मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध | Manvata hach khara dharm Marathi nibandh

मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध | Manvata hach khara dharm Marathi nibandh 


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध बघणार आहोत. 


“विज्ञानाला वगळा गतप्रभ, झणी होतील तारांगणे ।  

विज्ञानाला वगळा विकेल कवडीमोलावरी हे जिणे । ।”


मनुष्याने आपल्या बद्धीच्या जोरावर जीवसृष्टीत श्रेष्ठ स्थान मळविले आहे. पण अजुनही या मनुष्यप्राण्यात 'पशुत्व' शिल्लक आहे याचा प्रत्यय अनेकवेळा येतो. आता हेच पाहा ना की 'सारी माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत' असे म्हणत असतानाच ती सतत आपापसात झगडत असतात. धर्म, धन, जात, भाषा यावरून आपापसात भांडत असताना ते आपली बुद्धी गहाण टाकतात.


जर असे नसते तर आपल्यातीलच काही लोकांना अस्पृश्य लेखून त्याने त्यांना गावकुसाबाहेर ठेवले असते का? त्यांना जगण्याचा मुलभूत हक्कच नाकारण्यात येतो जणू! त्यांची सावलीसुद्धा त्याज्य ठरविली जाते. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांनी पोखरलेले त्यांचे जीवन कस्पटासमान असते.


पण समाजातील सहृदय थोर लोकांना हे मान्य नव्हते. विषमतेची दरी बुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी त्यासाठी साद घातली ती 'मानवधर्माची'. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळातील चातुर्वर्ण्याचे स्तोम कमी करण्यासाठी प्रयत्न केले. सर्व जाती-जमातींच्या लोकांना आपल्याकडे घेतले. ते एकच जाणत होते की, मी माणूस आणि तिही माणसे. केशवसुत एका ठिकाणी म्हणतात“ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हांतूनी वाहे " हे त्यांना बरोबर लागू पडते.


ज्ञानेश्वरांचे कार्य संत एकनाथांनी पुढे चालविले. वाळवंटात उन्हाचे चटके बसत असल्यामुळे रडणाऱ्या 'अत्यंजाच्या पोराला' त्यांनी उचलून घेतले. दलितांना घरी जेवू घातले अन् त्यांच्याकडे जेलेही. पण आम्ही मात्र ही सारी परंपरा विसरलो. मानवता लोप पावत आहे. 


माणूस माणसाला विसरला. पैसा हेच सर्वस्व झाले आहे. आजही अनेक अदिवसासी हलाखीचे जीवन जगत आहेत. श्रमाला प्रतिष्ठा दिली जात नाही. 'लग्न' या नावाखाली मुला-मुलींची 'खरेदी-विक्री' केली जात आहे. माणूस 'मानव' न राहता 'दानव' बनला आहे. म्हणूनच बहिणाबाई चौधरी विचारतात -

“माणसा माणसा

कधी होशील माणूस?"


पण अजुनही वेळ गेलेली नाही. आशेचे काही किरण दिसतात. आजच्या विज्ञानयुगात सावकाश का होईना मानवताधर्माची चाहूल लागते आहे. ही समाधानाची बाब आहे. नेत्रदान, रक्तदान, मुत्रपिंडदान या गोष्टींमुळे 'मानवधर्माचेच' द्योतक आहे. 


मानवाने अफाट बुद्धिच्या जोरावर अंतराळातील अडथळे दूर केले आहेत. मग मनातील भ्रामक पिंजरे तोडायला कितीसा वेळा लागणार? लवकरण 'वसुधैव कुटुंबकम्' चे स्वप्न साकार होऊन 'मानवधर्म' सुस्थापित होईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद