Bhrashtachar Essay in Marathi | भ्रष्टाचार निबंध मराठी 


निबंध 1  
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी बघणार आहोत. या निबंधामध्‍ये आज आपल्‍या देशात बोळकावलेला भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराविषयी असणारी समाजमनाची मानसिकता याविषयी वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आजच्या एकविसाव्या शतकातही एक भस्मासुर फार मातला आहे. या भस्मासुराचे नाव आहे, भ्रष्टाचार ! हल्ली वर्तमानपत्रांतून तर नित्य नवा 'आर्थिक घोटाळा' जाहीर होत असतो. बँक घोटाळे, मुद्रांक घोटाळे, खोट्या नोटा छापणे... हे असे एक ना अनेक घोटाळे आता चिरपरिचित झालेत.

पुराणकाळातील भस्मासुरापेक्षा या आधुनिक भस्मासुराच्या लीला महाभयंकर आहेत. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो  दिसतो. वाढत्या महागाईमागे याचाच हात आहे. कोणत्याही गोष्टीची कृत्रिम टंचाई हाच निर्माण करतो. नोकऱ्यांची टंचाई असली, तर भ्रष्टाचाराला तेथे मुक्त वाव मिळतो. लाखो रुपयांची लाच देऊन अधिकाराच्या जागा मिळवल्या जातात आणि एकदा अधिकाराची जागा मिळाली की, लाच म्हणून दिलेले पैसे वसूल करण्यासाठी लाच स्वीकारली जाते. असे हे एक दुष्टचक्र सुरू आहे. त्यातून 'काळा पैसा' निर्माण झाला आहे.

Bhrashtachar Essay in Marathi
Bhrashtachar Essay in Marathi


विज्ञानाच्या बळावर व्यक्तिगत जीवनात अनेक सुखसोयी, चैनीच्या गोष्टी सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटतात. त्याकरिता पैसा मिळवण्यासाठी कष्ट करण्याची कोणाचीच तयारी नसते. सहजगत्या, सुलभतेने मिळणारा पैसा बहुतेकांना हवा असतो. चंगळवादाच्या या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा जन्म होतो. पैसा हे एकदा सर्वस्व' मानल्यावर, तो मिळवण्यासाठी वाट्टेल ते केले जाते.

अन्नात व  औषधातदेखील भेसळ केली जाते. औषधातील भेसळीमुळे निरपराध जीवांचे  बळी घेतले जातात. भ्रष्टाचार करणाऱ्यांची विवेकशक्ती नष्ट झालेली असते. बालवर्गापासून शाळा-महाविद्यालयापर्यंत प्रवेशासाठी लाच घेतली जाते. लाच घेऊन परीक्षच्या प्रश्नपत्रिका फोडल्या जातात व लाच घेऊनच परीक्षेचे गुण फिरवले जातात. वैयक्तिक स्वार्थासाठी देशाची संरक्षणविषयक गुपिते परकीय सत्तेला पुरवली जातात.


चोरट्या व्यापाराला उधाण येते. नव्या पिढीला नष्‍ट करणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यापाराला जोर चढतो.
भ्रष्टाचाराच्या या भस्मासुराचा वेळीच बळी घेतला नाही, तर तो भारताचा विध्वंस केल्यावाचून राहणार नाही. आजच्या युवकांनी  समाजातील भ्रष्टाचागची मुळे उपटून काढून स्वच्छ जीवनाचा पाया घातला पाहिजे.

मित्रांनो तुम्‍हाला भ्रष्टाचार निबंध मराठी   हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद 

महत्‍वाचे मुद्दे : 

  • सध्याचा महासुर 
  • सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार 
  • कृत्रिम टंचाई
  • महागाई
  • पैसे दिल्याशिवाय काम होत नाही
  • काळा पैसा 
  • चंगळवाद 
  • त्यासाठी सहज मिळणारा पैसा
  • भ्रष्टाचारी नीतिमत्ता घालवून बसतो 
  • भेसळ
  • भयंकर परिणाम 
  • शाळामहाविदयालयीन प्रवेश पैसा
  •  नोकरीसाठी लाच
  • दुष्टचक्र
  • प्रश्नपत्रिका फोडणे 
  • गुण बदलणे 
  • अमली पदार्थांची आयात 
  • नवीन पिढी बरबाद 
  • सचोटी हरवली आहे...

निबंध 2  

Bhrashtachar Ek Samasya, corruption essay in marathi


काही वर्षांपूर्वी आपल्या देशात भ्रष्ट आचरणाला वाव नव्हता. भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. पण आज साऱ्याच नैतिक मूल्यांचा हास झाला आहे. आज असे एकही क्षेत्र नाही की, जेथे भ्रष्टाचार होत नाही. उलट आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.

केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर अगदी खेडोपाडीसुद्धा कामांच्या कागदांवर 'वजन' ठेवले नाही तर कामे होत नाहीत. सरकारी कार्यालयातुन  या रोगाची लागण प्रथम झाली. कोणतेही काम तेथील कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे असेल, तर आधी त्यांचे हात 'ओले' करावे लागतात. आजकाल विमा कंपनी, बँका, आयकर कार्यालय या ठिकाणी हा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, यात आपण काही गैर करत आहोत, असे कुणालाही वाटत नाही.
भ्रष्टाचाराची वाळवी समाजमनाला पोखरू लागली आहे.


आज भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे; कारण भ्रष्टाचाराने आपले हातपाय शिक्षण, वैदयक अशा मानवी जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांपर्यंत पसरवले आहेत. शाळा-महाविदयालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पैसे चारावे लागतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून भागत नाही, म्हणून गुणांची अदलाबदल केली जाते. केवळ काही रुपयांसाठी हुशार विदयार्थी आपल्या गुणवत्तेचे श्रेय कोणालाही विकायला तयार होतात.

वैदयकशास्त्र हे केवढे पवित्र क्षेत्र ! दुसऱ्याला जीवनदान देणारा डॉक्टर, वैदय हा एके काळी परमेश्वराचे दुुुुुसरे रूप  वाटत असे. पण आज अनेक ठिकाणी हा परमेश्वर असुरासारखे वागताना आढळतो. कशासाठी? तर काही मूठभर पैशांसाठी! कुणा गरिबाची किडनी त्याला फसवून काढून विकणारा डॉक्टर हा देव कसला? त्याला दानवच म्हटले पाहिजे. शिक्षणक्षेत्रातही भ्रष्टाचाराने आपले पाय दूरवर पसरले आहेत.



 माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा, निष्ठा का हरवतात? मंदिराचा सुवर्णकळस घडवणाराच कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्या आचरणाला काय म्हणावे? या साऱ्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे  'माणसाची उपभोगवादी वृत्ती!" 'भ्रष्टाचार' हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुशिक्षित  माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात. येथे स्त्री-पुरुष असा कोणताच भेदभाव नाही. प्रत्येकाला फक्त चैन हवी, सत्ता हवी. त्यासाठी फार मौल्यवान अशी आपली नीतिमूल्ये आपण हरवून बसलो आहोत.


प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या नाटकातील नायक भ्रष्टाचाराच्या विकृतीला 'मनाचा महारोग' म्हणतो. क्रिकेट खेळातील 'मॅच फिक्सिग' प्रकरणाने सारे जग हादरले. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आणि त्या खेळातील खेळाडू ही त्यांची आवडती दैवते. आपली तहानभूक विसरून, आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून ते त्यांचा खेळ पाहण्यासाठी आटापिटा करतात. असे हे आपले आवडते खेळाडू काही रुपयांसाठी मुद्दाम बाद होतात, हे कळल्यावर लोकांना कमालीचा धक्काच बसला.

भ्रष्टाचाराचा हा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. खळाळणाऱ्या, उफाळणाऱ्या पाण्यात एखादा भोवरा निर्माण होतो आणि मग पट्टीचा पोहणाराही या भोवऱ्यात गुरफटला जातो; आणि एकदा का भोवऱ्यात गुरफटला गेला की त्याची सुटका नसते. आज असेच आपण सगळे या भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलो आहोत. त्यातून आपली सुटका होणार तरी कधी?


निबंध 3

Essay on Corruption in Marathi Wikipedia Language

आजकाल 'बुंध्यावर घाव घाला, फांद्या आपोआप पडतील ' या न्यायाने माणूस गुण मिळवण्याऐवजी पैशाच्याच मागे लागलाय. पैसा... मग तो कशाही मार्गाने असो तो मिळवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करू लागला आहे. यातूनच जन्माला आला-भ्रष्टाचार !

वाढलेल्‍या गरजा हीच या अधोगतीची जननी आहे. वैज्ञानिक प्रगतीन वैयक्तिक सुखांची रेलचेल झाली. माणुस काय सुखाच्‍याच शोधात असतो.  कुठलंही भौतिक सुख सामान्य माणसाला पटकन भावतं, मग ते मिळविण्यासाटी लागणारा पैसा मिळविण्यासाठी प्रथम नकळत, नंतर समजून उमजून तो वाकड्या मार्गाने जातो, मानवी रक्‍ताला चटावलेल्‍या नरमांसभक्षक वाघासारखा पैशावर झडप घालु लागतो. हडप करू लागतो. 
वैयक्तिक स्वरूपाच्या लोभीपणाच एकवेळ   समजु शकतं पण याची लागण आज सगळीकडे झालेली दिसते ही दुदैवाची गोष्ट आहे. आज एकही क्षेत्र असं नाही जिथे भ्रष्टाचार पोचला नाही. भ्रष्टाचार शिष्टाचार होऊ पाहात आहे.

 माणसाची श्रीमंती, उच्चपद, अधिकार, सत्ता हे तो किती भ्रष्ट आहे यावरच अवलंबून आहे असं वाटु  लागतं, हवं ते मिळवण्यासाठी आजकाल माणुस वाटेल ते करू लागलाय, कंडक्टरने सुटे पैसे परत न करणे, वजनामध्ये तराजू मारणे, गॅस सिलेंडरसाठी बक्षिसी देणें, स्वतःचीच जमीन स्वतःच्या नावावर करण्यामठी कचेरीत साहेबांना खुश करणे,


 प्रमोशनसाठी वरिष्ठांना ओली पार्टी देणे, यापासून ते अक्षम्य अशा, राष्ट्राची गुपित परराष्ट्रांना विकणे, राष्ट्रसंरक्षक हत्यारं खरेदीत प्रचंट पैसा खाणे यापर्यत माणसाची मजल गेली आहे. हे सारं का घडतं? माणसाच्या मनावरचा नीतीचा अंकुशच हरवला आहे. 'कष्टाविण नाही फळ' असं पूर्वज म्हणायचे, त्यांना 'या' मार्गाची कल्पना नसावी. अन्यथा 'कष्टावीणही मिळे फळ,' असे म्हटले असते.

सार्वजनिकरीत्या, गोंडस नावाखाली राजरोस भ्रष्टाचार चालतो तेव्हा राष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते. बोगस प्रतिष्टानं काढून राजरोस अलोट पैसा जमवतात तेव्हा कुंपणानं खाल्लेलं शेत पाहुन कीव येते. शाळेच्या प्रवेशासाठी, इमारतीसाठी हजारोंची देणगी उकळली जाते. 

प्रत्येकानं आता भेसळीचं प्रशिक्षण घेतल्यासारखंच वाटतं. उद्घाटनाच्या दिवशीच पूल कोसळताहेत. भेसळीच्या अन्नानं, मद्यानं, औषधानं अनेकांचे प्राण घेतले आहेत. मंत्र्यांचा आशीर्वाद असतो हे तर लाजिरवाण आहे.  पाश्चात्त्य देशांतही 'वॉटरगेट' प्रकरणं होतात तेव्हा अवघ्या मानवजातीलाच ही कीड लागली आहे की काय असे वाटते. मोठेपणाचा मार्ग भ्रष्टाचाराच्या मैदानातूनच जातो की काय असे वाटते. 


याला उपाय ? वरिष्ठांनी स्वतः नीतिमान राहणं, धन्याच्या बागेतील आंबा घेतला तर हात कलम करून घ्यायला निघालेले दादोजी कोंडदेव यांचा आदर्श ठेवणं, स्वत:च्या काकांना राघोबा पेशव्यांना दिलेली शिक्षा योग्य म्हणणारे माधवराव पेशव्यांसारखे स्वच्छ, निःस्पृह राज्यकर्ते असणं, रंगे हाथ पकडलेल्यांना शासन करणं, नवीन पिढीवर सुसंस्कार करणं हेच होत. अन्यथा या नरकातून सुटका नाही.

Bhrashtachar Essay in Marathi | भ्रष्टाचार निबंध मराठी

माझा आवडता नेता मराठी निबंध | maza avadta neta nibandh in marathi


निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता नेता मराठी निबंध बघणार आहोत. गुणी माणसांचे गुणच दूताचे काम करतात. त्यांची कीर्ती दूरवर पसरवितात. डॉ. राधाकृष्णन् याला अपवाद नव्हते. त्यांच्या अलौकिक गुणांमुळेच त्यांनी त्रिखंडात कीर्ती गाजवली.


राधाकृष्णन् ! या नावातच किती माधुर्य आहे ! उत्कट भक्तीचा आविष्कार म्हणजे राधा, मूर्तिमंत तत्त्वज्ञान म्हणजे कृष्ण ! एक शुद्ध प्रेमरूप तर दुसरे केवळ ज्ञानरूप ! या दोहोंचा मनोज्ञ संगम म्हणजे डॉ. राधाकृष्णन.
थोर कुळात जन्म किंवा लक्ष्मीची कृपा यांचा लाभ त्यांना झाला नाही. पण सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी होता आणि त्याला दीर्घोद्योगाची जोड मिळाली. थकवा किंवा आळस त्यांना माहीतच नव्हता. अध्ययन, अध्यापन, चिंतन, लेखन यातच त्यांचा दिवस व्यतीत व्हायचा. 

ग्रंथांच्या सहवासात ते तहानभूक विसरत. रशियाचा हुकूमशहा स्टॅलिन यानेही 'चोवीस तास अध्ययन करणाऱ्या या भारतीय प्रोफेसरला मला भेटायचं आहे' अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या गुणांची भुरळ इंग्रजांना पडली पण इंग्रजांच्या संस्कृतीची भुरळ डॉ. राधाकृष्णन यांना कधीच पडली नाही. ख्रिश्चन शाळेत शिक्षण घेऊनही त्यांची स्वधर्मावरील श्रद्धा कमी झाली नाही. ज्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची टूम होती त्या काळातही त्यांना त्याबद्दल ओढ वाटली नाही. उलट 'मी युरोपात जाईन ते शिकविण्यासाठी, शिकण्यासाठी नव्हे' असा जाज्वल्य स्वदेशाभिमान आणि दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या ठायी होता.


शिक्षक, प्रोफेसर, कुलगुरू, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती इत्यादी बहुमानाची पदे त्यांनी भूषविली. इंग्लंडने मानाची 'सर' पदवी त्यांना दिली. 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताबही मिळाला पण अहंकाराचा वारा त्यांना शिवला नाही. फलभाराने वाकलेल्या वृक्षाप्रमाणे ते अत्यंत नम्र होते. 'आयुष्यात जे यश वाट्याला आले त्याचे श्रेय देवाला आणि दैवाला आहे,' असे ते म्हणत.


बी. ए. ला 'तत्त्वज्ञान' विषय घेतल्यामुळे पाश्चात्य ग्रंथ वाचण्यात आले आणि हिंदुधर्म अपुरा आहे असे वाटून ते खिन्न झाले. त्याच वेळी स्वामी विवेकानंद विश्वभ्रमण करून हिंदू धर्माची थोरवी पाश्चात्य जगाला पटवून देत होते. त्यांची भाषणे, लेख, पुस्तके डॉ. राधाकृष्णन् यांनी वाचली. हिंदुधर्माचे चिकित्सक दृष्टीने अध्ययन केले आणि भारताची सांस्कृतिक वकिली करणे त्यांचे जीवनकार्य बनले. लो. टिळकांनी गीतारहस्यात डॉ. राधाकृष्णन यांच्या लेखनातील अवतरणे दिली आहेत.


स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान या तत्त्वज्ञानाच्या चालत्या बोलत्या विश्वकोषा' ला मिळाला. 

अमोघ वक्तृत्वाची देणगी त्यांना लाभली होती. केंब्रिज विद्यापीठात 'ब्रडले आणि शंकराचार्य' या व्याख्यानात 'माया' हा अत्यंत गहन विषय त्यांनी सोपा करून सांगितला. आश्चर्य म्हणजे कोणतीही टिपणे न काढता! ते इंग्रजीतून एक तास अस्खलित बोलू शकत. 

त्यांच्या व्याख्यानसमयी जागा मिळण्यासाठी इंग्लिश लोक तासन् तास आधी येऊन बसत. वक्तृत्वाचे सुंदर लेणे, ईश्वराघरचे देणे होते. डॉ. राधाकृष्णन् वक्तशीर, कडक शिस्तीचे भोक्ते होते. विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्यांच्या ठायी होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराचे दार सदैव खुले असे. गरजू विद्यार्थ्याला मदतीचा हात देणे त्यांचा सहजस्वभाव होता. ते म्हैसूर सोडून कलकत्ता विद्यापीठात गेले तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी घोडागाडी स्वतः ओढत स्टेशनवर पोचवली. 


प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांची गर्दी आणि डोळ्यात अश्रूनी गर्दी केली होती. 'राधाकृष्णन् की जय' असा जयजयकार सर्व करत होते. अशी अफाट लोकप्रियता एखाद्याच्याच वाट्याला येते.  “माणसाने अंतराळात खुशाल जावे अन्य ग्रहांवर हिंडून यावे. परंतु आपल्या पायाने नीट जमिनीवर आधी चालायला शिकावे. त्याशिवाय त्याची बुद्धी, हुशारी व्यर्थ आहे.'' असा बहुमोल संदेश देणाऱ्या त्या थोर द्रष्ट्याला विनम्र अभिवादन.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2

माझा आवडता नेता : महात्मा गांधीजी | maza priya neta mahatma gandhiji essay in marathi


माझा आवडता नेता म्हणून महात्मा गांधीजींचे नाव माझ्या हृदयात कोरले गेलेले आहे. मी डोकावतो.क्षणभर मला भास होतो की , वर्षानुवर्षांपूर्वी लावलेली एक दिपकज्योती धडपडते आहे.माहीत आहे , कोणती ती ज्योत? राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जीवनज्योत , जी चिरंजीव आहे , अजरामर आहे. पारतंत्र्याच्या काळोख्या रात्रीतही स्वातंत्र्यस्फूर्तीच्या किरणांनी याच ज्योतीने तरुणांना जागे केले.


आजच्या नेत्यांपेक्षा बापू खूप खूप वेगळे होते. जनसेवेची , त्यागाची जिवंत भावना त्यांच्या नसानसात होती. देशासाठी त्यांनी तन-मन-धन सारं अर्पण केलं होत म्हणूनच दुःखित हृदयानं , करूण स्वरांनी त्यांना 'बापू' म्हणूनच हाक मारली. जगान त्यांना संत म्हणूनही ओळखलं, तर इतिहासकारांनी 'युगपुरुष' मानलं. नेता बनून मग लोकसेवा करण्यापेक्षा लोकसेवा करून ते नेता बनले होते. त्यांच्या कार्यामागे सारा देश धावत होता. स्वतंत्र अन् समृध्द भारत' हे त्यांच सुखद, मधुर स्वप्न होतं. निःस्सीम त्याग , प्रयत्नांची पराकाष्ठा अन् दृढ निष्ठा यांच्या त्रिवेणी संगमाने त्यांच हृदय अथांग भरलं होत .


गुलामीच्या शृंखला तोडण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. धर्म , अहिंसा, आणि सत्य या त्रिसूत्रीच्या निर्मल पवित्रतेवर त्यांचं प्रत्येक कार्य निर्भर होतं. "माझ्या स्वप्नातल्या भारतात अस्पृश्यतेचा शाप नांदू शकणार नाही' असे बापू म्हणत.


राजकीय व्यक्तीबरोबरच सरळ अन् पवित्र हृदयाची व्यक्ती म्हणून बापूंचा उल्लेख केला जातो. गरीबांना चरख्याचा मंत्र देणारे , देश एकतेसाठी राष्ट्रभाषेचा प्रचार करणारे, जातिभेद नष्टकरून हिंदू-मुस्लिम एकतेसाठी धडपडणारे बापू खरंच आपल्याला शिकण्यासारखे खूप-खूप ठेवून गेले. 


शत्रूविषयीसुद्धा आत्मीयता बाळगणारे बापू म्हणत- “क्षमा हेच बलवंताचे खरे लेणे असते.' प्रार्थनेविषयी ते म्हणत-‘शरीराला जशी अन्नाची जरूरी, तशी आत्म्याला प्रार्थनेची!'' 'सत्य हीच प्रभूची पूजा" असा त्यांचा विश्वास होता.सत्य - अहिंसेच्या जोरावरच त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला.त्यांच्या निश्चयी स्वभावाने त्यांना देशकार्यात गुंतवून ठेवले. अन्यायाविरुद्ध ते झटले.


१९२० च्या असहकार चळवळीत उचललेली पावले आणि १९३० च्या दांडी यात्रेतील पावले स्वातंत्र्याच्या मार्गात अशी कोरली गेली की, स्वातंत्र्य आंदोलन आख्खे ढवळून निघाले. १९४२ च्या 'चले जाव' ने सारा भारत दुमदुमला निःस्वार्थ स्वातंत्र्यप्रेम होतं ते ! सत्ता , वैभव यांच्यापासून कोसो दूर! एक पंचा बांधून देशसेवेला अर्पण झालेलं अस व्यक्तीमत्त्व! स्वातंत्र्यप्रेमाच्या नंदादीपाने भारतवासीयांच्या हृदयात सत्कार्याच्या ज्योती पाजळणारे गांधीजी, त्यांचे जीवन आजही डोळ्यासमोर आणा.आपल्याही भावना उफाळून येतील.त्यांच्या विविधरंगी गुणी व्यक्तीमत्त्वाला एक गुण जरी आपण घेतला तरी जीवनाच सार्थक होईल.आपल्याजीवनपुष्पाला अशा प्रेरणेची  नितांत गरज आहे.


वस्तुतः आजचा युवक उत्साही व क्रियाशील आहे. पण त्याला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.स्वातंत्र्याची प्रभात जरी आपल्या देशात झाली असली तरी 'सुराज्याचा प्रकाश' अजून देशातील काना-कोपऱ्यातील झोपडीपर्यंत पोहचलेला नाही. त्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरूणाला कार्यतेज व शक्ती देण्याचे सामर्थ्य महात्मा गांधीच्या जीवनकथेत आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी देशाला ग्लानी येईल, त्याचा आत्मविश्वास विचलित होईल, परक्यांच्या प्रभावाने तो स्वसत्वाला पारखा होईल, निराशेने त्रस्त व ग्रस्त होईल , त्या त्या वेळी समाजाने अन् देशाने महात्मा गांधीजीचे स्मरण करावे. त्यांच्या आदर्शाचा स्वीकार करावा निश्चित नवा चांगला मार्ग मिळेल. 


आज बापूजी असते तर! स्वार्थ भ्रष्टाचार व सत्ता यातून विनाशाकडे अशी दुष्ट वाटचाल संपली असती. समाजाच्या समस्या ओळखून योग्य प्रयत्न झाले असते. संस्कृती व मानव यांची सांगड घडली गेली असती. सुराज्याची प्रभात झाली असती. भारतीयांचे मनोबल वाढले असते. हिंसेचे भयानक रूप बदलले असते.अहिंसा व सत्य यामुळे सर्वसामान्य माणूसही सुखावला असता.

बापूंची जीवनज्योत निसर्गनियमानं परविश्वात विलीन झाली ती १९४८ मध्ये तरीही सखोल अर्थान अजूनही ती दीपस्तंभाप्रमाणे तेवते आहे. अन् अशीच तेवत राहील. मला म्हणावेसे वाटते
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 3

भारतमातेच्या चरणकमलांना ब्रिटिश शृंखलेतून मुक्त करणारे अनेक सुपुत्र होऊन गेले. पण भारतमातेच्या मस्तकावरच्या राजमुकुटात विराजमान होणारी फार मोजकी रत्ने आहेत...असंच एक स्त्रीरत्न ! इंदिरा गांधी !!
कोमल ' कमला 'च्या पाकळ्यांवर १९ नोव्हेंबर १९१७ रोजी दैवानं बहाल केलेला एक दवबिंदू !  जिद्द, राजकीय डावपेच, राष्ट्रापुढचे प्रश्न, त्यांची हाताळणी या सर्वांचं 'प्रियदर्शनी'ला बाळकडू घरीच मिळालं.  मातेच्या अकाली निधनानं त्या घायाळ  झाल्‍या ,  परदेशी शिक्षण घेऊन देशासाठी कर्तृत्व गाजवायला सिद्ध झाल्‍या.


maza avadta neta nibandh in marathi
maza avadta neta nibandh in marathi

प्रथम केवळ त्या‍ नभोवाणी मंत्री होत्या  त्या नंतर त्यांनी असं घवघवीत यश मिळवलं की डोळे दिपून गेले. बंगलोरच्या वादळी अधिवेशनात भल्याभल्यांना चीत करून  काँग्रेस पक्षावर आपल्या नावाचं शिक्कामोर्तब केलं. असं जगाच्या राजकारणात उदाहरण नाही. भारताची पहिली स्त्री पंतप्रधान ! इतकी तेजस्वी की शब्दश: कुणाची हिंमत नव्हती मान वर करून पाहण्याची. इंदिरा एक असामान्य प्रशासक होती. 'एकतेतून विकास' हा मूलमंत्र घेऊन 'गरिबी हटाव' मोहिमेचं वादळ निर्माण केलं. 'वीस सूत्री' कार्यक्रम, अणुस्फोट, बँकांचं राष्ट्रीयीकरण या प्रत्येकातून या राष्ट्राला बलवान बनवण्याचा चंग स्पष्ट होत होता.


“वाकड्या नजरेनं पाहाल तर डोळे फोडू' अशा जबरदस्त आत्मविश्वासानं, एक स्त्री असून, 'बांगला देश' युद्ध जिंकून जगाला आपली नोंद घेणे भाग पाडलं. अंतराळशास्त्र वा शेती उद्योग इंदिरेनं सर्वाला गती दिली.  बॉम्बे हाय' हे धोरणीपणाचंच सूचक होय. आक्रमक, आकर्षक, धोरणी, सर्वांना योग्य दिशेला नेणारी-नेता !  त्यांच विशेष कर्तृत्व जाणवतं ते 'अलिप्त राष्ट्र संघटना' या चळवळीत. महासत्तांना शरण न जाता तटस्थपणाची शक्ती निर्माण करणाऱ्या  त्या  एकमेव होत्या.

माझा आवडता नेता मराठी निबंध | maza avadta neta nibandh in marathi

me pantpradhan zalo tar marathi nibandh  | मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध

आयुष्याच्या प्रवासात जन्मापासून मरेपर्यंत केलेल्या चांगल्या वाईट कर्माची गोळाबेरीज हीच माणसाच्या आयुष्याची किंमत ! श्वसन, भोजन, शयन यातच गुरफटणे म्हणजे आयुष्य नव्हे. उच्च ध्ययासाठी जगणे आणि ध्येयपूर्ती करताना वा केल्यावर देह ठेवणे हे उच्चप्रतीचे आयुष्य होय. क्षणभंगुर आयुष्यातील ती सर्वोच्च कमाई आहे. आपण आपल्या समाजाचे, देशाचे काही देणे लागतो. या देशाला, समाजाला घडवायचे माझे स्वप्न एकाच घटनेने खऱ्या अर्थाने साकार होऊ शकेल-- मी पंतप्रधान झालो तर !


माझ्या देशाची उच्च सांस्कृतिक परंपरा, चमकदार इतिहास, त्यातील नररत्ने, सामर्थ्यशील शालीनता हे सारे मला या देशाचा पंतप्रधान होण्यास मोह पाडतात. हा काटेरी मुकुट म्हणूनच मी आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे.

me pantpradhan zalo tar marathi nibandh 

आज देशातील राजकारण कसे आहे ? गटबाजी, भ्रष्टाचार, तोडाफोडाची नीती, सत्तेसाठी चाललेली लाजिरवाणी स्पर्धा...सारेच ओंगळ आहे. दारिद्र्य, अशिक्षितपणा, मागासलेपण देश खाईत नेत आहे....मी हे सारं बदलू इच्छितो. “ सोपे नाही' याची कल्पना आहे. कारण ' लोकशाही हे गाढवांचे राज्य असते' असे म्हटले जाते तिथे लाथांचा सुकाळ असणारच.

पण अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे “लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही" हे मी बिंबविण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करीन.
मी काही ' केंबिज' किंवा 'डून स्कूल'चा वारसदार नाही. मी याच मातीतला असल्याने या मातीचे प्रश्न मला चांगलेच माहीत आहेत म्हणूनच ते प्रश्न सोडवण्याच्या माझ्या प्रयत्नांना जास्त यश येईल.

आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतकरी हा केंद्रबिंदू धरून सरकारी धोरणे राबवण्याचा माझा मानस आहे. त्याला सवलती कर्जे, आधुनिक तंत्रज्ञान, खते पुरवीन पण कर्जमाफी करून त्यांची क्रियाशीलता आणि देशाची तिजोरी दुबळी करणार नाही नाही. गंगा-कावरी प्रकल्पान सारा भारत पावसावर अवलंबून न राहता
होईल. तो मी करीन म्हणजे मुकलेली जमीन अन् सुकलेला शेतकऱ्याचा चेहरा भारतात कुणाला दिसणार नाही.

तळागाळाच्या साऱ्याच जनतेला अन्न, वर, निवारा मिळालाच पाहिजे याकडे माझा कटाक्ष राहील.
पांढरपेशा वर्गाचे हाल अधिकच आहेत. कर आणि महागाईच्या कैचीत तो सापडला आहे. मी कर आकारणी सुलभ करीन. बाजारभाव नियंत्रित करीन. समाजवाद आणि भांडवलशाही या दोन्हींची सांगड मी घालीन. समाजवादाने व्यक्तिगत कौशल्य मारले जाते तर भांडवलशाहीत पिळवणूक होते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या दोन्हींचा यथायोग्य वापर मी करीन. समाजातील उच्चभ्रूना या माझ्या धोरणाचा फायदा मिळेल.

लोकसंख्येचा विस्फोट ही आपली खरी समस्या. मर्यादित कुटुंबावर सवलतींचा वर्षाव करीन किंवा कायदाच संमत करून घेईन. माझी धोरण अंमलात आणण्यासाठी प्रामाणिक, नीतिमान् , कार्यक्षम, न्यायी मंत्र्यांची निवड करीन. कायदा व सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन करीन. मी रामराज्य आणू शकेन असा दावा मी करत नाही. वाईट काही असेलच पण अल्प. आणि राष्ट्राच्या प्रगतीला आड येणार नाही इतपत ! ' लाल फिती'चा अडसर दूर करून वेगाने कामं करीन, कारण कामासाठी मला फक्त ५ वर्षच हाती असतील आणि मला तर खूप काही करायचंय..." Miles to go before I sleep, miles to go..."

निबंध 2 

भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचा सोहळा पाहिला आणि मनात आले की. मी पंतप्रधान झालो, तर...
तर काय मजा येईल! पण खरेच मजा येईल का? पंतप्रधान म्हणजे मोठा बंगला, संदर मोटारो, भरपूर जगप्रवास, अनेक सभासमारंभांत प्रचंड स्वागत. सदा सभोवती रक्षक व सेवक.
पण ... पण खरे सांगू का ! मी पंतप्रधान झालो तर प्रथम सारा डामडौल कमी करीन. आपल्या भारतावर जागतिक बँकेचे केवढे कर्ज आहे ! मोठमोठ्या योजना पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा हवा, आम्ही मंत्रिमंडळातील लोकांनी आपले खर्च कमी केले तर खूप बचत होईल.

मी पंतप्रधान झालो, तर... प्रथम सभांना व घोषणांना बंदी घालीन. प्रत्यक्ष 'कृतीवर' माझा भर असेल. गरिबी हटवण्याचा संकल्प आम्ही कित्येक वर्षांपूर्वी सोडला आहे; पण गरिबी तसूभरही हटलेली नाही. उलट वाढतच आहे. ती दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन..

आज देशात अराजकता वाढत आहे. देशवासीयांत एकात्मता व ज्वलंत राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी मी अविरत झटेन. मी कोणा एका राज्याचा विचार करणार नाही, तर संपूर्ण भारताचाच सदैव विचार करीन. त्याच्या विकासासाठीच झटेन, पण त्यासाठी भी पंतप्रधान व्हायला पाहिजे ना?

me pantpradhan zalo tar marathi nibandh | मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध

Essay on parrot in marathi | पोपट मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोपट मराठी निबंध  बघणार आहोत. मानव प्राणी हा नेहमी आंनदाच्‍या शोधात असतो. त्‍यासाठी तो वेगवेगळे छंद जोपासतो. आपल्‍या आवडीच्‍या ठिकाणी फिरायला जातो. त्‍याला मनपसंत असलेले खाद्य पदार्थ खातो. पण मानवाचा सर्वात मोठा आनंद हा स्‍वतंत्र होण्‍यात आहे. त्‍यासाठी तो प्रंसगी युध्‍दही करतो. पंरतु इतर प्राण्‍यांच्‍या स्‍वतंत्रतेविषयी विचारही करत नाही. जसे उदाहरण द्यायचे झाल्‍यास पोपटाचे देता येईल. निबंधातील पोपटाने स्‍वता त्‍यांचे मनोगत स्‍पष्‍ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


मी पिंजऱ्यातला पोपट. आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही माणसे तुमच्या आनंदासाठी आम्हांला पकडता, घरी आणता आणि पिंजऱ्यात ठेवता. पण आम्हांला काय वाटत असेल, याचा विचार तुम्ही माणसे करत नाहीत. हेच बघा ना! या घरात आज अनेक वर्षे मला पिंजऱ्यात ठेवलेले आहे. ही घरातील माणसे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला आवडणारे पदार्थ खायला देतात. माझ्यासाठी खास पेरू आणतात. माझे नेहमी कौतुक करतात. येणाऱ्या पाहुण्यांपुढे माझे प्रदर्शन करतात. मला नवे नवे शब्द बोलायला शिकवतात. पण मला खरोखरीच काय हवे आहे, ते हे लोक समजून घेत नाहीत.

Essay on parrot in marathi
Essay on parrot in marathi 

मला स्वातंत्र्य हवे आहे. अगदी सोन्याचा पिंजरा असला, तरी तो मला नकोसा वाटतो. मला रानात मुक्तपणे विहार करायचा आहे. माझ्या भाऊबंदांबरोबर मला मोकळ्या आकाशात उडायचे आहे. मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, तुम्ही माणसे स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी झगडता, युद्धही करता; मग आमचे स्वातंत्र्य मात्र कसे हिरावून घेता?

मला आता या पिंजऱ्यातून मुक्त करा. मी तुम्हांला रोज भेटायला येईन.

मित्रांनो तुम्‍हाला पोपट मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.
व खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्‍यवाद .

निबंध 2 

एके दिवशी गंमतच झाली. पिंजऱ्यातील पोपट बाहेर आला आणि आम्ही त्याला शिकवलेल्या शब्दांपेक्षा वेगळेच काही बोलू लागला. तेव्हा आम्हा सर्वांना नवल वाटले आणि घरातली सारी माणसे त्याच्याभोवती जमली. पोपट सांगत होता, "हल्ली तुम्ही माझ्या पिंजऱ्याचे दार उघडे ठेवता. पण मी पिंजऱ्याबाहेर सहसा येत नाही. कारण वर्षानुवर्षे या पिंजऱ्यात राहिल्याने मला आता पिंजरा हेच आपले घर वाटू लागले आहे. बाहेरच्या जगाचे मला थोडेही आकर्षण राहिले नाही.

तुमच्याकडे येण्यापूर्वी मी माझ्या आईवडलांसह रानात मोकळे जीवन जगत होतो, त्यावेळी मी अगदी लहान होतो. 'कसे उडायचे' हेही मला अवगत नव्हते. आईवडील माझ्यासाठी खाऊ आणायला गेल्यावर मी झाडाच्या ढोलीत त्यांची वाट पाहत राहत असे.


याच प्रचंड झाडाच्या ढोलीमध्ये इतर पोपटांची वस्ती होती. त्यामुळे त्यांच्या छोट्यांबरोबर खेळण्यात, उडण्याचा सराव करण्यात माझा वेळ किती छान जात असे! अचानक तो घातवार उजाडला. एका पक्षिविक्याने मला पकडले. त्याच्याकडून मी तुमच्या घरी आलो. तुम्ही पहिल्या दिवसापासून माझे कौतुक करत आहात. मला खाऊपिउ घालत आहात. लाडाने माझ्याशी बोलत आहात. तेव्हा तुमच्या व जगाच्या दृष्टीने मी येथे सुखी आहे. पण खरे पाहता, मी सुखी नाही. कारण माझे स्वातंत्र्य मी कायमचे गमावले आहे. आकाशात मी केव्हाच उंच भरारी मारली नाही. आता तुम्ही मला मुक्त केलेत, तरी स्वतंत्र जगात मी जगूच शकणार नाही. आता माझे एकच सांगणे आहे की, माझ्या मृत्यूनंतर हा पिंजरा फेकून दया. दुसऱ्या कोणालाही कदापिही गुलाम करू नका.

मित्रांनो तुम्‍हाला पोपट मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .

Essay on parrot in marathi | पोपट मराठी निबंध

महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध | Mahatma jyotiba phule essay in marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध  बघणार आहोतचला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

थोर क्रांतिकारक विचारवंत व आदयसुधारक महात्मा  ज्योतिबा  फुले यांचा जन्म पुणे येथे १८२७ साली झाला. त्यांनीच महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. वर्तमानात आपल्या भोवताली समाजात आढळणाऱ्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून काढणारा आणि त्या मार्गावर अगदी एकाकी पण बेधडकपणे वाटचाल करणाराच खरा समाजसेवक, समाजहितचिंतक बनू शकतो. 

याचा प्रत्यय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रातून येतो. नवव्या वर्षी वैधव्य आल्यामुळे वपन करून विद्रूप करण्यात आलेल्या गुरुकन्येला पाहून ज्योतिबांंच्या  मनाला धक्का बसला. या आपल्या भगिनीसाठी काहीतरी करायलाच हवे हे त्यांच्या मनाने घेतले. असे  कृत्य करायला 'धर्माची आज्ञा' हे एकटेच कारण असते, हे त्‍यांच्‍या गुरूंच्या तोंडून प्रत्‍यक्ष ऐकल्‍यावर, तेव्‍हा त्‍यांनी आपल्या धर्माविषयी सत्यशोधन करायचेच असा पक्‍का निर्णय त्‍यांनी तरूण वयात घेतला. 

Mahatma jyotiba phule essay in marathi
Mahatma jyotiba phule essay in marathi

पुण्यात बुधवारवाड्यात पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी शाळा काढली होती. जोतिबा त्या शाळेत जाऊ लागले. तेव्हा त्यांच्या वडिलांचा गोविंदराव फुले यांचा ज्योतिबांंच्या शिक्षणाला सहमत नव्‍हते. ज्योतिबांंनी इंग्रजीबरोबरच संस्कृतचेही अध्ययन केले. त्यांचे विचार हे सुरुवातीला बंडखोरीचे होते.

त्यांनाही इतरांप्रमाणे इंग्रजांशी लढण्यासाठी शस्त्रविदया शिकावी असे वाटत होते, पण त्याच वेळी आपल्या समाजातील जातिभेद, अज्ञान आणि स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुर्दशा त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी इतर धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांपैकी ख्रिस्ती धर्मातील माणुसकीची वागणूक, सेवा, समानता या गोष्टींचे त्यांना विशेष आकर्षण वाटले. येथेच ज्योतिबांंना आपल्या कार्याचा मार्ग सापडला आणि तो कृतीत आणण्यास त्यांनी सुरुवात केली.



समाजातील  विशेषतः स्त्रियांमधील  अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी जोगेश्वरीच्या बोळातील चिपळूणकरांच्या वाड्यात १८४८ साली पहिली मुलींची शाळा काढली. मुलींना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला  सावित्रीबाईंना  तयार केले. स्त्रीशिक्षणाच्या आग्रही प्रयत्नामुळे समाजाचा प्रचंड रोष या पतिपत्नीला सहन करावा लागला. ज्योतिबांंच्या वडिलांनी ज्योतिबांंना व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.

 नंतर ज्योतिबांंनी मीठगंज भागात १८५१ साली दलित वस्तीत मुलींसाठी शाळा काढली. मागासलेल्यांना सुधारायचे तर त्यांच्यामध्येच जाऊन राहिले पाहिजे, म्हणून त्यांनी आपले घर बदलले. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या घरातील हौद सर्वांना खुला केला. समाजातील उच्चवर्णीयांतील स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी त्यांनी १८६३ साली 'बालहत्याप्रतिबंधक गृह' सुरू करून अशा स्त्रियांना आश्रय दिला.



ज्योतिबांं हे कर्ते सुधारक होते. अशाच एका अडलेल्या स्त्रीला आश्रय देऊन तिच्या मुलाला ज्योतिबांंनी दत्तक .   घेऊन सांभाळ केला ते निर्भय वृत्तीचे होते. त्‍यामुळे आलेल्‍या संकटाना त्‍यांनी मोठ्या धैर्याने तोंड दिले. शेतकऱ्याच्या पोशाखात ते 'ड्युक ऑफ कॅनॉट' यांच्या भेटीला गेले. शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी समजावून घेतले होते व त्याबाबतची त्यांची परखड मते त्यांच्या शेतकऱ्याचा असूड' (१८८३) या पुस्तकात व्यक्त झाली आहेत.


अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर ते झगडत राहिले, त्यासाठी त्यांनी १८७३ साली 'सत्यशोधक समाज' स्थापन केला. हजारो अनुयायी घडवले. विदया, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना 'महात्मा' म्हणून गौरविले. जोतिबा फुले यांनी समाजाला सत्य आणि समता या तत्त्वांचा सक्रिय संदेश दिला व २७ नोव्हेंबर १८८९ साली त्यांच्या लाडक्या जनतेचा त्यांनी निरोप घेतला. ज्योतिबांं गेले, पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले.


    महत्‍वाचे मुद्दे : 

    • समाजातील त्रुटी जाणून त्यावर मात करण्याचा निर्धार
    • सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास
    • इंग्रजीचे अध्ययन
    • मुलींसाठी शाळा
    • पीडित महिलांना आश्रय
    • निर्भयता
    • प्रत्यक्ष कृतीने विरोध
    • सत्यशोधक समाजाची स्थापना
    • सत्य व समता हा संदेश दिला
    • सतत समाजाचाच विचार केला.





    निबंध 2



    महात्मा ज्योतिबा फुले हे उच्चकोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनात सत्याचा मूलमंत्र    काया-वाचा-मने जपणाऱ्या, ज्योतिबांंचा जन्म १८२७ साली  गोऱ्हे  यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले.

    शाळेत घातले. त्‍‍‍‍यांंना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्‍‍‍‍यांंनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले.  ज्ञान ही एक शक्ती आहे,' अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या ज्योतिबांंनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे -

    "विदयेविना मति गेली। मतीविना नीति गेली।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।। इतके अनर्थ एका अविदयेने केले." जोतिबा फुले हे 'कर्ते सुधारक' होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन ज्योतिबांंनी पत्नीला सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विदयार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. ज्योतिबांं व सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे हे सत्र अविरत चालू राहिले.

    त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे. विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी, म्हणून जोतिबांनी चळवळ उभी केली. बालहत्याप्रतिबंधकगृहाची स्थापना केली. स्त्रियांप्रमाणे अस्पृश्यांसाठीही जोतिबांनी बहुमोल सेवाकार्य केले.

    सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती.

    जोतिबा फुले यांनी मौलिक विचारप्रवर्तक पुस्तके लिहिली. समाजातील पीडित श्रमिकांच्या विदारक आर्थिक स्थितीचा ज्योतिबांंनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याचे उत्कृष्ट चित्र त्यांनी आपल्या 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तिकेत रेखाटले आहे. शेतकऱ्यांची स्थिती बदलण्‍यासाठी  चांगले उपाय या  लेखांतून सांगीतले  आहेत. १०० वर्षांपूवी लिहिलेले हे मौलिक विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतात.

    ज्योतिबांंनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला आणि म्हणूनच लोकांनी त्यांना 'महात्मा' असे यथार्थपणे गौरवले.
    महत्‍वाचे मुद्दे : 

    • एक थोर समाजसेवक 
    • जन्म 
    • शिक्षण 
    • महात्मा फुले समाजसेवकांचे अग्रणी
    • परंपराग्रस्त समाजाला जागृत करण्याचे जोतिबांचे प्रयत्न
    • 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे फुले यांचे आचरण
    • स्त्री-शिक्षणाला प्राधान्य 
    • मुलींसाठी शाळा 
    • मनुस्मृतीवर घणाघाती हल्ला 
    • शेतकऱ्यांबद्दल कळकळ
    • त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न 
    • खेडे हा त्यांच्या सुधारणावादाचा केंद्रबिंदू 
    • शिक्षणाला प्राधान्य 
    • शिक्षण हे समाजसुधारणेचे प्रवेशद्वार
    • फुले यांचे समग्र विचार



    निबंध 3


    मराठी मातीनं ज्या असंख्य समाजसुधारकांना जन्म दिला, त्यांपैकी महात्मा जोतिराव फुले यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरावं लागेल. आज दलित, मागासवर्गीय व स्त्रिया यांच्या उन्नतीसाठी शासनाकडून क्रांतिकारक पाउलं टाकली जात आहेत. परंतु याची मुहूर्तमेढ १९ व्या शतकातच आपल्या महाराष्ट्रात  समाजसुधारक जोतिरावांनी रोवली होती.

    वर्णव्यवस्थेचा पगडा असलेल्या तत्कालीन समाजात जोतिरावांनी एका मागासवर्गीय कुटुंबात जन्म घेतला. सातारा जिल्ह्यातल्या 'कटगुण'गावी १८२७ साली !विद्येचं वारंसुद्धा न लागलेल्या कुटुंबात जन्मल्यामुळे जोतिबांना शिकण्यासाठी धडपडावं लागलं. म्हणून की काय सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार असलेल्या शिक्षणाची गंगा समाजाच्या सर्व थरांत नेण्याची जिद त्यांनी अंगी धरली. मुलींसाठी शाळा काढण्याचं सर्वप्रथम धाडस जोतिबांनी केले... त्यासाठी स्वतः - बेघर' झाले. त्यांच्या पत्नी सावित्रीबाईनी त्यांना साथ दिली. 

    निराधार बाल-विधवांचे जोतिबा कैवारी बनले. एवढंच नाही तर त्यांनी विधवा-विवाह घडवून आणले. मानवतेला काळिमा फासणारी विधवांच्या केशवपनाची पद्धत बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अस्पृश्यतेच्या रूपानं समाजाला लागलेला कलंक धुऊन काढण्यासाठी स्वत:च्या घरातील हौद जोतिबांनी अस्पृश्यांना खुला केला. सत्य व समता यावर आधारित न्याय व हक्कांसाठी जोतिबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली.

    मानवता म्हणजे माणुसकी ! माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच मानवताधर्म ! ह्या मानवताधर्माच्या शिकवणीची संजीवनी अमानवी रूढींच्या शंखलांनी जखडलेल्या समाजास जोतिबांनी प्रथम दिली. या कामी त्यांनी उभं आयुष्य वेचलं. त्याची मधुर फळं आज समाजाला चाखायला मिळत आहेत.
    मागासवर्गीयांना समाजात ताठ मानेनं जगता येतंय, स्त्री अबला राहिली नसून सबला बनली आहे, अस्पृश्यता नष्ट झाली आहे...

    पण या सुधारणा घडवण्यात जोतिबांना सिंहाचा वाटा द्यावा लागेल. मानवतेच्या ह्या थोर उपासकानं जणू- . । 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः ॥' या अर्थाच ज्ञानदेवांचं पसायदान वास्तवात आणण्यासाठी आपलं जीवन खर्ची घातलं.

    म्हणून आज म्हणावंसं वाटतं, या सुधारणांचं नेत्रसुख अनुभवण्यासाठी.. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी...जोतिबा, तुम्ही आज हवे होतात !...

    निबंध 4


    'सत्य' हेच मानवी जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे, असा विचार 'अखंडा'तून देणारे महात्मा फुले हे १९ व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. परंपरागत जातिव्यवस्था, गुलामगिरी, अज्ञान यांविरुद्ध बंड करणारे पहिले कृतिशील समाजसुधारक होते. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना फोडलेली वाचा, या कार्यामुळे त्यांना ‘महात्मा' ही पदवी जनतेने अर्पण केली होती.


    या महात्मा फुलेंचा म्हणजेच ज्योतीराव गोविंदराव फुलेंचा जन्म १८२७ मध्ये झाला. पंतोजींच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मिशनरी शाळेत त्यांनी माध्यामिक शिक्षण पूर्ण केले. 'त्यानंतर लहुजीबुवांकडे तालमीत त्यांना अनेक क्रांतिकारक विचारांचा लाभ झाला.


    त्या काळातील सामाजिक परिस्थिती, विशेषत: शेतकरी व स्त्रियांची दुःस्थिती त्यांना अस्वस्थ करत होती. त्यातच एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नात त्यांना अपमान सहन करावा लागला. त्यामुळे फुले अधिकच विचारी बनले.  १८४८ मध्ये त्यांनी शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची पहिली शाळा काढली. व सामाजिक क्रांतीचे पहिले पाऊल टाकले.


    शूद्रादिकांना शिक्षणदान करण्याचे व्रत घेतल्याने पत्नीसह त्यांना गृहत्यागही करावा लागला. तरीही त्यांनी आपले स्त्रीशिक्षणाचे कार्य चालू ठेवले. १८५१ मध्ये पुण्यात चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत त्यांनी मुलींच्या शाळा काढल्या. 


    त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा मे. कँडी यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी विद्या खात्याकडून सत्कार झाला. त्यामुळे प्रोत्साहित होऊन त्यांनी १८५१ मध्ये रात्रीच्या शाळेची स्थापना केली. परंतु रूढीमुळे अंध झालेल्या भारतीय समाजाला हे ज्ञानार्जन फारच झोंबले. त्यांनी या महात्म्यावर मारेकरी घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्या मारेकऱ्यांची असा लाभला जिव्हाळा. की पाषाणाची फुले झाली! - अशी अवस्था झाली. मारेकरी म. फुलेंचे भक्त बनले.


    यानंतर त्यांनी आपली दृष्टी सामाजिक प्रश्नांकडे वळवली. विधवाविवाह, पुनर्विवाहास मदत करण्याचे काम हाती घेतले. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. अस्पृश्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून घरचा हौद अस्पृश्यांसाठी १८६८ मध्ये खुला करून दिला. म. फुलेंची वाङ्मयीन सेवा फार मोठी आहे. “शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे,' हे पटवून देण्यासाठी 'तृतीय रत्न' हे नाटक लिहिले. 'गुलामगिरी', 'सार्वजनिक सत्य धर्म', 'मानव्याची आस' असे मानवतावादी साहित्य निर्माण केले. 


    जातिव्यवस्थेच्या मुळावर प्रहार केला. १८७३ साली कष्टकरी समाजातील सर्व लोकांना बंधमुक्त करून त्यांना आपले नैसर्गिक अधिकार निःशंकपणे भोगण्यास समर्थ बनविण्यासाठी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे या भूमिकेतून 'शेतकऱ्यांचा आसूड' लिहिला. अशा प्रकारे शंभर वर्षांपूर्वी म. फुलेंनी सहकाराचा कृतिशील पुरस्कार केला. कृषि-औद्योगिकरणाचा, शेतीच्या अत्याधुनिकीकरणाचा आग्रह धरला.


    स्वतः यशवंतासारखा दत्तक पुत्र घेतला. आपल्या मृत्यूपत्रात सर्व इस्टेट दत्तक पुत्राला बहाल केली. त्याने आपल्या कार्याचा वारसा चालवावा अशी इच्छा व्यक्त केली. दत्तक पुत्राचे आचरण योग्य नसल्यास त्यास इस्टेट न देता, शूद्र समाजातील लायक मुलाला द्यावी असेही नमूद केले.



    २८ मे १८९० साली या सामाजिक चलवळीच्या अध्वयूंची प्राणज्योत मालवली. म. गांधींनी ज्यांना 'खरा महात्मा' म्हणून भूषविले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'समाज-क्रांतिकारक', डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरुस्थानी मानून 'भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक', 'भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित' म्हणून गौरव केला, असे हे ज्योतिराव फुले एक महान ध्येय आहे, स्वप्न आहे. 


    लोकशाही ही मानवी समानतेवर, बंधुतेवर आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर अधिष्ठित असली पाहिजे. जसजसे मानवी समानतेचे तत्त्व भारतीय समाजाच्या अंगी बाणेल तसतशी भारतीय लोकशाही अभेद्य व अभंग होईल. ज्योतीरावांचे मानवतावादाचे, सर्वधर्म समभावाचे स्वप्न साकार होईल.

    निबंध 5

    थोर समाजसुधारक : महात्मा ज्योतिबा फुले

    १९ व्या शतकातील एक महान संत, बहुजन समाज आणि पददलित जनतेचे पहिले उद्धारकर्ते. स्त्रियांना मानाची वागणूक आणि शिक्षण देऊन त्यांना सबल बनविण्याचा प्रथम प्रयत्न करणारी एक महान व्यक्ती. २० फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले बालक पुढील वीस, पंचवीस वर्षांत साऱ्या महाराष्ट्रातील विद्वानांना उच्चभू लोकांना, उच्चवर्णीयांना एक नवीन दिशा दाखवील, एक सामाजिक क्रांती घडवेल, असे स्वप्नातही कोणाच्या आले नसेल.

    ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण जीवन दीन-दुबळ्यांच्या, रंजल्या-गांजलेल्याच्या उद्धारासाठी निरंतर व्यतीत होत होते. महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांच्या सामाजिक क्रांतीपुढे ज्योतिबांनी घेतलेला ध्यास हा श्रेष्ठ ठरत होता, त्यांचे नाव अग्रगणी घेतले जात होते. आजूबाजूच्या प्रसंगातून-वेगवेगळ्या त्यांना जाणवलेल्या घटनांतून ज्योतिबांना कळून चुकले की भारतीय समाजातील असे कितीतरी घटक आहेत ज्यांना साधे माणुसकीचेही अधिकार मिळत नाहीत.


     प्राण्यांना-जनावरांना ज्या ममतेने वाढवले जाते, तसे या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मानवजातीला अगदी घृणास्पद-अपमानास्पद वागणक दिली जात आहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत प्राचीन काळी दिला जाणारा मान-सन्मान, आता या १९ व्या शतकात कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. स्त्रियांची वास्तविक परिस्थिती अगदी उलट झाली आहे. या एकूणच परिस्थितीचा परिणाम ज्योतिबांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात झाला अन् त्यांच्या जीवनाला एकदम कलाटणीच मिळाली.


    स्त्रियांच्या दैन्यावस्थेने महात्मा फुल्यांचे अंतःकरण अक्षरशः कळवळले. ज्या समाजात स्त्रीला प्रतिष्ठेचे स्थान दिले जात नाही, त्या समाजाची प्रगती कदापिही होणे शक्य नाही. असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळेच ज्यातिबांनी सर्वप्रथम स्त्रीशिक्षण आणि स्त्रीचा उद्धार याच कामाकडे लक्ष दिले. एक स्त्री सुशिक्षित झाली. सारे घरदार सुशिक्षित होते.


    'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगता उद्धारी।' या काव्यपंक्तीनुसार स्त्रियांना शिक्षण देऊन शहाणे करण्याचे काम आपल्या धर्मपत्नीच्या सहकायनि सुरू केले. सावित्रबाईंनीही ख्या अनि स्वतः ज्योतिबांकडून शिक्षण घेऊन मुलींच्या शाळेतील शिक्षिकेची भूमिका अत्यंत कष्ट-त्रास सहन करून साकारली. इ.स. १८४८ मध्ये ज्योतिबांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. समाजकंटकांनी त्यांना आणि सावित्रीबाईंना खूप त्रास दिला. दोघांनी अनेक संकटे झेलली. पण ते डगमगले नाहीत. आपले हे आसिधाराव्रत अविरत चालू ठेवले.


    स्वीशिक्षणाबरोबरच दीनदलित आणि अस्पृश्य लोकांची होणारी परवड ज्योतिबांना याचि डोळा, याचि देही अनुभवली होती. या बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्यावर मायेची पखरण घालणारा हा 'महात्मा ज्योतिबा आरंभी एकटाच होता, अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यांना संघटित केले. त्यांच्यात आत्मविश्वास वाढविला. हक्कांची-अधिकारांची जाणीव करून दिली.


    महात्मा फुले हे केवळ बोलघेवडे समाजसुधारक...फक्त व्याख्याने झोडणारे-पुढारी नव्हते. त्यांच्या प्रत्येक समाजसुधारच्या कृतीमध्ये एक प्रत्यक्ष कृती-बस्तुपाठ होता. त्यामुळेच ज्यावेळी पुण्यामध्ये एकेकाळी पडलेल्या कडक उन्हाळ्यात, पाण्याच्या दुर्मिक्ष्यतेच्या समयी महात्मा फुल्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी... खास अस्पृश्यांसाठी खुला केला.


    'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले।' या संत उक्तीचे प्रत्यंतर अन्यत्र कुठे बरे दिसून येईल ? ज्योतिबांच्या समाजसुधारणा या केवळ चार-दोन क्षेत्रासाठीचे नव्हत्या तर समाजात जेथे जेथे अन्याय दिसतो आहे, अज्ञान दिसत आहे, त्या सर्व क्षेत्रात त्यांनी आपले कार्य सुरू केले. अज्ञानाविरुद्ध लढा देताना अनाथ बालके, विधवा स्त्रिया, कुमारी माता, अस्पृश्य जनता अशा सर्वांना घेऊन सज्ञानी आणि जबाबदार नागरिक बनविण्याचा त्यांनी विडाच उचलला होता. विधवा विवाहास सक्रिय पाठिंबा देऊन पुण्यामध्ये तसे पुनर्विवाह घडवून आणले. समाजातील दुष्ट, हानिकारक प्रथा नाहीशा करण्यासाठी 'भ्रूणहत्या प्रतिबंधक कायदा' आणि त्यांची गृहनिर्मितीसाठी अतोनात प्रयत्न केले.


    सामाजिक कार्यामध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा तयार केला. स्वतःच्या घरी अनाथ बालिकाश्रम उघडला. दुष्काळाच्या प्रसंगी 'छात्रालय' उघडून सर्व समाजाला त्यांनी दिलासा दिला. दारूबंदीसाठी ही पुणे नगरपालिकेमध्ये ठराव पास करून घेतला. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या कार्याविषयी ही फुल्यांना अतिशय आदर होता. त्यामुळे 'डोंगरी' तुरुंगातून त्या दोघांची सुटका झाल्यानंतर मोठा सत्कार समारंभ घडवून आणला.
    १८८८ मध्ये मुंबईत सर्व जनतेमार्फत 'फुल्यांना' 'महात्मा' ही पदवी बहाल करण्यात आली.


    अशा या महापुरुषाचे कार्य हे आजही अमर स्वरूपात आपल्यासमोर आहे. 'सत्यशोधक समाजा'चे ते संस्थापक होते. त्यांची साहित्य संपदा - शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न (नाटक), विवेकसार, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, इशारा अशी अनेक पुस्तके त्यांची आपल्याला त्यांच्या महान कार्याची आठवण करून देतात.

    “विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।।
    नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
    वित्तविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।"

     शिक्षणाचे महत्त्व यापेक्षा अधिक चांगल्या शब्दात कोण बरे सांगणार ? धन्य धन्य ते 'महात्मा ज्योतिबा फुले' हेच खरे.

    महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध | Mahatma jyotiba phule essay in marathi

     शालेय जीवनात खेळाचे महत्त्व| Shaley jivanat khelache mahatva in marathi

    नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शालेय जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध  बघणार आहोतचला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

    अरे किती खेळतोयस! अभ्यास करायचाय की नाही? चल आधी घरी." ही वाक्ये प्रत्येक आईबाबांच्या तोंडी असतात. सगळ्या मोठ्या माणसांना असेच वाटत असते की, खेळ म्हणजे केवळ गंमतजंमत. खेळ म्हणजे फक्त वेळ घालवणे, म्हणून निरर्थक. मला हे मात्र अजिबात मान्य नाही.


    खेळात मुख्यत्वे मनोरंजन घडते. खूप मजा येते. मनसोक्त आनंद लुटता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोठी माणसे दम दयायला तिथे नसतात, आमचे आम्हीच राजे असतो. त्यामुळे मुक्तपणे खेळायला मिळते. याचा आनंद मिळतोच. पण त्यात वाईट काय?


    Shaley jivanat khelache mahatva in marathi
    Shaley jivanat khelache mahatva in marathi

    खेळात फक्त मनोरंजन असते, हे मात्र मला अजिबात मान्य नाही. मैदानात आम्ही मनसोक्त धावतो, उड्या मारतो. यामुळे चपळता येत नाही का? त्यामुळे आपोआप व्यायाम घडतो त्याचे काय? खेळून घरी जातो तेव्हा किती भूक लागते ! हा फायदाही लक्षात घेतला पाहिजे. खेळाबद्दल मी शांतपणे विचार करू लागलो, तेव्हा मला त्याचे खूपच फायदे दिसू लागले. आपल्याला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न करावे लागतात.


     मैदानात जिंकण्यासाठी आम्ही जीव तोडून प्रयत्न करतो. प्रत्येकजण जिंकण्यासाठी धडपडतो. जिंकायचे, अधिक पुढे जायचे, अधिक प्रगती करायची ही प्रेरणा किती चांगली आहे? याच प्रेरणेमुळे माणूस प्रगती करतो ना? खेळामुळे ही प्रेरणा रुजत नाही काय? आम्ही जिंकण्यासाठी धडपडतो; आटोकाट प्रयत्न करतो. पण जिंकणारा शेवटी एकच असतो. 


    आपण जिंकू किंवा हरू. यांतले काहीही होऊ शकते. हे सर्व आम्हांला समजते. हरल्यावर वाईट वाटते, हे खरे. पण जिंकलेल्यांचे मन:पूर्वक अभिनंदनही करतोच ना? नंतर आम्ही हसतखेळत पुन्हा खेळायला तयार होतोच की नाही? जीवनात देखील हारजीत हसतखेळत स्वीकारली पाहिजे, ही शिकवण आपल्याला खेळाच्या मैदानावरच मिळते.

    खेळाचा आणखी एक फायदा आहे. जेव्हा आम्ही संघातर्फे खेळतो, तेव्हा संघाचा विजय व्हावा म्हणून जिवापाड प्रयत्न करतो. आपल्याला पडायला होईल, मार लागेल, जखमी होऊ, अशी कसलीच भीती त्यावेळी मनात नसते. आपला संघ जिंकला पाहिजे, हीच एक इच्छा आपल्या मनात असते. सगळेच जण संघासाठी धडपडत असतात. त्यावेळी कोणाच्याच मनात व्यक्तिगत स्वार्थ नसतो. या वेळी प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेला, भावनेला बाजूला ठेवतो. फक्त संघाचाच विचार करतो. किती महत्त्वाचा संस्कार आहे हा!

    शिवाय, आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. सगळेच काय वर्गात, अभ्यासात हुशार नसतात. अशांच्या मनात, आपले जीवन व्यर्थ आहे, असा न्यूनगंड निर्माण होतो. ते आत्मविश्वास गमावून बसतात. यांच्यापैकी कित्येकजण मैदानात विलक्षण कर्तबगारी दाखवतात. सचिन तेंडुलकर कुठे कॉलेजात अभ्यासात चमकला होता? म्हणजे आपली कर्तबगारी सिद्ध करायला मैदानात वाव मिळतो, हा केवढा मोठा फायदा आहे!
    खेळाचे असे कितीतरी फायदे मला आठवू लागले आणि शालेय जीवनात खेळाला अभ्यासाइतकेच महत्त्वाचे स्थान आहे, हे अधिकाधिक पटू लागले.

    मित्रांनो तुम्‍हाला शालेय जीवनात खेळाचे महत्त्व हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .

    महत्‍वाचे मुद्दे : 
    • पुष्कळदा खेळाबद्दल मोठ्यांची सतत तक्रार 
    • खेळ निरर्थक, केवळ गंमतजंमत, वेळ फुकट घालवणे 
    • मनोरंजनाबरोबर शारीरिक चापल्य
    • व्यायाम, जिंकण्याची ईर्ष्या, प्रसन्न चित्तवृत्ती
    • हारजितीचा हसतखेळत स्वीकार
    • संघभावनेचा संस्कार 
    • अभ्यासाखेरीज अन्य क्षेत्रांतील कर्तबगारीला वाव
    • खेळ आवश्यकच.

    शालेय जीवनात खेळाचे महत्त्व | Shaley jivanat khelache mahatva in marathi

    माझा आवडता खेळ | My Favorite Game Essay In Marathi


    नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता खेळ मराठी निबंध  बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
    बुद्धिबळ हा माझा आवडता खेळ आहे. हा एक बैठा खेळ आहे. हा खेळ दोघांमध्ये शांतपणे खेळता येतो. हा खेळ मुख्यत: घरात बसून खेळतात. मात्र, कुठेही बसून हा खेळ खेळता येतो. बुद्धिबळ खेळणारा खेळाडू खेळात अक्षरश: बुडून जातो. तो आजूबाजूचे सगळे भान विसरून  जातो. बुद्धिबळासाठी अगदी अल्प साधने लागतात. एक पट, सोळा पांढऱ्या सोंगट्या व सोळा काळ्या सोंगट्या इतक्या वस्तूंची आवश्यकता असते. पटावर आडव्या व उभ्या पट्ट्यांनी बनलेली चौसष्ट घरे असतात.

    My Favorite Game Essay In Marathi
    My Favorite Game Essay In Marathi

    सोंगट्यांच्या चालीही गमतीदार व वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्यादे सरळ रेषेत पुढेच जाते; पण कोपऱ्याच्या घरात असलेल्या सोंगटीला बाद करते. उंट फक्त तिरका चालतो. हत्ती फक्त सरळ रेषेत चालतो. वजीर सरळ रेषेत व तिरक्या रेषेत मागेपुढे कसाही जातो. घोडा एका चालीत अडीच घरे चालतो. एवढ्या गुंतागुंतीच्या चाली लक्षात ठेवाव्या लागतात. यांचा वापर करून आपली चाल करायची असते, प्रतिस्पर्ध्यावर मात करायची असते. मात्र यासाठी खूप विचार करावा लागतो. हा बुद्धीची कसोटी घेणारा खेळ आहे. म्हणूनच मला तो खूप आवडतो.

    मित्रांनो तुम्‍हाला My Favorite Game Essay In Marathi हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .


    माझा आवडता खेळ | My Favorite Game Essay In Marathi