साधी राहणी उच्च विचारसरणी मराठी निबंध | Essay On Simple Living High Thinking in Marathi

 साधी राहणी उच्च विचारसरणी मराठी निबंध | Essay On Simple Living High Thinking in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण साधी राहणी उच्च विचारसरणी मराठी निबंध बघणार आहोत.  साधे जीवन व उच्च विचार समाधान आणि सुखाची खाण असतात. साध्या जीवनामुळेच आपल्यात मानवतेच्या गुणांचा समावेश होतो. असे जीवन आणि आचरणात आनंद, सुख, समाधान आणि पावित्र्य आहे. आपल्या संतानी, धर्म ग्रंथानी, साहित्याने नेहमी साधे जीवन जगण्याची शिकवण दिली, कारण यातच आपले भले आहे.


वर्तमान जीवनात जो असंतोष, गोंधळ, मारामाऱ्या, धावपळ, ईर्ष्या, तणाव, रोग, दुःख इत्यादी आहे ते सर्व साध्या जीवनाच्या अभावामुळेच. आपल्या इच्छांना काही अंत नाही. त्याच आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. यांच्या मुळेच आपले जीवन चिंतामय आणि दुःखी बनले आहे. 


अति संग्रह करण्याच्या प्रवृत्तीमुळे सर्व उलट सुलट करून ठेवले आहे. इतक्या सोयी सुविधा, उपकरणे आणि शास्त्रीय प्रगती असूनही आजचा मनुष्य अशांत, दुःखी आणि असहनशील बनला आहे. गुन्हे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत आहे आणि सगळीकडे, तणाव, निराशा आणि अशांति आहे. 


सुख ही एक अमूल्य वस्तू आहे. ती खरेपण, स्वच्छता आणि साधेपणानेच मिळू शकते. आपल्या इच्छा आपले सुख, चैन आणि शांती हिसकावून घेतात. परिणामी सर्वत्र मारामारी, हिंसा, गुन्हे आणि दुर्गुणांचे साम्राज्य आहे. आपल्या स्वार्थात आंधळा झालेला मानव आज दूरचा विचार करू शकत नाही. 


त्याच्या डोळयांवर लोभ, लालसा आणि दुराचाराचा चष्मा आहे. कोणत्याही प्रकारे तो त्वरीत श्रीमंत बनू इच्छितो. त्यासाठी वाईटात वाईट मार्ग स्वीकारण्यास तयार आहे. यामुळे जी स्पर्धा सुरू झाली ती खरोखरच जीवघेणी आहे.


आज व्यक्ती स्वत:वर पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहे. आपण साधी व राहाणी उच्च विचारासरणी सोडून हा मार्ग पत्करला आहे. आपण गांधीजींना विसरलो रामायण, महाभारताच्या शिकवणूकीला तिलांजली दिली.


सारांश, सरळपणा आणि साधेपणातच सुखाचे मूळ आहे. याउलट नकलीपणा, देखावा, आणि समस्या दुःखाचे मूळ आहे. साधे जीवन जगल्यास जीवन आनंदी होते. उच्च विचार येतात. व्यक्ती सुखी व संतुष्ट राहते. आपले पूर्वज आपल्यापेक्षा सुखी होते. 


कारण त्यांचे जीवन साधे होते, गरजा कमी होत्या. त्यांच्या जीवनात सुख सुविधांचे अवंडबर नव्हते. शरीर निरोगी होते कारण राहणीमानाचा स्वास्थ्याशी सरळ संबंध असतो. साधी, सरळ, व्यक्ती स्वाभाविक रित्या निरोगी आणि संपन्न असते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद