वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आमची मुबंई मराठी निंबध | Aamachi Mumbai Marathi My City Essay Marathi

अलीकडे असा एकही दिवस उगवत नाही की, वर्तमानपत्रांत काही ना काही निमित्ताने मुंबईच्या गर्दीचा उल्लेख नाही. हाशहुश्श करीत आणि माणसांच्या गर्दीला शिव्याशाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबईतच राहत असतो. मुंबईच्या गर्दीबद्दलची चर्चा जेवढी गर्जत असते, तेवढेच मुंबईत येणारे माणसांचे लोंढेही सतत वाढत असतात आणि हे सारे पाहून 'आमची मुंबापुरी' मात्र गालातल्या गालात हसत असते.

नाहीतरी या मुंबापुरीचं सारंच आगळंवेगळं. अगदी चिचोळ्या आकाराची ही लहान सात बेटे. सभोवताली सारं खारं पाणी. माडाच्या आणि ताडाच्या वाड्यांनी भरलेली आणि ताज्या म्हावऱ्याच्या वासाने दरवळलेली ही बेटे कुणी राजाने आपल्या लेकीला आंदण दिली आणि जावयाने ती व्यापारी कंपनीला विकून टाकली. त्याचक्षणी या बेटांचे भाग्य उजळले. अशी हिची मजेशीर दंतकथा आहे. ही बेटे एकमेकांना जोडली गेली आणि एक नगरी निर्माण झाली. त्या नगरी वाढतच आहे. समुद्राला समांतर ठेवून ती आपले हातपाय पसरतच राहिली आहे. आजचे तिचे स्वरूप पाहून लेखक अरविंद गोखले तिला ‘महामाया' म्हणतात.

aamachi-mumbai-marathi-my-city-essay-marathi

या नगरीला मुंबापूरी नाव मिळाले ते तेथील देवतेच्या-मुंबापुरीच्या अधिष्ठानाने. या घाईगर्दीच्या शहरात आजही अनेक देवदेवता मोठ्या वैभवाने आपले अधिराज्य गाजवीत आहेत. पिकेट रोडवरचा मारुती, सागरकिनारी उभी असलेली महालक्ष्मी, उंचावर बसलेला सर्वसाक्षी बाबुलनाथ, कोर्टकचेऱ्यात गाजलेला विश्वविख्यात सिद्धिविनायक या बड्यांबरोबर इतर छोटेमोठे भगवान जागोजागी भेटतात. पण म्हणन काही ही मबापूरी काशीप्रयागसारखे धार्मिक क्षेत्रस्थान ठरत नाही. तर अनेक बुद्धिवंतांची ही कर्मभूमी आहे. नेहरू प्लॅनेटेरियम, भाभा अणुकेंद्र येथे अखंड ज्ञानसाधना चालू आहे. आज शेसव्वाशे वर्षे झाली तरी मुंबई विदयापीठ येथे आपला आब राखून आहे.

'देशातील महान औदयोगिक नगरी' हे सन्मानाचे मोरपीस तर मंबापुरीने आपल्या मस्तकी केव्हाच खोचले आहे. पण आज तेच तिच्या दुःखाचे कारण झाले आहे. प्रदूषित वातावरण हे मुंबईच्या कीर्तीला लागलेले गालबोट आहे. गगनाला भिडणाऱ्या सिमेंटच्या जंगलांनी मुंबईतील ताडामाडाच्या वाडया केव्हाच नष्ट केल्या आहेत. आता आमच्या या मुंबापुरीत दिसतात केवळ उंच इमारती, त्यावरच्या दूरचित्रवाणीच्या अँटेना आणि झोपडपट्टया व त्यांच्या भोवतालचे उकिरडे.

खरं पाहता, या नगरीचे अंतःकरण मोठे उदार, सर्वसमावेशक आहे. म्हणून तर येथे सगळ्या जातींचे, सगळ्या पंथांचे, सगळया धर्माचे लोक आनंदाने नांदतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसे या महापुरीत येतात ती आपले नशीब आजमावयाला. कलावंतांच्या कलेचीही ही नगरी योग्य बूज राखते, विद्वानांच्या विदयेला वाव देते. आणि व्यापाऱ्यांच्या मालाला न्याय देते. तिची स्वतःची एक भाषा आहे, मग ती राज्यभाषा मराठी असो वा राष्ट्रभाषा हिंदी असो. तिच्यावर 'मुंबईचा' एक वेगळा ठसा आहे. स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाने नांदणारी ही मुंबापूरी आहे; मग कुणी तिला मुंबई म्हणो वा बॉम्बे म्हणो, ती आहे आमची आगळीवेगळी मुंबापुरी!


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

 • माझे शहर निबंध मराठी
 • माझे आवडते शहर निबंध
 • स्वच्छ शहर सुंदर शहर मराठी निबंध
 • my city essay in marathi

आमची मुबंई मराठी निंबध | Aamachi Mumbai Marathi My City Essay Marathi

माझे आजोळचे गाव मराठी निंबध | My Village Essay Marathi


माझे सारे बालपण मुंबईत गेले आणि शिक्षणही मुंबईतच झाले. तरी मला खरी ओढ असते ती देवराष्ट्राची. कारण देवराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे. देवराष्ट्र हे माझ्या आजोळचे गाव. या गावाच्या नावात 'देव' आणि 'राष्ट' असे दोन महान शब्द असले, तरी हे गाव मात्र अगदी छोटेसे आहे. या गावाविषयीची माझ्या मनातील ओढ मात्र विलक्षण आहे, त्यामुळे सुट्टी पडते कधी आणि आपण आजोळच्या गावाकडे पळतो कधी याची मी आतुरतेने वाट पाहत असतो.

माझे हे आवडते गाव सातारा जिल्हयाच्या टोकावरील डोगराच्या कुशीत वसलेले आहेआजोबांच्या छायेखाली वावरणारा छोटासा नातूच जणू अगदी बालवयातील निरागसता आजही तेथे ओसंडून वाहताना आढळते एस् टी तून उतरून गावाच्या दिशेने थोडेसे चालावे लागते. पण आपण पाच-दहा पावले जात नाही तोच कुणाची तरी बैलगाडी जवळ येऊन उभी राहतेच. “अरे पावण्या, कवा आलास? शिवरामपंतांचा नातू नाही का तू!" असे म्हणून ज्या गप्पा सुरू होतात त्या गाव येईपर्यंत चालूच राहतात.

my-village-essay-marathi

देवराष्ट्रात कुणी कुणाला परका नाही, कुणाचे काही गुपित नाही. सर्वांना सर्वांविषयी आपूलकी. लग्न होऊन सासरी गेलेल्या गावातील सर्व मूली गावाच्याच माहेरवाशिणी. 'समुद्रेश्वर' हे गावाचे दैवत. त्याचा उत्सव सर्व गावकरी दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नोकरीधंदयाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले गावकरीही त्यासाठी मुद्दामहून गावात येतात. कारण समुद्रेश्वरच आपले रक्षण करतो अशी या गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
शेती हाच येथील गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. या शेतीतही सतत प्रगती करण्याची गावकऱ्यांची तयारी असते. गावकरी व्यसनांपासून दूर असल्यामुळे गावात नेहमी स्वास्थ्य, संपन्नता आढळते. गावावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा साऱ्या गावाने एकवटून तिच्याशी मुकाबला केला.

सुट्टीत जेव्हा जेव्हा मी गावी जातो, तेव्हा तेव्हा शहरात मनावर आलेली मरगळ तेथे पळून जाते आणि तेथील उत्साह, चैतन्य मनात भरून घेतो. निळे आकाश आपली विशालता मला तेथेच दाखविते, स्वच्छ वाहते पाणी किती निर्मळ असते याची प्रचीती मला तेथेच मिळते. नदीच्या पाण्यात मनसोक्त डुंबावे आणि नंतर पाण्याबाहेर येऊन उन्हात पोटभर खेळावे हा आनंद तेथेच लुटायला मिळतो. पक्ष्यांच्या जगातील विविधता मी तेथेच जाणली. आजीच्या हातच्या विविध पदार्थांचा पाहुणचार घेऊन मी जेव्हा निघतो तेव्हा आजी हातावर दही ठेवते. आपल्याकडे असे मानतात की, दूर निघालेल्या पाहुण्याला दही दिले तर तो लवकर परततो. मी तर मनात त्यावेळीच पूढच्या सुट्टीत गावात परत येण्याचा बेत योजीत असतो. आजीआजोबाच नव्हे, तर वाटेत भेटणारे गावकरी, जणू सारे गावच मला निरोप देत असते.


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते


 • my village essay in marathiमाझे आजोळचे गाव मराठी निंबध | My Village Essay Marathi

एक रखरखीत दुपार मराठी निबंध| Mi Anubhavleli Dupar Marathi Nibandhएक रखरखीत दुपार मराठी निबंध हा पुढील प्रमाणे लिहीता येईल. मे महिन्याने मध्य गाठला होता आणि आपले आगळे अस्तित्व तो जाणवून दयायला लागला होता-विशेषतः मध्यान्हीच्या वेळी. अशाच मे महिन्यातील एक रखरखीत दुपार होती ती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे सुखवस्तू समाज त्या रखरखीतपणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी चार भिंतींच्या आड लपला होता. डोक्यावर विजेचे पंखे भिरभिरत होते. कुठे थंड पाण्याच्या सहवासात फिरणारे ‘रूम कूलर' त्या रखरखीतपणावर मात करीत होते. बहुतेक दारे, खिडक्या वाळ्याच्या पडदयांनी सज्ज झाल्या होत्या. तरी आतील मानवी समाज कुरकुरत होता, 'काय उकडत आहे!

काळाकुळकुळीत डांबरी रस्ता उन्हाने तळपत होता. जणू संतप्त सहस्ररश्मींचा काही गुन्हाच त्याने केला होता. उन्हाने हवालदिल झालेल्या रस्त्याचे काळे अंतःकरण आता द्रवू लागले होते. त्या रस्त्याला काटकोनात छेदणारा बोळ सुद्धा उदास आणि एकाकी दिसत होता. नेहमी तेथे 'विटीदांडूचा खेळ' किंवा 'क्रिकेटचा गेम' रंगलेला असतो. पण आज चिटपाखरूही त्या गल्लीबोळात दिसत नव्हते. आता पाऊण एक महिना त्या गल्लीला दुपारचा असाच एकाकीपणा साहावा लागणार होता.

mi-anubhavleli-dupar-marathi-nibandh
अशा या रणरणत्या दुपारीही समोर काहीतरी नवीन बांधकाम चालले होते. येणाऱ्या दिवाळीपूर्वी ते काम पूर्ण करण्यासाठी अनेक मजूर तेथे खपत होते. डोक्याला बांधलेला रुमाल एवढाच काय तो त्यांच्याकडे उन्हाला आडोसा होता. झाडाच्या सावलीत बसलेले कुत्रेही अस्वस्थ होते. त्यांची जीभ तोंडाबाहेर लोंबत होती. त्या सून्न वातावरणाचा भंग करणारा आवाज झाला, "भांडीऽऽ, बाई, भांडी घ्या." त्या बाईच्या डोक्यावरील भल्यामोठ्या टोपलीत भांडी होती व त्यांवर जून्या कपड्यांचे बोचके ठेवलेले होते. उन्हाने थकलेली ती, पाण्याचा नळ शोधीत असावी. मी तिला हाक मारली आणि थंडगार पाण्याचा ग्लास पूढे केला. "अग, कशाला हिंडतेस या रणरणत्या दुपारी?" "बाई, दुपार नाही पाहिली तर संध्याकाळ कशी गवसायची!" तिच्या एकाच वाक्याने केवढे विदारक सत्य उघड केले. ही रखरखीत दुपार आपल्याला जीवनातील रखरखीतपणा सहन करण्याचे सामर्थ्य देत असते, असेच जणू ती सांगू पाहत होती.

एखादया शीघ्रकोपी दुर्वासाचा संताप शांत झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील रेषा जशा सुरकुतत जातात, तसा या दुपारचा 'ऐनपणा' संपल्यावर ही सुद्धा सुरकुतू लागते. घड्याळाचे काटे पाचाकडे सरकले की ही चवताळलेली महामाया दोनप्रहरी शांत होऊ लागते आणि सुस्तावलेले वारेही ये-जा करू लागतात. सहस्ररश्मी आपले चाबूक आवरते घेतो. मग घरात लपलेली माणसे बाहेर येतात. तापलेल्या धरतीला थंड करण्यासाठी पाण्याचा मारा करतात. सुखद संध्याकाळ अवतरते तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी वेलींवर सुवासिक सायली, जाई, जुई हसू लागतात. दुपारनंतर येणारी ही सुसहय संध्याकाळ जणू मानवांना सांगत असते, “अरे, जीवनातही अशी चटके देणारी दुपार संपली ना, की रम्य, शांत संध्याकाळ निश्चित अवतरते!"


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
 • मी अनुभवलेली दुपार निबंध मराठी
 • मी पाहिलेली दुपार निबंध
 • माझी मे महिन्यातील दुपार निबंध
 • माझी मे महिन्यातील दुपार निबंध मराठी


 • mi anubhavleli dupar marathi nibandh
 • may mahinyatil dupar nibandh
 • dupar in marathi 9th
 • mi anubhavleli dupar marathi nibandh
 • mazi may mahinyatil dupar
 • dupar varnanatmak nibandh marathi
 • dupar essay in marathi


एक रखरखीत दुपार मराठी निबंध | Mi Anubhavleli Dupar Marathi Nibandh

रम्य सायंंकाळ मराठी निंबध  | Ramya Saynkal Essay Marathi


रम्य सायंंकाळ मराठी निबंधामध्‍ये आपण मुबंई आणि महाबळेश्‍वर येथील संध्‍याकाळचे वर्णन बघणार आहोत ,मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातील ती सायंकाळ असली तरी ती रम्यच वाटते. हजारो नव्हे लाखो पावले द्रुत गतीने आपापल्या घरी परतत असतात. दिवसभर श्रम केलेले असले तरी त्या पावलांना जणू वाऱ्याचे पंख लाभलेले असतात. कारण त्यामागे ओढ असते घराकडे जाण्याची. त्यामुळे मग गाडीची गर्दी त्रासदायक वाटत नाही. कारण त्या गर्दीतील अनेक व्यक्तीच्या मनांची एका बाबतीत एकरूपता असते ‘घरी परतायचे.'


मला अचानक आठवली ती महाबळेश्वरची सायंकाळ. महाबळेश्वरला जायचे म्हटले म्हणजे सूर्यास्त, सूर्योदय पाहिलाच पाहिजे आम्ही आणि आमच्यासारखे आलेले शेकडो प्रवासी त्या बॉम्बे पॉइंटवर जमलो होतो; आणि अगदी नजर न हालविता ती रम्य सायंकाळ आपल्या नजरेत भरून घेत होतो, पण मला एक गंमत जाणवली-दिवसभर प्रकाशदानाचे काम करून अस्ताला जाणाऱ्या त्या सहस्ररश्मीलाही कशाची तरी ओढ लागली असावी! किती वेगाने उतरत होता तो. ते लाल वर्तुळ अस्ताला गेले, पण तरीही मागे आकाशात उरला 'लाल रक्तिमाच!' अशाच एका रम्य सायंकाळच्या दर्शनाने कूणा कवीची प्रतिभा पल्लवित झाली आणि तो म्हणाला, "उदय आणि अस्त दोन्ही स्थिती महात्म्यांना समानच असतात."ramya-saynkal-essay-marathi
सायंकाळ म्हणजे संधिकाल. दिवस आणि रात्र यांना जोडणारा दुवा. त्यामुळे या दोघांच्यातील साऱ्या चांगल्या गोष्टी त्यात एकवटतात. खेडेगावात तर ही सायंकाळ घरी परतणाऱ्या गुरांच्या 'गोरजाने' अधिक धूसर होते. त्यांच्या गळ्यांतील घंटांचा नाद सारे वातावरण भरून टाकतो. वेगाने घरटयांकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या रांगा दृष्टीस पडतात. तीच ओढ त्यांच्या पंखांत उतरलेली असते.
पाहता पाहता संधिप्रकाश संपतो आणि तमिस्रा आपले आधिपत्य गाजवू लागते. गावागावांत दूरवर दिवे लुकलुक लागतात. त्याचवेळी आकाशात एकामागून एक चांदण्या चमक लागतात. जणू त्या सांगत असतात, 'तम अल्प दयुति बहु.
अशाप्रकारे रम्य सायंंकाळ मराठी निंबध हा निबंध  वरील प्रमाणे  लिहीता  येईल.


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
 • एक निसर्गरम्य संध्याकाळ निबंध
 • संध्याकाळ मराठी लेख
 • मी पाहिलेली संध्याकाळ
 • संध्याकाळचे वर्णनरम्य सायंंकाळ मराठी निंबध | Ramya Saynkal Essay Marathi


नमस्‍कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चांदण्‍या रात्रीची सहल मराठी निबंध, तुम्‍ही आजवर दिवसा ढवळ्या सहलीला गेले असाल पण चांदण्‍या रात्री सहलीला गेल्‍यास काय अनुभव येतो व कोणते नयनरम्‍य वातावरण आपल्‍याला बघायला मिळु शकते याचे वर्णन करण्‍यात आले आहे चला तर मग सुरू करूया , चांदण्‍या रात्रीची सहल मराठी निबंध Essay on star night trip in marathi.


चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध लिहीताना मनात पुढील गोष्‍टी आल्याशिवाय राहत नाही. दिवसभराची सहल, वर्षा सहल, पहाटेची सहल, सायकलवरून सहल, गडावरचा फेरफटका असे सहलींचे विविध प्रकार आमच्या मित्रमंडळींनी आजवर अनुभवले होते. यावेळी कशी कुणाला ठाऊक कुणाच्या डोक्यातून कल्पना आली की, आपण 'चांदण्या रात्रीची सहल' काढू या. एकदा कल्पना निघाली की, ती साकार करण्यास आमच्या मित्रांना विलंब लागत नाही.

मे महिन्याचे दिवस होते; आकाशावर आक्रमण करण्याचे ढगांनी अदयापि योजिले नव्हते. त्यामुळे वैशाखी पौणिमेचा दिवस निश्चित करण्यात आला. या दिवशी जंगलातील जाळयांतील करवंदे तयार होतात अशी माहिती कुणी तरी पुरविली, तेव्हा मुद्दाम डोंगराकडे जायचे असे एकमताने ठरले; आणि रात्री दहानंतर आम्ही सहलीसाठी प्रस्थान ठेवले.

Essay on star night trip in marathi

गावातून बाहेर पडताना लक्षात आले की, सारे गाव शांतपणे झोपले होते, आपणच वेड्यासारखे घराबाहेर पडलो आहोत नाहीतरी थोडासा वेडेपणा केल्याशिवाय कोणतेही असामान्यत्व गवसतच नाही पौणिमेचे चांदणे लक्षात घेऊन नगरपालिकेने आज रस्त्यावरचे दिवे लावलेच नव्हते. पण स्वच्छ पसरलेल्या कौमुदीने त्यांची उणीव भासू दिली नव्हती. कोणताच  कृत्रिम प्रकाश नसल्यामुळे चांदण्याचे खरेखुरे सौंदर्य आम्हांला तेव्हाच उमगले. चांदण्याला 'पिठूर' हे विशेषण लावणारी व्यक्ती खरोखरच कविमनाची!
मे महिन्याचे दिवस असूनही ते चांदणे आपली शीतलता जाणवून देत होते. दिवसभर होणारा अंगाचा दाह केव्हाच कुठे गायब झाला होता, त्यामुळे सहलीची लज्जत अधिकच वाढली होती. आजूबाजूच्या बंगल्यांच्या बागांतून फुललेल्या सायंकाळच्या फुलांच्या व रातराणीच्या मादक गंधाने सारे वातावरण भरून गेले होते. अशा वातावरणात शब्द मुके न झाले तरच नवल! त्या प्रसन्न चांदण्यात न्हाऊन निघत असताना आम्ही गावाबाहेर केव्हा पडलो ते कळले देखील नाही

डोंगरचढणीचे दृश्य तर अनुपम होते. नेहमी ओक्याबोक्या दिसणाऱ्या डोंगरांनी रुपेरी शाल पांघरली आहे असे वाटत होते. करवंदांच्या जाळ्यावर तर चांदीची फुलेच फुलल्याचा भास होत होता. पायाखालच्या मातीचा स्पर्शही आगळावेगळा वाटत होता. दुपारच्या तळपत्या सूर्यकिरणांत पायांना टोचणारे आणि डोळ्यांत पाणी आणणारे सारे दगडगोटे कोठेतरी नाहीसे झाले होते आणि चांदण्याने धुऊन निघालेली ती भूमाताही मृदुमुलायम झाली होती. मला एकदम आठवण झाली कवी कुसुमाग्रजांची. त्यांनी आकाशातील या पूर्णचंद्राला 'स्वप्नांचा सौदागर' म्हणून संबोधिले आहे.

माझी ही आठवण मी माझ्या दोस्तांना ऐकविली, तेव्हा त्यांनाही अनेक आठवणी दाटून आल्या. मग चांदण्याच्या गाण्यांचा पूर लोटला. जाळीत पिकणाऱ्या डोंगरच्या मैनेच्या कहाण्या आतापर्यंत केवळ ऐकल्या होत्या. पण आता समोर ती पसरली होती. त्यांचा आस्वाद घेताना बरोबर आणलेल्या खाऊच्या डब्यांची.आठवणही झाली नाही. पण आमच्या दोस्तांनी तेथेही रसिकता दाखविली होती. रुपेरी चांदण्यात खाण्यासाठी निवडलेल्या वस्तूही तशाच होत्या. पांढरी "स्वच्छ मलईची बर्फी, पांढरीशुभ्र हलकीफुलकी इडली आणि मस्त, मऊ दध्योदन म्हणजे दहीभात.

रात्रभर त्या चांदण्यात लोळत असताना दुःख, द्वेष, असूया, चिंता हे सारे विकार हद्दपार झाले होते; साथ होती ती फक्त त्या चंद्रप्रकाशाचीच. कुणीतरी दोस्त त्या आकाशातील ग्रहतायऱ्यांची नावे सांगून त्यांची ओळख देऊ लागला. पण छे! ते रुक्ष शास्त्र कुणालाच तेथे रुचले नाही. तेथे कोणी शनी नव्हते, कोणी ध्रुव नव्हता, कोणी अरुंधती नव्हती. मग होते काय? लहानपणचा एक उखाणा आठवला, 'परडीभर फुले तुलाही वेचवेनात, मलाही वेचवेनात!'

यापूर्वी अनेक सहली काढल्या होत्या, पुढेही काढू, पण चांदण्या रात्रीची ती सहल अगदी आगळीवेगळीच! 
मित्रांनो चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Essay on star night trip in marathi हा निबंध कसा वाटला व तुम्‍ही गेलेल्‍या सहलीचा गमतीदार अनुभव तुम्‍ही कमेंट करून आमच्‍य पर्यंत पोहचवु शकता . धन्‍यवाद  

वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
 • Essay on night trip in marathi
 • माझी सहल मराठी निबंध

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Essay on star night trip in marathi


Essay On Pahat In Marathi -रम्‍य पहाट मराठी  निबंध  442 Words


नमस्‍कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रम्य पहाट मराठी निबंध, या निबंधामध्‍ये निसर्गाच्‍या लहरी स्‍वभावाचे वर्णन केले आहे. निसर्गाने रौद्र रूप दाखवल्‍यानंतर हतबल मानव व त्‍यानंतर येणाऱ्या  नयन रम्‍य पहाटचे वर्णन केले आहे .  चला तर मग सुरूवात सुरूवात करूया रम्‍य पहाट मराठी निबंधाची . 

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-

स्थळ- शहर वा खेडेगाव (निवडलेल्या स्थळानुसार पुढील वर्णन)

 • पहाटेची जागा 
 • भोवतालचे वर्णन 
 • अंधारातून अंधुक प्रकाश 
 • गावाबाहेर/शहराबाहेर वाटेत दिसणारी दृश्ये 
 • व्यक्ती 
 • सूर्योदयापूर्वीचे आकाश 
 • तारकांचे अस्ताला जाणेवातावरणातील शांतता 
 • पक्ष्यांची किलबिल 
 • आकाशातील रंगांची मैफील 
 • काव्याची आठवण 
 • अरुणोदयानंतरची पहाट 
 • बदललेले वातावरण 
 • प्रसन्नता, ताजेपणामी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोचलो, तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यावर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले, ते मला कळलेच नाही.

 मला जाग आली, तेव्हा सभोवार अंधार होता. पहाट झालेली नव्हती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्याची कामे शांतपणे चालू होती. पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो. सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. सारा गाव हळूहळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा-सारवण, झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. काही न बोलता मी आणि अमित चालत होतो. शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतता व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती.

आम्ही टेकडीवर पोचलो. अंधुक अंधुक दिसू लागले. आकाशातील तारे हळूहळू विझू लागले. एखादाच तारा आपले तेजस्वी अस्तित्व दाखवत होता; पण मावळतीचे वेध त्यालाही लागले होते. या काम
नि पूर्वेकडचे आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले होते. एखादया विदूषकाने क्षणाक्षणाला रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा प्रकार होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनात जागी झाली

'कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची!' जिम विकार पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले. मनात आले, ही रम्य, प्रसन्न पहाट जो अनुभवतो, त्याचे अंतःकरणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून अजूनही मानवतेचे दर्शन घडते!

त्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेवर घरांच्या छोट्या अंगणात तुळशीवृंदावनांपुढे रांगोळ्यांची शोभा दिसली. रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून देवळांतील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती. सगळीकडे 'प्रसन्नता' भरून राहिली होती. शाहीर होनाजीची 'अमर भूपाळी' जणू साकार झाली होती. काका
न पहाटेच्या या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.
काही विशेष : शालान्त परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत निबंधांबरोबर मुद्दे दिलेले नसतात. परंतु प्रश्नपत्रिकेतून निवडलेला निबंध कोणकोणत्या मुद्दयांना धरून लिहावा, याचा सराव विदयार्थ्यांना असला तर ते सहजतेने निबंध लिहू शकतील. परीक्षेत निबंध लिहिण्यापूर्वी अशी सवय विदयार्थ्यांमध्ये बाणावी, या उद्देशाने या ब्‍लागवर  सर्व निबंधांसाठी योग्य असे मुद्दे देण्यात आले आहेत.Essay On Pahat In Marathi -रम्‍य पहाट मराठी  निबंध   
श्रावणातल्या पावसानंतरची पहाट 'श्रावणात घननिळा' याचाच अनुभव ती रात्र देत होती. काळ्या मेघांनी सारे नभ आक्रमिले होते. नेहमी दिमाखाने चमचमणाऱ्या लक्षावधी चांदण्याही आज आकाशात कोठे दिसत नव्हत्या. चादण्याच काय पण त्यांचा तो तारकानाथही गगनाच्या प्रांगणात कोठेच दिसत नव्हता.

त्या रात्री एकच गोष्ट फक्त मूर्त स्वरूपात प्रतीत होत होती आणि ती म्हणजे कोसळणारा पाऊस. बराच वेळ मी तो पाऊस ऐकत होते-हो ऐकतच होते

कारण बाहेरच्या मिट्ट काळोखात काहीच दिसत नव्हते. पण मध्येच मोठ्या चपळाईने ती चपला चमकून गेली आणि त्या निमिषार्धच मला त्या पावसाचे रौद्र स्वरूप दिसले. खिडकी बंद करून मी डोक्यावरून पांघरूण घेतले. त्या क्षणी मनात आले, श्रावणातील अशाच एका रौद्र रात्री भगवंतांनी कृष्णावतारात या इहलोकात आगमन केले होते. नाही!

ती रात्र आणि तो पाऊस केव्हा संपला माहीत नाही. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा खिडकीच्या काचेचे रूप मला आगळेच भासले. क्षणात उठून मी बाहेर आले. रात्रीचा तो काळ्या ढगांचा बुरखा गगनाने केव्हाच फेकला होता. भगवान सूर्याचे आगमन अदयापि व्हायचे होते, पण आकाशात विविध रंगांची उधळण झालेली दिसत होती. 

कुणा बालिकेने रंगावली रेखाटण्याऐवजी स्वतःजवळचे सारे रंगच उधळले आहेत की काय, असे वाटत होते. हेच का ते कालचे काळेकुट्ट आकाश म्हणून मी कुतूहलाने पाहू लागले.


रात्रीचा पाऊस आता नव्हता, पण त्या पावसाच्या खुणा मात्र सर्वत्र दिसत होत्या. सारा आसमत धुऊन निघाला होता. झाडांची पाने अजूनही ओलीचिब दिसत होती. ओल्या ओल्या पानांतून जाई, जुईसारखी पांढरी फुले त्या नुकत्याच न्हाऊन निघालेल्या आसमंताला गंधित करीत होती. हळूहळू वर येणाऱ्या भास्कराने या साऱ्या दृश्यावर सोनेरी किरणांचा मुकुट चढविला; आणि जणू त्या सोनेरी किरणांतून भोवतालच्या वातावरणावर चैतन्याचा शिडकावा केला.
ramya-pahat-essay-marathi
श्रावणातील प्रत्येक पहाट आपल्याबरोबर चैतन्याची कुपीच घेऊन येते. कधी ते चैतन्य शिवाला बेल, शिवामूठ वाहणाऱ्या भक्तांच्या रूपाने भेटते; तर कधी मंगळागौरीसाठी पत्री-फूले गोळा करणाऱ्या परड्यात दिसते. विविध रंगांचा नाजूक तेरडाही जिवतीच्या व्रतासाठीच सकाळी हसत असतो. तर कुठे शनिवारची कहाणी शनीच्या पूजेची आठवण देते. 

अशा या श्रावणातील निसर्गदर्शन घेण्यास निघावे तर सरसर आवाज करीत सर कोसळते आणि आडोसा शोधावा तर पुन्हा हा खट्याळ श्रावण आपले हास्य पिवळ्या उन्हातून ओसंडून देतो. पावसानंतरची ही पहाट तप्त मनाला दिलासा देते व आपूलकीच्या ओलाव्याने खुलविते. अशाप्रकारे essay on pahat in marathi -रम्‍य पहाट मराठी  निबंध हा  निबंध  वरील प्रमाणे  
वर्णन करता येईल . आपले रम्‍य पहाट विषयी काय मत हे कमेंट करून कळवा, तुमची प्रतिक्रीया आमच्‍यासाठी अमुल्‍य आहे. धन्‍यवाद 
वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते 

 • mi anubhavleli pahat nibandh
 • me anubhavleli pahat in marathi
 • mi anubhavleli ek ramya pahat
 • me anubhavleli pahat marathi nibandh 
 • mi pahileli ramya pahat nibandh
 • me anubhavleli ek ramya pahat

रम्‍य पहाट मराठी निबंध | Essay On Pahat In Marathi

Essay on rainy season in marathi | पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध 

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील एक दिवस मराठी  निबंध, मानवाने विज्ञान आज भरपुर प्रगती केली असली तरी निर्सगावर त्‍याला मात करता आली नाही, खालील निबंधामध्‍ये निसर्ग मानवाची कश्‍याप्रकारे परीक्षा घेतो , व मानव त्‍यावर किती हतबल होतो याचे वर्णन केले आहे . चला तर मग सुरूवात करूया पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंधाला .
एकदा तोंड दाखवून तो लुच्चा पाऊस कुठे गडप झाला होता कोण जाणे? शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तर पाणी तरळले होतेच; पण शहरवासीयांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. पावसाचे आगमन व्हावे म्हणून त्याची विविध प्रकारे आळवणी चालली होती. होमहवन, जपजाप्य, मंत्रजागर सारे झाले; पण तो लबाड कुठे दडून बसला होता कोण जाणे! नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरविणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावे. त्याचा खेळ चालला होता, पण माणसे मात्र हवालदिल झाली होती. 


पुनः पुन्हा नक्षत्रांची गणना होत होती. पावसाची नक्षत्रे तर केव्हाच सुरू झाली होती; पण पावसाचा पत्ता नव्हता. 'येरे येरे पावसा' हे बालगीत बालकांबरोबर मोठेही मनातल्या मनात आळवीत होते. शेवटी त्या घनाला दया आली असावी! सकाळी माणसे जागी झाली ती नेहमीप्रमाणे पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने नव्हे, भगवान सहस्ररश्मीच्या सूचक पदन्यासाने नव्हे; तर मुसळधार कोसळणाऱ्या धारांच्या आवाजाने. या मुसळधार धारा पाहिल्यावर मात्र माणसे सूखावली. कारण ज्याची ती चातकाप्रमाणे वाट पाहत होती, तोच मुळी त्यांच्या भेटीसाठी आला होता. Essay on rainy season in marathi
Essay on rainy season in marathi 

हव्या हव्या असलेल्या त्या पाहुण्याचे मोठ्या आनंदाने स्वागत होऊ लागले.
पण सगळ्यांना गंमत वाटत होती ती ही की, ज्या पाहण्याची आपण वाट पाहत होतो, तो पाहुणा अचानक केव्हा आला ते कळलेही नव्हते. दिवस वर येत होता, पण तो वर येत आहे हे कळत होते ते केवळ घड्याळाच्या काट्यांमुळे. कारण वरुणराजाच्या आगमनामुळे भगवान सूर्यदेवांनी रजा घेतली असावी; किंवा परमेश्वराच्या या लाडक्या बाळांना-मानवांना-आपण नाहक इतके दिवस पीडा दिली म्हणून हा सहस्ररश्मी संकोचला असावा. 

काही का कारण असेना, पण एकूण आजचा दिवस हा दिनमणीचा दिवस नव्हता, तर तो एक ओला दिवस होता. पाऊस कोसळत होता. दाही दिशा अगदी कुंद झाल्या होत्या. उन्हाने त्रासलेल्या जीवांना तो ओला दिवस सुखावीत होता.
घड्याळाचे काटे सरकत होते; पण पाऊस थांबावयाचे काही चिन्ह दिसत नव्हते. मोठ्यांना आता कामावर जायला हवे होते. शाळा-कॉलेजाची मुलांना आठवण झाली. पण कसे जाणार? सारे रस्ते जलमय झाले होते. वरुणराजा अजूनही कोसळत होता. आता त्या पावसातील नावीन्य संपले होते. आता जाणवत होती केवळ त्याच्यातील रुद्रता. आनंदाने स्वागत केलेल्या पाहुण्याविषयी आता भय वाटू लागले!

 लोकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले. सारे रस्ते पाण्याने भरून वाहू लागले. गोरगरिबांच्या झोपड्या पाण्यात वाहून गेल्या. सगळी वाहने जेथल्या तेथे कळाहीन होऊन स्थिरावली होती. एवढी मोठी आगगाडी, पण तिचाही तोरा या जलधारांनी हिरावून घेतला.

विमाने सुद्धा आकाशात झेप घेऊ शकत नव्हती. कारण पाच-दहा फुटांपलीकडचेही दिसत नव्हते. सर्वत्र होते फक्त पाणीच पाणी. वर पाणी, खाली पाणी. घरे ओली, छपरे ओली, कपडे ओले. सारे कसे ओलेच ओले. दिवस संपत आला; पण पाऊस थांबला नव्हता वा कमी सुद्धा होत नव्हता. कालपर्यंत पाण्यासाठी आतुर झालेल्यांच्या तोंडचे पाणीच आता पळाले होते. चिंतातूर माणसे थकली. 

आडोशा-निवाऱ्याला जाऊन आडवी झाली आणि नकळत निद्राधीन झाली. रात्रीच्या अंधारात तो पाहुणा जसा अवचित आला होता, तसाच निघूनही गेला होता. हसत हसत बालरवी उदयाचलावर आला. जग जागे झाले, स्तिमित झाले; कारण तो ओला दिवस संपला होता; पण आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेऊन !


मला आशा आहे की marathi essay on rainy season हा निबंध तुम्‍हाला नक्‍कीच आवडला असेल , तरी मी तुम्‍हाला विनंती करू इच्‍छीतो की आपल्‍या प्रतिक्रीया कमेंट करून नक्‍की कळवाव्‍या. 


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते 


 • marathi essay on rainy season for class 6
 • marathi essay on rainy day
 • marathi essay on one rainy day
 • marathi essay on first day of rainy season
 • marathi essay on first day of rain

Essay on rainy season in marathi | पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

पावसाळयावर  मराठी निबंध |  Rainy Season Essay In Marathi

नमस्‍कार मित्रांनो पावसाळयावर  मराठी निबंध  Rainy Season Essay In Marathi विषयावर निबंध पाहणार आहोत. पावसाळा अर्थातच वर्षा ऋतु हा बालपणातील आठवणी ताज्‍या करून देणारा असतो , कागदाची होडी पावसाच्‍या पाण्‍यात सोडण्‍याची विलक्षण गंमत असते . शालेय जिवनामध्‍ये पावसाळा निबंध मराठी या विषयावर निबंध लेखन करायचे असते. हा वर्णणात्‍मक निबंध असतो, त्‍या अनुशंगाने आपण विस्‍तुत निंबध लेखन करणार आहोत चला तर निबंधाला सुरूवात करूया.

पावसाळ्याचे दिवस असूनही नेमेची येणारा पावसाळा जेव्हा दडी मारतो, तेव्हा माणूस अगदी मेटाकुटीला येतो. माणसे पाण्यासाठी वणवण भटकत असतात आणि त्यांचे डोळे वरचेवर आकाशाकडे वळलेले असतात. पण वर्षाराणीचे इमानी सेवक असलेले काळे ढग आसमंतात कुठेही दिसत नाहीत. कारण वर्षाराणी रुसलेली असते. परंपरेचे अंधपजक असलेल्या कविमंडळींनी आजवर 'ऋतुराज', 'ऋतुराज' म्हणून वसंताला श्रेष्ठ गणले, गौरविले, म्हणूनच ही राणी रुसली असावी की काय!


ऋतुराज्ञी वर्षा मराठी निबंध किंवा सर्व ऋतुंची राणी वर्षा ऋतु मराठी निबंध

सदोदित वसंताचे गुणगान करणाऱ्या लोकांना जेव्हा वर्षाराणीचे महत्त्व उमगले, तेव्हा त्यांनी तिचे राज्ञीपद तिला बहाल केले. कारण वर्षा नसेल तर वसंताचा साजशृंगार तरी कसा झाला असता? जाई, जुई, चमेली वर्षेच्या प्रेमळ वर्षावात भिजून निघतात म्हणून तर वसंताचा साजशृंगार होत असतो. ग्रीष्माने पोळून निघालेली धरतीमाताही वर्षेचे पाणी पिऊन तृप्त होते. तिच्या तृप्ततेचा तो मृद्गंधी निःश्वासही किती मोहक असतो!

वर्षाराणी ही खरोखरच आपली जीवनदात्री आहे. पण या सम्राज्ञीचा रोषही तापदायक असतो, याचा अनुभव कधी ओल्या दुष्काळाने, तर कधी कोरड्या दुष्काळाने येतो. कधी ही राणी रुसून बसते आणि मग सर्वांच्या तोंडचे पाणीच पळते, तर कधी रागारागाने ही दिवसरात्र बरसतच राहते आणि त्यामुळे या वर्षाराणीचे आगमन नकोसे होऊन जाते.जाळणाऱ्या ग्रीष्माच्या पाठोपाठ या वर्षाराणीचे होणारे आगमन केवढे सुखद असते! स्वास्थ्य आणि समृद्धता यांची त्यात हमी असते. वर्षाराणीच्या या आगमनाचे वर्णन करताना कवी निकुब  म्हणतात

'विजेचे नर्तन,


मेघांचे गर्जन मृद्गंध,

विशाल समृद्ध शेते,

अमृतवर्षाव सांगाती घेऊन हिरवा आपुला शृंगार लेऊन,

येई वर्षादेवी.'

आकाशातील काळ्या रंगाचे डोंगर या ऋतुराज्ञीच्या आगमनाची द्वाही फिरवू लागतात. आकाशातील ढगांची ही वादये वाजू लागली की, त्याच तालावर मोर आपले गायन व नर्तन सुरू करतात. धुंद वारा वाहू लागतो आणि शेवटी आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर बरसू लागतात. तहानलेली धरा ते पाणी जणू घटाघटा पिऊन टाकते आणि आनंदाने पुलकित होते. त्यामुळे तिचा मृद्गंध सगळीकडे दरवळतो.


असा हा वर्षाऋतू चैतन्याची सनद आहे. तो सृजनशीलतेचा संहारावरचा विजय आहे वर्षाऋतू हा विपुलतेचा ऋतू. वसुंधरेला सस्यश्यामला करणारा हा ऋतू धरतीपुत्रालाही उदात्ततेची शिकवण देतो. वर्षाराणी ही सर्व सजीवांची गंगोत्री आहे, सृष्टीचे सौभाग्य आहे. आमच्या जीवनात जे काही सुंदर आहे तो तिचाच आशीर्वाद आहे. म्हणून वर्षा ही ऋतुचक्रातील सम्राज्ञी आहे.

मित्रांनो तुम्‍हाला पावसाळयावर  मराठी निबंध |  Rainy Season Essay In Marathi हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता ऋतु कोणता आहे हे कमेंट करून जरूर कळवा, धन्‍यवादपावसाळयावर मराठी निबंध | Rainy Season Essay In Marathi

 ऋतुराज वसंत मराठी निबंध vasant essay in marathi


ऋतुराज वसंत मराठी निबंध vasant essay in marathi नमस्‍कार मित्रांनो होळी येते तीच मुळी रंगांची उधळण करीत. रंगपंचमीच्या दिवशी तर लहानमोठे सारेजण रंग उडविण्यात रंगून जातात. रंगाची पिचकारी सगळ्याच्या कानात ती गोड बातमी सांगते आणि सर्वांना मोहरवून टाकते. 'वसंत आला, जादूगार वसंत आला' शिशिराच्या जीवघेण्या थंडीने गारठून गेलेली सृष्टी पुन्हा एकदा अंग झटकून रंगांचा झिम्मा खेळावयास तयार होते. कारण दारी आलेला असतो तिचा आवडता अतिथी 'ऋतुराज वसंत!'आपल्या अंगावरची राजेपणाची वस्त्रे उतरवुन हा खेळकर वसंतही चैतन्यमय खेळात निसर्गदेवतेला सामील करून घेतो. हे कौतुक पाहावयास सहस्ररश्मीही आकाशात उशिरापर्यंत रेंगाळू लागतात. नेहमीच्या परिचित पक्ष्यांबरोबर पीलक, गोविद, तांबट, बुलबुल या साऱ्यांची गर्दी ऋतुराजाच्या स्वागतासाठी होते.


ऋतूचे चक्र फिरते आणि त्या गतीबरोबर पायाखालची भूमी आणि डोक्यावरचे आकाशही नवे रंगरूप धारण करते. निसर्ग जणू माणसाला चकवून कातच टाकीत असतो. आंब्यांच्या झाडांवर फुललेल्या मोहराचा सुगंध बातमी देतो. शिशिर संपला, उठा आणि वसंताचे स्वागत करा. काजू, शेवगा यांच्यावर फुललेली नाजूक फुले फळांच्या आगमनाची सुवार्ता देतात. शिरीषाची झाडे जांभळट गुलाबी नाजूक फुलांच्या शृंगाराने नटतात. जाई, जुई, सायली, मोगरा, चंपक ही सारी सुगंधी मंडळी ऋतुराज वसंताची संध्याकाळ जणू सुगंधमय करतात.

पाहता पाहता आसमंत बदलतो. कुणा जादूगाराने आपली जादूची काठी फिरविली की काय असे भासते. या किमयेने कविमनांवरही आपली सत्ता संपादित केलेली असते. 'आला हा वसंत फेरीवाला' म्हणून कुणी कवी त्याला साद घालतो. कुणाला हा पाहुणा प्रत्यक्ष देवाचा प्रेषित भासतो. वसंताच्या आगमनाने बेहोष झालेला निसर्ग रंग, रूप, गंध यांची पूजा मांडतो. एक आगळे चैतन्य त्याला लाभते. आनंद, उत्कटता, काव्य, संगीत आणि सौंदर्याचा सौदागर असा हा सर्वगुणसंपन्न ऋतुराज आहे म्हणूनच कवी त्याला आळवितो, 'हा प्रसाद काव्यामधला कविसम्मत.' मित्रांनो तुम्‍हाला वसंत सर्व  ऋतुंचा राजा  मराठी  निबंध vasant essay in marathi हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता ऋतु कोणता आहे हे कमेंट करून जरूर कळवा, धन्‍यवाद

वसंत सर्व ऋतुंचा राजा मराठी निबंध | vasant essay in marathi

शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध 

Nirop Samarambha Essay Marathiनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे,शाळा म्‍हटली की सर्वाना आठवण येते त्‍या शाळेतील झालेल्‍या गंमती जमती, शिक्षकांनी आपल्‍या केलेल्‍या तक्रारी, आपण केलेली मौजमजा , बालपणाचा हा काळ कोणीही विसरू शकत नाही . त्‍या अनुशंगाने आपण सविस्‍तर निंबध लेखन करणार आहोत चला तर निबंधाला सुरूवात करूया.

 शाळेचा निरोप समारंभ जसाजसा जवळ येत होता तशी निरोप समारंभाची आतुरता वाढत होती . आजवर दहा वर्षे या सभागृहात मी अनेक समारंभांसाठी आलो आहे, बसलो आहे, पण कालचा 'निरोपसमारंभ' हा साऱ्या समारंभांपेक्षा खरोखरच आगळावेगळा होता. 

खरं पाहता या समारंभाची आम्ही सर्वजण गेली वर्षभर वाट पाहत होतो. दहावीत आल्यापासून अनेकदा या निरोपसमारंभाविषयी गप्पा निघत, त्यावेळी आमचे अनेक दोस्त 'आपण या समारंभाविषयी अमूक एक बोलणार, अमूक एक सुनावणार' अशा बाता करीत, पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर काय घडले?

पूर्वपरीक्षेचा निर्णय जाहीर झाल्यावरच शाळेने हा समारंभ आयोजित केला होता. त्यामुळे "प्रत्येकाला अभ्यासात आपण कोठे आहोत?" हे उमगले होते. “उरलेल्या एका महिन्यात आपण काय करणे आवश्यक आहे" हेच विचार सर्वांच्या मनात गर्दी करून होते. निरोपसमारंभाच्या दिवशी आम्हांला सुटी दिली गेली होती आणि ठीक पाच वाजता शाळेत बोलाविले होते. गणवेषाचीही सक्ती नव्हती. किंबहुना आज कोणत्याही नियमाचे बंधन आमच्यावर नव्हते. कारण आजच्या समारंभाचे आम्ही पाहुणे होतो.

nirop-samarambha-essay-marathi

सवयीप्रमाणे पंधरा मिनिटे आधी, म्हणजे पावणेपाचला शाळेत गेलो. रोजची परिचयाची शाळा आज वेगळीच भासत होती. प्रवेशद्वारात भलीमोठी रांगोळी काढली होती आणि सारे गुरुजन आमच्या स्वागतासाठी उभे होते. या स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो. सभागृहात पाऊल टाकले तर ते सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर ज्यांनी शाळेस उत्कृष्ट यश मिळवून दिले अशा विदयार्थ्यांची छायाचित्रे मुख्याध्यापकांनी सभोवताली स्टँडवर लावून ठेवली होती. 

केवढी कल्पकता होती यांत! या साऱ्या प्रतिमा आम्हांला प्रेरणा देत होत्या तुम्हांलाही असेच यश मिळवायचे आहे, शाळेचा लौकिक वाढवायचा आहे, असेच जणू त्या आम्हांला सांगत होत्या. निशिगंधाची व गुलाबाची फूले जागोजागी लावल्याने सारे वातावरण कसे सुगंंधित झाले होते. समोरच्या फलकावर एक अर्थपूर्ण कविता लिहिली होती, ती आमच्याच एका शिक्षिकेने केलेली होती. कविता वाचताच आठवले ते त्या बाई शाळेत नवीन आल्या होत्या तो दिवस. किती त्रास दिला होता त्यांना आम्ही! उगाचच, अगदी वाहयातपणा म्हणून. पण पुढे त्यांनी आपल्या उत्कृष्ट शिकविण्याने आम्हांला जिंकून घेतले होते.

ठरल्यावेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी समारंभाचे अध्यक्ष होते. पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापकांनी करून दिली तेव्हा एक सुखद धक्का बसला. कारण ते अधिकारी आमच्याच शाळेचे 'माजी विदयार्थी' होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विदयार्थ्यांत झळकत होते.

निरोपसमारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे आजच्या समारंभात भाषणांची आतिषबाजी नव्हती. मोजक्या शब्दांत मुख्याध्यापकांनी आमच्या बॅचने मिळविलेल्या गेल्या दहा वर्षांतील यशाचा आढावा घेतला. इतिहासाच्या सरांनी चटकदार शैलीत मागच्या काही सुखद आठवणींची उजळणी केली, तर संस्कृतच्या गुरुजींनी  आम्हांला परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दांत आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेकडे कसे जाते हे विनम्रपणे सांगितले. 


नंतर विदयार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विदयार्थ्यांचा सत्कार पाहण्यांतर्फे करण्यात आला. नंतर विदयार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण नेहमी सभा गाजविणारे सारे वीर आज गप्प झाले होते. भारावलेल्या कंठांतून शब्द फुटेनात. सारेच वातावरण गंभीर झाले. म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम होऊन समारंभ संपला..

समारंभ संपला तरी आज आमचे पाय शाळेतून बाहेर पडत नव्हते. त्या वास्तूत अनेक आठवणी दडलेल्या होत्या. नेहमी अगदी वायातपणे वागणारे विदयार्थीही गुरुजनांना वाकून वंदन करीत होते,  कोणताही निरोपसमारंभ हा असा हेलावून टाकणाराच असतो.

तुमच्‍या शाळेतील निरोप समारंभातील आठवणी तुम्‍ही खाली कमेंट मध्‍ये व्‍यक्त करू शकतात मित्रांनो तुम्‍हाला शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध,nirop samarambha essay marathi हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा, धन्‍यवाद 
वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
 • शाळेचा निरोप समारंभ भाषण मराठी
 • कॉलेज निरोप समारंभ निबंध
 • शाळेचा निरोप घेताना निबंध मराठी
 • कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध
 • महाविद्यालयाचा निरोप घेताना निबंध
 • निरोप समारंभ मनोगत भाषण

शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi