कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध


नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता संत मराठी निबंध बघणार आहोत.  भारत ही संताची भुमी आहे. संतानी आपल्‍या शिकवणी व ज्ञानातुन समाजाची प्रगतीच करण्‍याचे काम केले आहे. भारताला खुप मोठी संतपंरपरा लाभलेली आहे. याच संतपंरपरेतील संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज , संत गाडगेबाबा यांच्‍या विषयी अनुक्रमे ३ निबंध बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

maza-avadta-sant-essay-in-marathi
maza-avadta-sant-essay-in-marathi

 majha avadta sant tukaram nibandh | संत तुकाराम महाराज

मुद्दे : 
  • महाराष्ट्राला संतांची परंपरा 
  • संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी 
  • आई-वडील, जन्म इ. 
  • प्रतिष्ठित घराणे
  • घरात विठ्ठलभक्तीची परंपरा 
  • लहान वयातच आध्यात्मिक विदयेचे संस्कार
  • कालांतराने अध्यात्माची ओढ 
  •  गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे थोर ग्रंथांचा व्यासंग 
  • विरक्ती- स्वप्नात गुरूपदेश 
  • कवित्वाची स्फूर्ती 
  • अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली अमृतवाणी 
  • भोंदू लोकांवर कोरडे ओढले
  • सामान्यांपासून प्रतिष्ठितांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित 
  • मत्सरी लोकांकडून छळ 
  • धर्मरक्षण हेच जीवितकार्य 
  • जातिभेद नाकारले 
  • 'संत तुकारामांची गाथा' हे मराठी भाषेचे श्रेष्ठ असे भूषण.

महाराष्ट्राला थोर संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेतील संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी होत. त्यांचा जन्म १६०८ साली देहू येथे झाला.  संत तुकारामांचे घराणे हे त्या काळातील एक प्रतिष्ठित घराणे होते. त्यांचे शिक्षण त्या काळातील प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तींप्रमाणे झाले.

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.

त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही  मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेली दैना पाहून तुकाराम महाराजांच्या मनात विरक्ती दाटून आली. लहानपणापासून अध्यात्मविदयेचे संस्कार जागृत झाले. त्यांचे मन अध्यात्मचिंतनात गढू लागले. ते देहूजवळच्या भामनाथगडावर जाऊन अध्यात्मचिंतन करू लागले. 

गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे थोर ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. या दरम्यानच्या काळात संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश झाला. संत नामदेव पांडुरंगासमवेत त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी त्यांना कवित्व करायला सांगितले आणि अलौकिक प्रतिभेतून स्फुरलेली त्यांची अमृतवाणी सिद्ध झाली.

संत तुकाराम महाराजांच्या  काव्याकडे सामान्य माणसापासून ते त्या काळातील प्रतिष्ठित लोकांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित झाले. गावागावांत त्यांची कीर्ती पसरली. संत तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून काहीजणांना त्यांचा मत्सर वाटू लागला. हे मत्सरी लोक त्यांचा नाना प्रकारे छळ करू लागले. त्यांच्या अभंगांच्या वह्या  त्या दुष्ट लोकांनी इंद्रायणी नदीत बुडवायला लावल्या. परंतु विठ्ठलकृपेने त्या वह्या  तरंगून वर आल्या, ही कथा सगळ्यांना ठाऊकच आहे. यामुळे लोकांच्या मनात तुकाराम महाराजांविषयी अपार भक्तिभावच निर्माण झाला.

संत तुकाराम महाराजांनी धर्मरक्षण हेच जीवितकार्य मानले होते. त्यांनी जातपात, उच्चनीच हे भेद नाकारले. संत तुकाराम महाराजांच्या कार्याच्या रूपाने भागवत संप्रदायाने कळसच गाठला. त्यांचे काव्य सुभाषितांसारख्या वचनांनी नटलेले आहे

जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो आपुले।
 तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

अशा हजारो प्रासादिक अभंगांतून आपले दिव्य तत्त्वज्ञान संत तुकाराम महाराजांनी जनतेसमोर मांडले आहे. जनसामान्यांच्या जिभेवर हे काव्य विराजमान झाले आहे. 'संत तुकारामांची गाथा' ही मराठी भाषेचे एक अलौकिक भूषण बनले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता बाकीचे २ निबंध तुम्‍हाला खाली स्‍क्रोल केल्‍यावर दिसुन येतील. धन्‍यवाद   


maza avadta sant eknath marathi nibandh | संत एकनाथ मराठी निबंध


आजही जन्मावरून माणसांत उच्चनीचता मानली जाते. अशा वेळी मनात येते, स्वर्गातील एकनाथांच्या आत्म्याला काय वाटत असेल? चारशे वर्षांपूर्वी एकनाथांनी प्रत्यक्ष कृतीद्वारा समाजाला समानतेची व मानवतेची शिकवण दिली होती.

इ. स. १५३३ मध्ये सुविदय, भाविक अशा चक्रपाणींच्या घरात संत एकनाथांचा जन्म झाला. एकनाथांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती फार पूर्वीपासून रुजलेली होती. त्यांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरीला आणली. एकनाथांना तर अगदी बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचे वेड लागले होते. त्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच घराचा त्याग केला आणि ते देवगडला आपल्या गुरुगृही, जनार्दनस्वामींकडे आले. जनार्दनस्वामींनी एकनाथांची परीक्षा घेतली. ते त्या कसोटीला उत्तम प्रकारे उतरले. तेव्हा त्यांना गुरूंचा अनुग्रह मिळाला.

एकनाथ विद्वान होते, ज्ञानी होते; धर्म व रूढी यांतील फरक त्यांनी जाणला होता. सनातनीपणाचे पांघरूण पांघरणारे लोक माणुसकीपासून दूर जात आहेत, हे एकनाथांनी ओळखले. संस्कृत भाषेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तिची थोरवी ते जाणत होते; पण त्याचबरोबर मराठीची महत्ताही त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कर्मठ समाजाचा रोष पत्करूनही सामान्य जनांसाठी मराठीत प्रासादिक रचना केली.

त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेचे शुद्धीकरण केले व तिच्यातील पाठभेद काढून टाकून 'ज्ञानेश्वरी' सिद्ध केली. एकनाथांनी भागवताची रचना केली व भावार्थ रामायणातून रामकथा सांगितली. 'रुक्मिणी-स्वयंवर' हा त्यांच्या पंडिती काव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. एकनाथांनी ही सर्व रचना मराठीत केली. एकनाथांच्या या मराठी रचनेला काशीच्या पंडितांनी प्रारंभी विरोध केला; पण ग्रंथ श्रवण केल्यावर त्याच पंडितांनी एकनाथांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक काढली.

एकनाथ संत होते, कवी होते, तसेच ते श्रेष्ठ समाजसुधारक होते. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धत व त्यामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर होणारा अन्याय त्यांना मान्य नव्हता. रणरणत्या वाळूत रडणाऱ्या हरिजन बालकाला त्यांनी उचलून घेतले व त्याला महारवाड्यात नेऊन पोचवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वत:च्या वडलांच्या श्राद्धाला महारांना आपल्या घरी पंक्तीला जेवायला बोलावले. काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. हे सारे एकनाथ करू शकले; कारण जनता हाच त्यांचा जनार्दन होता व जनसेवा हीच त्यांना ईश्वरपूजा वाटत होती.


sant gadge baba essay in marathi | संत गाडगेबाबा मराठी निबंध एक समाजसेवक संत

मुद्दे :
  • जन्म - बालपण
  • दारिद्र्याचे चटके
  • निरक्षरता, अंधश्रद्धा यांविरुद्ध प्रचार
  • 'गाडगेबाबा' हे नाव का पडले?
  • कष्ट करून भिक्षा घेणे
  • स्वच्छतेचा आग्रह
  • देणग्यांचा उपयोग जनतेसाठी
  • अनेक संस्था
  • निधन
संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी हे होते. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे घरात कायमचे दारिद्र्य होते. वडील अकाली वारले. त्यामुळे त्यांच्या मामाने त्यांचा सांभाळ केला.
संत गाडगेबाबांनी मामासोबत शेतात खूप कष्ट केले, पण सावकाराने मामाच्या शेतावर जप्ती आणली. मामाच्या अशिक्षितपणामुळे सावकाराने मामाला फसवले. या घटनेचा गाडगेबाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे 'व्यसन सोडा, शिक्षण घ्या. कर्ज घेऊ नका,' असा त्यांनी आयुष्यभर प्रचार केला.

सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी भजन, कीर्तन व प्रवचन हा मार्ग वापरला. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असे. त्यामुळे त्यांना 'गाडगेबाबा' हे नाव पडले. गाडगेबाबा कधी एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट करूनच भिक्षा घेत. त्यांच्या हातात नेहमी झाडू असे. ते स्वत: झाडण्याचे काम करत आणि लोकांना स्वच्छतेचा उपदेश करत.

लोकांकडून त्यांनी खूप देणग्या मिळवल्या. पण एकही पैसा स्वत:साठी खर्च केला नाही. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, गोरक्षण संस्था उभारल्या. त्यांनी अनेक शाळा व महाविदयालये सुरू केली. आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम केले. १९५६ साली त्यांचे निधन झाले. ते एक महान सेवाभावी संत होते.

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध

माझा आवडता नेता मराठी निबंध | maza avadta neta nibandh in marathi


निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता नेता मराठी निबंध बघणार आहोत. गुणी माणसांचे गुणच दूताचे काम करतात. त्यांची कीर्ती दूरवर पसरवितात. डॉ. राधाकृष्णन् याला अपवाद नव्हते. त्यांच्या अलौकिक गुणांमुळेच त्यांनी त्रिखंडात कीर्ती गाजवली.


राधाकृष्णन् ! या नावातच किती माधुर्य आहे ! उत्कट भक्तीचा आविष्कार म्हणजे राधा, मूर्तिमंत तत्त्वज्ञान म्हणजे कृष्ण ! एक शुद्ध प्रेमरूप तर दुसरे केवळ ज्ञानरूप ! या दोहोंचा मनोज्ञ संगम म्हणजे डॉ. राधाकृष्णन.
थोर कुळात जन्म किंवा लक्ष्मीची कृपा यांचा लाभ त्यांना झाला नाही. पण सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी होता आणि त्याला दीर्घोद्योगाची जोड मिळाली. थकवा किंवा आळस त्यांना माहीतच नव्हता. अध्ययन, अध्यापन, चिंतन, लेखन यातच त्यांचा दिवस व्यतीत व्हायचा. 

ग्रंथांच्या सहवासात ते तहानभूक विसरत. रशियाचा हुकूमशहा स्टॅलिन यानेही 'चोवीस तास अध्ययन करणाऱ्या या भारतीय प्रोफेसरला मला भेटायचं आहे' अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या गुणांची भुरळ इंग्रजांना पडली पण इंग्रजांच्या संस्कृतीची भुरळ डॉ. राधाकृष्णन यांना कधीच पडली नाही. ख्रिश्चन शाळेत शिक्षण घेऊनही त्यांची स्वधर्मावरील श्रद्धा कमी झाली नाही. ज्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची टूम होती त्या काळातही त्यांना त्याबद्दल ओढ वाटली नाही. उलट 'मी युरोपात जाईन ते शिकविण्यासाठी, शिकण्यासाठी नव्हे' असा जाज्वल्य स्वदेशाभिमान आणि दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या ठायी होता.


शिक्षक, प्रोफेसर, कुलगुरू, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती इत्यादी बहुमानाची पदे त्यांनी भूषविली. इंग्लंडने मानाची 'सर' पदवी त्यांना दिली. 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताबही मिळाला पण अहंकाराचा वारा त्यांना शिवला नाही. फलभाराने वाकलेल्या वृक्षाप्रमाणे ते अत्यंत नम्र होते. 'आयुष्यात जे यश वाट्याला आले त्याचे श्रेय देवाला आणि दैवाला आहे,' असे ते म्हणत.


बी. ए. ला 'तत्त्वज्ञान' विषय घेतल्यामुळे पाश्चात्य ग्रंथ वाचण्यात आले आणि हिंदुधर्म अपुरा आहे असे वाटून ते खिन्न झाले. त्याच वेळी स्वामी विवेकानंद विश्वभ्रमण करून हिंदू धर्माची थोरवी पाश्चात्य जगाला पटवून देत होते. त्यांची भाषणे, लेख, पुस्तके डॉ. राधाकृष्णन् यांनी वाचली. हिंदुधर्माचे चिकित्सक दृष्टीने अध्ययन केले आणि भारताची सांस्कृतिक वकिली करणे त्यांचे जीवनकार्य बनले. लो. टिळकांनी गीतारहस्यात डॉ. राधाकृष्णन यांच्या लेखनातील अवतरणे दिली आहेत.


स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान या तत्त्वज्ञानाच्या चालत्या बोलत्या विश्वकोषा' ला मिळाला. 

अमोघ वक्तृत्वाची देणगी त्यांना लाभली होती. केंब्रिज विद्यापीठात 'ब्रडले आणि शंकराचार्य' या व्याख्यानात 'माया' हा अत्यंत गहन विषय त्यांनी सोपा करून सांगितला. आश्चर्य म्हणजे कोणतीही टिपणे न काढता! ते इंग्रजीतून एक तास अस्खलित बोलू शकत. 

त्यांच्या व्याख्यानसमयी जागा मिळण्यासाठी इंग्लिश लोक तासन् तास आधी येऊन बसत. वक्तृत्वाचे सुंदर लेणे, ईश्वराघरचे देणे होते. डॉ. राधाकृष्णन् वक्तशीर, कडक शिस्तीचे भोक्ते होते. विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्यांच्या ठायी होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराचे दार सदैव खुले असे. गरजू विद्यार्थ्याला मदतीचा हात देणे त्यांचा सहजस्वभाव होता. ते म्हैसूर सोडून कलकत्ता विद्यापीठात गेले तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी घोडागाडी स्वतः ओढत स्टेशनवर पोचवली. 


प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांची गर्दी आणि डोळ्यात अश्रूनी गर्दी केली होती. 'राधाकृष्णन् की जय' असा जयजयकार सर्व करत होते. अशी अफाट लोकप्रियता एखाद्याच्याच वाट्याला येते.  “माणसाने अंतराळात खुशाल जावे अन्य ग्रहांवर हिंडून यावे. परंतु आपल्या पायाने नीट जमिनीवर आधी चालायला शिकावे. त्याशिवाय त्याची बुद्धी, हुशारी व्यर्थ आहे.'' असा बहुमोल संदेश देणाऱ्या त्या थोर द्रष्ट्याला विनम्र अभिवादन.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2

माझा आवडता नेता : महात्मा गांधीजी | maza priya neta mahatma gandhiji essay in marathi


माझा आवडता नेता म्हणून महात्मा गांधीजींचे नाव माझ्या हृदयात कोरले गेलेले आहे. मी डोकावतो.क्षणभर मला भास होतो की , वर्षानुवर्षांपूर्वी लावलेली एक दिपकज्योती धडपडते आहे.माहीत आहे , कोणती ती ज्योत? राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जीवनज्योत , जी चिरंजीव आहे , अजरामर आहे. पारतंत्र्याच्या काळोख्या रात्रीतही स्वातंत्र्यस्फूर्तीच्या किरणांनी याच ज्योतीने तरुणांना जागे केले.


आजच्या नेत्यांपेक्षा बापू खूप खूप वेगळे होते. जनसेवेची , त्यागाची जिवंत भावना त्यांच्या नसानसात होती. देशासाठी त्यांनी तन-मन-धन सारं अर्पण केलं होत म्हणूनच दुःखित हृदयानं , करूण स्वरांनी त्यांना 'बापू' म्हणूनच हाक मारली. जगान त्यांना संत म्हणूनही ओळखलं, तर इतिहासकारांनी 'युगपुरुष' मानलं. नेता बनून मग लोकसेवा करण्यापेक्षा लोकसेवा करून ते नेता बनले होते. त्यांच्या कार्यामागे सारा देश धावत होता. स्वतंत्र अन् समृध्द भारत' हे त्यांच सुखद, मधुर स्वप्न होतं. निःस्सीम त्याग , प्रयत्नांची पराकाष्ठा अन् दृढ निष्ठा यांच्या त्रिवेणी संगमाने त्यांच हृदय अथांग भरलं होत .


गुलामीच्या शृंखला तोडण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. धर्म , अहिंसा, आणि सत्य या त्रिसूत्रीच्या निर्मल पवित्रतेवर त्यांचं प्रत्येक कार्य निर्भर होतं. "माझ्या स्वप्नातल्या भारतात अस्पृश्यतेचा शाप नांदू शकणार नाही' असे बापू म्हणत.


राजकीय व्यक्तीबरोबरच सरळ अन् पवित्र हृदयाची व्यक्ती म्हणून बापूंचा उल्लेख केला जातो. गरीबांना चरख्याचा मंत्र देणारे , देश एकतेसाठी राष्ट्रभाषेचा प्रचार करणारे, जातिभेद नष्टकरून हिंदू-मुस्लिम एकतेसाठी धडपडणारे बापू खरंच आपल्याला शिकण्यासारखे खूप-खूप ठेवून गेले. 


शत्रूविषयीसुद्धा आत्मीयता बाळगणारे बापू म्हणत- “क्षमा हेच बलवंताचे खरे लेणे असते.' प्रार्थनेविषयी ते म्हणत-‘शरीराला जशी अन्नाची जरूरी, तशी आत्म्याला प्रार्थनेची!'' 'सत्य हीच प्रभूची पूजा" असा त्यांचा विश्वास होता.सत्य - अहिंसेच्या जोरावरच त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला.त्यांच्या निश्चयी स्वभावाने त्यांना देशकार्यात गुंतवून ठेवले. अन्यायाविरुद्ध ते झटले.


१९२० च्या असहकार चळवळीत उचललेली पावले आणि १९३० च्या दांडी यात्रेतील पावले स्वातंत्र्याच्या मार्गात अशी कोरली गेली की, स्वातंत्र्य आंदोलन आख्खे ढवळून निघाले. १९४२ च्या 'चले जाव' ने सारा भारत दुमदुमला निःस्वार्थ स्वातंत्र्यप्रेम होतं ते ! सत्ता , वैभव यांच्यापासून कोसो दूर! एक पंचा बांधून देशसेवेला अर्पण झालेलं अस व्यक्तीमत्त्व! स्वातंत्र्यप्रेमाच्या नंदादीपाने भारतवासीयांच्या हृदयात सत्कार्याच्या ज्योती पाजळणारे गांधीजी, त्यांचे जीवन आजही डोळ्यासमोर आणा.आपल्याही भावना उफाळून येतील.त्यांच्या विविधरंगी गुणी व्यक्तीमत्त्वाला एक गुण जरी आपण घेतला तरी जीवनाच सार्थक होईल.आपल्याजीवनपुष्पाला अशा प्रेरणेची  नितांत गरज आहे.


वस्तुतः आजचा युवक उत्साही व क्रियाशील आहे. पण त्याला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.स्वातंत्र्याची प्रभात जरी आपल्या देशात झाली असली तरी 'सुराज्याचा प्रकाश' अजून देशातील काना-कोपऱ्यातील झोपडीपर्यंत पोहचलेला नाही. त्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरूणाला कार्यतेज व शक्ती देण्याचे सामर्थ्य महात्मा गांधीच्या जीवनकथेत आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी देशाला ग्लानी येईल, त्याचा आत्मविश्वास विचलित होईल, परक्यांच्या प्रभावाने तो स्वसत्वाला पारखा होईल, निराशेने त्रस्त व ग्रस्त होईल , त्या त्या वेळी समाजाने अन् देशाने महात्मा गांधीजीचे स्मरण करावे. त्यांच्या आदर्शाचा स्वीकार करावा निश्चित नवा चांगला मार्ग मिळेल. 


आज बापूजी असते तर! स्वार्थ भ्रष्टाचार व सत्ता यातून विनाशाकडे अशी दुष्ट वाटचाल संपली असती. समाजाच्या समस्या ओळखून योग्य प्रयत्न झाले असते. संस्कृती व मानव यांची सांगड घडली गेली असती. सुराज्याची प्रभात झाली असती. भारतीयांचे मनोबल वाढले असते. हिंसेचे भयानक रूप बदलले असते.अहिंसा व सत्य यामुळे सर्वसामान्य माणूसही सुखावला असता.

बापूंची जीवनज्योत निसर्गनियमानं परविश्वात विलीन झाली ती १९४८ मध्ये तरीही सखोल अर्थान अजूनही ती दीपस्तंभाप्रमाणे तेवते आहे. अन् अशीच तेवत राहील. मला म्हणावेसे वाटते
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 3

भारतमातेच्या चरणकमलांना ब्रिटिश शृंखलेतून मुक्त करणारे अनेक सुपुत्र होऊन गेले. पण भारतमातेच्या मस्तकावरच्या राजमुकुटात विराजमान होणारी फार मोजकी रत्ने आहेत...असंच एक स्त्रीरत्न ! इंदिरा गांधी !!
कोमल ' कमला 'च्या पाकळ्यांवर १९ नोव्हेंबर १९१७ रोजी दैवानं बहाल केलेला एक दवबिंदू !  जिद्द, राजकीय डावपेच, राष्ट्रापुढचे प्रश्न, त्यांची हाताळणी या सर्वांचं 'प्रियदर्शनी'ला बाळकडू घरीच मिळालं.  मातेच्या अकाली निधनानं त्या घायाळ  झाल्‍या ,  परदेशी शिक्षण घेऊन देशासाठी कर्तृत्व गाजवायला सिद्ध झाल्‍या.


maza avadta neta nibandh in marathi
maza avadta neta nibandh in marathi

प्रथम केवळ त्या‍ नभोवाणी मंत्री होत्या  त्या नंतर त्यांनी असं घवघवीत यश मिळवलं की डोळे दिपून गेले. बंगलोरच्या वादळी अधिवेशनात भल्याभल्यांना चीत करून  काँग्रेस पक्षावर आपल्या नावाचं शिक्कामोर्तब केलं. असं जगाच्या राजकारणात उदाहरण नाही. भारताची पहिली स्त्री पंतप्रधान ! इतकी तेजस्वी की शब्दश: कुणाची हिंमत नव्हती मान वर करून पाहण्याची. इंदिरा एक असामान्य प्रशासक होती. 'एकतेतून विकास' हा मूलमंत्र घेऊन 'गरिबी हटाव' मोहिमेचं वादळ निर्माण केलं. 'वीस सूत्री' कार्यक्रम, अणुस्फोट, बँकांचं राष्ट्रीयीकरण या प्रत्येकातून या राष्ट्राला बलवान बनवण्याचा चंग स्पष्ट होत होता.


“वाकड्या नजरेनं पाहाल तर डोळे फोडू' अशा जबरदस्त आत्मविश्वासानं, एक स्त्री असून, 'बांगला देश' युद्ध जिंकून जगाला आपली नोंद घेणे भाग पाडलं. अंतराळशास्त्र वा शेती उद्योग इंदिरेनं सर्वाला गती दिली.  बॉम्बे हाय' हे धोरणीपणाचंच सूचक होय. आक्रमक, आकर्षक, धोरणी, सर्वांना योग्य दिशेला नेणारी-नेता !  त्यांच विशेष कर्तृत्व जाणवतं ते 'अलिप्त राष्ट्र संघटना' या चळवळीत. महासत्तांना शरण न जाता तटस्थपणाची शक्ती निर्माण करणाऱ्या  त्या  एकमेव होत्या.

माझा आवडता नेता मराठी निबंध | maza avadta neta nibandh in marathi

महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध | Mahatma jyotiba phule essay in marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध  बघणार आहोतचला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

थोर क्रांतिकारक विचारवंत व आदयसुधारक महात्मा  ज्योतिबा  फुले यांचा जन्म पुणे येथे १८२७ साली झाला. त्यांनीच महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. वर्तमानात आपल्या भोवताली समाजात आढळणाऱ्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून काढणारा आणि त्या मार्गावर अगदी एकाकी पण बेधडकपणे वाटचाल करणाराच खरा समाजसेवक, समाजहितचिंतक बनू शकतो. 

याचा प्रत्यय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रातून येतो. नवव्या वर्षी वैधव्य आल्यामुळे वपन करून विद्रूप करण्यात आलेल्या गुरुकन्येला पाहून ज्योतिबांंच्या  मनाला धक्का बसला. या आपल्या भगिनीसाठी काहीतरी करायलाच हवे हे त्यांच्या मनाने घेतले. असे  कृत्य करायला 'धर्माची आज्ञा' हे एकटेच कारण असते, हे त्‍यांच्‍या गुरूंच्या तोंडून प्रत्‍यक्ष ऐकल्‍यावर, तेव्‍हा त्‍यांनी आपल्या धर्माविषयी सत्यशोधन करायचेच असा पक्‍का निर्णय त्‍यांनी तरूण वयात घेतला. 

Mahatma jyotiba phule essay in marathi
Mahatma jyotiba phule essay in marathi

पुण्यात बुधवारवाड्यात पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी शाळा काढली होती. जोतिबा त्या शाळेत जाऊ लागले. तेव्हा त्यांच्या वडिलांचा गोविंदराव फुले यांचा ज्योतिबांंच्या शिक्षणाला सहमत नव्‍हते. ज्योतिबांंनी इंग्रजीबरोबरच संस्कृतचेही अध्ययन केले. त्यांचे विचार हे सुरुवातीला बंडखोरीचे होते.

त्यांनाही इतरांप्रमाणे इंग्रजांशी लढण्यासाठी शस्त्रविदया शिकावी असे वाटत होते, पण त्याच वेळी आपल्या समाजातील जातिभेद, अज्ञान आणि स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुर्दशा त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी इतर धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांपैकी ख्रिस्ती धर्मातील माणुसकीची वागणूक, सेवा, समानता या गोष्टींचे त्यांना विशेष आकर्षण वाटले. येथेच ज्योतिबांंना आपल्या कार्याचा मार्ग सापडला आणि तो कृतीत आणण्यास त्यांनी सुरुवात केली.



समाजातील  विशेषतः स्त्रियांमधील  अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी जोगेश्वरीच्या बोळातील चिपळूणकरांच्या वाड्यात १८४८ साली पहिली मुलींची शाळा काढली. मुलींना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला  सावित्रीबाईंना  तयार केले. स्त्रीशिक्षणाच्या आग्रही प्रयत्नामुळे समाजाचा प्रचंड रोष या पतिपत्नीला सहन करावा लागला. ज्योतिबांंच्या वडिलांनी ज्योतिबांंना व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.

 नंतर ज्योतिबांंनी मीठगंज भागात १८५१ साली दलित वस्तीत मुलींसाठी शाळा काढली. मागासलेल्यांना सुधारायचे तर त्यांच्यामध्येच जाऊन राहिले पाहिजे, म्हणून त्यांनी आपले घर बदलले. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या घरातील हौद सर्वांना खुला केला. समाजातील उच्चवर्णीयांतील स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी त्यांनी १८६३ साली 'बालहत्याप्रतिबंधक गृह' सुरू करून अशा स्त्रियांना आश्रय दिला.



ज्योतिबांं हे कर्ते सुधारक होते. अशाच एका अडलेल्या स्त्रीला आश्रय देऊन तिच्या मुलाला ज्योतिबांंनी दत्तक .   घेऊन सांभाळ केला ते निर्भय वृत्तीचे होते. त्‍यामुळे आलेल्‍या संकटाना त्‍यांनी मोठ्या धैर्याने तोंड दिले. शेतकऱ्याच्या पोशाखात ते 'ड्युक ऑफ कॅनॉट' यांच्या भेटीला गेले. शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी समजावून घेतले होते व त्याबाबतची त्यांची परखड मते त्यांच्या शेतकऱ्याचा असूड' (१८८३) या पुस्तकात व्यक्त झाली आहेत.


अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर ते झगडत राहिले, त्यासाठी त्यांनी १८७३ साली 'सत्यशोधक समाज' स्थापन केला. हजारो अनुयायी घडवले. विदया, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना 'महात्मा' म्हणून गौरविले. जोतिबा फुले यांनी समाजाला सत्य आणि समता या तत्त्वांचा सक्रिय संदेश दिला व २७ नोव्हेंबर १८८९ साली त्यांच्या लाडक्या जनतेचा त्यांनी निरोप घेतला. ज्योतिबांं गेले, पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले.


    महत्‍वाचे मुद्दे : 

    • समाजातील त्रुटी जाणून त्यावर मात करण्याचा निर्धार
    • सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास
    • इंग्रजीचे अध्ययन
    • मुलींसाठी शाळा
    • पीडित महिलांना आश्रय
    • निर्भयता
    • प्रत्यक्ष कृतीने विरोध
    • सत्यशोधक समाजाची स्थापना
    • सत्य व समता हा संदेश दिला
    • सतत समाजाचाच विचार केला.





    निबंध 2



    महात्मा ज्योतिबा फुले हे उच्चकोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनात सत्याचा मूलमंत्र    काया-वाचा-मने जपणाऱ्या, ज्योतिबांंचा जन्म १८२७ साली  गोऱ्हे  यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले.

    शाळेत घातले. त्‍‍‍‍यांंना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्‍‍‍‍यांंनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले.  ज्ञान ही एक शक्ती आहे,' अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या ज्योतिबांंनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे -

    "विदयेविना मति गेली। मतीविना नीति गेली।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।। इतके अनर्थ एका अविदयेने केले." जोतिबा फुले हे 'कर्ते सुधारक' होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन ज्योतिबांंनी पत्नीला सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विदयार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. ज्योतिबांं व सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे हे सत्र अविरत चालू राहिले.

    त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे. विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी, म्हणून जोतिबांनी चळवळ उभी केली. बालहत्याप्रतिबंधकगृहाची स्थापना केली. स्त्रियांप्रमाणे अस्पृश्यांसाठीही जोतिबांनी बहुमोल सेवाकार्य केले.

    सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती.

    जोतिबा फुले यांनी मौलिक विचारप्रवर्तक पुस्तके लिहिली. समाजातील पीडित श्रमिकांच्या विदारक आर्थिक स्थितीचा ज्योतिबांंनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याचे उत्कृष्ट चित्र त्यांनी आपल्या 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तिकेत रेखाटले आहे. शेतकऱ्यांची स्थिती बदलण्‍यासाठी  चांगले उपाय या  लेखांतून सांगीतले  आहेत. १०० वर्षांपूवी लिहिलेले हे मौलिक विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतात.

    ज्योतिबांंनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला आणि म्हणूनच लोकांनी त्यांना 'महात्मा' असे यथार्थपणे गौरवले.
    महत्‍वाचे मुद्दे : 

    • एक थोर समाजसेवक 
    • जन्म 
    • शिक्षण 
    • महात्मा फुले समाजसेवकांचे अग्रणी
    • परंपराग्रस्त समाजाला जागृत करण्याचे जोतिबांचे प्रयत्न
    • 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे फुले यांचे आचरण
    • स्त्री-शिक्षणाला प्राधान्य 
    • मुलींसाठी शाळा 
    • मनुस्मृतीवर घणाघाती हल्ला 
    • शेतकऱ्यांबद्दल कळकळ
    • त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न 
    • खेडे हा त्यांच्या सुधारणावादाचा केंद्रबिंदू 
    • शिक्षणाला प्राधान्य 
    • शिक्षण हे समाजसुधारणेचे प्रवेशद्वार
    • फुले यांचे समग्र विचार



    निबंध 3


    मराठी मातीनं ज्या असंख्य समाजसुधारकांना जन्म दिला, त्यांपैकी महात्मा जोतिराव फुले यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरावं लागेल. आज दलित, मागासवर्गीय व स्त्रिया यांच्या उन्नतीसाठी शासनाकडून क्रांतिकारक पाउलं टाकली जात आहेत. परंतु याची मुहूर्तमेढ १९ व्या शतकातच आपल्या महाराष्ट्रात  समाजसुधारक जोतिरावांनी रोवली होती.

    वर्णव्यवस्थेचा पगडा असलेल्या तत्कालीन समाजात जोतिरावांनी एका मागासवर्गीय कुटुंबात जन्म घेतला. सातारा जिल्ह्यातल्या 'कटगुण'गावी १८२७ साली !विद्येचं वारंसुद्धा न लागलेल्या कुटुंबात जन्मल्यामुळे जोतिबांना शिकण्यासाठी धडपडावं लागलं. म्हणून की काय सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार असलेल्या शिक्षणाची गंगा समाजाच्या सर्व थरांत नेण्याची जिद त्यांनी अंगी धरली. मुलींसाठी शाळा काढण्याचं सर्वप्रथम धाडस जोतिबांनी केले... त्यासाठी स्वतः - बेघर' झाले. त्यांच्या पत्नी सावित्रीबाईनी त्यांना साथ दिली. 

    निराधार बाल-विधवांचे जोतिबा कैवारी बनले. एवढंच नाही तर त्यांनी विधवा-विवाह घडवून आणले. मानवतेला काळिमा फासणारी विधवांच्या केशवपनाची पद्धत बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अस्पृश्यतेच्या रूपानं समाजाला लागलेला कलंक धुऊन काढण्यासाठी स्वत:च्या घरातील हौद जोतिबांनी अस्पृश्यांना खुला केला. सत्य व समता यावर आधारित न्याय व हक्कांसाठी जोतिबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली.

    मानवता म्हणजे माणुसकी ! माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच मानवताधर्म ! ह्या मानवताधर्माच्या शिकवणीची संजीवनी अमानवी रूढींच्या शंखलांनी जखडलेल्या समाजास जोतिबांनी प्रथम दिली. या कामी त्यांनी उभं आयुष्य वेचलं. त्याची मधुर फळं आज समाजाला चाखायला मिळत आहेत.
    मागासवर्गीयांना समाजात ताठ मानेनं जगता येतंय, स्त्री अबला राहिली नसून सबला बनली आहे, अस्पृश्यता नष्ट झाली आहे...

    पण या सुधारणा घडवण्यात जोतिबांना सिंहाचा वाटा द्यावा लागेल. मानवतेच्या ह्या थोर उपासकानं जणू- . । 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः ॥' या अर्थाच ज्ञानदेवांचं पसायदान वास्तवात आणण्यासाठी आपलं जीवन खर्ची घातलं.

    म्हणून आज म्हणावंसं वाटतं, या सुधारणांचं नेत्रसुख अनुभवण्यासाठी.. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी...जोतिबा, तुम्ही आज हवे होतात !...

    निबंध 4


    'सत्य' हेच मानवी जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे, असा विचार 'अखंडा'तून देणारे महात्मा फुले हे १९ व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. परंपरागत जातिव्यवस्था, गुलामगिरी, अज्ञान यांविरुद्ध बंड करणारे पहिले कृतिशील समाजसुधारक होते. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना फोडलेली वाचा, या कार्यामुळे त्यांना ‘महात्मा' ही पदवी जनतेने अर्पण केली होती.


    या महात्मा फुलेंचा म्हणजेच ज्योतीराव गोविंदराव फुलेंचा जन्म १८२७ मध्ये झाला. पंतोजींच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मिशनरी शाळेत त्यांनी माध्यामिक शिक्षण पूर्ण केले. 'त्यानंतर लहुजीबुवांकडे तालमीत त्यांना अनेक क्रांतिकारक विचारांचा लाभ झाला.


    त्या काळातील सामाजिक परिस्थिती, विशेषत: शेतकरी व स्त्रियांची दुःस्थिती त्यांना अस्वस्थ करत होती. त्यातच एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नात त्यांना अपमान सहन करावा लागला. त्यामुळे फुले अधिकच विचारी बनले.  १८४८ मध्ये त्यांनी शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची पहिली शाळा काढली. व सामाजिक क्रांतीचे पहिले पाऊल टाकले.


    शूद्रादिकांना शिक्षणदान करण्याचे व्रत घेतल्याने पत्नीसह त्यांना गृहत्यागही करावा लागला. तरीही त्यांनी आपले स्त्रीशिक्षणाचे कार्य चालू ठेवले. १८५१ मध्ये पुण्यात चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत त्यांनी मुलींच्या शाळा काढल्या. 


    त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा मे. कँडी यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी विद्या खात्याकडून सत्कार झाला. त्यामुळे प्रोत्साहित होऊन त्यांनी १८५१ मध्ये रात्रीच्या शाळेची स्थापना केली. परंतु रूढीमुळे अंध झालेल्या भारतीय समाजाला हे ज्ञानार्जन फारच झोंबले. त्यांनी या महात्म्यावर मारेकरी घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्या मारेकऱ्यांची असा लाभला जिव्हाळा. की पाषाणाची फुले झाली! - अशी अवस्था झाली. मारेकरी म. फुलेंचे भक्त बनले.


    यानंतर त्यांनी आपली दृष्टी सामाजिक प्रश्नांकडे वळवली. विधवाविवाह, पुनर्विवाहास मदत करण्याचे काम हाती घेतले. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. अस्पृश्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून घरचा हौद अस्पृश्यांसाठी १८६८ मध्ये खुला करून दिला. म. फुलेंची वाङ्मयीन सेवा फार मोठी आहे. “शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे,' हे पटवून देण्यासाठी 'तृतीय रत्न' हे नाटक लिहिले. 'गुलामगिरी', 'सार्वजनिक सत्य धर्म', 'मानव्याची आस' असे मानवतावादी साहित्य निर्माण केले. 


    जातिव्यवस्थेच्या मुळावर प्रहार केला. १८७३ साली कष्टकरी समाजातील सर्व लोकांना बंधमुक्त करून त्यांना आपले नैसर्गिक अधिकार निःशंकपणे भोगण्यास समर्थ बनविण्यासाठी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे या भूमिकेतून 'शेतकऱ्यांचा आसूड' लिहिला. अशा प्रकारे शंभर वर्षांपूर्वी म. फुलेंनी सहकाराचा कृतिशील पुरस्कार केला. कृषि-औद्योगिकरणाचा, शेतीच्या अत्याधुनिकीकरणाचा आग्रह धरला.


    स्वतः यशवंतासारखा दत्तक पुत्र घेतला. आपल्या मृत्यूपत्रात सर्व इस्टेट दत्तक पुत्राला बहाल केली. त्याने आपल्या कार्याचा वारसा चालवावा अशी इच्छा व्यक्त केली. दत्तक पुत्राचे आचरण योग्य नसल्यास त्यास इस्टेट न देता, शूद्र समाजातील लायक मुलाला द्यावी असेही नमूद केले.



    २८ मे १८९० साली या सामाजिक चलवळीच्या अध्वयूंची प्राणज्योत मालवली. म. गांधींनी ज्यांना 'खरा महात्मा' म्हणून भूषविले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'समाज-क्रांतिकारक', डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरुस्थानी मानून 'भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक', 'भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित' म्हणून गौरव केला, असे हे ज्योतिराव फुले एक महान ध्येय आहे, स्वप्न आहे. 


    लोकशाही ही मानवी समानतेवर, बंधुतेवर आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर अधिष्ठित असली पाहिजे. जसजसे मानवी समानतेचे तत्त्व भारतीय समाजाच्या अंगी बाणेल तसतशी भारतीय लोकशाही अभेद्य व अभंग होईल. ज्योतीरावांचे मानवतावादाचे, सर्वधर्म समभावाचे स्वप्न साकार होईल.

    निबंध 5

    थोर समाजसुधारक : महात्मा ज्योतिबा फुले

    १९ व्या शतकातील एक महान संत, बहुजन समाज आणि पददलित जनतेचे पहिले उद्धारकर्ते. स्त्रियांना मानाची वागणूक आणि शिक्षण देऊन त्यांना सबल बनविण्याचा प्रथम प्रयत्न करणारी एक महान व्यक्ती. २० फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले बालक पुढील वीस, पंचवीस वर्षांत साऱ्या महाराष्ट्रातील विद्वानांना उच्चभू लोकांना, उच्चवर्णीयांना एक नवीन दिशा दाखवील, एक सामाजिक क्रांती घडवेल, असे स्वप्नातही कोणाच्या आले नसेल.

    ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण जीवन दीन-दुबळ्यांच्या, रंजल्या-गांजलेल्याच्या उद्धारासाठी निरंतर व्यतीत होत होते. महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांच्या सामाजिक क्रांतीपुढे ज्योतिबांनी घेतलेला ध्यास हा श्रेष्ठ ठरत होता, त्यांचे नाव अग्रगणी घेतले जात होते. आजूबाजूच्या प्रसंगातून-वेगवेगळ्या त्यांना जाणवलेल्या घटनांतून ज्योतिबांना कळून चुकले की भारतीय समाजातील असे कितीतरी घटक आहेत ज्यांना साधे माणुसकीचेही अधिकार मिळत नाहीत.


     प्राण्यांना-जनावरांना ज्या ममतेने वाढवले जाते, तसे या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मानवजातीला अगदी घृणास्पद-अपमानास्पद वागणक दिली जात आहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत प्राचीन काळी दिला जाणारा मान-सन्मान, आता या १९ व्या शतकात कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. स्त्रियांची वास्तविक परिस्थिती अगदी उलट झाली आहे. या एकूणच परिस्थितीचा परिणाम ज्योतिबांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात झाला अन् त्यांच्या जीवनाला एकदम कलाटणीच मिळाली.


    स्त्रियांच्या दैन्यावस्थेने महात्मा फुल्यांचे अंतःकरण अक्षरशः कळवळले. ज्या समाजात स्त्रीला प्रतिष्ठेचे स्थान दिले जात नाही, त्या समाजाची प्रगती कदापिही होणे शक्य नाही. असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळेच ज्यातिबांनी सर्वप्रथम स्त्रीशिक्षण आणि स्त्रीचा उद्धार याच कामाकडे लक्ष दिले. एक स्त्री सुशिक्षित झाली. सारे घरदार सुशिक्षित होते.


    'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगता उद्धारी।' या काव्यपंक्तीनुसार स्त्रियांना शिक्षण देऊन शहाणे करण्याचे काम आपल्या धर्मपत्नीच्या सहकायनि सुरू केले. सावित्रबाईंनीही ख्या अनि स्वतः ज्योतिबांकडून शिक्षण घेऊन मुलींच्या शाळेतील शिक्षिकेची भूमिका अत्यंत कष्ट-त्रास सहन करून साकारली. इ.स. १८४८ मध्ये ज्योतिबांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. समाजकंटकांनी त्यांना आणि सावित्रीबाईंना खूप त्रास दिला. दोघांनी अनेक संकटे झेलली. पण ते डगमगले नाहीत. आपले हे आसिधाराव्रत अविरत चालू ठेवले.


    स्वीशिक्षणाबरोबरच दीनदलित आणि अस्पृश्य लोकांची होणारी परवड ज्योतिबांना याचि डोळा, याचि देही अनुभवली होती. या बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्यावर मायेची पखरण घालणारा हा 'महात्मा ज्योतिबा आरंभी एकटाच होता, अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यांना संघटित केले. त्यांच्यात आत्मविश्वास वाढविला. हक्कांची-अधिकारांची जाणीव करून दिली.


    महात्मा फुले हे केवळ बोलघेवडे समाजसुधारक...फक्त व्याख्याने झोडणारे-पुढारी नव्हते. त्यांच्या प्रत्येक समाजसुधारच्या कृतीमध्ये एक प्रत्यक्ष कृती-बस्तुपाठ होता. त्यामुळेच ज्यावेळी पुण्यामध्ये एकेकाळी पडलेल्या कडक उन्हाळ्यात, पाण्याच्या दुर्मिक्ष्यतेच्या समयी महात्मा फुल्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी... खास अस्पृश्यांसाठी खुला केला.


    'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले।' या संत उक्तीचे प्रत्यंतर अन्यत्र कुठे बरे दिसून येईल ? ज्योतिबांच्या समाजसुधारणा या केवळ चार-दोन क्षेत्रासाठीचे नव्हत्या तर समाजात जेथे जेथे अन्याय दिसतो आहे, अज्ञान दिसत आहे, त्या सर्व क्षेत्रात त्यांनी आपले कार्य सुरू केले. अज्ञानाविरुद्ध लढा देताना अनाथ बालके, विधवा स्त्रिया, कुमारी माता, अस्पृश्य जनता अशा सर्वांना घेऊन सज्ञानी आणि जबाबदार नागरिक बनविण्याचा त्यांनी विडाच उचलला होता. विधवा विवाहास सक्रिय पाठिंबा देऊन पुण्यामध्ये तसे पुनर्विवाह घडवून आणले. समाजातील दुष्ट, हानिकारक प्रथा नाहीशा करण्यासाठी 'भ्रूणहत्या प्रतिबंधक कायदा' आणि त्यांची गृहनिर्मितीसाठी अतोनात प्रयत्न केले.


    सामाजिक कार्यामध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा तयार केला. स्वतःच्या घरी अनाथ बालिकाश्रम उघडला. दुष्काळाच्या प्रसंगी 'छात्रालय' उघडून सर्व समाजाला त्यांनी दिलासा दिला. दारूबंदीसाठी ही पुणे नगरपालिकेमध्ये ठराव पास करून घेतला. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या कार्याविषयी ही फुल्यांना अतिशय आदर होता. त्यामुळे 'डोंगरी' तुरुंगातून त्या दोघांची सुटका झाल्यानंतर मोठा सत्कार समारंभ घडवून आणला.
    १८८८ मध्ये मुंबईत सर्व जनतेमार्फत 'फुल्यांना' 'महात्मा' ही पदवी बहाल करण्यात आली.


    अशा या महापुरुषाचे कार्य हे आजही अमर स्वरूपात आपल्यासमोर आहे. 'सत्यशोधक समाजा'चे ते संस्थापक होते. त्यांची साहित्य संपदा - शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न (नाटक), विवेकसार, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, इशारा अशी अनेक पुस्तके त्यांची आपल्याला त्यांच्या महान कार्याची आठवण करून देतात.

    “विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।।
    नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
    वित्तविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।"

     शिक्षणाचे महत्त्व यापेक्षा अधिक चांगल्या शब्दात कोण बरे सांगणार ? धन्य धन्य ते 'महात्मा ज्योतिबा फुले' हेच खरे.

    महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध | Mahatma jyotiba phule essay in marathi

    माझा आवडता खेळ | My Favorite Game Essay In Marathi


    नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता खेळ मराठी निबंध  बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
    बुद्धिबळ हा माझा आवडता खेळ आहे. हा एक बैठा खेळ आहे. हा खेळ दोघांमध्ये शांतपणे खेळता येतो. हा खेळ मुख्यत: घरात बसून खेळतात. मात्र, कुठेही बसून हा खेळ खेळता येतो. बुद्धिबळ खेळणारा खेळाडू खेळात अक्षरश: बुडून जातो. तो आजूबाजूचे सगळे भान विसरून  जातो. बुद्धिबळासाठी अगदी अल्प साधने लागतात. एक पट, सोळा पांढऱ्या सोंगट्या व सोळा काळ्या सोंगट्या इतक्या वस्तूंची आवश्यकता असते. पटावर आडव्या व उभ्या पट्ट्यांनी बनलेली चौसष्ट घरे असतात.

    My Favorite Game Essay In Marathi
    My Favorite Game Essay In Marathi

    सोंगट्यांच्या चालीही गमतीदार व वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्यादे सरळ रेषेत पुढेच जाते; पण कोपऱ्याच्या घरात असलेल्या सोंगटीला बाद करते. उंट फक्त तिरका चालतो. हत्ती फक्त सरळ रेषेत चालतो. वजीर सरळ रेषेत व तिरक्या रेषेत मागेपुढे कसाही जातो. घोडा एका चालीत अडीच घरे चालतो. एवढ्या गुंतागुंतीच्या चाली लक्षात ठेवाव्या लागतात. यांचा वापर करून आपली चाल करायची असते, प्रतिस्पर्ध्यावर मात करायची असते. मात्र यासाठी खूप विचार करावा लागतो. हा बुद्धीची कसोटी घेणारा खेळ आहे. म्हणूनच मला तो खूप आवडतो.

    मित्रांनो तुम्‍हाला My Favorite Game Essay In Marathi हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .


    माझा आवडता खेळ | My Favorite Game Essay In Marathi


    Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

    निबंध 1 

    नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध  बघणार आहोत. या पानावर पुर्ण 5 निबंध दिले आहेत.  भारतासाठी केलेले कार्य व समाज बांधवासाठी केलेला त्‍याग व कार्य सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहेत.    चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

    भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म्हणजेच, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  यांनी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर भारतीय जनतेला एक मौलिक संदेश दिला होता. तो असा की, लोकशाहीचे अस्तित्व आपणांस टिकवायचे असेल, तर आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. केवढी दुरदृृृृृष्‍टी होती  या संदेशात !

     पण आपण आज - अगदी स्वतंत्र होऊनही साठ वर्षे झाली तरी या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या नाहीत. कोणत्याही क्षुल्लक कारणाने प्रक्षोभ झाला की, लगेच जाळपोळ, मोडतोड केली जाते. कारण आपण तेव्हा हे विसरलेले असतो की, अशा विध्वंसात आपण आपलेच नुकसान करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि साहित्य यांतून आपल्याला असे मोलाचे संदेश मिळत असतात.

    १४ एप्रिल १८९१ मध्ये एका गरीब घरात बाबासाहेबांचा जन्म झाला होता. त्यात भर म्हणजे 'मागासलेली जात' हा शिक्का उमटलेला. पण ते कोणत्याही अडचणीला डगमगले नाहीत. कशासाठीही कुरकुरत बसायचे नाही, हा तर त्यांचा निश्चय होता. त्यामुळे चाळीतल्या गोंगाटातही ते उत्तम अभ्यास करू शकले. माणूस फक्त ज्ञानामुळेच दु:खमुक्त होऊ शकतो, हे त्यांनी जाणले होते.

    डॉ. आंबेडकर यांनी स्वत:ची उन्नती तर साधलीच, पण त्यांचा मोठेपणा असा की, ते आपल्या अन्यायग्रस्त समाजालाही विसरले नाहीत. आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते.
    Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi
    Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

     दलितांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' (१९२४) स्थापन केली. पुढे 'स्वतंत्र मजूर पक्ष' या राजकीय पक्षाची १९३६ साली स्थापना केली. १९४२ मध्ये 'ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' या संस्थेची स्थापना केली. दलित जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले.

     'मूकनायक', 'जनता' (याचेच रूपांतर पुढे 'प्रबुद्ध भारत' असे झाले) अशा नियतकालिकांद्वारे समाजात जागृती निर्माण केली. 'बहिष्कृत भारत'चे ते संस्थापक संपादक होते. 'हु वेअर दि शूद्राज?', 'बुद्ध अँड हिज धम्म' इत्यादी त्यांचे अनेक ग्रंथ विख्यात आहेत. 'भारतरत्न' या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले होते.


    जातीयतेचा कलंक नाहीसा व्हावा म्हणून बाबासाहेब आयुष्यभर झगडले. जातिपातीचा विचार न करता सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क मिळावा, म्हणून बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्यावर १९२७ साली सत्याग्रह केला. १९३० साली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशाचा लढा दिला.

     हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान हे वर्णवर्चस्वावर आधारलेले असल्यामुळे दलितांना हिंदू धर्मात समतेची व न्यायाची वागणूक मिळणे अशक्य आहे, अशी त्यांची खात्री झाली होती. म्हणून त्यांनी १९५६ मध्ये आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश केला.


    डॉ. आंबेडकरांनी महिलांच्या शिक्षणाचाही आग्रह धरला. त्यासाठी ते पालकांना सांगत - मुलामुलींची लग्ने लवकर करू नका. निदान त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहू द्या.  स्त्रियांचे हक्क, त्यांची उन्नती, त्यांचा विकास साधण्यासाठी बाबासाहेबांनी १९४८ मध्‍ये कायदेमंडळापुढे 'हिंदू कोड बिल' सादर केले. मुरळी, देवदासी, मजूर, कामकरी स्त्रिया इत्यादींच्या हक्कांसाठीही ते झटले. कारण स्त्रियांचा सन्मान त्यांना महत्त्वाचा वाटे.


    समाजातील जो घटक पीडित आहे, अन्यायग्रस्त आहे, त्याने त्या अन्यायाच्या निवारणासाठी स्वत:च पुढे आले पाहिजे, तरच त्याचे दुःख संपू शकते, असे बाबासाहेब सांगत. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत अन्यायाविरुद्ध लढलेल्या बाबासाहेबांचे १९५६ साली महानिर्वाण झाले.

     मित्रांनो तुम्‍हाला Dr Babasaheb Ambedkar Nibandh In Marathi हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .
    महत्‍वाचे मुद्दे : 

    • भारतीय घटनेचे शिल्पकार 
    • लोकशाही राज्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन 
    • जन्म १८९१
    • कष्टाने शिक्षण
    • ज्ञानामुळेच दु:खमुक्ती हा विश्वास
    • विविध शास्त्रांचा अभ्यास 
    • विपुल लेखन 
    • 'भारतरत्न' पुरस्कार
    • वाचनाची विलक्षण आवड
    • विदयार्थ्यांना मार्गदर्शन 
    • आत्मविश्वास 
    • दीर्घोदयोग, शीलसंवर्धन 
    • स्त्रियांना शिक्षणाचा आग्रह 
    • 'हिंदू कोड बिला'चा आग्रह 
    • प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करावा.
    निबंध 2

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी झाला. शाळेत, महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा अनेकदा मानभंग झाला होता व त्यांच्या रास्त हक्कांपासून त्यांना वंचित केले गेले होते. बडोदयाचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्यावर ते बी. ए. झाले. परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम. ए. पीएच. डी. या पदव्या मिळवल्या.

    तेथे ते बॅरिस्टरही झाले; सिडनहॅम महाविदयालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी विधी महाविदयालयात त्यांनी प्राध्यापक व नंतर काही वर्षे प्राचार्यपद सांभाळले. उच्चवर्णीयांकडून वर्षांनुवर्षे होणाऱ्या पिळवणुकीने दलित समाज भरडला जात होता. अशा या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. 



    भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी २० जुलै, १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. डॉ. आंबेडकरांना आपल्या निद्रिस्त समाजाची अस्मिता फुलवायची होती. त्यासाठी ते त्या 'मूक समाजाचे नायक' झाले. त्यांनी आपल्या या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला, 'वाचाल, तर वाचाल.'

    वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे, वाचनालये काढणे, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालवणे अशा कार्यांवर 'बहिष्कृत हितकारिणी सभे'चा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेबांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविदयालय व औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविदयालय' या संस्था काढल्या व नावारूपास आणल्या. 



    दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी महाडला ‘चवदार तळे' येथे अहिंसक सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला.डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ साली ते केंद्र सरकारात मजूरमंत्री होते.

    गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी विद्वत्तापूर्ण असे अनेक ग्रंथ लिहिले. राजगृहात त्यांचा स्वत:चा ग्रंथसंग्रह फार मोठा होता. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. ६ डिसेंबर, १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. मात्र पददलित समाजाला 'भीमशक्ती' प्रदान करूनच डॉ. भीमराव आंबेडकर हा आदित्य अस्तंगत झाला.

    महत्‍वाचे मुद्दे : 

    • जन्मतः अस्पृश्यतेचा डाग 
    • पावलोपावली मानभंग 
    • शिक्षण व त्यासाठी मिळालेले साहाय्य 
    • निद्रिस्त समाजाला जागे केले 
    • बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 
    • मूक समाजाचे नायक
    • वाचाल, तर वाचाल
    • संस्थेची स्थापना
    • महाविद्यालये काढली
    • चवदार तळे', मंदिरप्रवेश इत्यादी चळवळी 
    • वाचनाचा छंद 
    • अनेक ग्रंथलेखन 
    • ग्रंथसंग्रह 
    • घटना तयार केली 
    • बौद्ध धर्माचा स्वीकार 
    • महानिर्वाण

    निबंध 3

    ‘सूर्यफुले हातात ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला, आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे,' या शब्दांत कवी नामदेव ढसाळ बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतात. कवीने जणू आपल्या शब्दांतून सर्व दलितांचे मनोगतच व्यक्त केले आहे. दलितांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला बाबासाहेबांनीच शिकवले, म्हणून दलितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमेश्वरासमानच वाटतात. दलितांच्या वाट्याला आलेली दु:खे त्यांनी स्वतः अनुभवली होती, त्यामुळेच तेे आपल्या बांधवांना आत्मविकासाचा योग्य मार्ग दाखवू शकले,



    बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथे आला होता, रत्नागिरी जिल्हयातील मंडणगडजवळील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव, पण त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे आणि माध्यमिक व विश्वविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले, अर्थशास्त्रात पीएच्. डी. पदवी प्राप्त केलेल्या आंबेडकरांना नोकरीत कनिष्ठ जातीमुळे अनेकदा अपमान सहन करावा लागला. तेव्हाच त्यांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली. पुढे इंग्लंडला जाऊन ते कायदयाचे पदवीधर झाले.



    विविध वृत्तपत्रे काढून आणि परिषदा भरवून त्यांनी दलित समाजात जागृती निर्माण केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे त्यांच्या 'बहिष्कृत हितकारिणी' या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२७ मध्ये दलितांना प्रवेश करण्यास मनाई असणाऱ्या महाडच्या चवदार तळ्यात ते आपल्या जातिबांधवांसह उतरले. १९३० मध्ये त्यांनी नासिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला. सायमन कमिशनपुढे साक्ष देऊन व तीनही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेऊन त्यांनी दलितांची बाजू सातत्याने मांडली. भारताची राज्यघटना व हिंदू कोड बिल ही डॉ. आंबेडकरांची दोन महान कार्ये होत. आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपल्या थोर नेत्याविषयी बोलताना कवी म्हणतो,


    'तू फुकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर। 

    तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या।।


    निबंध 4 



     १९ व्या शतकात भारतीय समाजाला कलंक असलेल्या अस्पश्यतेच्या निवारणाचे कार्य निरनिराळ्या समाजसुधारकांनी केले होते पण या सर्वापेक्षा अतिशय निष्ठेने स्वानुभवाच्या आधारावर अस्पृश्यांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी जागृत व संघटित करण्याचे शिक्षणाद्वारे त्यांच्यात नवविचारांचा प्रसार करण्याचे व आत्मसन्मानाचा नवीन मार्ग दाखविण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. तसेच भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य वेगळे व असामान्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील 'महु' या गावी झाला.



    त्यांची माता भीमाबाई लहानपणीच वारल्याने वडील रामजी यांनी त्यांचे पालनपोषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण त्यांना अभ्यासाची आवड होती. तरी त्यांनी बिकट परिस्थितीत १९१२ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. ए.ची परीक्षा पास केली. उच्च शिक्षण घेण्याची त्यांची जिज्ञासा होतीच त्यामुळे त्यांनी १९१५ मध्ये प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहुन त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची एम. ए. पदवी संपादन केली.

    १९१६ मध्ये त्यांच्या 'नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अॅण्ड अॅनॅलिटिकल स्टडी' या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी. एच. डी. ही पदवी प्रदान केली. डॉ. आंबेडकरांना अर्थशास्त्रात संशोधन करण्याची व लंडन विद्यापीठाची पदवी मिळविण्याची आणि बॅरिस्टर होण्याची इच्छा होती. १९२१ मध्ये ते एम. एस. सी झाले. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा त्यांचा प्रबंध मान्य करून लंडन विद्यापीठाने त्यांना डी.एस.सी. पदवी दिली. १९२३ मध्ये बॅरिस्टरच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले.


    १९१७ मध्ये मुंबईला आंबेडकर आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानची नोकरी स्वीकारली पण या नोकरीत ते अस्पृश्य असल्याने त्यांना इतरांकडून अतिशय मानहानीची वागणूक मिळाली तसेच अवहेलना व अपमान सहन करावा लागला. या वागणुकीमुळे आंबेडकरांनी अस्पृश्यांना शिक्षण देणे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे आपल्या न्याय्य सामाजिक व आर्थिक हक्कांसाठी अहिंसक मार्गाने संघटित लढा देण्यासाठी अस्पृश्यांना आत्मनिर्भर बनविणे व त्यांच्या समान हक्कांसाठी निरनिराळ्या चळवळी करणे यांना पुढील काळात प्राधान्य दिले.


    जातिसंस्था व अस्पृश्यता ही भारतीय समाज जीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय दयनीय मानहानिकारक जीवन जगावे लागत होते. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेतच हिंदू समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन करण्यात आले. ही घटना अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढविणारी घटना होती.

     तसेच त्यांनी महाडच्या चवदार तळ्यावरील केलेला सत्याग्रह अन्यायी समाजव्यवस्थेविरुद्ध केलेले बंड होते. आपणास हक्क आहे हे देशाला सांगणारी एक प्रतीकात्मक कृती होती. २ मार्च १९३० रोजी नाशिक येथील काळा राम मंदिर येथे त्यांनी सत्याग्रह केले. त्याच्या प्रयत्नामुळे २४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करारात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदाराऐवजी १४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या. 


    १९33 साली काँग्रेसच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीयनी सह्या केल्या. १९३७ - १९३५ कायद्यामुळे झालेल्या निवडणुकीने आंबेडकर विरोधी पक्ष नेते निवडले गेले. १९२० च्या माणगांव परिषदेचा अध्यक्षपद भूषविले.१९३०-३१-३२ या तिन्ही साली गोलमेज परिषदेला अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहिले.१५ ऑगस्ट १९४७ च्या पंडीत नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री झाले. घटनेचा मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी डॉ.आंबेडकरांवर टाकली गेली व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अस्पृश्य असल्यामुळे लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता आणि त्यानी जे अस्पृश्यांसाठी कार्य केले त्यामळे उच्चवर्णीय लोकांमध्ये त्याच्या बद्दल आक्रोश होता पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाना अस्पृश्यासाठी जे कार्य केले त्यामुळे अस्पृश्यांना समाजात आर्थिक हक्कांसाठी शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनविले. त्यामुळे आंबेडकर अस्पृश्यांसाठी देवाचे अवतार आहेत.

    हिंदू कोडबील संसदेत मांडल्यामुळे आधुनिक मनु म्हणून भारत देश त्यांना 'दलितांचा कैवारी' म्हणून ओळखतो. भारत शासनाने १९९०-९१ साली मरणोत्तर 'भारत रत्न' पुरस्कार दिला व १९९०-९१ साली सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले.


    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यामुळे बेव्हरले निफोल्सन ने आंबेडकरच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून बाहेर पडणारे बार त्यांच्याविषयी उद्गार म्हटले आहे. तसेच आचार्य अत्रे त्यांना महाराष्ट्राचा तेजस्वी ज्ञानयोगी म्हणतात. सयाजीराव गायकवाड त्यांना 'दलितांचा उद्धारकर्ता' म्हणतात तर राजर्षी शाहूमहाराज त्यांना 'दलितांचा मुक्तिदाता' म्हणत.


    १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि १९४२ साली त्यांनी 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशन सोसायटी'ची स्थापना केली. तसेच १९४६ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच वर्षी औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविद्यालय' व 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' मुंबई येथे त्यांनी सुरू केले.


    १९१६ साली त्यांनी 'Caste in India' हे पुस्तक लिहिले. राजर्षीच्या मदतीने १९२० साली 'मूकनायक' वृत्तपत्र सुरू केले १९३० साली त्यांनी 'जनता उत्कृष्ट वृत्तपत्र' सुरू केले. पुढे ५६ साली नामांतर करून त्याचे 'प्रबुद्ध भारत' केले गेले. १९४६ साली त्यांनी Who Were Shudras पुस्तक लिहिले तसेच त्यांनी The Untouchable हा ग्रंथ लिहिला १९५६ साली त्यांनी Bouddh and his Dharm हा ग्रंथ लिहिला जो त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचा मृत्यू झाला आणि १९५७ साली हा ग्रंथ प्रकाशित झाला.



    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना समिती तयार केली जगात सर्वांत उत्कृष्ट घटना समिती आहे. त्यांनी त्या घटना समितीत अस्पृश्यांसाठी राखीव जागा ठेवली आहे ज्यामुळे अस्पृश्यांना नोकरी व अन्य कोणत्याही क्षेत्रात प्रवेश घेता येतो. महात्मा ज्योतीबा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, गोपाळबाबा वलंगकर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य सुरू केलेले होते. पण वरिष्ठ जातींच्या मनोभूमिकेत काहीही बदल झाला नाही.

    डॉ. आंबेडकर यांनी हा बदल घडवून आणला. तसेच हे कार्य करताना त्यांना हिंदू धर्मात अस्पृश्यांना माणुसकीचे अधिकार मिळणार नाहीत जाणवू लागले होते. त्यामुळे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती होते.

    निबंध 5

    महामानव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    थोर समाज उद्धारक, दलितांचे कैवारी, प्रकांड पंडीत, घटनेचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. त्या काळातील समाज अज्ञान, निरक्षरता, अनिष्ट रूढी-परंपरा, गरिबी अशा व्याधींनी पोखरलेला होता.दलित बांधवांना तर मानवतेचे हक्कसुद्धा नाकारले जात होते. 


    अन्याय, छळ, अपमान यांनी त्यांचे रोजचे जीवन दु:खमय झाले होते. अशा समाज बांधवांची दुःखे डॉ. बाबासाहेबांनी पाहिली आणि स्वत:ही अनुभवली होती. माझ्या बांधवांचे दुःख मी दूर करीन. त्यांना मानवतेचे अधिकार मिळवून देईन; अशा विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरवात केली. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. म्हणूनच अत्यंत बिकट परिस्थितीतही त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले.


    अर्थशास्त्रात डॉक्टरेट आणि कायद्यातील बॅरीस्टर ह्या उच्च पदव्या मिळविल्या. लंडनला भरलेल्या गोलमेज परीषदेत त्यांनी आपल्या बांधवांचे दु:ख जगासमोर आणले. लोकशाही राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केला.
    दलित बांधवात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मुंबई, औरंगाबाद येथे महाविद्यालये, वसतीगृहांची स्थापना केली. शिका, संघर्ष करा आणि आपले हक्क मिळवा, अशी आपल्या बांधवांना शिकवण दिली. 



    समाज प्रबोधनासाठी, त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. अनेक महान ग्रंथ लिहून समाजशिक्षण केले.
    त्यांच्या अथक प्रयत्नाने दलित बांधवांमध्ये शिक्षणाचा खूप प्रसार झाला. बाबासाहेबांनी त्यांना माणूसकीचे अधिकार मिळवून दिले. मानाने जगण्यास शिकवले...



    हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. शेतकरी, मजूर, कामगार यांचे प्रश्न सोडविले. स्वतंत्र भारतासाठी राज्यघटना लिहुन भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा मजबूत पाया घातला. म्हणूनच आज भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आणि जगाच्या प्रशंसेस पात्र ठरले.



    असे सर्व झाले तरी रूढीग्रस्त समाज अजूनही दलित बांधवांना आपले म्हणत नव्हता. म्हणून अखेर डॉ. बाबासाहेबांनी पूर्ण विचार करून आपल्या लाखो अनुयायासह हिंदू धर्माचा त्याग करून १९५६ मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असे मानवतेचे, समाजप्रबोधनाचे कार्य करीत असताना त्यांना राजर्षी शाहूमहाराज, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. 


    डॉ. बाबासाहेबांनी, आपला समाज, आपला देश यांची उन्नती करण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला. देशाने आणि जगाने या महामानवाला अनेक सन्मान देऊन गौरविले. आपल्या बांधवांची आणि देशाची सेवा करीत असतानाच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.

    मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

    Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

    खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi

    निबंध 1
    नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खेळाचे महत्व मराठी निबंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये आज खेळांबद्दल असलेला दृष्‍टीकोन , खेळाचे शारीरीक व मानसीक दृष्‍टया असणारे फायदे स्‍पष्‍ट केले आहेत.  आज आपण खेळाचे महत्व  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


    आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखादयाने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला 'भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे.


    आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदृढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागली आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.


    Khelache-Mahatva-Essay-Marathi
    Khelache-Mahatva-Essay-Marathi


    लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो; पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते.(हा निबंध पण वाचा शालेय जीवनात खेळाचे महत्त्व)


    खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळून जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते.



    खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार; पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते. (हा निबंध पण वाचा माझा आवडता खेळाडू निबंध मराठी मध्ये)



    प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड दयावे लागते. कधी हार  पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीच घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील हार संयमाने स्वीकारावी, तसाच जीवनातील विजयही विनम्रतेने स्वीकारावा.

    खेळात हार-जीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी! ऑलिम्पिक, विम्बल्डन, एशियाड आदी विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा वर्षभर खेळल्या जातात, ते एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी! खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते.


    मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

    निबंध 2

    अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलाचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे व्यक्तीचा मानसिक विकास होतो. 


    खेळाची अनेक रूपे आहेत. काही खेळ मुलांसाठी, काही मोठ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी असतात. काही खेळ खेळण्यासाठी मोठी मैदाने लागतात. काही खेळांना मात्र लागत नाहीत. घरातल्या घरात खेळले जाणारे कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सोंगट्या या खेळामुळे मनोरंजन व बौद्धिक विकास होतो.

    स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो" जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो.



    मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा० खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. 


    मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.


    खेड्यांतील आणि शहरांतील खेळात फरक असतो. खेड्यांतली मुले विटीदांडू, कबड्डी, गोट्या खेळतात. तर शहरातील मुले क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिससारखे खेळ खेळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे खेळांची मैदाने कमी होत आहेत. खेळांडूसाठी खेळाचे मैदान मोठे आणि हवेशीर असले पाहिजे. त्यांनी हिरव्या भाज्या, दूध, फळे आदींचे सेवन केले पाहिजे. 


    स्वच्छ वातावरणात राहिले पाहिजे. हे शरीर ईश्वराची देणगी आहे. त्याला निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी खेळ, व्यायाम, आणि शिक्षण आवश्यक आहे. शाळेमध्ये खेळांत भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


    निबंध 3


    खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi


    विद्यार्थी जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. पालकांच्या आता हे लक्षात आले आहे की, मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. मानवाचे संपूर्ण जीवन मन आणि शरीररूपी गाडीच्या दोन चाकांवर चालते.



    शिक्षण, चिंतन, मनन, व्यक्तीचा मानसिक विकास आणि व्यायाम, खेळ, शारीरिक विकास करतात. खेळाची दोन रूपे असतात. घरात बसून खेळले जाणारे खेळ उदा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते इ. मैदानावर मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ उदा. खो खो, क्रिकेट, फुटबॉल इ. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे व्यायाम कमी पण बौद्धिक विकास आणि मनोरंजन होते. मैदानी खेळांमुळे शरीराला भरपूर व्यायाम होतो व मनोरंजनही होते.



    'निरोगी शरीरात निरोगी मनाचा निवास असतो' शरीर अस्वथ असेल तर मनही अस्वस्थ असते. जी मुले केवळ पुस्तकातील किडे असतात त्यांचा शारीरिक विकास खुंटतो. ती चिडचिडी व सुस्त होतात. स्वत:चे रक्षणही ती करू शकत नाहीत. जी मुले अभ्यासाबरोबरच निरनिराळे खेळही खेळतात ती प्रसन्न व निरोगी राहतात.

    उत्साही आणि चपळ राहिल्यामुळे शारीरिक शक्तीचा विकास होतो. यावरच मानसिक व आत्मिक विकास अवलंबून असतो. दिवसभर यंत्राप्रमाणे काम केल्यानंतर जर खेळाच्या मैदानावर मुले गेली नाहीत तर बुद्धिमान विद्यार्थीसुद्धा निर्बुद्ध होऊन जाईल. आणखी काम करण्याची इच्छा मनांत निर्माण होण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.


    विद्यार्थी, जीवनात फक्त अभ्यासच करीत राहू नये किंवा नुसते खेळतच बसू तये तर “Work while you work, play while you play." हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे. माणसाचे मन सदैव अभ्यासात गुंतलेले राहिल्यास डोके जड़ पडते आणि त्याला विश्रांतीची गरज भासते. ही विश्रांती खेळण्यामुळेच मिळते.



    खेळण्यामुळे मानसिक द्वंद्व मिटते. मन हलके होऊन शरीरात नवीन ऊर्जा शक्ती येते. हाडे मजबूत होतात आणि चेहरा कांतिमान होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळ्यांची ज्योती (तेज) वाढते. शरीर वज्राप्रमाणे होते. खेळ जीवनात संजीवनी बुटीचे काम करते. खेळ मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे.



    जेव्हा खेळाडू खेळाच्या मैदानावर खेळतो तेव्हा तो पुलकित होतो. खेळ खेळण्यामुळे खेळाडू, स्वतः प्रेक्षकही आनंदी होतात. क्रिकेट आणि हॉकीचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित असतात. खेळाडूची एकाग्रता खेळ व अन्य कामांत सारखीच असते.



    शिक्षण घेऊन जे शिकावयास मिळत नाही ते खेळात शिकावयास मिळते. उदा. शिस्त विद्यार्थी जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तीत राहूनच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. शिक्षकही शिस्तीतच अध्यापन करतात. शिस्त नसेल तर शाळा कुस्तीचे मैदान बनेल.



    जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते. अन्यथा हरण्याची शक्यता जास्त असते. याखेरीज खेळात परस्पर सहकार्याची भावना पण उत्पन्न होते. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघाचे खेळ वेगळे असतात व प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे असते.



    कप्तान संघनेता असतो. त्याच्या आदेशाचे सगळे खेळाडू पालन करतात. संघातील खेळाडूंच्या परस्पर सहकार्यामुळे संघ विजयी होतो. खेळ मनुष्याला स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवितो. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनाचे उद्दिष्ट अभ्यास करणे हे असते त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानावर उतरल्यावर खेळाडूचे उद्दिष्ट आत्मविश्वासाने खेळून विजय प्राप्त करणे हे असते. विजयाची इच्छा खेळाडूला विजयी बनविते.

    खेळ हा खेळाडूचा आत्मा असतो. खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळले जावेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. खेळात संघर्ष हा असतोच. त्यातून जो विजय मिळतो त्याचा आनंद खास असतो.



    विजय मिळाल्यावर उत्साह वाटणे, पराजय सहन करणे व बदल्याची भावना मनात न ठेवता पराजयाच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करून जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खऱ्या खेळाडूची लक्षणे होत. पराजयच यशाचा संदेश देते.


    खेळांमध्ये केवळ दोन संघांमध्येच जवळीक निर्माण होते, असे नसून क्रिकेटसारख्या खेळांमुळे दोन देशांमध्ये ही जवळीक निर्माण होते. खेळ विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करतात. धनुर्विद्या, घोडेस्वारी, कबड्डी, मल्लयुद्ध यासारख्या खेळांची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.



    आजही या खेळांचे महत्त्व कमी झालेले नाही. भारत खेळांमध्ये मागे नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने येथे नेहमीच होतात. जिल्हा, मंडळ, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा होत राहतात. विजयी खेळाडूंना पुरस्कार दिले जातात.



    नव्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. खेळामध्ये नव्या गोष्टी शिकावयास मिळतात. आपल्या पराजयाची कारणे शोधून ती दूर करून पुन्हा विजय प्राप्त केला जातो. यात गुरू वा प्रशिक्षकाचे सहकार्य मिळते म्हणून भारत सरकार विजयी खेळाडूला "अर्जुन पुरस्कार" देते आणि प्रशिक्षकाला "द्रोणाचार्य पुरस्कार' देते.

    शिक्षण मनुष्याला सभ्य आणि देशप्रेमी बनविते. खेळांमुळे बंधुत्व, सहकार्य, शिस्त, निष्ठा, स्वावलंबीपणा इत्यादी गुण विकसित होतात. म्हणून जीवनात खेळांचे स्थान गौण नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.

    खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi