माझा आवडता संत : संत तुकाराम मराठी निबंध | Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi

 माझा आवडता संत : संत तुकाराम मराठी निबंध | Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता संत : संत तुकाराम  मराठी निबंध बघणार आहोत. 

'संत कृपा झाली ।

 इमारत फळा आली

ज्ञानदेवे रचिला पाया । 

उभारिले देवालया नामा तयाचा किंकर ।

 तेणे रचिले ते आवार जनार्दन एकनाथ । 

खांब दिधला भागवत

तुका झालासे कळस । 

भजन करा सावकाश' संत ज्ञानदेवांनी रचलेल्या भागवत संप्रदायाच्या इमारतीवर कळस होण्याचे भाग्य संत तुकारामांना लाभले. आजही त्यांची अभंगवाणी लोकांच्या अंतःकरणात घरकरून आहे. म्हणून मला आवडणारा संत श्री संत तुकाराम होत.

तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे) असे त्यांचे पूर्ण नाव होय. त्यांचा जन्म पुण्याजवळ देहू येथे इ.स. १६०८ मध्ये झाला. वाडवडील देहूचे महाजन होते. पूर्वापार विठ्ठलभक्ती चालत आलेली होती. विठ्ठलभक्ती ही माझ्या घराण्याची मिरासदारी आहे असे ते सांगत असत.

वयाची सतरा वर्षे पूर्ण होतात न होतात तोच त्यांचे आई - वडील वारले. बंधू सावजी विरक्त होऊन निघून गेले. पत्नी आणि मुलगा दुष्काळात अन्नान्न करीत मरण पावले. संसाराची वाताहत त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली. आपत्ती, दुःख, चिंता आणि अपमान यांनी उद्विग्न झालेले तुकाराम ईश्वरचिंतनाकडे वळले इ.स. १६३२ मध्ये.

संत तुकारामांनी सांगितले आहे की, 'नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येवोनिया' कवित्त्वाची स्फूर्ती होऊन अभंग रचना करण्याची प्रेरणा मिळाली. संत तुकारामांचे सुमारे पाच हजार अभंग उपलब्ध आहेत. या अभंगवाणीत आजही लोकांच्या अंतःकरणाला जाऊन भिडण्याचे सामर्थ्य आहे. 

संत तुकारामांची अभंगवाणी ही त्यांच्या व्यक्तिगत प्रखर अनुभवातून जन्माला आली आहे. त्यांनी त्यांचे मनोगत या अभंगवाणीतून ओतले आहे. त्यामुळे त्यांची कविता सुंदर जीवनभाष्य बनली आहे. 'शुद्ध अंतरंगाच्या बीजापोटी तिने रसाळ गोमटे रूप धारणे केले आहे. 

ही वाणी मेनाहून मऊ आणि प्रसंगी वज्राहून कठोर बनली आहे ? त्यांच्या अभंगातून भावनेची उत्कटता आणि हळुवारपणा दिसतो तर सामाजिक नीतिपर अभंगातून भावनेची उत्कटता आणि हळुवारपणाही दिसून येतो. संत तुकारामांनी संत नामदेवांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे चालविले आहे. 

'मना वाटे तैसी बोलिलो वचने ।

केली धीटपणे सलगी देवा ।'

असे आपल्या प्रारंभीच्या रचनेबद्दल सांगतात, 'काय म्या पामरे बोलावी उत्तरे । बोलविता धनी वेगळाचि' अशा विनयाने आपल्या रचनेचे सारे श्रेय पांडुरंगाला देतात. 'गिता', 'भागवत' हे त्यांचे प्रिय आणि आदरणीय ग्रंथ होते. 'गर्जू हरीचे पोवाडे' हे त्यांच्या कवितेचे ध्येय आहे. या ध्येयापोटीच 'घेई घेई माझे वाचे । घेई नाय विठ्ठलाचे' असे ते सांगतात.

'काय आम्हा विठोबाचे पायी ।

नाही ऐसे काही तेथ एक ।'

असे असल्याने पांडुरंगा शिवाय ते कोणाचेही गोडवे गात नाहीत.

 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 

कर कटावरी ठेवूनिया ।

तुळसीहार गळा कासे पितांबर । 

आवडे निरंतर हेचि ध्यान ।।'

हे त्यांनी विठ्ठलाचे रेखाटलेले शब्दचित्र परमसुंदर आणि मनोवेधक आहे. हा विठ्ठलच त्यांचा जीव आणि भाव आहे. त्यांनी पंढरीला माहेर संबोधले आहे. सासुरवाशिणीप्रमाणे निडळावर हात ठेवून पंढरीची ते निरंतर वाट पाहतात.

संत तुकारामांनी आपल्या असंख्य अभंगातून संसाराची असारता पटविली आहे. केवळ त्यांचा अध्यात्माचा उपदेश नव्हता तर त्यांचा अनुभवही होता. संसाराचा मोह धरणे म्हणजे 'ढेकणाच्या बाजेवर शांत झोपेची अपेक्षा' करण्यासारखे आहे.

वयाची सतरा वर्षे पूर्ण होतात न होतात तोच त्यांचे आई - वडील वारले. बंधू सावजी विरक्त होऊन निघून गेले. पत्नी आणि मुलगा दुष्काळात अन्नान्न करीत मरण पावले. संसाराची वाताहत त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली. आपत्ती, दुःख, चिंता आणि अपमान यांनी उद्विग्न झालेले तुकाराम ईश्वरचिंतनाकडे वळले इ.स. १६३२ मध्ये.

संत तुकारामांनी सांगितले आहे की, 'नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येवोनिया' कवित्त्वाची स्फूर्ती होऊन अभंग रचना करण्याची प्रेरणा मिळाली. संत तुकारामांचे सुमारे पाच हजार अभंग उपलब्ध आहेत. या अभंगवाणीत आजही लोकांच्या अंतःकरणाला जाऊन भिडण्याचे सामर्थ्य आहे. 

संत तुकारामांची अभंगवाणी ही त्यांच्या व्यक्तिगत प्रखर अनुभवातून जन्माला आली आहे. त्यांनी त्यांचे मनोगत या अभंगवाणीतून ओतले आहे. त्यामुळे त्यांची कविता सुंदर जीवनभाष्य बनली आहे. 'शुद्ध अंतरंगाच्या बीजापोटी तिने रसाळ गोमटे रूप धारणे केले आहे. 

ही वाणी मेनाहून मऊ आणि प्रसंगी वज्राहून कठोर बनली आहे ? त्यांच्या अभंगातून भावनेची उत्कटता आणि हळुवारपणा दिसतो तर सामाजिक नीतिपर अभंगातून भावनेची उत्कटता आणि हळुवारपणाही दिसून येतो. संत तुकारामांनी संत नामदेवांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे चालविले आहे. 

'मना वाटे तैसी बोलिलो वचने ।

केली धीटपणे सलगी देवा ।'

असे आपल्या प्रारंभीच्या रचनेबद्दल सांगतात, 'काय म्या पामरे बोलावी उत्तरे । बोलविता धनी वेगळाचि' अशा विनयाने आपल्या रचनेचे सारे श्रेय पांडुरंगाला देतात. 'गिता', 'भागवत' हे त्यांचे प्रिय आणि आदरणीय ग्रंथ होते. 'गर्जू हरीचे पोवाडे' हे त्यांच्या कवितेचे ध्येय आहे. या ध्येयापोटीच 'घेई घेई माझे वाचे । घेई नाय विठ्ठलाचे' असे ते सांगतात.

'काय आम्हा विठोबाचे पायी ।

नाही ऐसे काही तेथ एक ।'

असे असल्याने पांडुरंगा शिवाय ते कोणाचेही गोडवे गात नाहीत. 

'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 

कर कटावरी ठेवूनिया ।

तुळसीहार गळा कासे पितांबर । 

आवडे निरंतर हेचि ध्यान ।।'

हे त्यांनी विठ्ठलाचे रेखाटलेले शब्दचित्र परमसुंदर आणि मनोवेधक आहे. हा विठ्ठलच त्यांचा जीव आणि भाव आहे. त्यांनी पंढरीला माहेर संबोधले आहे. सासुरवाशिणीप्रमाणे निडळावर हात ठेवून पंढरीची ते निरंतर वाट पाहतात. संत तुकारामांनी आपल्या असंख्य अभंगातून संसाराची असारता पटविली आहे. 

केवळ त्यांचा अध्यात्माचा उपदेश नव्हता तर त्यांचा अनुभवही होता. संसाराचा मोह धरणे म्हणजे 'ढेकणाच्या बाजेवर शांत झोपेची अपेक्षा' करण्यासारखे आहे. जगाचा अनुभव सांगताना ते सांगतात' जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आहे आणि सारी सोयरी केवळ सुखाची आहेत अंतःकाळाचे कोणीच नाही. धन, पैसा, संपत्ती या संबंधाने बोलताना म्हणतात.

“धन मिळवून कोटी । 

सवे न ये रे लंगोटी ।।” 

अशी सारी स्थिती आहे. सारे काही सोडून दया 'दिनांचा सोयरा' असणाऱ्या विठ्ठलाला अनन्यभावे शरण जा. विठ्ठल ज्याचा नाथ त्यांना कळिकाळाचेही भय नाही असे सांगतात. 'आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडू कळिकाळाचे शीर' असा त्यांचा दृढ विश्वास आहे.

संत तुकारामांचा पिंड हा भावनाप्रधान भक्ताचा होता तसा परखड समाज सुधारकाचाही होता. 'बुडती हे जन न देखवे डोळा' या कळवळ्या पोटीच त्यांनी समाजाला उद्धाराचा मार्ग दाखवून जीवनाच्या वाटा उजळावयाच्या होत्या.

'पाया झाला नारू । तेथे न बांधा कापुरू

तेथे बिवण्याचे काम । अधमासि तो अधम ....'

हा जशास तसा ‘न्याय सांगतात'. 'दया तिचे नाव भूताचे पालन आणि निर्दाळण कंटकाचे' अशी डोळस भक्ती आणि सामाजिक नीती शिकवितात. 'यारे सारे लहान थोर । यातिभलते नारी नर ।' असे आवाहन करून जातीभेद मोडण्यांचा प्रयत्न करतात. तुका म्हणे तोचि संत सोशी जगाचे आघात', 'जे का रंजले गांजले । त्यासी म्हणजे जो आपुले' असे म्हणून सर्वसामान्य माणसांना कवटाळणारा संत म्हणजे संत तुकाराम होत.

संत तुकारामांनी साऱ्या समाजाला नीतिमूल्यांची आठवण करून दिली. सामाजिक जीवनात त्यांनी नीति हीच भक्ती मानली. 'नेत्री रूप मुखी नाम' हे या भक्तीचे एकरूप तर 'दया तिचे नाव भूतांचे पालन । आणिक निर्दालण कंटकाचे ही तिची दुसरी बाजू आहे.

रूढ संकेताच्या, दांभिकपणाच्या आणि अंधश्रद्धेच्या विध्वंसनाने प्रथम समाजाची मनोभूमी नांगरून तिच्यातून प्रांजल भक्तिभाव, नीति आणि समाजोद्धाराचे विधायक बी पेरणारा संत म्ळणजे संत तुकाराम होत. मी तर असे म्हणेन 'झालो बहु, होतिल बहु, आहेत ही बहु परंतु या सम हा'. अशा थोर मानवतेच्या उपासकाला, थोर संताला कोटी कोटी प्रणाम । मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद