पहाटेची भ्रमंती मराठी निबंध | pahatechi bhramanti essay marathi

 पहाटेची भ्रमंती मराठी निबंध | pahatechi bhramanti essay marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पहाटेची भ्रमंती मराठी निबंध बघणार आहोत. मंद मधुर हसत हसत इंद्रनील, चंद्रकांत, सांध्यसुंदरी जेव्हा लाजत लाजत पृथ्वीवर प्रवेश करते त्या वेळी आपल्या मनाची परगळ झटकून ताजेतवाने होण्यासाठी बहुतेक लोक भ्रमंती करतात. 


संध्याकाळी थकलेल्या मनाने व शरीराने गजबजलेल्या रस्त्यांवर फिरण्यापेक्षा पहाटेच्या शांत, पवित्र, उत्साहवर्धक, आल्हाददायक वातावरणातील भ्रमंतीच अनेकांना आवडते. पहाटे फिरताना दिवसा आढळणारे माणसांचे थवे व वाहनांचा महापूर आपल्याला जागोजागी अडथळा करत नाही. रस्ता मोकळाच असतो. 


आरामात रमत-गमत आपल्याला फिरता येते. मुंबईसारख्या शहरात मात्र थोडी माणसे, वाहने व 'जॉगिंग' करायला जाणारी काही मंडळी भेटतात. बाकी सर्व गावे निद्रेची काळोखी चादर ओढ्न साखरझोपेचा आनंद लुटत असतात. पहाटे फिरताना वाहनांची प्रदूषित हवा नाकात जाण्याऐवजी मद शीतल पवन आपल्याला सखदायक वाटतो. या वेळी शुक्र तारा मंदावलेला असतो. 


उषादेवीच्या गालावर हळू हळू लाली का चढत असते. आकाशातील काळोखाचा काळा पडदा हळू हळू दूर होऊ लागतो. रात्रीच्या अंधारात हरवलेले सर्व आकार आपलं अस्तित्व दाखवू लागतात. लाल, गुलाबी, सुवर्णाचे झगे लेवून बालकवींची व-हाडी मंडळी आकाशात जमू लागते. पूर्व दिशा उमलू लागते.


मुंबईसारख्या मोठ्या शहरात पहाटेसुद्धा जाग असते. लोकल, बसेस, बाहेरगावाहून येणाऱ्या एस्. टी. गाड्या, हमाल, प्रवासी, फुलवाले, दूधवाले, वर्तमानपत्रवाले, हॉटेलवाले या सर्वांची गडबड चालू असते. नोकरीवर जाणाऱ्या स्त्रिया-पुरुष यांचा दिवस भल्या पहाटेपासूनच सुरू होतो. शांत मनाने, शांत वातावरणातील ही गडबड, धावपळ पाहण्यातही एक आगळी मजा असते.


खेड्यात मात्र दृश्य वेगळे असते. थोडं फटफटल्याबरोबर शेतकऱ्याचं घर जागं होतं व कामाला लागतं. पहाटेच्या वेळी ताज्या दुधाच्या धारांचा चरवीत होणारा झुरुमुरू झुरुमुरू आवाज फार मंजुळ वाटतो. कोंबडा आरवून सर्वांना जागं करत असतो. पक्षी हलक्या स्वराने किलबिल करत असतात.


उंच उंच हिरव्यागार वृक्षांना व डोंगराला सभोवती पहायला ठेवून एखाद्या नदीच्या सोबतीनं निर्धास्त झोपलेलं खेडेगाव पहाटेच्या भ्रमंतीतच पहायला मिळतं. किंवा दिवसभराच्या श्रमाने दमन शांत झोपलेल्या लहान-मोठ्या इमारती व दिवसभराच्या दगदगीनं थकून लांबलचक पहुडलेले निर्जन रस्ते पहाटेच्या भ्रमंतीतच दिसतात. 


हे शांत वातावरण पाहन आपल्याही चित्तवृत्ती शांत होतात. दिवसभर गडबड- गोंधळ करून सतावणारं लहान मूल झोपल्यावर जसं निरागस वाटतं, तशीच सर्व गावे, शह सुंदर वाटते. निळसर धुक्याचा पदर डोक्यावर घेऊन मेंदीनं रंगवलेल्या नाजुक पावलांवर सोनफुलांचे चाळ बांधून, शुभ्र कोवळ्या दंवबिंदंची गळ्यात माळ घालून, लाजत, मुरडत लावण्यमयी सकाळ सृष्टीच्या गाव. 


शहरमा दाराशी येऊन उभी असते. तिचे दर्शन फक्त पहाटेच्या भ्रमंतीतच होते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद