आजची युवापिढी मराठी निबंध | Essay on YuvaPidi in Marathi

आजची युवापिढी मराठी निबंध | Essay on YuvaPidi in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आजची युवापिढी मराठी निबंध बघणार आहोत.  'दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाने केला आईवडिलांचा खून' ही नुकतीच औरंगाबादला घडलेली बातमी वाचून मन विषण्ण झाले. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले रक्त सांडणारा तरुण आज कोठे वाहत चालला आहे, याचीच खंत वाटते.


प्रखर राष्ट्रनिष्ठा जाज्ज्वल्य देशप्रेम यातूनच शेकडो क्रांतिकारक फासावर चढले. सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली हजारो क्रांतिकारकांनी देशासाठी प्राण वेचले आणखी किती जणांनी आत्मबलिदान केले याची गणतीच नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु आजपर्यंत भारताने एक महासत्ता म्हणून जगापुढे यायला हवे होते. कारण आपल्याकडे वीरांच्या रक्ताने व्हाऊन निघालेली भूमी थरारक प्रकट करणारा आदर्श इतिहास आहे. परंतु आज हे चित्र न दिसता दिसते आहे ते युवा पिढीचे वैफल्ययुक्त जीवन.


आजच्या युवापिढीकरिता. आज आमच्यासाठी शाळा महाविद्यालये म्हणजे मौज करण्याची साधने ठरत आहेत. शाळेत नाव टाकायचे तेही डोनेशन भरून नंतर वर्षभर टवाळ्या.


कॉलेज हे प्रेम करण्याचे माहेरघरच झाले की बलात्कार व आत्महत्या करण्याचे स्थान ? या सर्व बाबतीत कॉलेजच्या तरुणाच्या जीवनाबद्दल कोणती दिशा आहे ? हा चिंतेचा प्रश्न आज रस्त्यावर मुले, मुलींची छेड काढताना बिनधास्तपणे 'आती क्या खंडाला', 'यायला रे लडकी बडी मस्त मस्त' अशी गाणी म्हणताना कशाचाही विचार करत नाहीत. त्यासाठी मार खाल्ला तरी परत प्यार किया तो डरना क्या ! हे वाक्य तयारच ! आजची युवापिढी सिगरेट, जुगार, लूटमार, दंगली यासारख्या विघातक कार्यात अडकत आहे.


नवी पिढी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करीत आहे. योग्य-अयोग्य याचा विचार न करता पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आज यामुळेच आत्मावलोकनाची गरज निर्माण झाली आहे वा मातीतच दोष निर्माण झाल्याने निघणारी पिकेही रोगट बनण्याचे कारण म्हणजे पन्नास वर्षातील सामाजिक चुका होत.


आपल्या सदोष शिक्षणव्यवस्थेमुळे आज सहा कोटींच्या बेकारांची फौज उभी आहे, लोकसंख्या नियंत्रणात नाही, देशात स्वार्थी नेत्यांनी या युवकांचा जाती धर्मावर आधारीत भेदभाव निर्माण करण्यासाठी वापर करून घेतला आहे. आज आपल्या पुढे आदर्श उभे आहेत ते - छोटा राजन, हर्षद मेहता आणि तेलगी यांचे खरे तर 'युवापिढी' ही आपली समस्या नसून शक्ती आहे. युवकांच्या बाहूत अफाट बळ आहे. फक्त या शक्तीचा वापर सृजनशील कार्यासाठी व्हावा..


भारताचे भवितव्य या कोवळ्यांच्या हातात आहे. आपण हे हात मजबूत करायला हवेत. आज गरज आहे. ती युवकांपुढे चांगले आदर्श निर्माण करण्याची. शिक्षणव्यवस्थेत बदल करून ती अधिक रोजगारप्रधान बनविण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाबरोबरच पारंपरिक जीवनमूल्ये युवावर्गात रुजविणे महत्त्वाचे आहे. वडीलधाऱ्यांचा आदर, सामाजिक जाणीव व समाजाचे आपल्यावर असलेले ऋण याची जाणीव त्यांना करून द्यावयास हवी.


"Youth is Looking for new answer so that they can question them walk kelly” ?

अशाप्रसंगी राज्यकर्त्यांचे धोरण व प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांच्या या बंद मुठीमध्ये संपूर्ण जग जिंकण्याची शक्ती आहे. या शक्तीचा सक्षमपणे वापर करावा. यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजेत.


पाश्चात्त्यांच्या अनुकरणाबाबत आपण निरपेक्ष विवेकबुद्धी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या प्रगतीसाठी ज्ञान व गुण घ्यावेत व अवगुणांचा त्याग करायला शिकले पाहिजे. निष्कलंक चारित्र्याचे प्रखर बुद्धिमत्तेचे व कार्यक्षम असे अधिकार नेते निर्माण होणे आवश्यक आहे. या देशात एकापेक्षा जास्त अब्दुल कलाम, कल्पना चावला निर्माण होण्याची गरज आहे.


आजचा तरुण चिकित्सक बुद्धिवादी व धडाडीचा आहे. प्रचंड महत्त्वाकांक्षा व जबर इच्छाशक्ती यांच्या आधारे खरोखरच तो आकाशाला गवसणी घालणारा आहे. आजही त्याच्यासमोर सानिया, सुनिता, साबीर, राजवर्धनसिंग, साचन, लता-आशा, अनुजा ठाकूर असे युवक-युवती आहेत.


विकसनशील भारताला एक आर्थिक महासत्ता बनविण्याचा निर्धार आपण केला आहे. आपल्या या ताकदीला योग्य दिशा मिळाली तर नक्कीच २०२० मध्ये आपली भारतमाता एका महासत्तेच्या रूपात प्रकट होणार आहे. चला आजच आपण सर्वजण मिळून सुरुवात करूया. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद