वृद्धाचे मनोगत मराठी निबंध | vrudhachi manogat atmakatha in marathi nibandh

वृद्धाचे मनोगत मराठी निबंध | vrudhachi manogat atmakatha in marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृद्धाचे मनोगत  मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये सर्व कुटुंबासोबत राहूनसुद्धा एकट्या पडलेल्या आजी कशाप्रकारे  मनोगत सांगत आहे  व त्या दुःखातून सावरत ती कशाप्रकारे ती स्वतःचे जीवन जगत आहे याची माहिती निबंधामध्ये दिली आहे. या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.  


बालपण सर्वांच्या आवडीचे, म्हातारपण ते नावडीचे पण अनुभव समृध्द असे, वेगळे महत्त्व म्हातारपणाचे बाळांनो, आज मी तुम्हाला नेहमी प्रमाणे राजा राणी किंवा परीची गोष्ट न सांगता माझी स्वत:चीच कहाणी सांगणार आहे. आज तुमच्या समोर जे माझं रुप दिसते आहे ते म्हातारीचं आहे. माझं सर्व शरीर, जे तरुणपणी अतिशय सुंदर दिसत होतं आज त्यावर सर्व सुरकुत्या पडलेल्या आहेत. केस जे अतिशय काळेशार व लांब होते आज पांढरे व केवळ वितभर राहिले आहेत. तरुणपणी सुंदर दिसणाऱ्या या डोळ्यांनी आज मला निट दिसत नाही. तरुणपणी दिवसभर काम करुनही न थकणारे हे शरीर आता मात्र थकल आहे. त्याला मदतीची गरज आहे. माझी कार्यक्षमता कमी झाली. परंतु असे असले तरी मी हिम्मत सोडली नाही.माझे शरीर थकले असले तरी मन मात्र ताजेतवानेच आहे. ह्या वयात खरे तर मदतीची गरज असते. मला मदत करायला कुणालाही वेळ नाही. सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं. परंतु मी विचार केला की कुढत बसण्यापेक्षा व कुणाच्या मदतीची अपेक्षा ठेवल्या पेक्षा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपणच आपली कामे का करु नये?स्वत:ची कामे करण्यात वेळ निघून जातो. त्यामुळे मला एकटेपण आठवत नाही. माझा मुलगा आहे, नातवंड आहेत. मुलगा त्याच्या प्रपंचाची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. त्यामुळे त्याला माझ्या करिता वेळ नाही. कधी कधी माझ्यातील आईचं प्रेम कासावीस होत. बालपणी माझ्या कुशीत दडायचा, घरभर माझ्या पदराला धरुन फिरायचा आजही त्याने तसेच माझ्याजवळ बसावं. मी त्याला भरभरुन आईचं प्रेम द्यावं असे वाटते. परंतु मुलगा मोठा झाला असल्यामुळे त्याला माझ्या प्रेमाची गरज उरली नाही.मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवते. तो प्रसन्न दिसला तर माझं मन सुध्दा प्रसन्न होते. तो दुःखी दिसला तर मला सुध्दा वेदना होतात. नातवंड केवळ एखाद्या वेळेसच माझ्याकडे येतात. कुटूंबात राहून सुध्दा मी एकटी आहे. असे असले तरी मी दुःखी नाही. माझ्या एकटेपणावर मी अतिशय छान उपाय शोधून काढला आहे. मी खूप सारी पुस्तके विकत घेतली आहेत. त्यात संत महात्म्यांच्या ग्रंथांचे भांडार आहे.वैज्ञानिक,विचारवंत व समाजसुधारकांची पुस्तके आहेत.माझ्याकडील ग्रंथ हे माझे धन आहे. ही सर्व पुस्तके मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुरतील एवढी आहेत. ही पुस्तके खरे तर मी या आधीच वाचायला पाहिजे होती परंतु संसार प्रपंचामुळे वेळ मिळाला नाही. प्रत्येक वृद्धाने अशा प्रकारे आपल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करावा. कुटुंबाच्या प्रेमाची अपेक्षा न करता. कारण पुस्तकापेक्षा गुणी मित्र कुणीच नाही.तसेच भुतकाळातील गोड स्मृतींना उजाळा देण्यात वेळ सहज जातो.

नका कंटाळू म्हातारपणास, नका घाबरु त्याला। धैर्याने व आनंदाने,सामोरे जा त्याला।।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

1 टिप्पणी: