आहे. त्याची ती डौलदार चाल, मानेभोवतीची दाट आयाळ आणि धीरगंभीर गर्जना मनाला भुरळ घालते. 


सिंह बहुधा कळप करून रहातात. त्याचे आयुष्य साधारण: २५ वर्षे असते. सिंह हे सिंहीणीपेक्षा मोठे असतात व त्यांना आयाळ असते. सिंहाच्या बछड्यांना छावा म्हणतात. जंगलात सिंहाचे क्षेत्र ठराविक असते. या ठराविक क्षेत्रातच ते फिरतात व शिकार मिळवितात. सिंह मुख्यतः भारत व मध्य आशियात आढळतात.


सिंह मासाहारी असतो म्‍हणजेच सिंह दुसऱ्या जंगली प्राण्यांना मारुन खातात. हरणे, कोल्हे, झेब्रा, काळविट हे त्यांचे भक्ष होय. आजकाल जंगले कमी-कमी होत चालल्याने त्यांचे हे नैसर्गिक अन्नही कमी होत आहे. मग हे भुकेले सिंह जंगलांजवळच्या गावातील बैल, गाय, शेळ्या यांसारखे पाळीव प्राणी मारतात. कधी-कधी ते नरभक्षक ही बनतात. सिंहांना नेहमी पाण्याच्या आसपास रहायला आवडते. ते उत्तम पोहू शकतात.



परंतु आपल्या देशातील सिंहांची संख्या हळू-हळू कमी होत चालली आहे. हे असेच चालू राहिल्यास आपल्याला सिंह फक्त फोटोतच पहायला मिळतील. त्यांची कातडी व दातांसाठी सिंहांची अंदाधुंद शिकार होत आहे. त्यांपासून अनेक शोभेच्या वस्तु तयार केल्या जातात. त्यामुळे सरकारने त्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध लादले आहेत व शिक्षेची तरतूद केली आहे. गुजरात मधील गिरचे जंगल हे सिंहांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


lion essay in marathi | जंगलचा राजा सिंह मराठी निबंध

essay on elephant in marathi | हत्ती मराठी निबंध


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हत्ती मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात हत्‍तीबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


essay-on-elephant-in-marathi
essay-on-elephant-in-marathi



जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत पण सर्वात भक्कम पशू हत्ती होय. हत्ती विशालकाय असतो. त्याला नाकाच्या ठिकाणी एक लांब सोंड असते. सोंडेच्या सहाय्याने तो खातो व पाणी पितो. लाकडाचे ओंडके उचलण्याचे अवजड काम पुर्ण करतो. हत्ती मुख्यत: आफ्रिका व आशियात सापडतात. तो शाकाहारी व अतिशय बुद्धीमान प्राणी आहे. 


जंगलात हत्ती कळप करून राहतात. हत्तीच्या पायाचे तळवे मुलायम असतात. खडबडीत जागेवर जर तो चालला तर त्याच्या पायाला जखमा होतात. म्हणून तो मऊ मातीत वा वाळुत चालतो. हत्तीची चाल माणसापेक्षा जलद असते. जर हत्ती मागे लागला तर त्याच्यापासून सुटका होणे कठीण असते.



अवजड कामे करण्यासाठी हत्तींचा उपयोग केला जातो. हत्तींची शिकार करण्यासाठी त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर हत्तीच्या उंचीइतका एक खड़ा खोदण्यात येतो. त्याला गवताने झाकले जाते. हत्तींचा कळप जेव्हा तिथून जाते तेव्हा एक तरी हत्ती त्यात पडतोच. मग दोर-काठयांच्या साह्याने हत्तीला बाहेर काढण्यात येते.



प्राचीन काळात राजा हत्तीवर स्वार होऊन युद्धावर आणि शिकारीसाठी जात असे. दक्षिण भारतात आजही उत्सवात हत्तीला सामील करून घेतले जाते. त्याच्याशिवाय उत्सव पूर्ण होत नाही. सर्कशीत हत्ती निरनिराळ्या प्रकारच्या कसरती करून दाखवितो. ओझे वाहून नेण्यासाठी हत्तींचा वापर केला जातो. 


हत्तीचे दांत फार किमती असतात. त्यापासून दागिने व गृहसजावटीच्या वस्तू बनवितात. लग्नात वधूला हस्तिदंती बांगड्या घालतात. प्राचीन काळी राजासिंहासनावर हस्तिदंताचे नक्षीकाम केले जात असे. परंतु हस्तीदंतासाठी त्यांची अंदाधुंद शिकार होत आहे. हे थांबायला हवे. त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

essay on elephant in marathi | हत्ती मराठी निबंध

horse essay in marathi | घोडा मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण घोडा मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये घोड्यांचा इतीहासात कश्‍याप्रकारे उपयोगी होता  व घोडा मानवाला कश्‍याप्रकारे उपयोगी ठरतो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


horse-essay-in-marathi
horse-essay-in-marathi



हत्ती आणि उंटाप्रमाणेच घोडा पण एक उपयोगी प्राणी आहे. संस्कृतमध्ये त्याला अव आणि इंग्रजीत 'हॉर्स' म्हणतात. पुराणांच्या अनुसार समुद्रमंथनाच्या वेळी जी चौदा रत्ने निघाली त्यातील एक रत्न घोडा होता. हा एक शक्तिशाली प्राणी आहे.  मोटर, विद्यतशक्तीला 'हॉर्स पावर' म्हणूनच म्हणतात. 



घोड्याचा बसण्यासाठी, टांग्याला लावण्यासाठी. डोंगराळ भागात जाण्यासाठी. चारा वाहन नेण्यासाठी उपयोग होतो. प्राचीन काळात घोडा राजे महाराजांच्या सेनेचे प्रमुख अंग होता. त्यांच्या रथांनाही घोडे जोडले जात. विवाहाच्या शुभप्रसंगी वराला घोडीवर बसवितात.


घोड्यांचा पूर्वीपासून आजतागायत युद्धात उपयोग केला जातो. राजे महाराजांच्या कथांशी घोड्यांच्या कथाही जोडल्या गेल्या आहेत. महाराणा प्रतापचा घोडा चेतक, राणी लक्ष्मीबाईचा घोडा यांच्या शौर्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. आजही पोलीस दल व सैन्यदलात घोडयांचा उपयोग केला जातो. घोड्यांचा अनेक जाती आहेत. 'अरबी घोडा' उच्च प्रतीचा समजला जातो. घोडे अनेक रंगांचे असतात.



टांग्यांना जुंपल्या जाणाऱ्या घोड्यांच्या पायाला नाल ठोकतात. त्यामुळे घोड्याचे खूर खराब होत नाहीत व पाय चांगले राहतात. दुर्गम डोंगराळ भागात सामान आणि माणसांची वाहतूक घोडे  चांगल्या प्रकारे करू शकतात. घोडे खुप वेगाने धावू शकतात. त्यामुळे घोडयांच्या शर्यती हा मनोरंजनाचा लोकप्रिय खेळ आहे. गवत व चणे हे त्याचे अन्न होय.



घोडा एक हुशार प्राणी आहे. योग्य प्रशिक्षण दिल्यास तो माणसाच्या आज्ञा पाळतो. तो अतिशय इमानदार व आज्ञाधारक असतो. कुत्र्यांप्रमाणेच घोडे ही माणसाचे चांगले मित्र आहेत.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

horse essay in marathi | घोडा मराठी निबंध

dog essay in marathi | कुत्रा मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कुत्रा मराठी निबंध बघणार आहोत. मानवी सभ्‍यतेच्‍या सुरूवातीपासुनच कुत्रा मानवाचा मित्र म्‍हणुन साथ देत आला आहे. पाळीव प्राणी भरपुर असतात पण याला विशिष्‍ट दर्जा आहे कारण वेळप्रसंगी तो आपल्‍या मालकासाठी त्‍याचे प्राण पण द्यायला तयार होतो. अश्‍या या प्राण्‍याला आदर देऊन सुरूवात करूया निबंधाला. 

dog-essay-in-marathi
dog-essay-in-marathi




कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. तो स्वामीभक्त असतो. घरांच्या रक्षणासाठी तो फार उपयोगी आहे. त्‍याच्‍या  अनेक जाती असतात. काही तर फार समजदार असतात. त्यांची गंधसंवेदना फार तीव्र असते. म्हणून पोलिस गुन्हेगारांना पकडण्यासाठी कुत्र्यांची मदत घेतात.


कुत्र्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान, शेपूट असते. कुत्रे अनेक रंगाचे असतात. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. काही सशासारखे लहान व गोजिरवाणे तर काही वाघा एवढे मोठे व मजबूत असतात. अनेक लोक घराच्या राखणीसाठी कुत्रे पाळतात. दारावरची घंटी वाजताच कुत्रे सावध होतात. अनोळखी माणसे पाहिली की भुंकू लागतात. रात्रीच्या वेळी चोर आले तर त्याच्या भुंकण्याने लोक जागे होतात. मग चोर एक तर पळून जातो किंवा पकडला जातो. काही लोक आवड किंवा हौस म्हणून कुत्रे पाळतात.



कुत्रा जरी उपयोगी प्राणी असला तरी तो पिसाळला की धोकादायक बनतो तो चावला तर इंजेक्शन घेणे अत्यावश्यक असते. असे न केल्यास ज्याला कुत्रे चावले तो पिसाळू शकतो. भटक्या जमातीचे लोक नेहमी आपल्याबरोबर कुत्रे बाळगतात. त्यात शिकारी कुत्रे पण असतात. त्यांचे मालक लहान, जंगली जनावरांची शिकार करताना या कुत्र्यांची मदत घेतात. कुत्र्याच्या स्वामीभक्तीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. धर्मराजाला स्वर्गापर्यंत घेऊन जाणारा एक कुत्राच होता. असा हा इमानदार प्राणी माणसाचा खरा मित्र आहे.

 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

dog essay in marathi | कुत्रा मराठी निबंध

 cow essay in marathi | गाय मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गाय मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये भारतात गायीला विषेश महत्‍व का आहे व प्राचीन भारतापासुन आजपर्यत गाय मानवाला कश्‍याप्रकारे मदत करत आलेली आहे ते या निबंधात स्‍पष्‍ट केले आहे . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

cow-essay-in-marathi
cow-essay-in-marathi



भारतात गाय पूजनीय आहे. प्राचीन काळात साधू संत, ऋषिमुनी आपल्या आश्रमात गाई पाळत असत. महर्षी जाबालीने आपला शिष्य सत्यकामवर गोसेवेची जबाबदारी सोपविली होती. आणि त्यांना तोपर्यंत चारीत राहण्याचा आदेश दिला होता जो पर्यंत त्यांची संख्या दुप्पट होणार नाही. 


गाईला चार पाय, एक लांब शेपूट असते जिने ती तिच्या पाठीवर बसणारे, पक्षी, माशा, डांस उडविते. तिला दोन मोठे-मोठे सुंदर डोळे असतात. तिचा रंग पांढरा, काळा, लाल, मातकट असतो. खेळाच्या मैदानावर, रस्त्यावर, मोकळ्या जागी ती चरतांना दिसते. 


गाय पाळीव प्राणी आहे. तिचे दूध पौष्टिक व पचायला हलके असते. प्राचीन काळात घरे मातीची असत ती गाईच्या शेणाने सारवीत असत. इंधन म्हणून शेणाच्या गोवऱ्या जाळीत असत. आता गोबर गॅस वापरतात यातून धूर निघत नसल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होत नाहीत. गोबर गॅस हे अतिशय स्वस्त इंधन आहे. बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला जातो. खेड्यातील स्त्रिया अजूनही शेणानेच चूल सारवितात . शेणाचा उपयोग खतासाठी केला जातो. गोमूत्राचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो. 


गाईची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकारने गोशाळा स्थापन करून बेवारस गायींची सोय केली पाहिजे. गाईंची कत्तल थांबविली पाहिजे. ईश्वराकडून मिळालेले श्रेष्ठ बक्षीस 'गाय' आहे. भारतीय परंपरेतील पूज्य पशृंमध्ये गाईचे स्थान आहे. गाय बहुउपयोगी  असल्यामुळे तिला कामधेनू म्हणतात. अशा प्रकारे हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

cow essay in marathi | गाय मराठी निबंध

my pet cat essay in marathi  | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या घरी मनीमाऊ नावाची छोटीशी गोंडस मांजर आहे या निबंधाच्‍या मदतीने आज  आपण तिच्‍याबद्दलच माहीती करून घेऊया  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


my-pet-cat-essay-in-marathi
my-pet-cat-essay-in-marathi



पशू-पक्षी, मनुष्याचे जीवन साथी आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढीपासून आपणांस दूध मिळते. कुत्रे आपल्या शेताची आणि घराची राखण करतात. पोपट, कबुतर, ससे, मांजर, पाळल्याने आपल्याला आनंद मिळतो. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार लोक पशू पक्षी पाळतात. माझ्या बऱ्याच मित्रांजवळ कोणता ना कोणता पाळीव प्राणी आहे.


मी पण एक छोटीशी सुंदर मांजर पाळली आहे. आम्‍ही लाडाने तिला  मनीमाऊ म्‍हणतो तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. आम्ही सगळे तिला 'मनीमाऊ' म्हणतो. मनीमाऊ म्हणून हाक मारताच ती धावत माझ्याजवळ येऊन बसते. मी तीला रोज दूध, ब्रेड, बिस्किट खाऊ घालतो. साबण लावून तिला आंघोळ घालतो. 


माझी मनीमाऊ मांजर पूर्णपणे शाकाहारी आहे. ती आज्ञाधारक आहे. घरात अजिबात घाण करीत नाही. त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन जातो. संध्याकाळी तिला घेऊन मी बागेत फिरावयास जातो. तिथे मी तिच्याबरोबर खेळतो, धावतो तेव्हा ती शेपटी फुगवून म्याऊँ-म्याऊँ करून आपला आनंद व्यक्त करते.


मनीमाऊ घरात मुक्तपणे फिरते. परंतु खाण्याचे पदार्थ खराब करीत नाही. दारावरची घंटी वाजली की तिचे कान उभे राहतात. मग लगेच ती दाराकडे धावत जाते. जणु  आमचे स्वागतच करते. कधी-कधी ती एखादा उंदीर पकडून बाहेर पळून जाते. कुत्रा मांजरीचा शत्रू असतो. पण तीच कुत्र्यावर धावून जाते. थंडीच्या दिवसांत ती  गच्चीवर जाऊन उन्हात बसते. उन्हाळ्यात सोफ्याखाली नाही तर पलंगाखाली जाऊन बसते. मनीमाऊ मला खूप आवडते. मी कुठे बाहेर गेलो तर मला तिची खूप आठवण येते.


मित्रांनो my favourite animal cat in marathi  तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व तुमच्‍या घरी कोणताही पाळीव प्राणी असल्‍यास त्‍याचे नाव  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my pet cat essay in marathi | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध