पाटीचे मनोगत मराठी निबंध | PATICHE MANOGAT MARATHI NIBANDH

    

पाटीचे मनोगत मराठी निबंध | PATICHE MANOGAT MARATHI NIBANDH


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पाटीचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या घरी अडगळीच्या खोलीत अनेक वस्तू काढताना अचानक मला त्यात लहानपणीची पाटी दिसली. ती हातात घेऊन निरखून पाहून लागतो. 


आज इतक्या वर्षांनी तुला माझी आठवण झाली होयरे बाळ! तिच्यावरील मातीचे, धुळीचे पांघरूण झटकत असताना पाटी जेव्हा असं म्हणाली तेव्हा तर मी उडालोच! हा काय प्रकार आहे! भुताटकी तर नव्हे ना? पुन्हा ती मधाळ हाक कानी आली.....


अरे बाळा तू असं भांबावू नकोस, मी पाटीच बोलत आहे. तुझी ती आवडती हो हो तीच ती आवडती पाटी! माझ्यावरच प्रथम शिक्षणाचा 'श्रीगणेशा' गिरवलास तुझी तीच पाटी बोलत आहे. आज तू इतका मोठा झालास! तू तर 'हस्ताक्षर स्पर्धेत' प्रथम क्रमांक मिळविलास. तुझ्या या यशात माझ सिंहाचा वाटा आहे आत्मप्रौढी सांगत नाही.


“मना सत्य ते सत्य वाचे वदावे” हा माझ्या मनाचा धर्म आहे. तू आज जो काही आहेस ते माझ्यामुळेच ना! आणि तू तर मलाच विसरलास. या अडगळीत टाकून दिलंस...! अरे हे धुळीचे प्रहार सोसत या गुदमरणाऱ्या वासाच्या सहवासात, कोळी कीटकांच्या सहवासात त्रास सहन करीत येथे मी कशी जीवन जगते आहे ते माझे मलाच माहीत.


अरे तू जेव्हा लहान होतास किती प्रेम करायचास माझ्यावर! एक दिवसआड तरी काळ्या कोळशाने घासून 'वडराच्या तम्या' सारखी काळीभोर करायचास! पण जसा जसा तू मोठा होत गेलास तसा तसा मला विसरत गेलास 'कामापुरता मामा' किंवा 'ताकापुरती आजी' काम झाले की अडगळीत टाकून द्यायचे. ही भारतीय राजकारण्यांची आदर्श परंपरा चांगलीच जोपासलीस तू! “या धुळीत या अडगळीत गेले माझे जीवन मिटून...” अशी केविलवाणी दयनीय स्थिती झाली आहे आज माझी! अरे मी म्हणजेच ज्ञान, मी म्हणजेच शिक्षण! शिक्षणाचं महत्त्व महात्मा फुले यांना नाही का कळलं? म्हणून तर त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला-


“विद्ये विना मती गेली

मती विना गती गेली

गति विना वित्त गेले

वित्ताविना क्षुद्र खचले

एवढे अनर्थ एका अविद्येने केले"


असे त्यांनी माझं महत्त्व सांगितले. संत तुकारामांनी शब्दांचे महत्त्व सांगताना म्हटले - 'शब्दाचि अमुच्या जिवाचे जीवन' याही पुढे जाऊन ग्रामीण कथाकार आनंद यादवांना माझ्यामुळेच पोळी मिळाली आणि जीवनात आनंदी आनंद झाला. माझ्यामुळेच डॉ. आंबेडकर दलितांचे कैवारी बनले.अगदी वर्तमान काळातील दलित तरूण कवी अरुण कांबळे यांनाही माझ्यामुळेच “त्यांच्या प्रत्येक शब्दाला आभाळपण प्राप्त झाले.' अरे, बाळ, साऱ्या जगाला तारणाऱ्या ज्ञानदेचा पाटीचा किती घोर अपमान केलास तू! अरे माझ्यामुळेच या विश्वाच्या प्रगतीचे चाक अखंडे भिरभिरते आहे.


माझे अनेक प्रकार आहेत. दगडाची पाटी, खापराची पाटी, मण्यांची पाटी, काचेची पाटी, एक का दोन! माझ्या मुळेच तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले. मी म्हणजे 'शिक्षणाचा राम'. 'मी आहे म्हणून तर तुझ्या जीवनाला अर्थ नाही तर सारे व्यर्थ.' ज्यांनी ज्यांनी माझा आधार घेतला ते मोठ मोठ्या पदाला पोहोचल. 


डॉक्टर, इंजिनिअर, तंत्रज्ञ, वैमानिक, विचारवंत, समाजसेवक बनले. ज्यांनी मला नाकारलं त्यांना सौख्य समृद्धीने ठोकरलं...! घोणेत मुंडी घालून कुत्र्यासारखं मळा धरून पडण्याचे जीवन त्यांच्या वाट्याला आले म्हणून -


“घ्या माझा आधार

करा जीवनाचा उद्धार "


अरे बाळा, कितीतरी वर्षांनी मला मन मोकळं करायची संधी मिळाली आहे. आता तरी या नरकातून मला बाहेर काढ. मला कोळशाने घास. माझे महत्त्व जाणून घे. माझी सेवा करशील तर जीवनाचे नंदनवन होईल.


“मी तरेण तर कोण मरेल ?

मी मरेण तर कोण तरेल ?”मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद