मी शाळा बोलते मराठी निबंध | Mi shala boltey nibandh marathi

 मी शाळा बोलते मराठी निबंध |  Mi shala boltey nibandh marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी शाळा बोलते  मराठी निबंध बघणार आहोत.  हा एक कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे.  शाळा जर बोलू शकली असती तर ती स्वतःचे मनोगत कश्याप्रकारे मांडते हे या निबंधात  दिलेले आहे .चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.



अन्न, वस्त्र, निवारा, तेवढीच गरजेची शाळा शिक्षणाने घडतो माणूस, होई पशुपासून वेगळा | माझी ही महती अगदी प्राचीन काळापासून आहे. केवळ शिक्षणच अशी कला आहे, जी माणसाला पशुपासून वेगळं करते. जर शिक्षण नसेल तर मानव व पशु यात फरक़ राहत नाही आणि शिक्षण देणारी संस्था म्हणजे मी, शाळा होय.


जन्म होताच प्रत्येकाचे अनौपचारिक शिक्षण सुरु होते. ते शिक्षण देणारी पहिली गुरु आई असते. मी मात्र औपचारिक शिक्षण देते. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं ही सर्व माझीच रुपे आहेत.



आईला जसा आपल्या बाळांचा लळा असतो तसाच मला सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचा लळा आहे. हुशार, खोडकर, गोंडस, दणकट, मस्तीखोर, रडवेली, हसऱ्या चेहऱ्याची, मंद बुद्धी, अशी सर्व प्रकारची मुले-मुली मी पाहत असते. अगदी पहिल्याच दिवशी शाळेत येणारी मुले,मुली, बावरलेल्या नजरेने मला पाहतात, कौतुकाच्या नजरेने पाहतात. त्यांना. पाहून मी मनातल्या मनात हसते. 


शाळेची भीती वाटणाऱ्या मुला मुलींना काही दिवसांनी माझा लळा लागतो. मग ती माझ्या अंगा खांद्यावर खेळतात. मला सुध्दा ती हवीहवीशी वाटतात. आतापर्यंत लाखो विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षण घेवून गेले. कुणी डॉक्टर झाले, कुणी इंजिनिअर झाले, कुणी वकील झाले, कुणी अधिकारी झाले. जेंव्हा कधी ते माझ्या जवळून जातात व मोठ्या अभिमानाने माझ्याकडे पाहून सांगतात “ही माझी शाळा, इथे मी शिकलो” तेंव्हा त्यांनी “ही माझी शाळा” काढलेले उद्गार मला “ही माझी आई" असे ऐकू येतात. कर्तृत्ववान मुलांचा ज्याप्रमाणे आईला अभिमान असतो तेवढाच अभिमान मला, त्यांना पाहून वाटत असतो.



जगामध्ये मीच अशी आई आहे जी सतत मुला मुलींच्या सान्निध्यात असते. ३-४ वर्ष वयाच्या मुला पासून तर कॉलेजच्या मुला पर्यंत सर्वच वयोगटातील मुले मुली हि  माझी लेकर आहेत आणि हे वर्षानुवर्ष सतत सुरु आहे. माझं वय वाढतं पण मी म्हातारी  होत नाही. उलट तेवढी माझी प्रसिध्दी वाढते. प्रत्येक शहरात, गावागावात, वाड्या वस्तीवर, पिढ्यानपिढ्या ज्ञानामृत पाजणारी आई म्हणून माझा गौरव होत आहे.


जो शाळेत नाही गेला ,त्याचा जन्म वाया गेला, धर्मनिरपेक्षतेचे एक उत्कृष्ट उदाहरण, एकतेचे सुंदर प्रदर्शन जेथे घडते असे पवित्र ठिकाण म्हणजे शाळा. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद