माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | My Favourite Game Cricket Essay In Marathi

निबंध 1 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये  लोकांचे क्रिकेटवर  असलेले अपार प्रेम व्यक्त  केले आहे. क्रिकेट या खेळाचे फायदे , सविस्तर रित्या सांगीतले आहेत . वर्णन केेले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

आज एकविसाव्या शतकात माणसाला खेळाचे महत्त्व उमगलेले आहे. शरीर निरोगी राहण्याकरिता व्यायाम, योग वा खेळ आवश्यक आहेत हे सर्वमान्य झाले आहे. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ ठरला आहे. त्यामुळे साहजिकच क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा क्रिकेट पाहणारे व ऐकणारे यांचीच संख्या फार मोठी झाली आहे. मी त्यांपैकीच एक मी क्रिकेट खेळतो, क्रिकेटसंबंधित पुस्तके वाचतो आणि मैदानावर जाऊन मी मोठ्या हौसेने क्रिकेट खेळतो, पंरतु मैदानावर जाणे न जमल्यास T.V. किंंवा मोबाईलवर क्रिकेटचे सामने पाहतो.


 असे सामने पाहताना सर्व क्रिकेटप्रेमी देहभान हरपून जातात. क्रिकेटवर अलीकडे खूप टीका होत आहे. ती रास्तच आहे. हा खेळ चार-चार, पाच-पाच दिवस चालतो. क्रिकेटचे सामने असले की लोकांमध्ये अक्षरशः वारे संचारते. लोक कामधाम सोडून हा खेळ पाहत बसतात. त्यामुळे देशभर कामाचे लक्षावधी तास फुकट जातात. कामावर हजर असलेले लोक एकाग्र चित्ताने कामे करीत नाहीत. विदयार्थ्यांचे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. देशाच्या कार्यशक्तीची ही फार मोठी हानी आहे, यात शंकाच नाही.



आपले क्रिकेटपटू खेळापेक्षा पैशाकडे लक्ष देतात. आपण देशाच्या वतीने खेळत आहोत, ही भावनाच लुप्त होत आहे. अलीकडे तर आपल्या खेळाडूंचा कोटी कोटी रुपयांना लिलाव होऊ लागला आहे. वारेमाप प्रसिद्धी व वारेमाप पैसा यांमुळे या खेळांच्या सामन्यात मॅच फिक्सिंगसारख्या विकृत प्रवृत्ती शिरल्या आहेत. या खेळाकडे कोणीही खेळ म्हणून पाहतच नाही. खिलाडूवृत्ती नष्ट होत आहे. इतर खेळांना काडीचीही किंमत कोणी देताना दिसत नाही.

My-Favorite-Game-Essay-In-Marathi
My-Favorite-Game-Essay-In-Marathi



असे असले तरी हा खेळ मला खूप आवडतो. या खेळाचे काही फायदेही आहेत. या खेळामुळे चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता या गुणांचा विकास होतो. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार षटकार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.

अलीकडे क्रिकेटचे स्वरूप बदलत आहे. सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. वीस वीस (20-20 किंवा T20) षटकांचे सामनेही लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.

क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जात असली तरी या खेळात सांघिक एकता हीच महत्त्वाची आहे. तीच यश खेचून आणते. काही वेळेला एखादया खेळाडूने भरपूर धावा केल्या तरी संघाला यश मिळत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा (Chance) खेळ आहे'. प्रत्येक डावात काय घडेल, हे सांगणे कठीण असते. प्रत्येक खेळाडूला अतिशय जबाबदारीने खेळावे लागते; कारण त्यावरच त्याच्या संघाचा आणि पर्यायाने देशाचा लौकिक अवलंबून असतो.

मित्रांनो तुम्‍हाला maza avadta khel marathi nibandh हा निबंध कसा वाटला  व तुमचा आवडता क्रिकेटर कोण आहे हे सांगण्‍यास विसरू नका.  . धन्‍यवाद . 
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  •  खेळाचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान
  •  खेळांचे उपयोग नेतृत्वगुण
  • सांघिक भावना ,ऐक्य 
  • जबाबदारीची जाणीव 
  • निकोप दृष्टिकोन दुसऱ्यांविषयी आपुलकी 
  • वेळेचे महत्त्व 
  • शिस्तप्रियता, चपळता, काटकपणा 
  • सध्या बहुतेकांची आवड क्रिकेट 
  • खेळाचा तपशील व महत्त्व
 निबंध 2

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघांत सामने होतात. प्रत्येक संघात ११ + ३ खेळाडू असतात. या खेळासाठी चपळता, काटकपणा आणि शिस्तप्रियता आवश्यक असते. तीन स्टम्प्स व त्यांवरील दोन बेल्स मिळून विकेट  तयार होते. अशा समोरासमोरील दोन विकेट्स असतात. विकेटची रुंदी २२.९ सेमी असते. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड अंतर असते, यालाच 'पिच' किंवा खेळपट्टी म्हणतात. खेळपट्टीची रुंदी ५ फूट असते. मैदान सामान्यत: वर्तुळाकृती असते. 


जेव्हा एक संघ फलंदाजी स्वीकारतो, तेव्हा दुसरा संघ गोलंदाजी पत्करतो. दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटसाठी लाल रंगाचा चेंडू वापरतात तर दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सफेद रंगाचा चेंडू वापरतात. बॅटची लांबी ३४ इंचांपेक्षा व रुंदी ४ ५ इंचांपेक्षा अधिक नसावी. बॅटचे वजन मात्र निश्चित नसते.

या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार-षटकार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.

सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. या प्रकारचे सामने लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.

निबंध 3 

माझा आवडता खेळ


खेळ म्हणजे क्रीडा, करमणुकीचे साधन. ज्याच्यामुळे आपल्याला विरंगुळा मिळतो. आनंद मिळतो, तो खेळ. आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात मनावरील दडपण कमी करण्यासाठी खेळ खेळतो किंवा बघतो. आपले जीवन-देखील एक खेळच आहे.


"दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव,

हासत हासत झेलू, आपण पराजयाचे घाव॥"


खेळ म्हटला, की जय-पराजय, यश-अपयश आलेच. मग यशाने हुरळून जाऊ नका नि पराजयाने खचून जाऊ नका, असा सदेश देणारा खेळ मला आवडतो. खेळ प्राण पणाला लावून खेळला जात नाही; तर कौशल्य पणाला लावून खेळला जातो. कौशल्य प्राप्त होण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. खेळ वैयक्तिक पातळीवर आणि सांघिकपणे खेळला जातो.



लंगडी, कबड्डी, हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केट बॉल, टेनिस इ. पण सध्या सर्वात लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट हा खेळ सांघिकपणे खेळला जातो. या खेळात चौदा प्रमुख खेळाडू असतात. त्यातील अकरा खेळाडू खेळतात. म्हणजेच तीन खेळाडू राखीव असतात. या खेळात गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकारषटकार मारणाऱ्या फलंदाजाला, तसेच अवघड झेल पकडणाऱ्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळते. क्षणाक्षणाला चुरस वाढविणारा हा खेळ आहे.



क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जाते. तरीही, या खेळात सांघिक एकता फार महत्त्वाची ठरते. सांघिक एकता, सहकार्य असल्याशिवाय यश मिळत नाही. कधीकधी एखाद्या खेळाडूने भरपूर धावा केल्या, तरीही संघ यशस्वी होईल, असे निश्चित सांगता येत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा' खेळ आहे. प्रत्येक डाव हा उत्सुकता वाढविणारा असतो. प्रत्येक खेळाडूला अतिशय सावधतेने व जबाबदारीने खेळावे लागते.



ह्या खेळाबद्दलचे सामान्य लोकांना वाटणारे आकर्षण वाढत चालले आहे. खेळाडूंचे चारित्र्य निखळ हवे, तरच खेळ निखळ होईल. निखळपणाबद्दल सांगायचे, तर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना होता. गुंडाप्पा विश्वनाथ संघनायक होते. सामना रंगात आला असताना पंचांनी इंग्लंडच्या एका खेळाडूला बाद दिले. तो निर्णय चुकीचा होता, हे कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथने पंचांच्या लक्षात आणून दिले व त्या खेळाडूला खेळू देण्याची विनंती केली.



पंचांनीही विनंती मान्य करून त्या खेळाडूला खेळू दिले. या निर्णयामुळे सामना फिरला आणि भारताचा पराभव झाला. पण मला वाटते, हा खेळ स्कोअर बुकच्या पलीकडे नोंदवला गेला. कारण या सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवापेक्षा विश्वानाथने निखळ खेळाडू म्हणून नोंदवलेला विजय जास्त महत्त्वाचा !  



म्हणून या खेळात नम्रता, शिस्तपालन, माणुसकी हे गुण खेळातील यशापेक्षा मोठे यश असतात. या खेळामुळे करमणूक होते, ती खेळ पाहणाराची; पण खेळ प्रत्यक्ष मैदानावर खेळणाराचा व्यायाम होतो. 



खेळ खेळल्याने शरीर बळकट होते. खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ असल्याने या खेळात वैयक्तिक विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. शिवाय, खेळामुळे मनाची एकाग्रता वाढते. खिलाडूवृत्ती वाढते. हे सगळे फायदे लक्षात घेता मलाच काय, सगळ्यांनाच आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | My Favourite Game Cricket Essay In Marathi

माझे गाव मराठी निबंध | Maze Gav Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे गाव मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावात असलेेेेेल्‍या अडचणी जर मनावर घेतल्‍या तर कश्‍या प्रकारे सोडवल्‍या जाऊ शकते व त्‍यानंतर झालेल्‍या प्रगतीचे  वर्णन केेले आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आज मी माझ्या गावाची हकिकत सांगणार आहे. त्याचे कारणही महत्त्वाचे आहे. नुकताच शासनाकडून 'निर्मल ग्राम' हा गौरव पुरस्कार माझ्या गावाला मिळाला आहे. पुरस्कारापोटी दोन लाख रुपये मिळाले. हजारो गावांत माझे  गाव 'निर्मल ग्राम' ठरले याचा मला मोठा अभिमान वाटतो.


सह्याद्रीच्या कुशीतील अणूर हे एक खेडे. जमीन खडकाळ, बरड. फारशी सुपीक नाही. पाण्याची तर नेहमीचीच ओरड. गावात साधारण सहाशे-सातशेपर्यंतची वस्ती. गावात शिक्षणाचे प्रमाण कमी. सहकार्य जवळजवळ नाहीच. स्वच्छता बाळगण्याची वृत्ती नाही. गाव एकंदरीत बकाल बनला होता.

maze gav essay in marathi
maze gav essay in marathi


अशा या गावाचे एवढे परिवर्तन कसे झाले? गावाचेच सुदैव म्हणायचे ! गावातला रघू शहरातून गावाकडे परत आला; म्हणून हे सारे घडले ! रघू शहरात नोकरी करत होता. पण त्याची प्रकृती ठीक राहीना म्हणून तो गावाकडे परत आला. रघूला बरे वाटले आणि त्याने गावातच राहायचे ठरवले. रघूला स्वस्थ बसवेना. त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र केले. तो गावात नवा असल्याने त्याचे गावातील कोणाशीही भांडण नव्हते. त्यामुळे त्याच्या विनंतीवरून सगळे एकत्र जमले. रघुने स्वच्छ सुंदर गावाची कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. बहुसंख्य लोकांनी रघूची टिंगल केली.

रघूने कामाला सुरुवात केली. प्रथम त्याने प्रत्येक घराला संडास बांधायची कल्पना मांडली. गावकऱ्यांबरोबर तो स्वतः काम करत असे. गावाची दुसरी अडचण होती ती पाण्याची. गावातल्या महिलांना खूप दूरवरून पाणी आणावे लागत असे. रघूने यासंबंधी खूप विचार केला. काही जाणकारांशी चर्चा केली. त्याने जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तीन विहिरी खणल्या. काही बोअर विहिरी काढल्या आणि जो काही तुटपुंजा पाऊस पडतो त्याचे पाणी अडवण्याचे उपाय सुचवले. बघता बघता गावाचा कायापालट होऊ लागला. गोबर गॅस, ओल्या कचऱ्यापासून खत असे काही प्रकल्प यशस्वी झाले. रघूने पारंपरिक शेतीला वनशेतीची जोड दिली. गावाची आर्थिक स्थिती सुधारली.

गावातील भांडणे संपली. गावकरी गुण्यागोविंदाने राहू लागले. एकमेकांच्या मदतीला जाऊ लागले. गावात दहावीपर्यंत शाळा सुरू झाली. लघुउदयोग सुरू झाले. लोक विधायक कामात गुंतले. बघता बघता माझा गाव निर्मळ झाला. साऱ्या महाराष्ट्रात 'निर्मल ग्राम' हा किताब मिळवणारा माझा गाव आज साऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाला आहे. अशी आहे आमच्या आदर्श गावाची कथा.

मित्रांनो तुम्‍हाला माझे गाव मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद . 


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  •  स्थळ 
  •  गावाचे मूळ स्वरूप 
  •  गावाचे विकृत रूप 
  •  गावातील भांडणे 
  • गावाला लाभलेले योग्य नेतृत्व 
  • गावाच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न
  • गावाचा विकास
  • गावातील भांडणे संपली 
  • निर्मळ गाव.

माझे गाव मराठी निबंध | Maze Gav Essay In Marathi

मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध |  Tourist Destination essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये आंबोली  या पर्यटन स्थळा विषयी माहीती  देण्‍यात आली आहे.उन्‍हाळ्याच्‍या सुट्टीत घालवलेले ते सोनेरी क्षण या निबंधात दर्शविले आहेत ते तुम्‍हाला लक्षात येईलच .  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


 माझे एक काका सावंतवाडीला राहतात. एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही काकांकडे गेलो होतो. आम्ही सर्वचजण आल्यामुळे काका आनंदात होते. मोठ्या उत्साहात त्यांनी आम्हांला संपूर्ण सावंतवाडीचे दर्शन घडवले. एके दिवशी त्यांनी आंबोलीला जाण्याचा बेत जाहीर केला आणि आम्हा मुलांमध्ये उत्साहाची लाटच पसरली. वास्तविक मी पूर्वी आंबोली पाहिले आहे. परंतु हे डोंगरमाथ्यावरील सुंदर गाव पुन्हा पाहायला मिळणार, याचा मलाही खूप आनंद झाला होताच.

Tourist Destination essay in marathi
Tourist Destination essay in marathi


आंबोली हे निसर्गाची कृपा लाभलेले डोंगरमाथ्यावरचे एक छोटेसे गाव आहे. प्रथम आम्ही सावंतवाडीहून गाडीने आंबोलीकडे निघालो, तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 'दानोली' या गावी पोहोचलो. मग रमतगमत डोंगरमाथ्यावरील आंबोली या गावी पोहोचलो. या आंबोलीला अलीकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळू लागल त्याला 'गरिबांचे महाबळेश्वर' म्हणून ओळखतात,

'आंबोली ' या ठिकाणाचा समावेश कोकणातील सिंधदुर्गात केला जातो, अजूनही या ठिकाणाचे शहरीकरण झाले नाही, म्हणून ते घाटमाथ्यावरील एक टुमदार खेडेगावच आह. या घाटमाथ्यावरून सुंदर दृश्ये दिसणारी ठिकाणे आहेत, ते पॉइन्टस म्हणूनच ओळखले जातात. तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी प्रवासी आवर्जून येतात. या आंबोली गावात अजून दोन प्रेक्षणीय स्थानांचा उल्लेख केला जातो. ती स्थाने म्हणजे 'महादेवगड' आणि 'नारायणगड'. गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानांवर गडांच्या कोणत्याही खुणा आज आढळत नाहीत. या गडांच्या आश्रयाने तेथील काही भूमिपुत्रांची वस्ती आहे. अगदी थोड्या पैशात ते भाकरी, पिठले, कढी देऊन आपले स्वागतही छान करतात.

आंबोली घाटाला कोणत्याही काळात पर्यटक भेट देतात, पण खासकरून वर्षा ऋतूत येथील सौंदर्य अनुपम असते. निसर्गराजा प्रसन्न होऊन आपले जलवैभव येथे ओतत असतो आणि शहरातून थकून आलेले पर्यटक या पाण्यात न्हाऊन आपल्या थकव्याला पळवून लावतात. आंबोली-बेळगाव रस्त्यावर थोडी पायपीट केल्यावर हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान दिसते. येथे पार्वतीदेवीचे मंदिर आहे. ही हिरण्यकेशी नदी म्हणजे भगवान महादेवाने पार्वतीला दिलेली भेट अशी कथा सांगितली जाते. पुढे या नदीला चित्री नावाची नदी मिळते आणि मग या मैत्रिणी हातात हात घालून कर्नाटकाकडे मार्गस्थ होतात. या हिरण्यकेशी नदीवर असलेला नागरतास धबधबा आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो.

निसर्गरम्य कोकणातील आंबोलीला आंबा, काजू यांचे वरदान लाभलेले आहेच. पण त्याशिवाय हिरडा, जांभूळ, ऐन, अंजनी इत्यादी औषधी झाडांचे वैभवही प्राप्त झाले आहे. आंबोलीच्या घाटात हिंडताना इतकी रंगीबेरंगी झाडे, पाने, फुले दिसतात की, काय पाहू आणि काय नको असे होते. अजून आंबोली हे एक डोंगरमाथ्यावरील टुमदार खेडे आहे. तेथे पंचतारांकित संस्कृती पोहोचली नाही. त्यामुळे तेथे पुन:पुन्हा जावेसे वाटते.

मित्रांनो तुम्‍हाला मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध हा निबंध कसा वाटला व पर्यटन स्थळाचा तुमचा अनुभव शेअर करू शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आंबोलीला जाण्याचे प्रयोजन
  • आंबोली - निसर्गाचे वरदान लाभलेले एक छोटेसे गाव 
  • गरिबांचे महाबळेश्वर 
  • सुंदर ठिकाणे 
  • महादेवगड, नारायणगड 
  • मूळ वस्ती
  • आंबोलीतील नदी 
  • धबधबा 
  • आंबोलीतील झाडे
  • साधेपणा हाच आगळेपणा.

मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध | Tourist Destination essay in marathi

Maza Avadta San Essay In Marathi | माझा आवडता सण मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता सण मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दसरा या सणा‍विषयी माहीती व महत्‍व देण्‍यात आले आहे.  दसरा या सणाचे नाते महाभारत व रामायणा सोबत कसे आहे हे सांगण्‍याचा प्रयत्न केला  आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

सण ! भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक ! भारतीयांच्या आध्यात्मिक अन् भाविक भावनांतून जन्मले - सण!! प्रत्येक सणाला एक खास व्यक्तिमत्त्व असते. गुढीपाडवा एखाद्या धीरललित राजासारखा !...वस्त्राभरणांनी नटलेली, सौम्य पण प्रसन्न, रसिक नार दीपावली !!...तारुण्याचं वारं प्यालेल्या पंचमी अन् होळी या हरिणी...
याउलट प्रतापशाली वीरोत्तम-दसरा ! माझा सर्वांत आवडता सण. तो येतोच तो उच्चैःश्रवावर आरूढ होऊन. त्याच्या आगमनाच्या तुताऱ्या, वाऱ्यावर डोलणारी झेंडूची फुले, वाजवत आकाश दणाणून सोडतात. गुढीपाडव्याच्या शिरावर राजासारखा राजमुकुट असेल तर दसऱ्याच्या मस्तकी 'शिरस्त्राण' असते. अंगात चिलखत असते. माणसांच्या औक्षणाची मानवंदना स्वीकारत, शरद ऋतच्या आरंभी, वरुणराज जेव्हा पांढरे निशाण दाखवून अंतराळाच्या मैदानातून पळ काढतो, तेव्हा प्रकट होतो, -दसरा!

Maza Avadta San Essay In Marathi
Maza Avadta San Essay In Marathi


हा दसरा आहे मोठा दिमाखदार ! याच वेळी पूर्वी सैन्ये दिग्विजयासाठी बाहेर पडत आणि शत्रूला धूळ चारून खरे सोने लुटून आणीत. प्रभू श्रीरामाने सोन्याच्या लंकेवर चाल केली ती याच मुहूर्तावर. 'रामलीला' महोत्सव रूपानं ती स्मृती अजून जपली जाते. अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी शमी वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे काढली तीही-- याच दिवशी. अन् पुढे महाभारत घडलं. शमी वृक्षाची पूजा आजही करून आपण त्याचा आदर करतो. 'रामायण' व 'महाभारत' दोन्हीची आठवण करून देणारा एकमेव-दसराच.रघुराजानं वरतंतुशिष्य कौत्स याला गुरुदक्षिणा देण्यासाठी स्वर्गातून सोन्याचा पाऊस पाडायला लावला तो दसऱ्याला ! म्हणूनच दसरा हा सोनियाचा सण ! महाशक्तिमान दुर्गादेवीनं 'महिषासुर ' मर्दन केले तेही दसऱ्यालाच.

हिंदू पंचांगातील साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक आहे-हा दसरा ! पावसाळा संपल्याने सैन्याला कूच करणे, पिके तरारून आल्याने ' हातपाय पसरायला' किसानांना मोकळीक मिळणे हे दसऱ्यामुळे मिळते. म्हणून घराघरांतून गोडधोड होते. शस्त्रास्त्रे, वाहने, विद्या, आयुधे यांची पूजा होते. हल्ली आपट्यांच्या पानांवर 'सोने लुटीचा' अन् 'सीमोल्लंघना'चा आनंद मानावा लागतो. 'कालाय तस्मै नमः !' 

दसरा म्हणजे माहेश्वरी ( ऐश्वर्य), महाकाली (शक्ती), महालक्ष्मी (संपत्ती आणि सौंदर्य), महासरस्वती (ज्ञान ) या आदिशक्तींचे पूजन – म्हणजेच दसरा ! तुम्हा आम्हा सामान्यांना दसरा हा अनोखा शुभ दिवस वाटतो. पण तुकाराम म्हणतात,

 'तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ अवघ्या दिशा॥' गोडधोड खाऊन लोळत पडणे हा या सणाचा अपमान आहे. सज्जन, थोर, योगी मंडळींना घरी बोलावून त्यांच्या सहवासापासून विचारांचे सोने लुटणे, काव्यशास्त्रविनोदाची पक्वान्ने आस्वादणे हाच या युगातला दसरा.“ साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ॥" शौर्य, त्याग, वाईट वृत्तींचा शेवट ही त्रिसूत्री सांगून, 'त्येन त्यक्तेन भुंजीथाः ' असा मंत्र कानात सांगून, आपल्या घोड्याला टाच मारून, इंद्रधनुष्याच्या 'फ्लायओव्हर 'वरून हा दसरा निघून जातो. पुन्हा वर्षाचा प्रवास संपवून, ऋतुचक्राचा एक फेरा पूर्ण करून शरद ऋतूच्या प्रारंभी तो पुन्हा दिमाखाने येईल आणि आमच्या जीवनातील रोजची दुःखे विसरून आम्ही सदैव म्हणत राहू,
'दसरा सण मोठा । नाही आनंदा तोटा ।'

मित्रांनो तुम्‍हाला maza avadta san marathi nibandh हा निबंध कसा वाटला व दसरा हा सण तुम्‍ही कसा साजरा करता हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maza Avadta San Essay In Marathi | माझा आवडता सण मराठी निबंध

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा  

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण Zade Lava Zade Jagva  मराठी निबंध बघणार आहोत. या 8 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे निसर्गाचे नुकसान केेले आहे. व त्‍यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना' चा संदेश आहे.  केवळ जंगलतोडीमुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. 

गावोगावच्या नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. 

Zade-Lava-Zade-Jagva
Zade-Lava-Zade-Jagva



अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा'ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? 

निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. 

नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपापल्या परिसरात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.

शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा 'हरितश्यामल' बनेल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व झाडे लावण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे व तुम्‍ही वृक्षप्रेमी असल्‍यास कोणत्‍या उपक्रमात सहभाग घेतला आहे हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • आजचा मानव निसर्गापासून दूर 
  • वृक्षतोड
  • प्रदूषण
  • दुष्काळ
  • पर्यावरणाचा समतोल ढळला 
  • निसर्गाकडे चला 
  • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
  • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
  • वनोत्सव सुरू करावेत 
  • वृक्षमित्र पुरस्कार 
  • जंगल संपत्तीचे महत्त्व 
  • वृक्ष ही जीवनधारा 
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरी

निबंध 2 

एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता. वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एकेक रोप देत होता. अतिशय आवडली मला ही कल्पना.

माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली, वनांचा विध्वंस केला. जंगलांवर कुणाचा हक्क? कुणाची मालकी? कुणाचीही नाही; म्हणजे सर्वांचीच. वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले. मग वाटेत येणारी झाडे; झाडे कसली मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. 

घरे उभारण्यासाठी लाकूड, घरे सजवण्यासाठी लाकूड... पुस्तके, ग्रंथ, कचेयांतील कामांसाठी कागद; त्यासाठी पुन्हा लाकूड. वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टी बांधून आपण झाडे तोडत राहिलो. खेडेगावातील गरजा वेगळ्या, पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच. मग झाडे तोडली जातात.

शेवटी व्हायचे तेच झाले. या बेसुमार वृक्षतोडीमुळे सारा देश उजाड झाला. देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले, की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे ! झाडे कमी झाली, तसा पाऊस कमी झाला. माणसे वाढली, पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला. त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली. आता माणसाला पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला आहे.

मग मात्र माणूस खडबडून जागा झाला. स्वतःला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. आता कुणी झाड तोडू लागला की चारजण धावून त्याचा हात धरतात, त्याला वृक्षतोड करू देत नाहीत.
प्रत्येक मंगलप्रसंगी वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. 

घरात बाळ झाले की  झाड लावा. बाळाबरोबर झाडाला वाढवा. पाहुणे आले; त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा. इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोगप्रसंगी 'स्मृतिवना'त झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत.जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावूनच करायचे आहे. अगदी खेडोपाडी, समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे. त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • झाडांचे महत्त्व
  • नेहमी होत आलेली चूक
  • उजाड देश
  • पाऊस कमी
  • भूगर्भातील पाण्याची पातळी खाली
  • पर्यावरणाचा तोल हरवला
  • आपली चूक उमगली 
  • वृक्षतोड थांबवली  विविध कारणांनी झाडे लावायची. जोपासायची, वाढवायची
  • तरच देश सस्यश्यामल होईल.

निबंध  3 

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना'चा संदेश आहे. परंतु प्रचंड प्रमाणात वाढलेली वृक्षतोड एक दिवस ही पृथ्वी रसातळाला नेईल.


केवळ जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. गावोगावच्या नदयांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.


या साऱ्या गोष्टींवर जे प्रतिबंधात्मक असे अनेक उपाय आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृक्षारोपण होय. अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा' ची कल्पना आता रूढ होत आहे. झाड लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. 

झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.

यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने शाळेच्या आवारात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.


शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. म्हणजे ही वसुधा पुन्हा हरितश्यामल' बनेल.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजचा मानव निसर्गापासून दूर 
  • वृक्षतोड 
  • प्रदूषण 
  • दुष्काळ
  • पर्यावरणाचा समतोल ढळला 
  • निसर्गाकडे चला 
  • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
  • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
  • वनोत्सव सुरू करावेत
  • वृक्षमित्र पुरस्कार
  • जंगल संपत्तीचे महत्त्व
  • वृक्ष ही जीवनधारा
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरी


निबंध  4 

jhade lava jhade jagva


पर्यावरण संतलनासाठी एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टके वनक्षेत्र असणे आवश्यक असते. परंतु आज भारतात २२ टक्के वनक्षेत्र आहे त्यातही दाट वनक्षेत्राचे प्रमाण ६ ते ७ टके आहे. काही राज्यात वने दाट प्रमाणात आढळतात. तर काही राज्यात वनाचे प्रमाण अतिशय विरळ असते. अशाप्रकारे आपल्याला वन वितरणाच्या बाबतीत विषमता आढळते.

वनांबाबतची ही भीषण परिस्थिती फक्त भारतातच नव्हे तर बहुतांशी देशात आढळते. आज अनेक  कारणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. त्यामध्ये घरांसाठी. उद्योगधंद्यासाठी, उद्यानांसाठी, क्रीडागणे, मैदाने, रस्ते, तलाव, धरणे यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे वृक्षांची लाकडे बहुउपयोगी असल्यामुळे ती मिळवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते.

वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वृक्ष CO2 घेतात आणि ऑक्सीजन बाहेर सोडतात. त्यामुळे माणसाला श्वसनासाठी ऑक्सीजन चा पुरवठा होतो, त्याचबरोबर वातावरणातील ऑक्सीजन, आणि CO2  चे प्रमाणही संतुलित राखले जाते.

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वृक्ष हे मातीची धूप होण्यापासून रोखत असतात. पण आता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीची धूप होते आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते आहे. या गोष्टीचा खूप दूरगामी परिणाम मानवावर होऊ शकतो. भविष्यकाळात मानवाला अन्नधान्याची टंचाई भासू शकते.

दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि पर्जन्याच्या प्रमाणात देखील असमतोल निर्माण होत आहे. वृक्ष हे पर्जन्य पडण्यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मानव आपल्या दैनंदिन जीवनासाठी इतर सजीवांवर देखील अवलंबून असतो. या सर्व सजीवांची एक अन्नसाखळी असते. वृक्ष तोड झाल्यामुळे या अन्नसाखळीलाही मोठ्या प्रमाणात बाधा पोहचत आहे. 

कारण बरेच प्राणी, पशू, कीटक हे घनदाट वनात आढळतात. त्या वनांवरच त्यांचे आयुष्य अवलंबून असते. यात आपल्याला प्रामुख्याने वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे यांचा उल्लेख करावा लागेल. वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे या प्राण्यांचे प्रमाण देखील कमी होत आहे. त्यामुळे त्या प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून सरकारला विशेष मोहीम हाती घ्यावी लागत आहे. त्यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे.

वनांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे तो विविध गोष्टींपासून वंचित राहू लागला आहे. कारण मानवाचे जीवन हे मोठ्या प्रमाणावर वनांवर अवलंबून आहे. वनांपासून त्याला इंधनासाठी, घरासाठी, इतर वस्तू बनवण्यासाठी लाकूड मिळते. त्याचबरोबर वनांचे विविध औषधी उपयोगही आहेत. विविध जर्जर व्याधींच्या उपायासाठी आजही मोठ्या प्रमाणात वनौषधींचा वापर होत असतो. 

त्याचप्रमाणे वनांपासून आपल्याला डिंक, लाख, फळे, फुले इ. उपयोगी वस्तूदेखील मिळतात. त्याचप्रमाणे काही आदिवासी जमाती झाडांच्या पाला पाचोळ्यापासून आपली घरे बनवतात. अशाप्रकारे वृक्ष हे कल्पतरू प्रमाणे असतात. ते आपल्याला विश्रांतीसाठी सावली देतात. वृक्ष हे आपल्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होण्यासाठी मदत करतात.

वनांचे अशा प्रकारे विविध उपयोग माहिती असून देखील, त्यांचे प्रमाण कमी होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेसारख्या देशात एक झाड तोडायचे असल्यास त्याआधी दोन झाडे लावावी लागतात. आपल्या देशातही अशी परिस्थिती निर्माण करावयाची असल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. 

लोकांचे वृक्षसंवर्धनाचे फायदे समजून सांगितले पाहिजे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी व्याख्याने आयोजित करून लोकांना वनांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. वनसंपत्ती संवर्धनासाठी जोरदार प्रचार करायला हवा.

त्याचप्रमाणे शाळांतून देखील मुलांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजेत, कारण तेच भावी काळातील नागरिक आहेत. ते ही गोष्ट आपल्या घरच्यांनादेखील सांगू शकतील. त्यांना विविध गोष्टींद्वारे नैतिक मूल्याद्वारे हे पटवुन दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमात देखील वनसंवर्धन विषयक प्रकरणांचा समावेश केला पाहिजे. शाळेच्या मार्फत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ''वृक्षदिंडी'' काढली पाहिजे. 

आज धार्मिक दिंड्यांऐवजी 'वृक्षदिंडी'' ची खरी गरज आहे. त्याचप्रमाणे शाळेत वृक्षसंवर्धन या विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे. शाळेवर, गावपातळीवर सामहिकपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. सर्वात शेवटचा उपाय म्हणजे या विषयांबद्दल कडक कायदे केले पाहिजे. विनाकारण परवानगी न घेता झाड तोडल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. 

याआधी जनजागृती खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी सरकारने जनजागतीसाठी विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन यांचा उपयोग केला पाहिजे. अशाप्रकारे वृक्ष हे मानवी जीवनाचा, निसर्गाचा आधारस्तंभ आहे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

निबंध 


पृथ्वीने सुजनतेला प्रथम जन्म दिला मनुष्यरूपात ! परमेश्वराला वाटलं की या वसुंधरेला फुलवणारं चैतन्य इथे उमलावे, देवांचे व दैत्यांचे समान अंकुर रुजून, एका नंदनवनाची निर्मिती व्हावी, या क्षमेला, प्रेम, दया, शांती या जीवनमूल्यांचे बाळकडू पाजावे. पृथ्वीवर नंदनवन निर्माण करावे, हिरव्यागार मखमली सदाहरित वनांचा प्रसार सर्वत्र व्हावा आणि यासाठीच तर मनुष्याने जन्म घेतला आहे.

कावळा करतो कावकाव म्हणतो; माणसा झाडे लाव, एक तरी झाड लाव, असे म्हणतच आपण मोठे झालो या बालगीतातील बोध मात्र तेथेच विसरून गेलो. पर्यावरण हा शब्द आपणासाठी नवीन नाही, अगदी साध्या शब्दांत पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाची गोळाबेरीज,पर्यावरणाचा समतोल टिकविण्याचे काम निसर्ग करतो. 

जेव्हा निसर्गाच्या कार्यात माणसाचा नको तेवढा हस्तक्षेप वाढतो. म्हणजे हवा, पाणी, जमिनीचा नको तेवढा व नको तसा वापर होऊ लागतो तेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो. मानवाचे स्वास्थ्य हे पर्यावरणाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडले की आपले स्वास्थ्य बिघडते. आपल्या स्वास्थ्याची पर्यायाने पर्यावरणाची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी नाही का ?


पूर्वादीकालापासून संतांनी स्वतःच्या साहित्यातून व वर्तनातून हा आपल्या पर्यावरणाचा समतोल तर सांभाळला आहेच व मार्गदर्शनही केले आहे.तुकोबांनी वृक्ष-वेलींना आपले सगे-सोयरे संबोधले आहे. पण झाडे आपल्याला आरोग्यदायी जीवन देतात कारण 'काळी माती हिरवी सोने' प्राणवायूचे हे कारखाने आपण काटकसर करून सोने विकत घेऊ, प्रतिष्ठा वाढेल सर्व काही मिळेल केव्हा ? 'शिर सलामत तो पगडी पचास' आपण आरोग्याची मूर्ती असू तेव्हा त्या सोन्याचे तेज वाढले ना!

आज धूर ओकणारी वाहने व त्यातील कार्बन त्याबरोबर इतरही अपायकारक घटकद्रव्ये ही आरोग्याला मारक ठरत आहेत. श्वसनांच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या दगदगीच्या जीवनात शांती मिळते कुठे माणूस ती शोधायला निसर्गरम्य परिसराकडे वळतो. पण अशी वृंदावने, बागा आहेत तरी किती ? यांचे प्रमाण इतके कमी का ? याचा थोडा जरी विचार माणसाने केला तर आढळून येते की शहरवासीयांनी टुमदार इमारती, मोठमोठे कारखाने, बांधकामे यांकरिता वृक्षांचा नाश केला. 

वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके झाले, रखरख वाढली, पाऊस अनियमित झाला व पर्यायाने पर्यावरणाचा निसर्गाचा समतोल बिघडला स्वच्छ हवेऐवजी प्रदूषित हवा. याशिवाय पर्याय राहिला नाही. याची जाण आता होऊ लागली आहे. ही एक रोगराई विरुद्धची लढाई आहे. धुरीकरणामुळे सातत्याने छळणारा खोकला हा आपण मित्र बनू न देता वेळीच वृक्ष तोड रोखली पाहिजे. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल चिंता करीत बसण्यापेक्षा नव्याने वृक्ष लागवड करणे यातच शहाणपणा आहे. 

वेळीच जागा होणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे असा हा एककलमी कार्यक्रम अमलात आणणे गरजेचे आहे.
'दुर्दर राहे पाषाणात तया चारा कोण देतो' म्हणणाऱ्या संत सेना महाराजांनी आपणाला प्रश्न केला आहे की जर खडकाखाली राहणाऱ्या बेडकाला आपण चारा देत नाही तर आपल्याला त्याला नष्ट करण्याचा अधिकार काय ? पर्यावरण दूषित करणारे कृमी, कीटक खाऊन बेडूक पर्यावरणाला मदत करतो तो मानवाचा मित्र ठरतो.

 वृक्षतोड झाल्याने प्राणीजीवन विस्कळीत होऊन त्यांना निवाऱ्याची उणीव भासते व काहीवेळेस त्यांचा शिरकाव शहरांमध्ये झाल्यास त्यासारखे भयास्पद ते काय? पाणी, हवा, प्राणी, वृक्ष या सर्वांचा हितकारी संगम म्हणजेच पर्यावरणाचा समतोल.

वृक्ष मानवाचा खरा मित्र आहे तो त्याला लागवड करून सांभाळ करणाऱ्याला आणि त्याचे तोडून तुकडे करणाऱ्यालाही आपली थंड सावली, शुद्ध हवा, फळे, फुले देतो तो कुणाबरोबरही दुजाभाव करीत नाही. 
आपण स्वतःहून वृक्षलागवड करत नसू तर शासनाकडून किंवा सामुदायिकरीत्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संगोपन तरी आपण नक्कीच करू शकतो. वृक्षांचा गैरवापर केल्यास प्रदूषणासारख्या महाभयंकर संकटास तोंड देण्याची वेळ आपल्यावर येईल, हे आपण जाणून आहोतच. 

वृक्ष म्हणजे पृथ्वीने आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवजीवन टिकणार नाही बालपणीच्या पाळण्यासाठी मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्याला सोबत करतात.या भूतलावर आधी वनस्पती व नंतर प्राणिसृष्टी जन्माला आली आहे, वनस्पती नष्ट झाल्या तर त्या मागोमाग मानवी जीवनही नष्ट होईल.

शहरांतील सिमेंट-काँक्रीटच्या उंच जंगलापेक्षा आपणांस जीवन ताळ्यावर आणण्यासाठी उंच उंच वृक्षराजींच्या वेसणीची गरज आहे मानवाला आज तनशांतीपेक्षा मनःशांतीसाठी जास्त भटकावे लागत आहे. बाजारात पैसे टाकला की खाण्यापिण्यातून, हिंडण्याफिरण्यातून मनःशांती प्राप्त होत आहे. पण मनाच्या शांतीचा लळा बाजारात पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले मन बगीचा, उद्यान, अभयारण्य, वन, समुद्र, नदीकाठ, सरोवराच्या शोधात बाहेर पडते. 

निसर्गरम्य वातावरणासाठी खरी गरज आहे. वृक्षांची यासाठी का होईना आपण सामाजिक वनीकरण इ. माध्यमांतून केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपल्या स्वार्थी व नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.आजपर्यंत असे केले असले तरी आज सर्वांना अशी शपथ घेण्याची गरज आहे. 'झाडे लावू आणि झाडे जगवू.' या क्षेत्रात घोषणांना महत्त्व नाही प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे.


निबंध 6

झाडे लावा व पर्यावरण वाचवा



'हिरव्या पानांना पर्याय नाही, संतुलन झाडांशिवाय नाही' अशा ओळी असलेला एक बिल्ला काही दिवसांपूर्वी सामाजिक वनीकरणातर्फे वाटला गेला. तसेच जळगाव जिल्ह्यात इच्छापूर, कुंडशिवार, खामखेडा पूल व टहाकळी या मुक्ताईनगर परिसरात काही सिंचन योजनांचे भूमिपूजन तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे संपन्न झाले. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून जनमानसात पर्यावरणासंदर्भात जागृती होत आहे. 

प्रचंड जंगलतोड, चराऊ कुरणाचा हास व जमिनीची धूप या कारणांमुळे महाराष्ट्रावर वारंवार अवर्षणाचे संकट ओढवून टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून वनीकरण, मृद व जलसंधारण, चराऊ कुरणांचा विकास अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत. 


ज्या प्रदेशात वृक्षांचे जमिनीवर वनस्पतिक आवरण असते, तेथील वातावरण पावसाला अनुकूल असते. कारण तेथल्या जमिनीतून व वनस्पतींच्या पानांतून जे बाष्पीभवन होते, त्यामुळे हवेत आर्द्रता निर्माण होते. ही आर्द्रता ढगातून पाऊस पाडण्यास कारणीभूत होते. म्हणून वनीकरण, फलोद्यान, गवते व चारा यांची लागवड करणे गरजेचे वाटते. 



वृक्षतोडीमुळे भूपृष्ठ, माळराने उजाड झालीत. पावसाचे पडणारे पाणी या हिरव्या झाडाझुडुपांमुळे अडून राहते. मूळांकडे जाते. म्हणजे भूगर्भात पाणी मुरवण्याचे काम निसर्ग करीत असतो. म्हणून वृक्षारोपण केले, तर पाण्यासाठी दाही दिशा अशी कठीण अवस्था होणार नाही.


मानवजातीकडून होणाऱ्या निसर्गावरील वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत चालला आहे.  मूलभूत गरजा भागवताना होणारी वनसंपत्तीची बेछूट लूट थांबणे व त्याचवेळी पुनर्निर्मिती अर्थात झाडे लावणे आवश्यक आहे. 'नैसर्गिक संपदेचा नाश हा अविचार' आणि 'वृक्षारोपण हा आजचा सुविचार' आहे. वृक्षारोपण केले, तरच भूगर्भातील पाणीपातळी सांभाळली जाईल.


श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३०० वर्षांपूर्वीच त्यांच्या आज्ञापत्रांत वनउत्पादनातल्या वापरासंबंधी काही तत्त्वे ठरवून दिली आहेत. ते म्हणतात, 'रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिविलयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?' सम्राट अशोकाने २३०० वर्षांपूर्वी 'राजाज्ञेत प्राणिसंरक्षण आणि वृक्षसंवर्धन याविषयी नमूद केले होते. 


आज तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषण वाढत आहे. ही दखलपात्र घटना वरील पार्श्वभूमीवर विचारात घेण्यासारखी आहे. म्हणून या पर्यावरणाच्या जाणिवेची नितांत गरज आहे.
रस्त्याने चालताना डोक्यावर सावली धरणारी झाडे दिसत नाहीत. वृक्षामुळे आपणास अन्न, प्राणवायू, आर्द्रता मिळून मृद्संहार थांबतो. त्याशिवाय का तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लींना आपले सोयरे मानले? म्हणजे झाडे जसे भूमिपुत्र, तसे आम्हीही याच मातीची लेकरे... म्हणून 'झाडे लावा आणि पर्यावरण अर्थात विश्व वाचवा' अशा घोषणा अस्तित्वात आल्या.


वृक्षदिंड्याही कौतुकाने निघतात. चांदोबा लपायलाही पूर्वीपासून निंबोणीचे 'झाड' च लागत आले आहे. परसदारी पवित्र ‘तुळसी' चे रोप लागते. मंगलप्रसंगी केळीचे खोड स्नेह्यागत उभे राहते, तर आंब्याची पाने शुभ पताका होऊन दारी मुंडावळ्यागत शोभिवंत होतात. अशी संगसोबत आयुष्यभर झाडे देतात. खऱ्या अर्थाने सोयरे छायादायी ठरतात. बालकवींच्या शब्दांत हरिततृणांच्या मखमालीचे हिरवेहिरवेगार गालिचे आपल्या रंग-सौंदर्याने डोळियांचे पारणेच फेडतात. 


झाडे-पाने, फुले, फळे, औषधी, इंधने, सुगंध, पाऊस, छाया, आधार, चारा, प्रदूषणशोषण, निवारा एवढेच नव्हे, तर पैसासुद्धा देतात. म्हणूनच 'चिपको आंदोलन, वृक्षमित्र मंडळे, जलसंवर्धन, सामाजिक वनीकरण, वनशेती, पर्यावरण बचाव... या साऱ्या गोष्टींना खूप महत्त्व येत आहे.  प्रत्येकाने वृक्षवल्ली वाचवण्याचा, वाढवण्याचा स्वयंनिर्धार करायला हवा.


पर्यावरणाचे आपण केवळ वारसदार नसून त्याचे रक्षण करून, त्याला समृद्ध करणारे विश्वस्तही राहू. काळाची गरज म्हणून पर्यावरणाचा समतोल कायम राखू आणि त्यासाठी झाडे लावू !" यानिमित्त 'वनराई' चळवळीचे जनक मोहन धारियांना सलाम ! 'सामाजिक वनीकरण-ग्रामीण फळबागा-परसबागा' ही ग्रामीण विकासाची त्रिसूत्री राबविणाऱ्या अवघ्यांना सलाम ! 'एक व्यक्ती-एक झाड' योजना जे प्रत्यक्ष आचरणात आणतील, त्या प्रत्येकाला सलाम ! ‘पाणी अडवा - पाणी जिरवा' मोहीम राबविणाऱ्या राळेगणसिद्धीच्या सिद्धपुरुषाला अर्थात अण्णा हजारेंनाही सलाम !


चला, पर्यावरण वाचवण्यास, झाडे लावण्यास कटिबद्ध होऊया 
 रक्षावया पर्यावरण, उपाय एकच... वृक्षारोपण

निबंध 7


 झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध 

निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, पहाड, विविध प्रकारची झाडे, वेली, पशू, पक्षी, कीटक, सूक्ष्म जीव इत्यादी सर्व मानवाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे. ही पृथ्वी सुंदर दिसते ती झाडे वेलींमुळे. झाडे नसती तर ही पृथ्वी उजाड, भकास दिसली असती. केवळ नद्या, नाले, पहाडांनी ही वसुंधरा सुंदर दिसली नसती. म्हणून पृथ्वीच्या सौंदर्यात वृक्ष वेलींचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचा साज श्रृंगार म्हणजे झाडे वेली.



तुकाराम महाराज केवळ वृक्ष वेलींनाच सोयरे मानतात असे नव्हे तर (वनचरे) वनातील प्राण्यांना सुद्धा ते आपले सोयरे मानतात. पक्षांचा मंजूळ स्वर त्यांना अतिशय आवडतो. मानवांच्या गोंगाटापासून जर दूर जायचे असेल तर भरपूर वृक्ष वेली असलेल्या वनात जावे लागेल. तेथे एकांत मिळतो. तुकाराम महाराज कधी-कधी एकांतात बसून मनन चिंतन करीत असत. 



एकांतात लोभ, मोह,माया, लालसा, द्वेष, मत्सर, या दुर्गुणांपासून मनूष्य दूर होतो. त्यामुळे एकांत सुखकर वाटतो. निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रसन्न होते. पृथ्वीचं हे सुंदर रुप, विविध पशु पक्षी, त्यांचे विविध आवाज, खळखळ आवाज करुन वाहणारे ओढ्याचे पाणी, विविध रंगाची व विविध आकाराची फुले. त्यांचा वेगवेगळा सुगंध, वेगवेगळ्या रंगाची व आकाराची फळे, प्रत्येकाची वेगळी चव, वळणाच्या वाटा,चढ उताराचा रस्ता, ह्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायचा असेल तर  निसर्गाच्या सान्निध्यात जावे लागेल. परंतु अशी ठिकाणे दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहेत. 


मनुष्य वृक्षांची कत्तल करतो आहे. जंगलेच्या जंगले नष्ट होत आहेत. जंगले नष्ट करणे म्हणजे मानवी जीवन धोक्यात घालणे होय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज वृक्षांना व वनचरांना आपल्या सोयऱ्यांची उपमा देतात. त्यामुळे त्यांच्या ह्या अभंगाला शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. त्यांचा हा अभंग मानवाला एक चेतावणी आहे की जंगले व त्यातील प्राणी नष्ट करु नका. नातलगा प्रमाणे त्यांना महत्त्व द्या. अन्यथा आपली हानी करुन बसाल. 


त्यांच्या चेतावनीची प्रचीती आज आपणास येत आहे. २००५ मध्ये कोंकणातील दासगाव, जुई इत्यादी गावे भूस्खलनामुळे गाडली गेली होती. तसेच २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीन हे गाव सुध्दा पूर्णपणे गाडले गेले. हा सर्व जंगल तोडीचा दुष्परिणाम आहे. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा हा दुष्परिणाम आहे.
जर कराल नष्ट जंगले तर, धराशायी होतील बंगले वाचवा वृक्ष वल्ली, वनचरे ,तरच राहील भविष्य बरे

निबंध 8


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! संत तुकारामांनी ३०० वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!' वृक्ष, जंगले यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना आपले सगेसोयरे म्हटले आहे. माणसाचे निसर्गाशी नाते अतूट असते. मानवी


जीवन वनस्पतींवर अवलंबून असते. वनस्पती नसतील तर मानवी जीवन अस्तित्वातच राहणार नाही. म्हणून वृक्षवल्ली हे आपले निसर्गधन आहे. फार पूर्वी मानव निसर्गाच्या सान्निध्यातच वनांमध्ये राहत होता. अन्न, निवारा, वस्त्र (वल्कल) त्याला वृक्षांपासूनच मिळत होते. आजारी पडल्यास औषधे वृक्षवेलींपासूनच मिळत होती. त्यामुळे औदुंबर, तुळस अशा वनस्पतींत दैवी अंश आहे असे मानत असत, आजही आपण या वृक्षांना पवित्र मानतो.


'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमलीचे' अशी बालकवींनी वर्णिलेली मखमली हिरवळ आपणा सर्वांनाच आवडते. हिरव्यागार वनश्रीने नटलेले निसर्गाचे रूप आपल्या सान्निध्यात माणसाला आनंदाने बेहोष करून टाकते. त्याच्या मनातील उदासीनता नाहीशी करून त्याचे मन प्रसन्न करून टाकते. त्यामुळे हल्ली अनेक लोक पर्यटनाद्वारे निसर्गाच्या कुशीत जात असतात. वृक्ष केवळ मनालाच शांती देतात असे नाही, तर मानवाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करतात.

जंगले असल्यास पाऊस भरपूर पडतो, जमीनीची धूप होत नाही, आपल्याला फळे, फुले, छाया यांची लयलूट होते. इमारती बांधण्यासाठी लाकूड, फर्निचरसाठी लाकूड, कागद निर्मितीसाठी लाकूड वृक्षांपासूनच मिळते. वृक्ष हवाशुद्धीचेही काम करतात. कारखान्यातून निघालेला दूषित वायू, कर्बवायू शोषून प्राणवायू बाहेर सोडतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनेही जंगलांचे महत्त्व खूपच आहे. 



आजकाल वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे जास्ती पाऊस, कमी पाऊस अशा दुर्घटना घडू लागल्या आहेत. मातीची धूप, दरडी कोसळणे अशा गोष्टी हल्ली जास्त प्रमाणात आढळून येतात. झाडे वातावरणातील उष्णता शोषून घेतात म्हणून झाडांभोवती गारवा असतो. हिरवी सृष्टी मनाला आल्हाददायक वाटते. 



आजकालच्या विज्ञानयुगात माणूस निसर्गापासून दूर चालला आहे. उंचउंच इमारतींच्या जंगलात खरी जंगले नामशेष व्हायला लागली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. हा तोल साधण्यासाठी पुन: झाडे लावण्याची मोहीम चालू झाली आहे. 'झाडे लावा, देश वाचवा' अशी घोषणा करून सरकारने सामाजिक वनीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. 


बहुगुणांचे 'चिपको आंदोलन' यासाठीच आहे. सरकारप्रमाणेच सामान्य माणसाचाही हातभार लागणे आवश्यक आहे. तेव्हा एकमेकांना भेटीदाखल रोप द्यावे, कुटुंबात मूल जन्माला आले की एक झाड लावावे, त्याची देखभाल करावी. सहकारी सोसायट्यांनी आपल्या परिसरात झाडे लावावीत. म्युनिसिपालिटीने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत. तसेच जंगलतोड होऊ नये म्हणून कागद कारखाने स्वत:च बांबूची जंगले वाढवितात. काही देवराया असतात, असे मानले जाते. म्हणजे काही जंगले देवांची मानतात. त्या ठिकाणी कोणी झाडे तोडत नाहीत. त्यामुळे त्या वृक्षांचे जतन होते.


या साऱ्या गोष्टींना यश येऊन पुन: जिकडेतिकडे हिरवेगार वृक्ष दिसू लागतील, सुजलाम् सुफलाम् अशी भारतभूमी नंदनवन बनेल, अशी आशा करूया. यंत्रयुगाची यांत्रिकता, कागदपत्रांची उलाढाल हे काही काळ दूर सारून माणूस वनराईच्या संगतीत राहिला तर निसर्गाचा  रंग त्याच्या मनावर चढेल आणि निसर्गाशी असलेले नाते घट्ट विणीने विणले जाईल. मानव निसर्गाशी एकरूप होईल, निसर्गात मिसळून जाईल.

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा

Mazi Aaji Essay In Marathi

निबंध क्र १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आजी मराठी निंबध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावाकडे राहणा-या आजीची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात आजीने माझे म्हणजे नातवाचे पुरवलेले लाड, गावात असणा-या लोकांची मदत आजी कश्‍याप्रकारे करते हे  तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


बाबांना 'पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी गावाहुन आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, " अरे नंदू, माझी खुप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.


आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.


माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करीत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग'! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही हे खरंच!  


हे  निबंध पण वाचा  




आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची 'मोठी आई' बनली आहे.

Mazi Aaji Essay In Marathi
Mazi Aaji Essay In Marathi


आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःची सर्व कामे  आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. आजी दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते. 


आजी स्वतःसाठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व गावाकडील तुमच्‍या कोणत्‍या आडवणी ताज्‍या झाल्‍या त्‍या तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद 
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शहरापेक्षा खेडेगावात राहणे आजीला आवडते
  • पंच्याहत्तरी ओलांडली तरी
  • तेवढीच कार्यव्यग्रता 
  • सुरुवातीपासून आदर्शवादी जीवन 
  • दुसऱ्यांसाठी झटणे 
  • वेळ अपुरा पडतो 
  • कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सतत कामात दंग.

निबंध क्र २ 

Majhi Aaji Essay In Marathi


माझी आजी ! आमच्या कुटुंबातील वयाने सर्वांत मोठी, वडीलधारी व्यक्ती. तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. ती सकाळी आमच्या लवकर उठते. अंघोळ आटोपली की ती माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात वावरते. आई तिला काम करू देत नाही. पण आजी ऐकतच नाही. आजीला स्वयंपाक करायला खूप आवडते. न्याहारीसाठी ती कधीतरी एखादा पदार्थ करते. तिने केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला की ती खूश होते. दुपारी जेवून झाले की काही वेळ ती टी. व्ही. पाहते. कधी कधी टी. व्ही. पाहता पाहता तेथेच झोपते. संध्याकाळ झाली की ती फेरी मारायला बाहेर पडते. ही संध्याकाळची फेरी मात्र ती कधीच चुकवत नाही.


माझी आजी एका कारणासाठी मला खूप आवडते. ती कधीही रागावत नाही. मला तिने अजूनपर्यंत एकदाही साधी एक चापटही मारलेली नाही. एकदाही रागावली नाही. उलट, आईबाबा रागावले की ती माझीच बाजू घेते. माझ्या बाबांनाच दटावते ! आईबाबा अभ्यासासाठी खूप मागे लागले, तरी आजीला आवडत नाही. त्यामुळे मी आजीवर खूश ! तिने काहीही सांगितले की मी ताबडतोब करतो. तिला वाईट वाटणार नाही. याची काळजी घेतो. आईबाबासुद्धा आजीसारखेच वागले, तर किती छान होईल ! 



आजीला वाचनाचा छंद आहे; पण हल्ली तिचे डोळे दुखतात. मग ती मलाच, वाचायला सांगते आणि ती ऐकते. तिला माझी अभ्यासाची पुस्तकेसुद्धा आवडतात. माझीच पुस्तके मला मोठ्याने वाचायला सांगते. दररोज संध्याकाळी मी तिच्यासाठी माझे एखादे पुस्तक वाचतो. मध्ये मध्ये तिला काही कळले नाही की ती मला आपली शंका विचारते. मीसुद्धा माझ्या परीने तिचे शंकानिरसन करतो. अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागले आहे की, आजीला वाचून दाखवता दाखवता माझा अभ्यास आपोआप होत असतो.


एका गोष्टीसाठी मात्र तिचा खास आग्रह असतो. काहीही खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, असे ती सांगते. बाबांनासुद्धा ती तसेच सांगते. आजीने काहीही सांगितले की बाबा निमूटपणे ऐकतात. माझे मित्र घरी आले की आजी बेहद्द खूश होते. ती काहीतरी खाऊ करून त्यांना देतेच. ऐंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते. ती कधी आजारी पडल्याचे मला तरी आठवत नाही. कधीतरी ती मला आपले पाय चेपायला सांगते, तेवढेच. अशी ही माझी आजी मला खूप खूप आवडते.


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • माझी आजी साधी 
  • दिनक्रम 
  • सकाळी अंघोळीनंतर देवपूजा
  • स्वयंपाकात आईला मदत
  • दुपारी टी. व्ही. पाहणे
  • संध्याकाळी फेरी मारणे
  • रागावत नाही
  • नीटनेटकेपणा स्वच्छता 
  • मित्रांशी प्रेमाने वागते 
  • अजूनही ठणठणीत.



निबंध क्र ३ 

आजीने केव्हाच सत्तरी ओलांडली आहे, पण याची आठवण आजीला कुठे आहे? तीन वर्षांपूर्वी तिचा सत्तरावा वाढदिवस साजरा करायला आम्ही सगळेजण तिच्या घरी-तळेगावला गेलो, तेव्हा तिला धक्काच बसला. आपण इतके वृद्ध झालो आहोत, असे तिच्या कधी स्वप्नातही आले नव्हते.आजीचे म्हणजेच आम्हा सर्वांचे घर तळेगावला आहे. तेथून जवळच आमचा एक शेतमळा आहे.

त्यामुळे माझे बाबा, काका, आत्या शिक्षणासाठी आणि पुढे नोकरी-व्यवसायासाठी गावाबाहेर पडले, तरी आजीआजोबा तळेगावच्या घरातच वास्तव्य करून राहिले आणि आजोबांच्या मागेही आजी आजवर त्याच घरात एकटी राहते. आपण एकटे आहोत असे मुळी तिला कधी वाटतच नाही. दिवसभर ती आपल्या कामातच गुंतलेली असते. आमची आजी तेथील शेजारपाजारच्या लोकांची 'आई' आहे.

ती सकाळी लवकर उठते आणि आपली स्वत:ची सर्व कामे उरकून, थोडीशी न्याहारी करून गावातल्या 'निवारा' केंद्रात जाते. तेथे अनेक वृद्ध राहतात. त्यांतील काही वृद्ध निराधार आहेत. रोज दोन तास आजी तेथील मंडळींची कामे करत असते. कुणाचे पत्र लिहायचे असते, कुणाच्या शर्टाला गुंड्या लावायच्या असतात. अशी बारीकसारीक हजारो कामे करताना आजी स्वत:ला कधी वृद्ध समजतच नाही.

दुपारच्या वेळी काही गृहिणी जमतात. त्यांच्याबरोबर चांगल्या पुस्तकांचे वाचन, वर्तमानपत्रांचे सामुदायिक वाचन, त्यावर चर्चा, चिंतन असे तिचे कार्य सतत चाललेले असते. तोपर्यंत दुपार संपत येते. नंतर आजी जवळच्या एका आदिवासी पाड्यावर जाते. त्या आदिवासी स्त्री-पुरुषांना चांगल्या कामात गुंतवून व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आजी धडपडत असते. हातपाय चालतात तोवर माणसाने काही तरी कार्य करत राहिले पाहिजे अशी तिची शिकवण आहे. खऱ्या अर्थाने आजी त्या गावाच्या परिसरातील लोकांची आई झाली आहे.


निबंध क्र ४ 

आमची आजी घरातील सर्वांना खूप आवडते. ती नेहमी हसतमुख असते. सगळ्यांशी प्रेमाने वागते.आमची आजी अजिबात आळशी नाही. ती सर्वांच्या आधी उठते आणि रात्री मात्र सर्वांत लवकर झोपते. ती आम्हांला नेहमी सांगते, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास ज्ञान, आरोग्य भेटे." सकाळी उठल्यावर स्वत:ची सर्व कामे आटोपून घेते. मग देवपूजा व पोथीवाचन करते. देवपूजेनंतर न्याहरी करते. त्यानंतर ती आईसोबत थोडे कामही करते.

 नऊ वाजेपर्यंत सगळेजण आपापल्या कामावर निघून जातात, मग आजी एकटीच घरी असते. तीच मग घराची काळजी घेते. संध्याकाळी आम्ही घरी येतो, तेव्हा ती आम्हाला काहीतरी छानसा खाऊ करून देते,संध्याकाळी ती मुरलीधराच्या देवळात जाते. तेथे ती सातपर्यंत रमलेली असते, घरी जाल्यावर थोडेसे काहीतरी खाऊन ती वाचन करते आणि मग झोपी जाते. अशी ही आमची आजी सर्वांची आवडती आहे.
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजीचे घरातील आणि इतरांच्या मनातील स्थान 
  • वयदिनक्रम 
  • सुगरण, सुगृहिणी 
  • संध्याकाळी देवळात 
  • रात्री जेवण, वाचन व झोप.

निबंध क्र 5

“मी देवळात जाऊन येते ग,' पूजेच्या तबकात ओंजळभर मोगऱ्याची फुलं आणि दुर्वांची जुडी ठेवत आजी आईला म्हणाली. आम्हा नातवंडांपैकी एकालाही बरोबर चलण्याचा आग्रह तिने केला नाही. कारण आज तिला एकटीलाच जायचे होते. त्या दिवशी आजीने गजानन महाराजांच्या पादुकांवर मोगऱ्याची फुले वाहून माथा टेकवला तो अखेरचाच! मनाचा मोगरा, देहाचे दुर्वांकुर योगिराजाच्या चरणी समर्पित केले. असं भाग्याचं मरण 

एखाद्याच्याच भाळी रेखलं असतं.  आजीच्या मृत्यूने आमच्या कुटुंबावर दुर्भाग्याची कुन्हाड कोसळली. अपत्यांवर, सुनांवर, नातवंडांवर अतूट माया करणाऱ्या त्या माऊलीने 'भरल्या गोकुळा' चा कायमचा निरोप घेतला. 'देवळात जाते' सांगून 'देवाघरी' प्रयाण केले. आम्ही शोकावेगाने फोडलेला टाहो तिला ऐकू जाणार नव्हता. एकाच वर्षाच्या आत आजोबा-आजीचं छत्र हिरावून घेणारा देव ‘दयाघन' उरला नाही. आमचं दुःख शब्दातीत होतं.


आमच्यावर आजीचा केवढा जीव ! बाबा म्हणायचे, "तुझं मुलांपेक्षा नातवंडांवर काकणभर जास्तच प्रेम आहे.' त्यावर ती उत्तरायची, “अरे बाबा, नातवंडं म्हणजे दुधावरची साय'' खरं सांगायचं तर तिने आम्हाला सायीपेक्षाही जास्त जपलं. तिच्या शब्दात काय जादू होती कोणास ठाऊक, तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पटायची. साहजिकच तिची अवज्ञा करण्याचा प्रसंग सहसा येत नसे.


लवकर उठणे, देवपूजेसाठी फुले तोडणे, आईला छोट्या छोट्या कामात मदत करणे, नियमित गृहपाठ करणे, संध्याकाळी खेळून आल्यावर शुभंकरोति, रामरक्षा म्हणणे यामुळे आजी माझ्यावर खूष असायची. माझी चुलत भावंडं लटक्या रुसव्याने म्हणायची, "नाहीतरी समीरदादा आजीचा जास्तच लाडका आहे.'' लोण्याहून मऊ अंतःकरणाची आजी कठीण वज्राचा भेद करण्याइतकी खंबीरही होती. तिचं जीवन म्हणजे एक कंटकमय प्रवास.


ऐन तारुण्यात आजोबांना अपघात झाला. 'जिवावरचं पायावर निभावलं' यातच आजीनं समाधान मानल. पदरी तीन अपत्य. संसाराचा गाडा कसा रेटायचा? यक्षप्रश्न होता. युधिष्ठिराच्या स्थिरतेने, चतुराईने तिने तो सोडवला. सुदैवाने एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पतीची सेवा, मुलांचं संगोपन करता करता विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याचे काम ती मनापासून करू लागली. तिच्या उद्बोधक गोष्टी नि सुरेल आवाजातील कविता ऐकणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक सुखद अनुभव होता.



आजीच्या स्वभावाचा एक उल्लेशनीय पैलू म्हणजे ती 'आदर्श सासू' होती. तिने सुनांना भरभरून प्रेम दिले. त्यांना माहेरची आठवण येऊ दिली नाही. “सून म्हणजे गृहलक्ष्मी. ती प्रसन्न असली तर घरात स्वर्गसुख नांदतं' असं तिचं ठाम मत होतं. त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला न घातला त्यांच्यावर प्रेमाचा अंकुश ठेवण्याचं तंत्र तिला उत्तम साधलं होतं. पुरणपोळी खावी तर आजीच्याच हातची. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली आजी 'सुगरण' होती हे सांगायलाच नको. चटणीपासून पंचपक्वान्नांपर्यंत तिच्या हातच्या प्रत्येक पदार्थाला अमृताची गोडी असायची. जेवणाऱ्याने तृप्तीची ढेकर दिली की आजीचं मन आनंदाने तुडुंब भरायचं. चेहऱ्यावर समाधान झळकायचं.


तिचं प्रत्येक काम स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकं. अंगणात रेखलेली रांगोळी असो की पाटीवर लिहिलेली बाराखडी असो, ती पुसावीशी वाटत नसे. तिला काय येत नव्हतं ते विचारा. शिवणकाम, विणकाम, भरतकाम, पाककला, हस्तकला सर्वच कलांमध्ये तिला चांगली गती होती. अशा 'बहुगुणी' आजीचे गुण किती व" नि किती नको?


आजी म्हणजे अस्सल चंदनी खोड. झिजणे हा तिचा मंत्र. आजाऱ्याची शुश्रूषा करायची, अडल्यानडल्याच्या मदतीला धावून जायचे, हतबल झालेल्याला धीर द्यायचा हेच तिचं जीवनव्रत होतं. उपासना होती, देवपूजा होती. तिने व्रतवैकल्यं, सोवळंओवळं, पूजापोथी याचं फारसं अवडंबर केल्याचं स्मरत नाही. 'Work is worship, Duty is God' हे वचन तिनं आपल्या जीवनात उतरवलं होतं. तिच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला तेव्हा मनात विचार चमकून गेला, चितेवर रचलेली काष्ठे चंदनाची नसतील, पण देह मात्र अस्सल चंदनी आहे.'

निबंध क्र 6

 माझी आजी ही माझ्या जीवनातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. तिचे वय साठ वर्षे आहे. मात्र तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे. मी आजपर्यंत तिला कधीही आजारी पडलेले किंवा औषधे घेताना पाहिले नाही. फक्त वाचण्यापुरता तिला चश्मा लावावा लागतो. तिचा पोशाख म्हणजे साधी पण स्वच्छ सुती साडी. स्वच्छतेच्या बाबतीत ती फार काटेकोर असते.


आजी कायम हसतमुख असते. ती आजोबांच्या तब्बेतीची सर्व प्रकारे काळजी घेते. दिवसभर ती स्वत:ला व्यस्त ठेवते. तिला वाचनाची अतिशय आवड आहे. वेळ मिळेल तेव्हा ती पुस्तके वाचते. रोज संध्याकाळी ती नियमाने फिरायला जाते. सणांच्या दिवशी मंदिरात जाणे, पूजा-अर्जा करायला तिला अतिशय आवडते. तिने बनविलेले पदार्थही अतिशय रुचकर असतात. ती अतिशय शिस्तप्रिय आहे. आम्हा नातवंडांनाही ती शिस्तीचे धडे देत असते. बाबा तिचा व आजोबांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही काम करीत
नाहीत.


मला माझी आजी खूप आवडते. आई किंवा बाबा मला रागवल्यावर तीच माझी समजूत काढते. मी परिक्षेत चांगले गुण मिळवल्यावर ती माझे कौतुक करते. रोज झोपतांना ती मला एक छानशी गोष्ट सांगते. आजी आमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती आहे. मला माझी आजी खूप आवडते.

निबंध क्र 7

माझी आजी मराठी निबंध 


माझी आजी :  माझ्या आजीचे नाव आहे 'मथुरा'. ती मुंबईला  राहते. तिला निसर्ग फार आवडतो . तिला स्वच्छता फार आवडते. ती शिस्तप्रिय आहे. तिला रिकामे बसणे आवडत नाही . वेळ अमूल्य आहे, वेळेचा सदुपयोग करा हाच तिचा संदेश आहे.


सत्तरी उलटली तरी ती उद्योगी आहे. 'आळसे कार्यभाग नासतो' हे तिचे ठाम मत आहे. अजूनही ती दिवसभर घरकाम , बागकाम , समाजकार्य यात मग्न असते. ती रोज सकाळी देवदर्शनास जाते, ज्ञानेश्वरी वाचते, गीतेचे श्लोक म्हणते, बातम्या ऐकते व सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाते. तिला समुद्र, खळाळणाऱ्या लाटांचं संगीत , देखणा सूर्यास्त सारं खूप आवडतं. शांतपणे निसर्ग निरखित ती बराच वेळ स्तब्धपणे बसून राहते. जणू अथांग सागरासारख्या या अथांग जीवनाचा वेध घेत असावी.



माझी आजी उत्तम कवयित्री आहे. निसर्गाचं सान्निध्य तिला खूप आवडतं. वृक्ष , लता, वेली, पाखरं , चंद्र, चांदणे, धरती, आभाळ हे तिचे जिवाभावाचे शब्द . आपल्या हृदयातल्या भावना या शब्दात ती सहजगत्या ओवते. कविता जन्माला येते. नुसते शब्द नसतात ते! सारं जीवन बध्द असतं त्यात! 


आजीचं शिक्षण फारसं झालेलं नसलं तरी हृदयानं ती खूप खूप श्रीमंत आहे, मोठ्या मनाची आहे. केस पांढरे झाले पण मनाचा हिरवेपणा कायम आहे. ती चिरयौवना आहे. दुःखी, गरजू यांच्या हाकेला ती धावून जाते. सर्व जण तिला 'आजी' च म्हणतात.


पांढरी शुभ्र साडी, नितळ कांती, हसरा चेहरा, बोलके डोळे, केसांचा घट्ट अंबाडा, त्यात खोचलेले गुलाबाचे फूल, सारं काही सुंदर. तिच्या हातच्या बेसनाच्या लाडूची चव काही वेगळीच! अन्न हे पूर्णब्रह्म आहे, फक्त उदरभरण नाही, हे तिनेच मला समजाविले . संस्काराचं जे खत-पाणी तिने मला दिलं , तो माझा अमूल्य ठेवा आहे. तिच्याबरोबर राहण्याची गोडीच अवीट आहे. प्रत्येक सुटीत मी आजीकडे जातो.



सुटी संपली की तिला सोडून निघणं जिवावर येतं. पाय निघतच नाही तिथून . आम्हा दोघांचेही डोळे पाणावतात तिच्या सहवासातले क्षण अलगद मुठीत मखमली मुलायमतेने लपवून मी निघतो, परत लवकर येण्यासाठी! ती बरोबर नसताना तिने सांगितलेल्या गोष्टी आठवतात , मग एकटाच मी कधी खदाखदा हसतो तर कधी एकटाच हमसाहमशी रडतो.


तिने माझ्याबरोबर दिलेली तिची औषधे मला हमखास बरी करतात इतिहासातले आदर्श तिने गोष्टीतून माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात पेरले आहेत ; मला त्याची जाणीव आहे. मला खऱ्या अर्थाने 'मोठे' होऊन कुटुंब, समाज , देश यांचे ऋण फेडायचे आहे. तिनेच मला सांगितले 
“ फेक भविष्य फसवे,
हाती ठेव वर्तमान..." 

इतक्या सहजतेने ती जीवनाला सामोरं जाणं शिकविते . ती माझा गुरू , मित्र सारं काही आहे. दुधावरच्या सायीसारखं ती मला जपते. तिच्या मायेच्या पदराआड अखिल विश्वातली भीती लुप्त होते. तिच्या प्रेमात मी आकंठ तृप्त होतो. फुलासारखं कोमल तर प्रसंगी वज्राहूनही कठीण असं तिच हृदय आहे. माझ्या निराशेवर ती फुकर घालते. तिचे वर्णन करायला शब्द थिटे पडतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Mazi Aaji Essay In Marathi | माझी आजी मराठी निबंध

Maze Baba Marathi Essay | माझे बाबा मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे बाबा मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये एका सामान्‍य कुटुंबातील वडीलांची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात तुम्‍ही तुमच्‍या वडीलांचा व्यवसाय व माहीती जोडुन आवश्‍यक तेथे बदल करू शकता. जास्‍त वेळ न घेता सुरूवात करूया निबंधाला  .

महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. ) :

  • वडिलांविषयीची भावना 
  • वडिलांचा व्यवसाय
  • वडिलांचा दिनक्रम
  • वडिलांचे कुटुंबीयांशी वागणे
  • वडिलांचा छंद

माझे बाबा मला खूप आवडतात. त्यांचा मी लाडका मुलगा आहे. माझे बाबा हे पदवीधर आहेत. नोकरी करत करत त्यांनी शिक्षण घेतले. आपण स्वतःचा एखादा व्यवसाय करायचा, असा त्यांनी निश्चय केला होता. त्यामुळे ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. सुरुवातीला ते दुसऱ्याची रिक्षा चालवत; पण आता त्यांनी स्वत:ची रिक्षा घेतली आहे.
Maze Baba Marathi Essay
Maze Baba Marathi Essay

बाबा सकाळी लवकर उठतात. आंघोळ आटोपतात. देवपूजा करतात आणि आठ वाजता बाहेर पडतात. दुपारी घरी आल्यावर जेवण व विश्रांती घेतात व रात्री आठ वाजता घरी येतात. बाबा घरी आले की, काही कामे करतात. मग आमचा अभ्यास घेतात. कधी कधी प्रवाशांच्या गमती सांगतात. कधी एखादे पुस्तक वाचत बसतात, त्यांना मुंबईतील खूप ठिकाणे माहीत आहेत. आम्हांला ते कधी कधी फिरायलाही नेतात. बाबांचे त्यांच्या रिक्षावर प्रेम आहे. ते प्रेमाने रिक्षाची देखभाल करतात, रिक्षाची छोटी छोटी दुरुस्ती ते स्वत:च करतात. आमच्या बाबांना वाईट व्यसन अजिबात नाही, म्हणून माझ्या बाबांचा मला खूप अभिमान वाटतो.

मित्रांंनो तुम्‍हाला majhe baba essay in marathi कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवावेे. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 
धन्‍यवाद    

 माझे वडील मराठी निबंध 2


माझे वडील केंद्रीय सचिवालयात काम करतात. त्यांचे कार्यालय आठवड्यातून पाच दिवस उघडे असते. शनिवार, रविवार त्यांना सुट्टी असते. माझ्या वाडिलांचे वय अंदाजे ४० वर्षे आहे. त्यांची उंची पाच फूट दहा इंच आहे. रंग सावळा आणि शरीर सुदृढ आहे. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. ते एम.एस्सी. फिजिक्स आहेत. त्यांनी एम.बी.ए. पण केले आहे. त्यांना अभ्यासाची व वाचनाची खूप आवड आहे. ते रोज ४/५ तास अभ्यास करतात. आमच्या घरी एक चांगले ग्रंथालय आहे. आमच्याकडे रोज दोन वृत्तपत्रे येतात. त्यांचे ते वाचन करतात.
माझे वडील सकाळी ५.३० वाजता उठतात. 

सकाळी थोडा योगाभ्यास करतात. नंतर बागेत फिरावयास जातात. तेथून परतल्यानंतर स्नान करून नास्ता करतात, वतर्मानपत्र वाचतात. दूरदर्शनवरील सकाळच्या बातम्या पाहतात व त्यानंतर कामावर जातात. असा त्यांचा दैनादिन कार्यक्रम असल्यामुळे ते नेहमीच निरोगी आणि उत्साही असतात.


सुट्टीच्या दिवशी ते आम्हा सर्वांना फिरावयास घेऊन जातात. मागच्या शनिवारी आम्ही बागेत खूप खेळलो. आम्ही सर्व भावंडे आणि माझी आई त्यांच्यावर खूप प्रेम करतो. ते पण आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही सर्व जण त्यांच्या आज्ञेत असतो. माझे वडील सर्वांशी मिळून मिसळून वागतात. शेजाऱ्यांना, मित्रांना मदत करण्यास ते नेहमीच तत्पर असतात. कधी-कधी ते त्यांच्याबरोबर फिरावयास जातात. त्यांच्या मित्रांचेही आमच्याकडे जाणे-येणे असते. 

कॉलनीच्या कल्याण सभेचे ते सचिव आहेत. त्यामुळे कॉलनीच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. कर्मचाऱ्यांना, नेत्यांना भेटत असतात. त्यांच्यामुळेच आमच्या कॉलनीत पोस्ट ऑफिस आणि दवाखाना सुरू झाला.


ते कधीच दु:खी, अस्वस्थ नसतात. आम्हा भावंडांच्या अभ्यासातही ते मदत करतात. परीक्षेच्या काळात आमची खास तयारी करून घेतात. आमच्या आरोग्याकडेही त्यांचे पूर्ण लक्ष असते. आमच्याशी ते खेळतात आणि गोष्टींच्या माध्यमातून आमच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर चांगल्या सवयी आम्हाला लागाव्यात अशीच त्यांची इच्छा असते. आमच्या वाढदिवसाला आणि परीक्षेत पास झाल्यावर सुंदर-सुंदर भेटी देतात. असे माझे वडील मला खूपच आवडतात. मला त्यांचा अभिमान वाटतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maze Baba Marathi Essay | माझे बाबा मराठी निबंध