internet essay in marathi | इंटरनेट मराठी निबंध 


निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण internet essay in marathi निबंध बघणार आहोत. या  निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी तयार केलेली इंटरनेट नावाची जादु कोणती कामे करू शकते व चुकीच्‍या रीतीने वापरल्‍यास कीती  नुकसान करू शकते याचे वर्णन केेले आहे. व त्‍यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

सकाळची वेळ १०.३० ची अमेरिकेतल्या एका उत्तुंग इमारतीत महत्त्वाची मिटींग बोलावली होती. विषय खूप गंभीर होता. या मिटींगसाठी त्याविषयातील जाणकार तज्ञ आली होती. एक गंभीर परिस्थिती उद्भवली होती. त्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ही मिटींग बोलावली होती. नुकतेच एका हॅकरनी इंटरनेटवरील एका प्रोग्रामद्वारे 'आय लव्ह यु' नावाचा व्हायरस सोडला होता. या व्हायरसद्वारे इंटरनेटवरील अतिमहत्त्वाची माहिती पुसली जाणार होती किंवा त्या माहितीत बदल होण्याचा संभव होता. यावर उपाय योजण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

internet essay in marathi
internet essay in marathi 


या बैठकीत तज्ज्ञांनी विचार मांडून त्यावर तोडगा शोधला. एका अँटीव्हायरस विकसित केला. या अँटीव्हायरस प्रोग्रामद्वारे तात्पुरता या परिस्थितीवर उपाय योजला गेला. जोपर्यंत पुढे गंभीर परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत हे शास्त्रज्ञ निर्धास्त झाले.

 तर या इंटरनेटची सुरुवात ७० व्या दशकात झाली. इंटरनेट असे जे जाळे जे एकमेकांना जोडले आहे. अमेरिकेमध्ये सुरुवातीला संरक्षण दलातील माहिती आदान-प्रदान करण्याकरिता हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. त्यालाच व्यापक असे जागतिक रूप देऊन इंटरनेटची सुरुवात केली गेली या इंटरनेट 'वर्ल्ड वाईड बेब' असेही म्हणाले जाते. असे जे जाळे जे जागतिक पातळीवर पसरले आहे.

 इंटरनेट असण्यासाठी पहिली गरज संगणक असावे लागते नंतर दुसरे महत्त्वाचे उपकरण मोडेम लागते. भारतात या इंटरनेटची सुरुवात १९९४ साली पासून सुरू झाली. आज आपण मोबाईलवर सहजरीत्‍या इंटरनेट वापरू शकतो.

वर उल्लेख केल्यामुळे या इंटरनेटचे काही धोकेही आहेत. सध्या 'आय लव्ह यू', 'बग' या नावाने अनेक व्हायरस सध्या धुमाकूळ घालत आहेत. हे एका प्रकारच्या प्रणाली (प्रोग्राम)मध्ये बनविलेले असतात, जे चुकून इंटरनेटवरती काम करतेवेळी आपल्या हातून उघडले गेले तर आपल्या संगणकातील नव्हेच तर आपल्या संगणकाला 'लॅन'मार्फत (लोकल एरिया नेटवर्क) जोडल्या गेलेल्या सर्व संगणकातील महत्त्वाची नोंद यामुळे पुसली जाते. किंवा त्यामध्ये फेरफार होतात तर हे इंटरनेट हॅकर हे खरेतर याबाबतीत तज्ज्ञ असतात ते इंटरनेटमार्फत देशाची जी गुप्त माहिती आहे, ती पळवून इतर देशांना विकतात.

 इंटरनेटच्या आहारी गेलेली इतकी माणसे आहेत की दिवस-दिवस ते इंटरनेट पुढे बसून असतात. त्यामुळे त्यांना भूक लागत नाही पण खूप वेळ बसल्याने त्यांना पाठीचा त्रास होत राहतो. हा खरंच खूप गंभीर प्रश्न आहे.
या तोट्याबरोबरच इंटरनेटद्वारे आपल्याला खूप मोठे वरदान लाभले आहे. या इंटरनेटमार्फत आपल्यापुढे खूप मोठा माहितीचा विस्फोट उभा आहे. 

याद्वारे आपल्याला जगातील कोणतीही, कसलीही, कशाहीप्रकारची माहिती मिळवु शकतो. जर आपल्याला ती माहिती कोणत्या संकेतस्थळावर आहे हे शोधण्यासाठी याहू, गुगलसारखे संकेतस्थळे शोधुन देणारे माध्यमेही आहेत. या इंटरनेटचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे 'ई-मेल' ज्याला 'इलेक्ट्रॉनिक मेल' ही म्हणतात. याद्वारे आपण आपल्या मित्राला नातेवाइकाच्या सेकंदाच्या काही भागामध्ये पत्र पाठवू शकतो. यामार्फत आपल्याला बाहेर कोठेही न जाता घरातल्या घरात संगणकाद्वारे कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो. यालाच इ. कॉमर्स म्हणतात
.
भविष्यात इंटरनेटची खूप मोठी भरारी होणार आहे. सध्या जे रोबोट आहेत त्याला जर इंटरनेटचे तंत्रज्ञान विकसित केले तर त्याला प्रश्न विचारण्याचा अवकाश, तात्काळ तो तुमच्यासमोर त्याचे उत्तर सादर करेल.
या इंटरनेटमार्फत जे धोके संभवतात त्यासाठी चांगले असे सायबर लॉ योजले पाहिजेत.त्याचबरोबर आपण त्या इंटरनेटचे गुलाम होण्यापेक्षा त्याला आपणच गुलाम ठेवले पाहिजे. इंटरनेट आपला वेळ वाचविण्यासाठी विकसित  कले आहे . त्याला तेथेच मर्यादित ठेवले पाहिजे.

या इंटरनेटच्या महापुराला आपले जीवन सुखकर करण्यासाठी उपयोगात आणावे. तो तुमचा दक्ष सेवक आहे. जे तुम्ही त्याच्याकडून मागाल ते तुम्हांला चांगल्या प्रकारे देऊ शकेल. इंटरनेटचा योग्य वापर करावा.
 
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व इंटरनेट वापरताना तुम्‍ही काय उपाय योजना करता व इंटरनेटव्‍दारे तुम्‍ही कोणती कामे सहजरीत्‍या करीत असता हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद 

निबंध 2

इंटरनेट मराठी निबंध 

माहिती तंत्रज्ञानाचा एक सुंदर आविष्कार म्हणजे इंटरनेट. आज जिकडे पाहावे तिकडे सगळीकडेच इंटरनेटच हा शब्द आपल्या कानावर पडत असतो. इंटरनेटची उपयुक्तता जवळजवळ सर्वच क्षेत्रांत आपल्याला जाणवत आहे. पण काय आहे हो हे इंटरनेट? ते कसे तयार होते ? त्याचा विस्तार नक्की कुठून कसा झाला? यांसारखे अनेक प्रश्न नेहमीच सर्वसामान्य मनात घोळत असतात. तर हे इंटरनेट म्हणजे असंख्य कॉम्प्युटर किंवा संगणकांचे जगभर पसरलेले जाळे होय किंवा अनेक नेटवर्क यांचे हे एक नेटवर्क आहे. 


या इंटरनेटशी आज संपूर्ण जगातील असंख्य लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. अमेरिकेतल्या पेंटॉगॉन या त्यांच्या सुरक्षाव्यवस्था असलेल्या ठिकाणी सर्वप्रथम अशाप्रकारच्या नेटवर्कची गरज भासू लागली. कारण युद्धपरिस्थिती दरम्यान या अधिकाऱ्यांमधील अपुऱ्या सुसंवादाचे परिणाम तेथील सुरक्षाव्यवस्थेला जाणवत होता. म्हणून सर्वप्रथम पेंटॉगॉनमधील संगणक हे जोडण्याची कल्पना यातून निघाली. त्यातूनच सर्वप्रथम 'अपनिट' तयार झाले व पुढे 'अर्पानेट'चाच विस्तार होत होत त्यातून इंटरनेटचा जन्म झाला आणि हळूहळू जगभरातील संगणक एकमेकांना जोडले जाऊन इंटरनेटचे हे महाकाय जाळे विणले गेले.


पुढे इ.स. १९९१ मध्ये टिम बर्नर ली या गणितज्ञाने स्वीत्झर्लंडमधील जिनिव्हा येथे सर्वप्रथम 'वर्ल्ड वाइब वेब' (www) सुरू केले. कदाचित तेव्हा त्या बिचाऱ्याच्या हे ध्यानीही नसेल की पुढे यामध्ये एवढे क्रांतिकारक बदल होतील म्हणून. भारतामध्ये इंटरनेटचा व पर्यायाने 'वर्ल्ड वाइब वेब'चा प्रसार होण्यास १९९५ सालापासून सुरुवात झाली आणि हा प्रसार अजूनही असाच चालू आहे.


 आज जवळजवळ असे कोणतेच क्षेत्र उरलेले नाही की जेथे इंटरनेटचे अस्तित्व किंवा उपयुक्तता नाही. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा क्रीडा, आरोग्य, बँक. राजकारण असे कोणतेही क्षेत्र असो, त्यांना इंटरनेट नवीन नाही सर्वांनाच इंटरनेट हे आपल्याला माहिती-तंत्रज्ञानामुळे लाभलेले वरदान वाटू लागले आहे.


आज इंटरनेटमुळे घरबसल्या आपण जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती किंवा ज्ञान मिळवू शकतो. अगदी घरबसल्या आपण बँकेचे व्यवहारही करू शकतो. जगातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टीची माहिती आपल्याला इंटरनेटवरून मिळते आणि शिक्षणक्षेत्रात तर इंटरनेटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हव्या त्या विषयाची अद्ययावत माहिती इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाइटवरून मिळते. अगदी एखादा आजारी माणूसही त्याच्या आजाराविषयीची माहिती, इलाज अगदी चांगला तज्ज्ञ डॉक्टर यांची निवड इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो.



एवढेच नाही तर दररोजच्या बातम्या, वर्तमानपत्रे, हे सर्वच्या सर्व इंटरनेटवर आपल्याला पाहायला मिळते. अगदी अमेरिका किंवा इंग्लंडमधील एखादा भारतीय माणूस किंवा कोणीही व्यक्ती आज भारतात काय चालू आहे याची माहिती तेथे बसून इंटरनेट वरून मिळवू शकतो. खरेच किती मोठी विज्ञानाने केलेली क्रांती आहे ही !
तसेच आपण चक्क इंटरनेटवर खरेदीही करू शकतो.


 इंटरनेटवर वेगवेगळ्या कंपन्या आपले प्रॉडक्ट व त्याची माहिती देणाऱ्या वेबसाइट्स बनवीत असतात. आपण चक्क या वेगवेगळ्या जाहिराती पाहून इंटरनेट वरून ऑनलाइन शॉपिंगही करू शकतो. अशाचप्रकारचा व्यवहार हा अनेक कंपन्यांमध्येही चालतो. त्यालाच 'बिझीनेट ट्रेडिंग' असे म्हटले जाते असे इंटरनेटचे एक नाही तर असंख्य फायदे आहेत. आपण इंटरनेटवरून हवाई तिकीट बुक करू शकतो. 


रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण करू शकतो. इंटरनेट टेलिफोनद्वारा जगात कुणाशीही चक्क लोकल फोनच्या दरात संभाषण करू शकतो. खरोखरच इंटरनेटमुळे जग हे जवळ आल्यासारखे वाटते म्हणूनच इंटरनेट हे मानवाला लाभलेले एक वरदानच आहे. पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात. 


तसेच या बाबतीतही आहे. या इंटरनेटचा वाईट मार्गाने उपयोग करणारी माणसे असतात. ते इंटरनेटवर असलेली महत्त्वाची माहिती काढून टाकणे व तिथे नको ते लिहिणे, दुसऱ्याचा पासवर्ड मिळवून त्याच्या व्यक्तिगत माहितीत डोकावणे किंवा इंटरनेटवरून व्हायरस (विषाणू) सोडून जगभराचे व्यवहार ठप्प करणे यांसारखे गुन्हे करतात. त्यांना इंटरनेटच्या भाषेत 'सायबर गुन्हे' असे म्हणतात व त्यासाठी त्यांना शिक्षाही होऊ शकते आणि असे अनेक गुन्हे सायबर विश्वात घडले आहेत.


काहीजण इंटरनेटच्या ई-मेल (E-mail) या माध्यमातून एखाद्याला धमकावतात तर काही जण चक्क इंटरनेटवरून मुलींची छेड काढतात. त्यांना अश्लील छायाचित्रे पाठवतात. अश्लील ई-मेल (E-mail) करतात. खरंच या तर माणुसकीलाही काळिमा फासणाऱ्या घटना आहेत की एवढ्या उपयोगी माध्यमाचा काहीजण अशा अनैतिक मार्गाने वापर करतात व स्वतःहून


या गोष्टीला शापाचे स्वरूप देतात. काहीजण इंटरनेटमधून मुलींना फसवण्याच्याही घटना अलीकडच्या काळात उप येत आहेत. पण खरोखरच मी तर म्हणेन अशी काही विघ्नसंतोषी माणसे सोडली तर इंटरनेट हे मानवाला मिळालेले बहु वरदानच आहे. कारण कोणतीही गोष्ट ही चांगली किंवा वाईट नसते. आपणच तिला चांगल्या किंवा वाईटचा दजा दत असतो. हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे की आपण इंटरनेटचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायचा का अधोगतीसाठी करायचा म्हणूनच मी एकदा नाही तर त्रिवार म्हणेन की इंटरनेट हे मानवाला लाभलेले वरदानच आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

internet essay in marathi | इंटरनेट मराठी निबंध

maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोबा मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आजोबा या शब्‍दाबरोबर आठवण येतात, ते आपल्‍यावर प्रेम करणारे व आपले सर्व लाड व  हट्ट पुरवणारे आपले आजोबा. लहानपणीचे ते आनंदीदायी क्षण आजही आनंद देऊन जातात, अश्‍याच एका प्रसंगाचे वर्णन निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आज आमच्याकडे एक छोटासा घरगुती समारंभ झाला. माझे सर्व काका, आत्या, कुटुंबातील लहानथोर सर्व मंडळी एकत्र जमली होती. आम्ही आमच्या आजोबांचा ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. गेले सात-आठ दिवस आमची अगदी गुप्त तयारी चालली होती. आम्हांला आजोबांना काही कळू दयायचे नव्हते.

maze-ajoba-marathi-nibandh
maze-ajoba-marathi-nibandh

 पण शेवटी आजोबांनीच आम्हांला धक्का दिला. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांसाठी उत्कृष्ट आंबा आइस्क्रीम मागवले होते आणि समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांनी एकेक भेटवस्तु दिली आणि ती भेटवस्तू देताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिचे छंद, तिच्या आवडी लक्षात घेतल्या होत्या. त्यामुळे खूपच मजा आली.
 
माझे आजोबा सदा प्रसन्न आणि तृप्त असतात. आजोबांच्या या आनंदी, आशावादी वृत्तीमागे आहे त्यांची तंदुरुस्ती ! त्यांचे वागणे अतिशय नियमबद्ध  आहे. काहीही झाले तरी त्यांचे पहाटे फिरायला जाणे कधी चुकत नाही. त्यांनी एक 'पेन्शनरांचा क्लब' स्थापन केला आहे. ही वृद्ध मंडळी एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात, सहलीला जातात. अशा प्रसंगी आजोबा आपल्या दोस्तांसाठी आजीला कुरकुरीत चकल्या करायला सांगतात.

आजोबांना आमच्या आजीविषयी विशेष अभिमान आहे. आजोबा सरकारी कचेरीत मोठ्या हुद्द्यावर होते आणि तेथे अगदी उच्च पदावरून ते सन्मानाने निवृत्त झाले. त्याचे श्रेयही ते आमच्या आजीला देतात; कारण त्यांच्या मते, घराच्या आघाडीवर त्यांना कधीही लक्ष घालावे लागले नाही. आमच्या आजीमुळेच आपले घर 'आदर्श' राहिले, असे ते मानतात.  

आजही आजोबा घरात असूनही सर्वांपासून अलिप्त राहतात. कुणाच्याही कुठल्याही निर्णयात ते ढवळाढवळ करत नाहीत. पण आम्ही एखादी शंका विचारली, तर ते त्याचे खुलासेवार निरसन करतात. उत्तम आरोग्य, स्वच्छ विचारसरणी आणि सतत उदयोगात रमलेले आजोबा अगदी ऐंशीव्या वर्षीही तेज:पुंज वाटतात. आपल्या वार्धक्यातही त्यांनी आपल्या 'युवा' मनाला जपले आहे, म्हणून ते सदा आनंदी राहू शकतात. 'कर्ते व्हा. कार्यरत राहा' हा त्यांचा आम्हांला सदैव उपदेश असतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व  तुमच्‍या आजोंबासोबत असलेल्‍या गमतीदार आठवणी तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. ) 

  • व्यक्तिमत्त्व वर्णन
  • वय, पोशाख, काही सवयी
  • स्वभाव- एखादा प्रसंग
  • घरात असून अलिप्त
  • परंतु घरातील एक 
  • वय मोठे; पण मन तरुण 
  • कर्तबगारी
  • कर्तव्यदक्ष 
  • शिकवण

टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • My (majhe) Grandfather Essay in Marathi language


 निबंध 2 

maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध


आज मी दोन दिवसांची रजा घेऊन आजोबांना भेटायला आलो आहे. बसमधून उतरल्याबरोबर माझी पावले फारच जलद पडू लागली आहेत. डोळे कौलारू घराचे छप्पर शोधताहेत. गेली पंधरा वर्षे असाच धावत धावत मी माझ्या आजोळी येत आहे.

कधी 'मे' महिन्याची सुटी लागते व कधी कोकणात जातो, असे मला व्हायचे. मुंबईहन कोकणात मला न्यायला पूर्वी आजोबाच यायचे. पुढे मोठी झाल्यावर आम्ही नातवंडे एकटी यायला लागलो. पण कोकणात आल्यावर बसमधून उतरताक्षणीच आजोबांचे शद्र कानावर पडायचे, आलात बाळांनो, या.' या वात्सल्यपूर्ण शब्दांनी आमचं स्वागत व्हायचं व प्रवासाचा सर्व शीण जायचा!


आमचं कोकणातील घर नारळी पोफळींच्या गर्द छायेत झाकून गेलं होतं. परंतु आजोबांचा सहवास जास्त शीतल वाटायचा. आजोबांना कधीच रागावलेलं मी पाहिलं नाही. एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाल्यास ते फक्त 'गोविंद! गोविंद!' म्हणायचे.


नातवंडांशी बोलताना, गोठ्यातल्या जनावरांशी बोलताना किंवा शेतातील गड्यांशी बोलताना त्यांचा स्वर नेहमीच शांत व प्रेमळ असायचा. आजोबा कधीच रिकामे बसायचे नाहीत. त्यांचा निम्मा वेळ शेतात व गोठ्यातच जायचा. शेतात ते गड्यांच्या बरोबरीनं काम करायचे. 


गोठा तर इतका स्वच्छ ठेवत की, घरातच जनावरं बांधलीत की काय असे वाटावे! संध्याकाळी घरात आल्यावरही हातानं बारीक-सारीक काम चालूच. त्यांना कोठे एवढासाही केर पडलेला खपत नसे. वर्तमानपत्रं, पुस्तकं, औषधे कशी व्यवस्थित लावून ठेवलेली. त्यांच्या सर्व वस्तू जिथल्या तिथे; अंधारातही अचूक सापडणाऱ्या!


संध्याकाळी त्यांच्या मुखातून देवाची स्तोत्रं एकामागून एक बाहेर पडत असत. आम्हा नातवंडांनाही स्तोत्र शिकवणं हे त्यांचं आवडतं काम. ते आम्हाला गोष्टीही सांगायचे. पण अभ्यास शिकवणं, श्लोक शिकवणं त्यांना जास्त आवडायचं. 

आजही जुन्या कवितांचं, स्तोत्रांचं, श्लोकांचं धन माझ्याजवळ आहे ते आजोबांच्यामुळेच. आजीचे व त्यांचे नेहमी भांडण व्हायचे कारण त्यांच्या स्वभावातला दोष म्हणजे दातृत्वाचा अतिरेक. गड्यांना आंबे, सुपाऱ्या, नारळ न मागता मुक्तहस्ताने ते देत. 


आला गेला पै-पाहुणा पिशव्या भरभरून माल घेऊन जाई. एखादा मित्र बरोबर घेतल्याशिवाय ते कधी जेवलेच नाहीत. त्यामुळे ते सदैव समाधानी असत. जेवण तरी काय? साधा आमटी-भात असला तरी चालेल पण तो रुचकर असला पाहिजे. पाट-पाणी, वाढप सर्वच त्यांना व्यवस्थित लागायचं. 

पण परवा शेतातून परत येताना बांधावरून पाय घसरून ते पडले. पाय दुखावला. त्यांना वाटलं, आपली अखेरच जवळ आली. त्यामुळे कोणताही उपाय न करता त्यांनी शेवटचं भेटायला बोलावलं, म्हणून मी धावत-पळत आलो आहे. आजोबांना मुंबईला नेऊन मला बरं करायचं आहे. आजोबांचा प्रेमळ सहवास मला अजून हवा आहे; अजून हवा आहे ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध  बघणार आहोत. या निबंधामध्ये चंद्रावर गेल्यावर काय करता येईल व मानव चंद्रावर जाऊन कोणती स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचे वर्णन केले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

चंद्राचे मानवी मनाला विलक्षण आकर्षण आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीही 'चंद्र हवा' म्हणून कौसल्यामातेकडे हट्ट धरला आणि मग आरशातून चंद्राचे प्रतिबिंब दिसताच तो छोटा राजकुमार हर्षभरित झाला, अशी कथा आहे. चंद्राविषयीच्या मानवाच्या या आकर्षणाची परिणती म्हणजे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांतून मानवाने चंद्रावर केलेले पदार्पण होय.
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi


नील आर्मस्ट्राँग या अमेरिकन अवकाशयात्रीने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. मानवाचे चंद्रावरील चिमुकले पाऊल म्हणजे त्याची विज्ञानाच्या आधारे अवकाशातील प्रचंड झेप होती. या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर चंद्रावर जाण्याची, तेथे सहली काढण्याची, तेथे कायमची वस्ती करण्याची स्वप्ने माणूस पाहू लागला. माझ्या मनात आले - अशाच एका मोहिमेतून मला चंद्रावर जायला मिळाले तर ! 

...तसे झाले तर ! फार दिवसांचे उराशी बाळगलेले माझे स्वप्न साकार होईल. चंद्रावर चालताना टुणटुण उड्या मारत जाण्याचा आनंद मला लुटता येईल. पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा 'ससा' धुंडाळण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावरून माझी पृथ्वीमाता कशी दिसते. ते मी पाहीन.

चंद्रावरून पृथ्वीवरील माणसांशी संपर्क साधणारी संदेशवाहिनी असणारच ! त्या वाहिनीवरून मी चंद्रावरील सृष्टीचे, सभोवारच्या अथांग विश्वाचे, तेथून दिसणाऱ्या माझ्या पृथ्वीमातेचे धावते समालोचन माझ्या घरच्या माणसांना ऐकवीन. तेथेच कायमचे वास्तव्य करणे जमले तर तेथे एक भारतीय उपाहारगृह सुरू करीन. त्या उपाहारगृहात अस्सल मराठी पदार्थ मिळू शकतील. मोदक, थालीपीठ यांसारखे पदार्थ तसेच सोलकढी, मधुकोकम यांसारखी पेये मिळू शकतील. 

चंद्रावरील तरुण जोडपी कदाचित 'मधुचंद्रा'ऐवजी 'मधुवसुंधरा 'साठी पृथ्वीवर येण्यास आतुर होतील. अशा वेळी शक्य झाले  तर त्यांना पृथ्वीवरील प्रवासाची सोयही मी करीन. पण हे सारे केव्हा?- जर मला चंद्रावर जायला मिळाले तर !!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व  चंद्रावर जाण्यास तुम्हाला संधी मिळाल्यास तुम्ही काय करू इच्छिता ते  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • चंद्राचे आकर्षण
  • प्रभू रामाला चंद्र हवा
  • वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न
  • चंद्रमोहिमेत सहभागी व्हावे
  • चंद्रावरचा ससा
  • चंद्रावरून पृथ्वी कशी दिसेल
  • संदेशवाहिनी
  • उपाहारगृह 
  • पृथ्वी, चंद्र ये-जा उत्सुकता.

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

vidnyan shap ki vardan essay in marathi | विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी 

निबंध क्रं.1  

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. या 2 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे विज्ञानाचा वापर करून  स्‍वताचे  कश्‍याप्रकारे फायदा  नुकसान केेले आहे. हे तुम्‍हाला निबंधात सवीस्‍तर  वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

'विज्ञान-शाप की वरदान? (science boon or curse?) हा माणसाला पावलोपावली पडणारा प्रश्न आहे. विज्ञानाने प्राप्त करून दिलेल्या शेकडो सोयी-सुविधा तो उपभोगत असतो आणि त्याच वेळी वैज्ञानिक शोधांतून ओढवणारे जीवघेणे अपघातही तो अनुभवत असतो. मग त्याला पुनःपुन्हा प्रश्न पडतो की, विज्ञान हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान?

'विज्ञान'रूपी ही कामधेनू माणसावर प्रसन्न झाली आणि मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाला. चाकाचा शोध लागल्यामुळे माणसाच्या जीवनाला गती आली. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आपल्या सर्व प्रकारचे सामर्थ्य वाढवले. सात महासागरांपलीकडे पसरलेले जग जवळ आले. इतकेच नाही, तर माणसाने अंतराळात झेप घेतली, संगणकाच्या साहाय्याने तर माणसाने आज अशक्‍य वाटलेल्‍या गोष्टी प्राप्त केल्या. इंटरनेटच्या साहाय्याने दुरवर  असलेली माणसे एकमेकांना रोज भेटू लागली.


vidnyan-shap-ki-vardan-essay-in-marathi
vidnyan shap ki vardan essay in marathi


विज्ञानाची ही किमया श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत पोचली आहे. अगदी खेड्यातही भाकरीच्या पिठासाठी कुणा अन्नपूर्णेला जाते फिरवावे लागत नाही. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने स्वत:चे कष्ट खूप कमी केले आहेत; तसेच वैदयकीय क्षेत्रात अनेक शोध लावून अनेक असाध्य आजारांवर मात केली आहे. 

वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांवर मात करता येते. हे सारे पाहिले की मन ग्वाही देते, विज्ञान मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदान आहे. अणुशक्ती ही मानवाला लाभलेली परमशक्ती आहे, पण त्याच क्षणी या विसाव्या शतकात झालेल्या दोन विध्वंसक महायुद्धांची आठवण येते. या महायुद्धांत झालेला मानवसंहार पाहिला की विज्ञानाची अवास्तव शक्ती याला कारण आहे, हे प्रकर्षाने जाणवते.

 गेली पन्नास वर्षे साऱ्या विश्वाला तिसऱ्या महायुद्धाची छाया सतत झाकोळून टाकत आहे. 'तिसरे महायुद्ध' झाले तर सारे विश्व नष्ट होण्याची भीती आहे. माणसाने आपल्या विज्ञाननिष्ठेने जे काही मिळवले त्यांतूनच माणसाने आपला विनाश ओढवून घेतला आहे, असे म्हणावे लागते.

विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने भयंकर शस्त्रास्त्रे निर्माण केली, त्यांतून आज दहशतवाद फोफावला आहे. माणसातला माणूस हरवला आहे आणि तो जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालला आहे. माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे तो सुखी झाला आहे का, याबाबत संशयच आहे. हे पाहिले की प्रश्न पडतो, खरोखरच 'विज्ञान शाप आहे की वरदान?'

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व विज्ञान शाप आहे की वरदान याविषयी तुमचे मत काय आहे.  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • विज्ञान, माणसाची निर्मिती
  • अनेक फायदे 
  • मानवी जीवन संपन्न करण्यासाठी उपयोगी
  • आरोग्य 
  • वाहतूक 
  • दळणवळणात क्रांती
  • परग्रह निरीक्षणसृष्टीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न 
  • शोधातून अंधश्रद्धा निर्मूलन 
  • प्रयोगाला महत्त्वअणुशक्तीनिर्मिती 
  • मात्र, अणुबॉम्ब आणि इतर शोधांमुळे मानवी जीवन संकटातविज्ञानाचा दुरुपयोग टाळणे मानवाच्या हाती 
  • विज्ञानाचा सुज्ञपणे उपयोग करणे आवश्यक

                                                                 निबंध क्रं.2

Vigyan shap ki vardan marathi nibandh | विज्ञान-सुखदायक की दुःखदायक मराठी निबंध 

इतीहासात राजे महाराजे यांना पण टी.बी. सारख्‍या आजारापुढे काहीही न करता आल्‍यामुळे मृत्‍युशिवाय पर्यांय नव्‍हता परंतु आजच्या युगातील गरीब व्‍यक्‍ती त्यावर मात करून जगतो ही आहे विज्ञानकृपा, हे विज्ञान वरदान  नाही काय ? | आजच्या दैनंदिन जीवनातील एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाचा परिसस्पर्श झालेला नाही. अंघोळीला गिझर, स्वयंपाकाला कुकर, हिंडायला स्कूटर, टोस्टर, रूम हिटर, टी. व्ही. अन् संगणक सारेच! 

ज्ञानाच्या जिज्ञासेतून विज्ञान आले आणि मानवाने आपल्यासाठी त्याला यथेच्छ राबवले. अनेक सुविधांनी माणसाचे शारीरिक कष्ट कमी केले. सुखासीनता वाढवली. निरोपांसाठी स्वतः जाण्याचे श्रम वाचवून फोनवर काम भागवू लागले. हजारो मैलांचा प्रवास, पोटातील पाणी न हालता, विमानाने काही तासांत होऊ लागला. किचकट बौद्धिक समस्या संगणक (Computer) सोडवू लागला. अवकाशाचा शोध घेतला, सागरतळांचा ठाव घेतला. 

चंद्रावर उतरून आता तर मंगळ काबीज करू लागला आहे. काही दशकांपूर्वी देवी, टॉयफॉइड, टी. बी. या रोगांपुढे हात टेकणारा माणूस आता रोग मोडीत काढू लागला आहे...पृथ्वीवरच्या प्रत्येक निसर्गदत्त गोष्टीचा मानवाने, विज्ञानाच्या साह्याने, कौशल्याने वापर करून घेतला...जग अधिकच सुंदर केले ! आकर्षक केले ! ! मोहमयी केले ! ! ! 

स्वतःलाही दीर्घायू करवून घेतले. नैसर्गिक प्रकोपांचे इशारे अगोदरच मिळवून स्वतःचे रक्षण केले.  चार हजार वर्षांपूर्वीच्या पशूच्या पिढीत व आजच्या त्याच पशूच्या पिढीच्या जीवनमानात काहीच फरक पडला नाही...पण माणसाचे तसे नाही. सर्व प्राणि मात्रांमध्ये सर्वात अवलंबी, अशक्त माणसाने, मेंदूच्या चमत्कारातून विज्ञान निर्माण करून करामत केली. 'विज्ञान' या तीन अक्षरांच्या तीन पावलांनी वामनासारखे तिन्ही लोक पादाक्रान्त केले.

पण गुणांच्या छायेतच दुर्गुणही वाढतात. दीर्घायू झाल्याने लोकसंख्येचा विस्फोट झाला. त्याने सामाजिक तसेच वैयक्तिक जीवनातही अनंत प्रश्न निर्माण केले. जीवन यांत्रिक झाले. यंत्रांच्या अती वापराने बेकारी वाढली, शारीरिक दुखणीही वाढली. निसर्ग आणि माणूस यांत अंतर पडले. आयुष्याला एक प्रचंड गती आली आणि माणूस गरगरू लागला. सर्वांत जास्त हानी झाली-मानवी मनाची! विज्ञानाने जरी

                               " दहा दिशांचे तट कोसळले । ध्रुव दोन्ही जवळी आले ॥" 

अशी स्थिती केलेली असली तरी मनामनांमध्ये अंतर पडून “ दोन ध्रुवांवर दोघे आपण"  अशीही परिस्थिती झाली आहे. घरांचे घरपण हरवले आहे. विज्ञानाने समृद्धी दिली पण बदल्यात चैन हिरावून घेऊन बेचैनी दिली... डोळे दिपवणारी प्रगती विज्ञानाने केली पण मानवाला लाक्षणिक अर्थाने आंधळे केले. चेर्नोबिलचा अणुस्फोटाचे भिषण परीणाम बघितल्‍यावरीही मानव अणुभट्ट्या तयार करणे चालूच ठेवत आहे.

एक प्रकारचा उन्माद त्याला आला आहे.  E = MC2 चा वापर माणसांच्याच विध्वंसासाठी करणे म्हणजे तर कु-हाडीचा दांडा गोतास काळच ! अण्वस्त्रांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य ढवळून निघाले आहे. म्हणजेच, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. ते सर्वस्व नाही. त्याला लक्ष्मणरेषा हवी. ते साध्य नसून साधन आहे. वैज्ञानिक साधनांचा वापर चुकीचा केला गेला तर त्यात चूक साधकाची ! साधनांची नव्हे ....

पण हे ऐकण्याच्याच मन:स्थितीत आज माणूस नाहीये. त्यामुळेच आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आणि कदाचित त्यातच जगाचा अंत आहे.


निबंध क्रं.3  

विज्ञान : शाप की वरदान!

विज्ञान म्हणजे ज्ञान. वस्तुमात्राच्या स्थितीचे गुणधर्मांचे, व्यवहाराचे ज्ञान. आपल्या विश्वातील अणूरेणूंपासून आकाशातील ग्रहगोलांपर्यंत सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा माणसाला होती व आहे. ही ज्ञानलालसा पुरी करण्यासाठी मानव अखंड धडपडत आहे आणि विज्ञानाची वाटचाल अखंड चालू आहे.


विज्ञान ही माणसाला लाभलेली दिव्य शक्ती आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली आणि म्हणूनच त्याची आदिमानवाच्या अवस्थेपासून आजच्या अवस्थेपर्यंत प्रगती झाली. आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र नाही जेथे विज्ञानाने प्रवेश केला नाही व जे समृद्ध केले नाही. विज्ञानाच्या बळावर माणसाने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. 

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आपल्याला टी.व्ही., रेडिओ, पंखे, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलन यंत्रे अशा अनेक सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत. टेलिफोन, फॅक्स, ई-मेल, इंटरनेट या साऱ्यांद्वारे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात संपर्क साधू शकतो.


औद्योगिक क्षेत्रातही विज्ञानाने फार मोठी क्रांती केली आहे. अत्याधुनिक छपाई यंत्रावर वृत्तपत्रांच्या लाखो प्रती काही तासांतच छापून वितरणासाठी पाठवल्या जातात. माणूस विविध प्रकारची वाहने वापरतो. समुद्राच्या तळाशी जातो, आकाशातही भरारी घेतो. कृत्रिम उपग्रह सोडून माणूस अवकाशावर सत्ता गाजविण्याच्या प्रयत्नात आहे. वेधशाळेत यंत्रांद्वारे वादळ, मुसळधार पाऊस आदी अनिश्चित गोष्टींचा अंदाज करता येऊ लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा विज्ञानामुळे मानवाने फार मोठी झेप घेतली आहे.


रोगनिवारणासाठी अनेक प्रभावी औषधे निर्माण झाली आहेत. मानवाचे निरुपयोगी झालेले अवयव शस्त्रक्रियेद्वारा बदलून त्याला जीवदान देता येते, अपंग माणसाचे अपंगत्व घालवून त्याला निरोगी सुखी जीवन जगण्याची संधी देता येते.


विज्ञानाने शेतीमध्येसुद्धा अनेक प्रयोग केले आहेत. संकरित बी-बियाणे, जपानी भातशेती असे प्रयोग करून आपण धान्य उत्पादन वाढवू लागलो आहोत. अशा त-हेने विज्ञानामुळे आजच्या मानवाचे जीवन अधिक आनंदमय व स्वास्थ्यपूर्ण झाले आहे. विज्ञान ही आपल्याला लाभलेली कामधेनू आहे. __परंतु या विज्ञानरूपी गुलाबाला काटे आहेतच.


विज्ञानामुळे अनेक उद्योगधंदे वाढले आहेत. त्यामुळे वायुप्रदूषण, जलप्रदूषण वाढत आहे. मानव यंत्रांचा गुलाम बनू लागला आहे. शाश्वत नीतिमूल्ये नष्ट होऊ लागली आहेत. विज्ञानाच्या शोधांमुळेच अॅटमबाँब निर्माण होऊ शकला, भयानक शस्त्रास्त्रे तयार केली गेली आणि जीवघेणी महायुद्धे मानवाच्या नाशाला कारणीभूत ठरली. विज्ञानाने माणसांच्या विघातक सामर्थ्यात केलेली वाढ भयावह आहे. त्यामुळे विज्ञान हा अखिल मानवजातीला मिळालेला शापच आहे असे वाटू लागते.


परंतु हा दोष विज्ञानाचा नाही, तर माणसाच्या वृत्तीचा आहे. विज्ञान ही एक शक्ती आहे. अग्नी जसा उष्णता निर्माण करण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी वापरता येतो, तसाच आग लावण्यासाठीही वापरता येतो. तो कशासाठी वापरावयाचा हे वापरणाऱ्यावर अवलंबून असते. विज्ञानाचे तसेच आहे. विज्ञानाने मानवी जीवनाला विलक्षण गती दिली आहे,


मानवाची सर्वांगीण प्रगती घडविली आहे. विज्ञानामुळेच त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. म्हणून विज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठीच केला तर हे वरदान मानवाला निश्चितच उपकारक ठरू शकेल. आपले जीवनमान उंचावणारे विज्ञान हे मानवाला लाभलेले वरदानच होय!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद 

vidnyan shap ki vardan essay in marathi | विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी


Internet shap ki vardan in marathi essay | इंटरनेट  शाप की वरदान मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण इंटरनेट  शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. इंटरनेटचा वापर करणे आजकाल फार सामान्‍य झाले आहे. परंतु जसा इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्‍यांचे वाईट व चांगले परीणाम स्‍पष्‍ट दिसायला सुरूवात झाली आहे. इंटरनेटचे फायदे तोटे (internet che fayde tote)  या निबंधात सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 
 
निसर्गाने दिलेल्या शक्तीचा वापर हा माणसाच्या मतावर आणि त्याच्या माणुसकीवरच अवलंबून आहे. भौतिक सुख प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केलेल्या अविरत मेहनतीचे फळ म्हणजेच आजच्या भौतिक सुधारणा होय. त्यांपैकी इंटरनेट  हे सुद्धा एक होय. हे दिव्य ज्ञान आता वरदान आहे की शाप हे खालील मुद्द्यांवरून ती स्पष्ट करू इच्छितो.

इंटरनेटचा वापर मुख्यत्वे संकेतस्थळांवर (वेबसाईट) साठवलेल्या माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता होतो.  इंटरनेटच्या माध्यमातून आपण काही गोष्‍टींचा उत्कृष्ट वापर करू शकतो. जसे e - बँकिंग, e - कॉमर्स, e - चौपाल, e - मेल इत्यादी. म्हणजे आज इंटरनेट वापर ही नित्याची बाब झाली आहे.

इंटरनेटला मेलच्या (संदेशाच्या) माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या 'साबीर भाटीया' या युवकाने 'हॉटमेल'चा शोध लावून केले. सध्या न्यूयॉर्क शिकागो, पॅरीस इत्यादी ठिकाणी अनेक कंपन्यांचे 'माहिती साठवणूक केंद्रे' आहेत व त्या माध्यमातून भूस्थिर उपग्रहाच्या साहाय्याने संकेतस्थळांचा वापर करून हवी ती माहिती इंटरनेटवरून मिळवता येते.

internet-shap-ki-vardan-in-marathi-essay
internet-shap-ki-vardan-in-marathi-essay


इंटरनेटचे संकेत स्थळ असलेले 'Google Earth' हे लष्‍करी दृष्‍टीकोनातुन बघीतले  एक शापच आहे. उपग्रहाच्या साहाय्याने जगातील कुठल्याही ठिकाणांची चित्रे व चित्रफिती कोणत्याही अडथळ्याशिवाय बघणे हे लष्करीदृष्‍टीकोनातुन अतिशय हानिकारक आहे. 

'इंस्टंट न्यूज'सारखे 'ब्लॉग' तयार होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळेच चुकीची  माहिती सर्रास उपलब्ध असते. ही सामाजिक व राजकीयदृष्ट्या गंभीर बाब आहे. 'व्हायरस' ही इंटरनेटला लागलेली कीडच होय. अशी प्रोग्राम्स तयार करणे ही समाजाला लागलेली कीड, असाध्य रोग आहे. विशेषतः इंटरनेटच्या माध्यमांतून मुलींसोबत होणाऱ्या गैरव्यवहाराचे प्रमाणसुद्धा अतिशय जास्त वाढले आहे.

स्वतःची ओळख लपवण्याची सुविधा असल्याने व कोणतीही प्रतिक्रिया न होण्याच्या विचाराने सामाजिक, राजकीय, आर्थिक गैरव्यवहारांचे प्रमाण गेल्या ३-४ वर्षांत खूप वाढले आहे. वरील गैरव्यवहार, गैरप्रकार इतके जास्त वाढले आहेत की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'सायबर क्राईम विभागांची' स्थापना करावी लागली. म्हणजे मानव जातीला ठरलेला शापच आहे.

पण याच इंटरनेटमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती एक-दुसऱ्याच्या अतिशय जवळ आला, त्यांचा वेळ वाचला, त्यांच्यात आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली. जग प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात, त्याच शब्दांना खरे करण्याचे कार्य इंटरनेट करते आहे. हवी असलेली माहिती क्षणार्धात तुम्हांला इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या मिळते, तुमचा फायदा होतो, वेळ वाचतो. पत्र व्यवहार, आर्थिक व्यवहार यांना लागणारा वेग हा १००० पटीनी वाढला झाला आहे त्‍यामुळे ही कामे कमी वेळात पुर्ण होत आहेत.  

देशादेशाविषयीची माहिती उपलब्ध असल्याने देशांना संपर्क करण्यास व त्यातून सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक देवाणघेवाण करण्यास मदत होते, हा अतिशय मोठा फायदा आहे. आर्थिक व्यवहार हे वेळेच्या मर्यादेत जर झाले तर फायदेशीर असतात. इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर होतो (शेअर मार्केट).

कित्येक जणांनी इंटरनेटच्या माध्यमातून लग्नसुद्धा जुळवली आहे. मन जुळली आहेत, लोक जवळ आली आहेत, विभिन्न देशांतील संस्कृतीचा परिचय एकमेकांस झाला... एकूणच जग अतिशय छोटे झाले आहे तर आपण याला शाप कसे म्हणणार हे तर वरदानच होय. 

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

हा निबंध मराठी भाषेत ( marathi language ) आहे.  शब्‍दमर्यादा 500 

या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते 

  • marathi essay on internet advantages and disadvantages
  • Internet is a blessing or curse in Marathi Essay

Internet shap ki vardan in marathi essay | इंटरनेट शाप की वरदान मराठी निबंध

Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध 


माझा आवडता ऋतु पावसाळा मराठी | maza avadata rutu pavsala essay in marathi

ग्रीष्म ऋतू म्हणजे सर्व निर्जीव-सजीव वस्तू आणि प्राणिमात्रांना होरपळून काढणारा ऋतू... न्हाळा म्हणजेच ग्रीष्म मानवाला नकोनकोसे करून सोडतो. सारी जीवनसृष्टी हवालदिल होऊन जाते. 'पुरे-पुरे आता तो उन्हाळा !' असा आक्रोश करू लागतात. आणि तेवढ्यात कोठे तरी एखादा काळा ढग दिसू लागतो.

चातकाप्रमाणे आतुर झालेला मानव त्याला न्याहाळू लागतो. एकाएकी एकमेकांवर ढग आपटू लागतात, त्या तालावर मोर नाचू लागतात, बेधुंदपणे वारा वाहू लागतो. आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर पडू लागतात. धरित्री तर केव्हाची तहानलेली असते. भराभरा ते पाणी अधाश्याप्रमाणे पिऊन टाकते. तिची तहान भागते, ती वसुंंधरा आनंदाने पुलकित होऊन...


सगळीकडे आपल्या जवळचा सुगंध पसरवून टाकते. मग तर मोर बेहोष होऊन नाचू लागतात. गुरे, ढोरे शेपट्या उंचावून धावत सुटतात. बेडकांच्या तर 'डराँव डराँव'ने सारा आसमंत भरून जातो आणि 'वर्षा ऋतू'चे आगमन मोठ्या उत्साहात या पृथ्वीतलावर होते.


खरोखरीच या चराचरसृष्टीला मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा 'वर्षा ऋतू' होय. 'नवचैतन्य' घेऊन येतो हा वर्षा ऋतू. कालपर्यंत उजाड-खडकाळ माळरान तापलेला, तो दोन-तीन दिवसात हिरवागार होऊन जातो. या हिरव्या रंगांच्या छटा तरी किती हो ! हिरवा कंच... काळपट हिरवा... पोपटी हिरवा... हिरवागार हिरवा... अशा विविध रंगात रोपटी वाढतात.


शेते बहरतात. झाडे फळे-फुले-पाने यांनी बहरून जातात. मानवाला आपले सारे वैभव देण्यास आनंदाने डुलू लागतात, नम्र होतात. मक्याची-ज्वारीची-गव्हाची ताटे, लोंब्या वाऱ्यावर डोलु लागतात. कळ्या उमलू लागतात, फुले हसू लागतात अन् हिरव्यागार शालूवर पाण्याचे मोती चमकू लागतात.

ग्रीष्मात आटून गेलेल्या नद्या-नाले-ओढे आता दुथडी भरून वाहू लागतात. त्यामधील दगड-धोंडे-गोटे-खडक एकदम स्वच्छ धुऊन जाऊन चमकायला लागतात. नद्यांची पात्रे अथांगपणे भरधाव वाहु लागतात. असा हा जीवनदायी 'पावसाळा'. मानवी जीवनाला समृद्ध करून टाकतो.

Maza-avadata-rutu-essay-marathi-language
Maza-avadata-rutu-essay-marathi-languageAdd caption

कोठेही नजर टाका, हिरवा मांगल्याचा, सूचक समृद्धीचा प्रतिक, डोळे अन् आत्मामन तृप्त करणारा हा वर्षा ऋतू म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो. ना ग्रीष्माचा दाह ना शिशिरातील थंडीचा कडाका.. सगळा कसा सात्त्विक... सौम्य स्वभावाचा आल्हाददायी हा ऋतू. आषाढातील वर्षाचे आगमन...


याच आषाढात... संपूर्ण वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी वारकऱ्यांची लाट येते... 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात वारकरी चिंब भिजून जातात. पण उत्साहात नाचत राहतात.

शेतकरी या पावसाच्या धारामध्ये आपल्या घामाच्या...कष्टाच्या धाराही मिसळतो अन् मग काय ? आनंदच आनंद. धरित्री भरभरून पीक देते. शेतकरीच नव्हे तर सर्व प्राणिमात्र आनंदीत होतात.

तसा पाहिला तर 'वर्षा ऋतू', 'वसंत ऋतू'च्या पुढे उपेक्षिला जातो. परंतु त्या 'वसंत ऋतूच्या क्षणिक सुखापुढे या 'वर्षा'चा उदात्तपणा. उदारपणा केवढा महान असतो. खरोखरीच वर्षा ऋतू सृष्टीचे 'सौभाग्य' आहे. ती मानवी जीवनाची 'गंगोत्री' आहे. मानवाला मिळालेले 'महान वरदान' आहे.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .


Maza avadata rutu marathi nibandh


निबंध 2



घरामध्ये महिलामंडळच भरलं होतं. सर्वांजवळ पोळपाट लाटणी होती, म्हटलं , “ मोर्चा आहे की काय ? " म्हणून आईला विचारलं तर, " अरे, पावसाळा आला ना तोंडावर ! वर्षाचे पापड, लोणची करून ठेवते - " उत्तर आलं...पावसाळा येणार त्याची अशी आगमनाची वार्ता घरोघरी होणाऱ्या पापड लोणच्यांनी येते. तशीच लगबग सर्वत्र दिसते.

छत्र्या दुरुस्तीला निघतात, गच्चीवर गळती थांबवण्याचे लेप दिले जातात, बाजारात छत्र्या रेनकोटची रेलचेल होते, विक्सच्या जाहिराती वाढतात, शेतकरी शेतं नांगरून आभाळाकडे नजर लावून बसतात...!
पावसाची नऊ नक्षत्रं कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच ! एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षाराणीच...

मृगाच्या रथात बसून बिजलीचा चाबूक घेऊन, नभांच्या मेघगर्जनेच्या तुताऱ्या फुकत तिचं दिमाखदार आगमन होतं. साऱ्या आसमंतात मृद्गंधाचं अत्तर उधळलं जाऊन सारं वातावरण कसं सुगंधी होतं. मरगळलेले वृक्ष वेली अंग झटकुन चैतन्यानं फुलू लागतात, आनंदान डोलू लागतात.

कोरड पडलेल्या नद्या, ओढे, तळी, धरणे पाणी पिऊन आनंदीत होतात. अगोदरच तयार करून ठेवलेल्या घरट्यात पक्षी विसावतात. दाणागोटाही अगोदरच साठवलेला असतो म्हणून हळूच डोकावून वर्षाराणीचं वैभव निःशब्दपणे कौतुकाने बघतात.


मुंग्याही वारुळाचा आश्रय घेतात. हिरवा शालू नेसून काळ्या मेघांचं काजळकुंकू करून तर जास्तच गोड दिसते. घरांच्या छपरावर होणारी टप टप् कृषिराजाला मधुर स्वर वाटू लागतात.
शहरातून वाहतूक विस्कळीत होते. क्वचित वीज जाऊन अंधारात जग बुडून जाते. “ ये रे ये रे पावसा..." म्हणत मुलं नाचतात. कागदी नौदल प्रमुख होऊन आईचा मार खातात...कुणी रसिक गरम गरम चहाचे घुटके घेत उबदार पांघरूण घेऊन झक्कपैकी कादंबरी वाचत पडतो...

सारी सृष्टी बेहोष होते. बेभान, धुंद होते. तशीच बेहोषी भाविकांनाही येते. नामसंकीर्तनात दंग होऊन त्यांची "पाऊले चालती पंढरीची वाट ! " चंद्रभागेच्या तीरी जल्लोष होतो. टाळ मृदुंग आकाश दणाणून सोडतात.
...पण हीच वर्षाराणी रुसली तर तोंडचं पाणी पळवते. डोळ्यात पाणी आणते. देवाला गाभाऱ्यात कोंडलं जातं, एवढेच काय गाढवागाढवीचं लग्नही लावलं जातं. कृषिराजा भिकारी होतो. गायवासरे कसायांची धन होते.

पाणी...वेळच्या वेळी, हवा तेवढाच पाऊस पडला तर सर्व धरित्री सुजलां सुफलां होते. तीन महिन्यांत वर्षाची बेगमी होते म्हणूनच का तिला वर्षा 'राणी म्हणत असतील."

Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध बघणार आहोत. क्रिकेटचे आणि भारताचे एक निराळेच नाते आहे.  हॉकी राष्‍ट्रीय खेळ असल्‍यावरही गल्‍ली बोळामधेही आपल्‍याला क्रिकेटचे सामने आपल्‍याला दिसुन येतील. क्रिकेटचे भारतात असलेले वेड  आणि खेळाडुंची क्रिकेटला जिव की प्राण म्हणुन खेळण्याची तळमळ आपल्याला खालील ४ निबंधामधुन दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  


माझा अविस्मरणीय सामना : यंदा 'महाविद्यालयीन ट्रॉफी जिंकून आणायचीच. अशी प्रतिज्ञा आमच्या मुंबई कॉलेज संघाने केली होती. त्यासाठी गेले सहा महिने रात्रंदिवस सराव चालू होता. मागील  वेळेस  हातातोंडाशी आलेली ट्रॉफी शेवटच्या बॉलवर घालवावी लागली होती. आता कोणतीही कसर सोडायची नाही अन् कसूरही करायची नाही असा निश्चय केला होता सर्व खेळाडूंनी...

सामने सुरू झाले, अन् आमचा सामना अंतिम डावापर्यंत तरी कोणतीही अडचण न येता पोहोचला. आता खरा कसोटीचा क्षण होता. आमच्याबरोबर खेळणारा संघही काही कमी नव्हता. त्याची ही तयारी उत्तम होती. 'ट्रॉफी' जिंकण्यासाठी त्यांनीही जिद्दीने खेळ सुरू केला होता. तोडीस तोड - धावांबरोबर धावा - खेळ कसा अटीतटीचा चालला होता. (हे पण वाचा मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध)

दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.

एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती. 

मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.

दुसरा दिवस उजाडला तो आमच्या संघाच्या धडाडीच्या खेळानेच. चौकारांच्या दणक्याने कांबळीने सर्वांना खूश करून सोडले. तर सरदेसाईची त्याला साथ आणि चोरट्या धावा यामुळे आमचा संघ धावसंख्या वाढवीत होता. अखेरीस ३०४ धावांवर आमचा संघ बाद झाला अन् ९४ धावांनी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात विरुद्ध संघानेही धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.

पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.

mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi
mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi


आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.

नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.

 दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.

गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला. (100 हुन अधिक निबंध वाचा तुमच्‍या मोबाईलवर  )

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

निबंध 2

 एक रंगलेला क्रिकेटचा सामना


आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. 'संघ अ' आणि 'संघ ब' असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.

मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते. सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. 'अ' संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर 'ब' संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते.

एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते. अखेरीस ‘संघ अ' विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

 महत्‍वाचे मुद्दे :

  • आम्ही मुले नेहमीच खेळतो 
  • एके दिवशी मोठ्या माणसांचा सामना 
  • काहीजण चांगले खेळले 
  • काही गमती 
  • आनंदाचे वातावरण.

निबंध  3

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना 


भारतीय संघ बांग्लादेशात खेळायला निघाला होता. कोण जाणार, कोण नाही याची चर्चा होऊन शेवटी संघ रवाना झाला. एकदिवसीय चार सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार होते. सुरुवात तर चांगली झाली. एकदिवसीय चारही सामने भारतीय संघाने जिंकले.

पण यात विशेष आवडला तो दुसरा कसोटी सामना. कारण, या सामन्यामुळे विश्वचषक सामन्यात लागलेला कलंक पुसला गेला. बांगलादेशच्या याच संघाने आमच्या सर्व वीरांना चारी मुंड्या चित केले होते. त्याच संघावर  आमच्या क्रिकेट वीरांनी नेत्रदीपक विजय मिळवला.


असा हा सामना बांग्लादेशातील ढाका येथील शेरेबांगला स्टेडियमवर झाला. प्रथमच नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीलाच आपल्या खेळाडूंना सूर सापडला आणि भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीचे पार खोबरे करून टाकले. एकापाठोपाठ एक अशा पाच फलंदाजांनी आपली शतके झळकावली.

सचिन व सौरभ यांनी आधीचा लागलेला डाग पुसून टीकाकारांची बोलती बंद केली. सहाशे दहा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाने आपला डाव सोडला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला, बांग्लादेशला, खेळाची संधी दिली.
भारताच्या झहीर खानच्या तुफानी गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला. उरल्यासुरल्या फलंदाजांना अनिल कुंबळेने तंबूत पाठवले.

चारशे धावांचे ओझे घेऊन फालोऑन स्वीकारून बांगलादेश दुसरा डाव खेळायला मैदानात उतरला. आता पाऊसच त्यांना वाचवू शकणार होता. पण त्या दिवशी तोही त्यांच्यावर फिदा नव्हता. या डावात बांगलादेशच्या खालेद मासूद, अश्रफूल आणि मोर्तझा यांनी अटीतटीची झुंज दिली. पण भारतीय खेळाडू आता पेटून उठले होते. अगदी सचिनने गोलंदाजीतही आपली करामत दाखवली आणि दोन गडी टिपले. भारताने बांग्लादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी दणदणीत पराभव केला.

या यशाने भारताने जणू दाखवून दिले, 'हम भी कुछ कम नही !' आता आपल्या लाडक्या खेळाडूंवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली, याचा मला विशेष आनंद झाला.

महत्‍वाचे मुद्दे :
  • विश्वचषक सामन्यात आलेले अपयश 
  • त्यामुळे निंदानालस्ती
  • मन दुखावले 
  • बांग्लादेशात सामने 
  • फलंदाजीतील पराक्रम 
  • गोलंदाजीतील विक्रम
  • मिळालेले यश
  • यशाचा परिणाम. 

निबंध 4


मी पाहिलेला चुरशीचा सामना 

इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चालले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांत उपांत्य सामना होणार होता. हा मी पाहिलेला अत्यंत चुरशीचा सामना होता. सामन्याचा दिवस उजाडला. मी खादयपेये घेऊन स्टेडियमवर गेलो. ठीक वेळेवर दोन पंच आणि दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर आले. नाणेफेक झाली.

त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला.

आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर होते; पण फलंदाज फारच जबाबदारीने खेळत होते.

नियोजित पन्नास षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर २१३ धावा झळकावल्या. चाळीस मिनिटांची विश्रांती सुरू झाली. क्रीडांगणावर खेळाडू नव्हते, प्रेक्षक जरा सैलावले होते. बरोबर आणलेल्या खादयवस्तूंचा समाचार घेणे सुरू झाले. पण कोठेही कागद फेकाफेकी नव्हती. विश्रांतीचा काळ संपला; पण कोठेही अस्वच्छतेचा अंशही नव्हता.

थोड्याच वेळात दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानावर फलंदाजीसाठी उतरले. ऑस्ट्रेलियाचा संघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. सुरवात चांगली झाली. धावफलकावर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बिनबाद ४६ धावा लागल्या. जॉन्टी होडस व लान्स क्लसनर यांनी वेगाने फलंदाजी केली.

धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा लागल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडु सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले.

 आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली. आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार होता. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती.
मग विजय कोणाचा? सारे वातावरण संभ्रमित होते. पंच निर्णय काय देणार?

 सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

महत्‍वाचे मुद्दे :
  • सामना कोठे व कोणत्या खेळाचा 
  • संघ 
  • सामन्याचे वर्णन 
  • सामना आवडल्याची कारणे 
  • अविस्मरणीय घटना 
  • सामना पाहून आल्यावर मनात आलेले विचार...

निबंध 5

मी पाहिलेला एक क्रिकेटचा सामना (क्रिकेट मॅच)


 एकदा मी एक विलक्षण अद्भुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते.


१ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं' हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता. 


वास्तविक ते टेनिस - बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस बांधले होते. त्यांच्या पॅडसचं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. 

त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस," पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस ? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुंकी  लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुंकी  लावली की चेंडू थुंकी  भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.  एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता.


त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट !" अंपायर गोंधळला "आऊट कसा' ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; 


अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!" अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.



गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. एका संघाची पाळी संपली. 


मग चौकशी सुरू झाली "स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, 


"मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो. "अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो." लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, 



त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. 


निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.

निबंध 6

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi


क्रिकेट मॅच) एकदा मी एक विलक्षण अदभुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. 

एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते. १ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. 


दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं" हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता.


वास्तविक ते टेनिस बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस् बांधले होते. त्यांच्या पॅडस्चं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. 


मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस, पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुकी लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुकी लावली की चेंडू थुकीने भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.



एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता. त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट!" अंपायर गोंधळला "आऊट कसा" ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. 


थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खूप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!'' अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.


गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. 


एका संघाची पाळी संपली. मग चौकशी सुरू झाली “स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. 


स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, "मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो.''अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो.


" लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. 



पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.


क्रिकेटची फारशी माहिती नसलेला एक नवखा गोलंदाज, पहिल्यानेच गोलंदाजी करायला आला. अंपायरने त्याला विचारलं, Are you bowling over the wicket or round the wicket ?' त्या नवख्या गोलंदाजाने उत्तर दिले. No, No! I am bowling at the wicket.


असाच एक नवखा खेळाडू खेळायला आला. जलदगती गोलंदाजाचा चेंडू त्याच्या पायावर एवढ्या जोरात लागला की तो विव्हळून खाली बसला. जरा पाय चेपलान, झटकलान् आणि पुन्हा खेळायला उभा राहिला. पंचांनी त्याला विचारलं; Can you walk ?' खेळाडू उद्गारला - Oh yes ! Just see, I can walk' म्हणून त्याने चालून दाखवले. तेव्हा पंच त्याला म्हणाला, you can walk , no ? Then walk to the pavilion, you are out !'



5 निबंध मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi