आनंदीवहिनी मराठी निबंध | AANANDIVAHINI ESSAY MARATHI

 आनंदीवहिनी मराठी निबंध | AANANDIVAHINI ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आनंदीवहिनी मराठी निबंध बघणार आहोत. 'आनंदीवहिनी, जरा संध्याकाळी लाडू करायला या हं, परवा मंगळागौर आहे,' 'वहिनी, आज रात्री दवाखान्यात जरा झोपायला जा हं,' 'वहिनी, उद्या सकाळी जरा लवकरच ये गो, मोदक करायचे आहेत.' अशी वहिनींना गावभरची आमंत्रणं असत. 


सर्वांना त्या आपल्या आपल्याच वाटत. आनंदीवहिनी नावाप्रमाणं 'आनंदी' होत्या. सतत हसतमुख. कितीही काम असो- चेहऱ्यावर कंटाळा नाही, वैताग नाही की कपाळावर आठी नाही. तसंच चेहऱ्यावरून ओसंडणारं व तोंडातून बाहेर पडणारं हसू कधीही, केव्हाही त्यांना सोडून गेलं नाही. 


त्यांचं हसणं म्हणजे धो-धो कोसळणारा कोकणातील पाऊसच! आनंदीवहिनी घरात आहेत हे बाहेरून समजायचं. दहा-बारा माणसांचं कोकणातील कुटुंब, पूर्वी सुनेच्या व आता सासूच्या भूमिकेतून त्या सांभाळत होत्या. त्यांना दोन सुना होत्या. पण 'सुना' की 'लेकी' असा पाहणाऱ्यांना प्रश्न पडे. त्या प्रेमळ आजी होत्या व परोपकारी शेजारीण होत्या.


सुना आल्या तेव्हा दुसऱ्या वर्षापासून घराचा सर्व कारभार त्यांच्यावर सोपवून त्या नातवंडात रमू लागल्या. संसारातून इतक्या सहजपणे सुटका करून घेणाऱ्या अशा स्त्रिया अपवादानेच बघायला मिळतील, सकाळी पोथीवाचन व संध्याकाळचं भजन त्यांनी कधी चुकवलं नाही. त्यांचा आवाज गोड होता. 


कितीतरी जुन्या गाण्यांचा त्यांच्याजवळ खजिना होता. त्यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची परोपकारी वृत्ती. जर आपली तेथे गरज आहे, आपली मदत होऊ शकेल, असं त्यांना वाटलं की, आनंदीवहिनी तेथे हजर सासरच्या, माहेरच्या अनेक नातेवाईकांना त्यांनी आपल्या घरी ठेवून घेतलं. 


त्यांचं शिक्षण केलं. 'पण मी केलं,' असा गाजावाजा न करता. त्यांच्या घरून कोणी रिकाम्या हातानं परत गेला नाही. श्रावणात लोणचं, मिरची मागायला मागच्या दारी कोणी ना कोणीतरी यायचंच. या आनंदीवहिनींचा आळीतील सर्व लोकांना आधार वाटायचा. 


आपल्याला गरज पडली तर त्या धावत येतील, अशी खात्री वाटायची. जो तो त्यांना दीर्घायुष्य चिंतत असे. 'उद्या बारसं आहे, आनंदीवहिनींना जरा नऊ वाजता पाठवा,' किंवा 'बाळाला फार ताप चढला आहे, वहिनी जरा चला,' अशी बोलावणी त्यांना सतत येत असत. बालपणीच पोरक्या व तरुणपणीच विधवा झालेल्या आनंदीवहिनी आपलं दुःख मनात ठेवून जगावर सुखाची, आनंदाची उधळण करून राहिल्या!



परवा मंगळागौर आहे,' 'वहिनी, आज रात्री दवाखान्यात जरा झोपायला जा हं,' 'वहिनी, उद्या सकाळी जरा लवकरच ये गो, मोदक करायचे आहेत.' अशी वहिनींना गावभरची आमंत्रणं असत. सर्वांना त्या आपल्या आपल्याच वाटत.


आनंदीवहिनी नावाप्रमाणं 'आनंदी' होत्या. सतत हसतमुख. कितीही काम असो- चेहऱ्यावर कंटाळा नाही, वैताग नाही की कपाळावर आठी नाही. तसंच चेहऱ्यावरून ओसंडणारं व तोंडातून बाहेर पडणारं हसू कधीही, केव्हाही त्यांना सोडून गेलं नाही. 


त्यांचं हसणं म्हणजे धो-धो कोसळणारा कोकणातील पाऊसच! आनंदीवहिनी घरात आहेत हे बाहेरून समजायचं. दहा-बारा माणसांचं कोकणातील कुटुंब, पूर्वी सुनेच्या व आता सासूच्या भूमिकेतून त्या सांभाळत होत्या. त्यांना दोन सुना होत्या. पण 'सुना' की 'लेकी' असा पाहणाऱ्यांना प्रश्न पडे. त्या प्रेमळ आजी होत्या व परोपकारी शेजारीण होत्या.


सुना आल्या तेव्हा दुसऱ्या वर्षापासून घराचा सर्व कारभार त्यांच्यावर सोपवून त्या नातवंडात रमू लागल्या. संसारातून इतक्या सहजपणे सुटका करून घेणाऱ्या अशा स्त्रिया अपवादानेच बघायला मिळतील, सकाळी पोथीवाचन व संध्याकाळचं भजन त्यांनी कधी चुकवलं नाही. त्यांचा आवाज गोड होता. कितीतरी जुन्या गाण्यांचा त्यांच्याजवळ खजिना होता.


त्यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची परोपकारी वृत्ती. जर आपली तेथे गरज आहे, आपली मदत होऊ शकेल, असं त्यांना वाटलं की, आनंदीवहिनी तेथे हजर.. सासरच्या, माहेरच्या अनेक नातेवाईकांना त्यांनी आपल्या घरी ठेवून घेतलं. 


त्यांचं शिक्षण केलं. 'पण मी केलं,' असा गाजावाजा न करता. त्यांच्या घरून कोणी रिकाम्या हातानं परत गेला नाही. श्रावणात लोणचं, मिरची मागायला मागच्या दारी कोणी ना कोणीतरी यायचंच. या आनंदीवहिनींचा आळीतील सर्व लोकांना आधार वाटायचा. आपल्याला गरज पडली तर त्या धावत येतील, अशी खात्री वाटायची. जो तो त्यांना दीर्घायुष्य चिंतत असे.


'उद्या बारसं आहे, आनंदीवहिनींना जरा नऊ वाजता पाठवा,' किंवा 'बाळाला फार ताप चढला आहे, वहिनी जरा चला,' अशी बोलावणी त्यांना सतत येत असत. बालपणीच पोरक्या व तरुणपणीच विधवा झालेल्या आनंदीवहिनी आपलं दुःख मनात ठेवून जगावर सुखाची, आनंदाची उधळण करून राहिल्या! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद