मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile Shap Ki Vardan Marathi nibandh  बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या क्रांतीकारी उपकरणाचे फायदे व आरोग्‍यावर होणारे तोटे सांगीतले आहे.मोबाईलमुळे मानवी जिवनात काय बदल झाले व त्‍याचा उपयोग कसा करून घेता येईल याविषयी सविस्तरपणे माहीती सांगीतली आहे चला तर मग सुरू करूया निबंधाला .

माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये स्‍मार्टफोन  म्हणजेच मोबाईलचा  शोध हा सर्वांत महान शोध म्हणावा लागेल. पुराणकथेतील वामनाने साडेतीन पावलांमध्ये सर्व विश्व पादाक्रांत केल्याचे सांगितले जाते. पण मोबाईलच्या इवल्याशा उपकरणाने एका पावलात अक्षरशः संपूर्ण जग पादाक्रांत केले आहे. आज श्रीमंतांपासून ते गरीबलोकांपर्यंत  अक्षरशः सर्वांच्या खिशात हा मोबाईल असतो. या मोबाईलशिवाय हल्ली कोणाचे पानही हलत नाही.

या मोबाईलने अल्पावधीतच आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. सर्व लोक या मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत. कोठेही जा, लोक मोबाईलवरून कोणाशी ना कोणाशी तरी सतत बोलत असतात. गाडीतून उतरल्यावर, रस्त्याने चालताना, गाडी चालवताना, इतकेच नव्हे, तर घरी आल्यावरही सतत कोणाशी तरी बोलत असतात. सतत बोलण्यात गुंतल्यामुळे बोलणाऱ्याचे भोवताली लक्षच नसते. यामुळे अनेकदा अपघात होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बोलणाऱ्याचे भोवतालच्या माणसांकडे लक्ष नसते.

आपली मित्रमंडळी, नातेवाईक, घरातील माणसे यांच्याशी जिवाभावाच्या दोन गोष्टी बोलणे दुरापास्त झाले आहे. यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या इतर व्यक्तींपासून दुरावत चालला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होत आहे. व्यक्तीला निवांतपणे स्वत:कडेही पाहायला वेळ राहिलेला नाही. आजकाल मोबाईलमध्‍ये गेम खेळने नेहमीची गोष्‍ट झाली आहे. त्‍यातच PUBG (Player Unknown's Battle grounds.) या गेमने  धुमाकुळ घातला आहे. मुले तहान भुक विसरून हा गेम खेळतात त्‍यामुळे त्‍यांंच्‍या अभ्‍यासाकडे व आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते.   


Mobile Shap Ki Vardan
Mobile Shap Ki Vardan 


मोबाईलमुळे शारीरिक दुष्परिणामही होतात. हे उपकरण सतत कानाला लावून ठेवल्यामुळे विशिष्ट इलेक्ट्रॉनिक किरण मेंदूवर विपरीत परिणाम करतात. त्याचबरोबर माणसातील विकृतीला खूप वाव मिळू लागला आहे. इतरांना वाईटसाईट SMS, WhatsApp करणे , बदनामीकारक मजकूर पाठवणे हे सर्रास घडत आहे. परीक्षेतील गैरव्यवहारांसाठी या उपकरणाचा उपयोग विदयार्थी खूप चतुराईने करत आहेत.

 'गणपती दूध पितो' यांसारख्या अंधश्रद्धात्मक अफवा मोबाईलमुळेच जगभर पसरतात. भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठीही या उपकरणाचा उपयोग गुन्हेगारांनी केल्याचे उघड झालेले आहेच. हे सर्व पाहिले की, हा मोबाईल  शाप तर नाही ना, असे मनात आल्यावाचून राहत नाही.

मात्र मोबाईलला शाप म्हणणे खुपच एकांगी होईल. वास्तविक पाहता,मोबाईल  हे संपर्काचे उत्कृष्ट माध्यम आहे. आपण कोणाशीही, कधीही आणि अक्षरश: जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी कुठूनही संपर्क साधू शकतो. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना, माझा देश कसा, तर “सारे जहाँ से अच्छा" असे या मोबाईलमुळेच सांगू शकला.

आपण कोणाशीही चटकन संपर्क साधू शकत असल्यामुळे आपली कामे भराभर होऊ शकतात. विदयार्थ्यांनाही लहानसहान शंकांचे निरसन करून घेण्यासाठी हे साधन खूप उपयुक्त ठरते. यामुळे अभ्यासाचा, कामांचा वेग वाढला आहे. वेळेचा अपव्यय कमी झाला आहे. आपल्याला हवी असलेली व्यक्ती कामात गुंतलेली असेल, तर आपण एस्एम्एस् पाठवू शकतो. आधुनिक काळातील गतिमान जीवनाशी हा मोबाईल  सुसंवादी आहे.

नोकरीवर जाणाऱ्या पतिपत्नींना घरात एकटे असलेल्या आपल्या मुलांशी विडीओ कॉल करून संपर्क साधता येतो. त्यांना काही हवे-नको असल्यास त्यांची काळजी घेता येते. वृद्ध एकाकी व्यक्तींना तर हा फार मोठा आधार बनला आहे. हल्ली मोबाईलवरून आपल्या विविध बिलांची माहिती मिळते. बातम्या, चित्रपट तर केव्हाच सुरू झाले आहेत. नाटक-सिनेमा, रेल्वे, विमाने यांची तिकिटे मोबाईलवरून खरेदी करता येऊ शकतात. 

दूरदर्शन आकाशवाणीवरील कार्यक्रमांमध्ये या मोबाईलमुळे लोकांचा सहभाग वाढला आहे. हल्ली कित्येक गुन्हयांचा उलगडा मोबाईलमुळे झाल्याचे दिसून येते. एके ठिकाणी पावसाळ्यात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या व्यक्तीचा मोबाईल वाजला आणि त्याचा जीव वाचवणे अग्निशमन दलाला शक्य झाले !

मोबाईलचे फायदे किती सांगावेत ! तोटे आहेतच, पण तो त्या उपकरणाचा दोष नव्हे. हे उपकरण वापरणाऱ्या माणसाचा तो दोष आहे. तेव्हा या दूरसंचाराला - मोबाईलला - शाप कसे म्हणणार?

मित्रांनो तुम्‍हाला brahman dhwani shap ki vardan marathi nibandh हा कसा वाटला हे कमेंट करून शांगु शकता , तुम्‍ही मोबाईलचा वापर कमी करण्‍यासाठी कोणते उपाय उपयोगात येतील हे सांगु शकता यामुळे आमच्‍या इतर वाचकांना तुमच्‍या सल्‍याचा उपयोग होऊ शकेल, धन्‍यवाद .
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • भ्रमणध्वनीचा (स्‍मार्टफोन) शोध हा एक महान शोध 
  • खूप दुष्परिणाम
  • दूरध्वनीवर सतत
  • बोलत राहणे 
  • भोवतालापासून तुटलेपण 
  • SMS चे खूळ-वाईट उपयोग 
  • बदनामीसाठीही
  • अंधश्रद्धा पसरवण्यासाठी
  • परीक्षेतील गैरव्यवहार वाढण्यास मदत 
  •  बॉम्बस्फोट 
  • परंतु खूप उपयुक्त 
  • कोणाशीही, कुठेही, कधीही संपर्क
  • कामाचा वेग वाढला 
  • वेळेचा अपव्यय कमी
  • शाळकरी मुले व वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी 
  • अडचणींच्या वेळी तर देवदूतच 
  • गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही उपयोगी 
  • चांगले-वाईटपण वापर करणाऱ्यावर अवलंबून.

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan

Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध

निबंध क्रं. १ 

नमस्‍कार मित्रांनो आज आपण  Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध बघणार आहोत.  स्वामी विवेकानंद यांनी  भारताचे व हिंदू धर्माचे नाव नाव संपुर्ण विश्‍वात कश्‍याप्रकारे केले त्‍यांच्‍या बालपणा गमती जमती , त्‍यांनी केलेली भारत भ्रमंती ,  यांचे वर्णन खालील २  निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळेच आपल्याला पुत्ररत्‍न लाभले, अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'नरेंद्र' असे ठेवले.


नरेंद्र हा बालवयात कोपिष्ट होता. शाळेतही तो फार खोड्या काढत असे. पण पुढे त्याच्यात पूजाअर्चा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली. नरेंद्राला तीव्र बुद्धि्मत्तेचे वरदान लाभले होते. नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन त्याने आपले शरीर सुदृढ बनवले होते. मोठा झाल्यावर नरेंद्र ब्राम्‍हणसमाजात जाऊ लागला. तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. 'खरोखरच देव आहे की नाही? देव असेल तर तो कोठे भेटेल?' नरेंद्र ज्याला-त्याला हे प्रश्न विचारत असे. तेव्हा ब्राहमसमाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्राला स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्राचे गुरू झाले.

Swami Vivekananda Essay In Marathi
Swami Vivekananda Essay In Marathi



परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे, ही शिकवण परमहंसांनी नरेंद्राला दिली. सुरवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही. नंतर परमहंसांच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले. तो कालिमातेचा भक्त बनला. रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्राला सांगितले की, तू हिंदुत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्त्वज्ञान साऱ्या जगाला सांग.


१८९३ मध्ये नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना 'स्वामी विवेकानंद' म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरवात करताना 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे न संबोधता 'माझ्या बंधु-भगिनींनो' असे संबोधून उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे माहात्म्य सर्वांना पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्यही त्यांनी या महान कार्यासाठी वेचले.







 स्वामी विवेकानंद निबंध क्रं. २ 


महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  1. बालपण वैभवात 
  2. अभ्यास,खेळ, व्यायाम, संगीत, काव्य इत्यादी अनेक गोष्टींत रुची
  3. १४-१५ व्या वर्षी भारतभ्रमण 
  4. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या भारतीयांचे दर्शन 
  5. स्वधर्म विसरलेल्या हिंदूंचे दर्शन
  6. राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव
  7. अनेक धर्मांतील, ग्रंथांतील तत्त्वांचा अभ्यास
  8. रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व
  9. भारतभ्रमणाला सुरुवात
  10. कन्याकुमारी येथे तपश्चर्या 
  11. अमेरिकेत
  12. सर्वधर्म परिषदेला हजर 
  13. सभा जिंकली
  14. जगभर नाव.


जेव्हा भारत पारतंत्र्यात होता, तेव्हा भारतीय समाजाला एक प्रकारची धर्मग्लानीच आली होती म्हणा ना! अशा अंधकारात १२ जानेवारी १८६३ रोजी दत्त घराण्यात एक दीपज्योती जन्माला आली. तिचे नाव नरेंद्रनाथ दत्त, म्हणजेच विश्वविख्यात स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे बालपण अत्यंत आनंदात व वैभवात गेले. विशाल नेत्र आणि विशाल भाल लाभलेले स्वामी विवेकानंद अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, सुदृढ, निर्भय, विलोभनीय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना अभ्यास, खेळ, व्यायाम, संगीत, काव्य, पाकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत खूप रुची होती. लहान वयात आईकडून धार्मिक विचारांचे; तर मोठेपणी वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. सत्य वचन व सत्य आचरण हा तर त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.

१४-१५ वर्षांचे असतानाच अर्धाअधिक भारत त्यांनी पालथा घातला. त्या काळी त्यांनी भारतीयांची केविलवाणी अवस्था पाहिली. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या, स्वत्व विसरलेल्या हिंदू समाजाला पाश्चात्य शिक्षणाने भारून टाकले होते. परकीयांंच्या फसव्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाने भारतीय समाजाची दिशाभूल केली जात होती. हे सर्व पाहून विवेकानंद अत्यंत व्यथित व अस्वस्थ झाले.


 रवींद्रनाथ टागोरांशी चर्चा करून आणि राजा राममोहन रॉय यांची तत्त्वे विचारात घेऊन विवेकानंदांनी सर्व धर्माचा आणि तत्‍वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यांचे इंग्रजी, संस्कृत, बंगाली इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. निरनिराळ्या धर्मातील व पंथांतील विद्वानांशी त्यांनी तत्त्वज्ञानावर चर्चा केली. त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व पत्करले.


विवेकानंद हे १८८४ साली पदवीधर झाले. रामकृष्ण परमहंसांच्या प्रभावामुळे त्यांनी संन्यास घेतला आणि भिक्षेची झोळी घेऊन राष्ट्रकल्याणासाठी घराबाहेर पडले. अंतिम सत्य काय? या एकाच विचाराचा त्यांनी ध्यास घेतला आणि भारतभ्रमणाला सुरुवात केली. भारतभ्रमणानंतर कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर बसून विचार करत असताना भारतातील दरिद्री, अज्ञानी जनतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे अनेक स्त्री-पुरुष निर्माण केले पाहिजेत, असे त्यांना तीव्रतेने जाणवू लागले. 


 अमेरिकेतील शिकागो शहरी ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी सर्वधर्म परिषद भरणार होती. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद तेथे उपस्थित राहिले. परिषदेच्या दिवशी विवेकानंदांनी 'माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो' अशी भावपूर्ण शब्दांनी सुरुवात करून सभा जिंकली. त्यावेळी दोन मिनिटे सतत टाळ्यांचा गजर होत होता. या परिषदेत ते ज्या दिवशी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत विचारगर्भ भाषणाने हिंदू धर्माविषयीचे निबंध वाचत होते, त्या दिवशी 'न भूतो न भविष्यति' अशी गर्दी लोटली होती. 


होमरूल लीगच्या नेत्या अॅनी बेझंट यांनी या प्रसंगी 'एक योद्धा संन्यासी, समस्त प्रतिनिधींमध्ये वयाने लहान तरीही प्राचीन व श्रेष्ठ सत्याची जिवंत मूर्तीच' असे स्वामी विवेकानंदांचे वर्णन केले आहे. विवेकानंदांनी खऱ्या धर्माची तत्त्वे सांगून धर्म हे उन्नतीचे साधन असावे, असे प्रतिपादन केले.


विवेकानंदांची प्रभावी भाषणशैली साऱ्या जगतात वाखाणली गेली. समस्त पाश्चात्त्य जगात विवेकानंदांची कीर्ती व भारताचा मान वाढला. अपूर्व सहनशीलता, असीम धैर्य, अलौकिक त्यागशक्ती यांचा सहज समन्वय म्हणजे स्वामी विवेकानंद ! ज्याने आपल्या देशाला आणि देशबांधवांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले, ते स्वामी विवेकानंद माझी आवडती विभूती आहेत. या महान विभूतीने ४ जुलै १९०२ या  दिवशी रात्री बेलूर या मठात महासमाधी घेतली.

मित्रांनो  तुम्‍हाला वरील निबंध कसा वाटला हे आम्‍हाला कमेंट करून जरूर कळवा . निबंध पुर्ण वाचल्‍याबद्दल धन्यवाद. 

टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  1. Swami Vivekananda Nibandh In Marathi
  2. swami vivekananda marathi madhe nibandh

Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi

निबंध क्रं. १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी मराठी निबंध बघणार आहोत. सत्‍य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्‍या माध्‍यामातुन भारताला गुलामगीरीच्‍या बेळीतुन मुक्‍तता मिळवुन देण्‍याचे कार्य महात्‍मा गांधीजींनी पुर्ण केले. जन्माने सामान्‍य असणारे गांधीजी आपल्‍या कार्यामुळे कश्‍याप्रकारे महान व्‍यक्‍तीमत्‍व प्राप्‍त करू शकले याची सखोल माहीती खालील 4 निबंधात प्रस्‍तुत केली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.



मानवतेचा मानदंड महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून दयायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, 'महामानव', गांधीजी स्वत:ला नेहमी 'एक सामान्य माणूस' मानत असत. त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे 'गांधीजी' होय.



महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते; पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले. तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते, त्यांच्याविरुद्ध ते खंबीरपणे झगडले.


Mahatma-Gandhi-Nibandh-In-Marathi
Mahatma-Gandhi-Nibandh-In-Marathi


भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केला. सामान्य भारतीय हे अर्धनग्न अवस्थेत जिवन ज‍गतात, अर्धपोटी राहतात हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा  छोट्या वस्‍तीत राहणे त्यांनी पसंत केले. सर्व लोकांना समाजात समान वागणूक हवी, असे आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचराकुंडी साफ करण्याचे काम करायला स्वत: सदैव पुढे येत असत.



मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला कर त्यांना अन्यायकारक वाटला; म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजीनी 'दांडी यात्रा' काढली. महात्माजींंनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. सर्व धर्मातील व सर्व जातीजमातीतील जनतेने एकदिलाने राहावे, यासाठी ते जीवनभर झटले. एका प्रार्थनासभेत त्यांची हत्या झाली. आज गांधीजी देहाने हयात नाहीत; पण त्यांच्या अलौकिक कार्याने  ते अमर झाले आहेत.  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध क्रमांक २
राष्ट्रपिता महात्मा गांधी
 महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  1. सामान्यातून असामान्य 
  2. चुका कबूल करण्याची वृत्ती -
  3. आत्मवृत्ताला नाव 'सत्याचे प्रयोग ' 
  4. बॅरिस्टर झाल्यावर आफ्रिकेला प्रयाण 
  5. विषमतेची वागणूक सशस्त्र सत्तेला अहिंसेने उत्तर
  6. भारतदर्शन 
  7. राजकारणात प्रवेश
  8. सत्याग्रह निःशस्त्र प्रतिकार 
  9. सविनय कायदेभंग 
  10. उपोषण 
  11. निरपेक्ष समाजकार्य 
  12. सर्व जनतेचे बापू 
  13. सेवाग्राममधून समाजसेवा 
  14. कुटिर उदयोगांना महत्त्व 
  15. सत्ता पद स्वीकारले नाही
  16. सत्यासाठी मरणही पत्करले 
  17. राष्ट्राचा पिता.



भारताला स्‍वतंत्र करण्‍यासाठी अनेक महान स्‍त्री व पुरूषांनी आपले सर्वस्‍व राष्‍ट्राला अर्पण केले . अश्‍या महापुरूषापैकी एक होते महात्‍मा गांधी. महात्‍मा गांधी युगपुरूष होते. त्‍यांच्‍या बद्दल सर्व विश्‍व आदराची भावना ठेवत होते . अश्‍या महामानवाला नमन करूया आणि निबंधाला सुरूवात करूया .



महात्माजींच्या कार्याची थोरवी गाताना प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणाले होते, "आणखी काही पिढ्यांनंतर लोकांचा विश्वासही बसणार नाही की, असा कधी कोणी माणूस झाला होता." ध्येयवेडाने प्रेरित झाल्यावर एका सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व कसे फुलू शकते, त्याचे महात्माजी हे उदाहरण आहेत. २ ऑक्टोबर १८६९ ला काठेवाडमध्ये पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला होता.

त्यांची विदयार्थिदशा ही इतर सर्वसामान्य मुलांसारखीच होती. त्या वयात त्यांच्याही हातून चुका झाल्या. त्यांचा वेगळेपणा एवढाच की, त्यांनी आपल्या चुका कबूल केल्या. पुढेही जीवनात वेगवेगळे प्रयोग करताना जेव्हा जेव्हा चुका झाल्या, तेव्हा तेव्हा त्या त्यांनी सर्वांपुढे मान्य केल्या व त्याचे शासनही स्वत:ला करून घेतले. आपल्या आत्मवृत्तालाही त्यांनी नाव दिले आहे  'सत्याचे प्रयोग.' दुसरा गांधीजींचे विशेष म्हणजे परदेशात जाण्यापूर्वी आपल्या मातेजवळ त्यांनी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या आयुष्यभर पाळल्या.

वयाच्या अट्ठाविसाव्या वर्षी बॅरिस्टर गांधी कामानिमित्त आफ्रिकेत गेले, पण तेथील हिंदी लोकांना मिळणारी अमानुष वागणूक पाहून त्यांच्या कार्याचे स्वरूपच बदलले. त्यांना स्वत:लाही 'काळा आदमी' म्हणून हा छळ काही काळ सहन करावा लागला आणि तेथेच त्यांच्या कार्याचे स्वरूप ठरले. या अन्यायापुढे मान तुकवणे योग्य नाही, हे त्यांना जाणवले. त्याच वेळी गांधीजींनी सशस्त्र शक्तीपुढे 'अहिंसे'चे हत्यार स्वीकारले. "हे सामर्थ्य आपल्याला आपल्या पत्नीकडून मिळाले" असे महात्माजी सदैव सांगत.

आफ्रिकेतून परत आल्यावर आपल्या गुरूंच्या ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या - सांगण्यानुसार गांधीजींनी संपूर्ण भारताचे - भारतीय समाजाचे दर्शन घेतले आणि १९२० पासून आपल्या लढ्याला सुरुवात करताना सत्याग्रह, नि:शस्त्र प्रतिकार, सविनय कायदेभंग व स्वदेशीचा पुरस्कार या चतु:सूत्रीचा स्वीकार केला. एखादया लढ्यात हिंसेने प्रवेश केला, तर गांधीजी त्या क्षणी तो लढा थांबवत व उपोषणाचा मार्ग स्वीकारून स्वशासन करून घेत.

यानंतर गांधीजी जगले ते देशासाठी, त्यांनी कधीही आपल्या पत्नीचा, आपल्या मुलांचा, कुटुंबाचा वा घराण्याच्या स्वार्थाचा विचार केला नाही, त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांचा मोठा मुलगा हरिलाल त्यांना दुरावला, पण ते संपूर्ण भारतीय जनतेचे 'बापू' झाले होते. ब्रिटिशांशी लढण्यात ते अखंड गुंतलेले असतानाही आपल्या देशातील दलित पीडित समाजाचा त्यांना क्षणभरही विसर पडला नव्हता. हरिजनांच्या उद्धारासाठी त्यांनी 'हरिजन' साप्ताहिक चालवले. साबरमतीच्या सेवाश्रमात त्यांनी हरिजन, आदिवासी, कुष्ठपीडित सर्वांची सेवा केली. मोठ्या कारखान्यांपेक्षा 'कुटिर उदयोगा'ला ते महत्त्व देत.

बापूजी जे जगले ते इतरांसाठीच. म्हणून कवी मनमोहन म्हणतात, 'चंदनाचे खोड लाजे। हा झिजे त्याहूनही  कोणतेही पद, कोणतेही स्थान, सत्ता त्यांनी स्वीकारली नाही. असेच कार्यरत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी या राष्ट्रपित्याचा एका मारेकऱ्याने खून केला. त्यावेळी प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले होते, “या जगात अतिशय चांगले असणेही तितके चांगले नाही."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



निबंध क्रमांक ३

Mahatma Gandhi Information In Marathi Essay

महत्‍वाचे मुद्दे : 

  1. महात्मा गांधी
  2. आवडते पुढारी
  3. सत्याग्रह व असहकार ही शस्त्रास्त्रे
  4. बापूजीपासून महात्माजी
  5. सत्वाचे प्रयोग' आत्मचरित्र
  6. असामान्य धाडस
  7. सशस्त्र शक्तीशी निशस्त्र मुकाबला
  8. असहकार चळवळ
  9. दांडी यात्रा
  10. चले जाव आंदोलन 
  11. निकंलक चारित्र्य 
  12. संयम, मनोनिग्रह
  13. सामान्याकडून असामान्यत्वाकडे वाटचाल

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शस्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूजी 'महात्मा' कसे झाले, याचा शोध घेतला की त्यांच्या चरित्रातील दिव्यत्व प्रत्ययास येते. आपली जीवन कहाणी सांगताना बापूजी तिचा उल्लेख 'सत्याचे प्रयोग' म्हणून करतात. आपल्या जीवनातील सर्व चुकांची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. गांधीजींनी लोकांना सत्याचे नुसते पाठ दिले नाहीत, तर स्वत:च्या जीवनात सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले.

महात्माजीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, बापूजींनी आयुष्यभर सत्य, अहिंसा या व्रतांचे कठोरपणे पालन केले: बापूजीजवळ असामान्य धाडस होते. आपल्या देशातील लोकांची गरीबीची अवस्‍था पाहून बापूजी केवळ पंचा नेसूनच सर्वत्र वावरू लागले. बापूजींंनी आपला देश, भारतीय संस्कृती, भारतातील सर्वसामान्य माणूस यांचा प्रथम विचार केला. म्हणूनच सशस्त्र चळवळीचा हिंसक मार्ग त्यांनी अनुसरला नाही.

सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ते नि:शस्त्र हातांनी. 'सत्याग्रह या नवीन अस्त्राचा उपयोग त्यांनी प्रथम आफ्रिकेत आणि नंतर भारतात केला. १९२० ची बापुजीची असहकार चळवळ, १९३० ची 'दांडी यात्रा' व १९४२ चा 'चले जाव' लढा' हे संपुर्ण विश्वातील स्वातंत्र्य आंदोलनांमधील सोनेरी क्षण होते. बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात होते. बापुजींजवळ विलक्षण 'संयम' होता. 


आजच्या विदयार्थ्यांत कोणत्याही त-हेचा 'मनोनिग्रह' आढळत नाही. मनोनिग्रहाचे महत्त्व त्यांना बापूजींच्या जीवनचरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी कस्तुरबांना आजारपणात मीठ सोडायला सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी त्यांचे मनोबल तयार करण्यासाठी स्वत:च मीठ सोडले. खजूर व शेळीचे दूध या साध्या पदार्थांवर ते अखेरपर्यंत राहिले. 

सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धेत बापूजी केव्हाच अडकले नाहीत. आफ्रिका सोडताना आपल्याला मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशकार्यासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेच्या कोणत्याही पदाची हाव न धरता, ते निर्वासितांच्या सेवेला धावून गेले. सामान्याकडून असामान्यत्वाकडे यशस्वी वाटचाल कशी करता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रपिता बापूजी


प्रख्यात तत्त्वज्ञ आईनस्टाईनने महात्माजी र्विषयी असे म्हटले आहे की, “आणखी काही वर्षांनंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही."सर्वाना सत्‍य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे आपले आवडते बापू आता आपल्यात राहिले नाहीत, परंतु त्यांची तत्वे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहतील .

मित्रांनो मी आशा  करतो तुम्हाला महात्मा गांधी निबंध मराठी आवडला असेल , निबंध पुर्ण वाचल्‍याबद्दल  धन्‍यवाद 

निबंध क्रमांक 4

 राष्ट्रपिता महात्मा गांधी Essay On Mahatma Gandhi In Marathi

 भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर होते. त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एव्हरेस्ट शिखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती.  आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते. 


सत्य, अहिंसा, न्याय, समानता, सेवा, राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते एक आदर्श उदाहरण होते. हिंसा, स्वार्थ, असत्य, संकुचितपणा, राजकारण, जातिभेद, घृणा, द्वेष, लोभ, लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार आणि आदर्श यांचे उच्चांक गाठून मानवतेची कीर्ती वाढविली. या वास्तवतेवर कदाचित येणाऱ्या पिढीचा विश्वासही बसणार नाही.


जे असाधारण, असंभव आणि अविश्सनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले. त्यांचे जीवन, आदर्श, उच्च विचार, साधेपणा, खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील.
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक स्त्री होती.  वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबाशी झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहून राजकोटला स्थलांतर केले.


किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ, कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली करू लागले. तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. 


तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहांत टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा निश्चय केला. 'गीता' त्यांचा आदर्श बनली. तिथे असतानाच त्यांनी सत्य, अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले. त्यात सत्याग्रह मुख्य होता.


१९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार, मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. भारतीय नेते आणि संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले. त्यांना मार्गदशन केले त्यांच्यावर प्रेम केले. 


त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. संपूर्ण भारतात खादी, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच आली. त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला. गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. नेते, गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार त्यांना पटवून दिले. त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला. 

परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली. गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले. अनेक सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली.


१२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनांत इंग्रज शासकांविरुद्ध तिरस्कार नव्हता. द्वेष नव्हता. ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका. त्यांनी 'यंग इंडिया''हरिजन' ही वत्तपत्रे चालविली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले. काँग्रेस आणि भारताला गांधीजींनीच 'स्वराज्य' ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली 'भारत छोड़ो' चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट झाला.


शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले. जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दु:ख झाले. संपूर्ण शक्तिनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले. लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरणच जनतेसमोर प्रस्तुत केले.


दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूबरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, "आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे. राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वत:ला सत्य आणि त्या मूल्यांच्या प्रति समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध क्रमांक 5


बापूजी - एक थोर आदर्श

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती॥ २ ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा जन्मदिवस. आता, आंतरराष्ट्रीय स्तरावर 'अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. अशी नुकतीच वर्तमानपत्रातून बातमी आली. राष्ट्रपिता महात्माजींची अनमोल कारकीर्द- प्रकर्षाने डोळ्यासमोरून जाऊ लागली.

सध्याचे युग 'कलियुग, आक्रमणाचे युग'. रोज वृत्तपत्रात कोठे ना कोठे तरी बंद - हरताळ, जाळपोळ, बलात्कार, लूटमार, दरोडा, घातपात, बॉम्बस्फोट, मोर्चे अशा बातम्या नित्य-परिचयाच्या झाल्या आहेत. शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र आणि सरळमार्गी असणाऱ्या क्षेत्रातूनही विद्यार्थी - शिक्षण महर्षी संस्थाचालक या सर्वामध्ये अनाचार-भ्रष्टाचार-मारामारीच्या बार्ता आता सरसकट येऊ लागल्या आहेत, मागील शतकार्धात आम्ही स्वातंत्र्यासाठी परकीयांसाठी लढत होतो. आता आपणच आपल्याशी झगडत आहेत आणि आपल्या प्रगती मार्गात मोठे अडथळे निर्माण करीत आहोत. - 'राष्ट्राचे भावी नागरिक' म्हणून आपण युवाशक्तीला, विद्यार्थ्यांना आवाहन करतो, जागरूक करण्याचा प्रयत्न करतो,

परंतु हीच शक्ती, हेच विद्यार्थी आपल्या हक्कांविषयी विशेष जागरूक असताना, पण कर्तव्यांविषयी नाही, त्यांच्या त्या पोरकटपणामुळे, अजाणतेमुळे ते न झालेल्या अन्यायाविरुद्धही चिडून उठताना दिसतात. आणि मग अशात-हेने चुकलेल्या या वासरांना योग्य मार्गाला नेणारा आदर्शच राहिला नाही. अशावेळी आठवण होते ती आपल्या बापूजींची, त्या थोर राष्ट्रपित्याची..

ही कोवळी, अपरिपक्व मुले आणि त्यांच्या सभोवताली हे स्वार्थान-अत्याचाराने-सत्ताप्राप्तीसाठी काहीही करायला निघालेल्या सत्तांधाने बरबटलेले. कसे आणि कोण करणार यांच्यावर संस्कार ? कोण देणार यांना उपदेश ? कोण ठेवणार यांच्यापुढे आदर्श ? अशा या बालकांपुढे गांधीजींच्या थोर जीवनाची अगदी जवळून ओळख करून देणे, आज आवश्यक ठरले आहे.

'२ ऑक्टोबर' महात्माजींचा जन्मदिवस या दिवशी आपण सुट्टी घेतो. परंतु निदान तो दिवस तरी विद्यार्थ्यांसाठी के वळ गांधीजींचा जीवनपरिचय करून देण्यात गेला तरी पुष्कळ गोष्टी साध्य होतील. गांधीजींचे बालपण, जीवनचर्या, शिक्षण, बालपणातील अनुभवातून लिहिलेले 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तक, हरिश्चंद्र नाटकाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम, एकदा कोठे बोलल्यानंतर त्यांच्या वडिलांकडून मिळालेली शिक्षा, नंतर प्रत्येक गोष्ट सत्यपणे सांगायची त्यांची सवय, जीवनातील अपयशही प्रामाणिकपणे सांगण्याची त्यांची पद्धत... अशा अनेक गोष्टींचा बालजीवनावर निश्चित चांगला परिणाम होईल.

बापूजींच्या जीवनातील तो अतिशय महत्त्वाचा प्रसंग, द. आफ्रिकेमध्ये असताना... काळ्या लोकांना दिली जाणारी वागणूक तो रेल्वेमधील प्रसंग... त्यातून त्यांचे दिसणारे देशप्रेम... धाडस-धडाडी, निश्चितपणे मुलांना देशप्रेमाचा उपदेश करून जाईल. आपण सामान्य माणसे अनेकदा न पटणाऱ्या गोष्टी इतरांसाठी करतो, इतर लोक आपल्याला हसतील म्हणून आपण घाबरतो. परंतु गांधीजी स्वतः धुतलेले कपडेच परदेशात घालत असत.


बापूजींच्या पंचाची तर आपल्या देशात तर चेष्टा झाली, परदेशातही फार चेष्टा झाली. पण त्यांनी पंचा वापरणे सोडले नाही, अशा पद्धतीने "माझ्या देशातील लोकांना जर अंगभर कपडा मिळत नाही तर, मी कसे घालू अंगभर कपडे ?" असा महान हेतू - विचार त्यांच्यामागे होता. म्हणूनच गांधीजींनाच ते शोभले आणि जीवनभर निभावले. गांधीजींचा ‘संयम' फार मोठा होता. मद्य, मांस आणि परस्त्री या तीन गोष्टींपासून कायम दूर राहण्याचे वचन त्यांनी आपल्या मातेला दिले होते, ते त्यांनी अखेरपर्यंत पाळले. हा संयम - असा मनोनिग्रह आजच्या पिढीत कोठून येणार, कोठे आढळणार?

तो गांधीजींच्या चरित्रातून निश्चितच विद्यार्थ्यांना मिळेल. एकदा त्यांच्या पत्नी-कस्तुरबा यांना 'मीठ' सोडण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्या तयार नव्हत्या म्हणून बापूजींनीच मीठ सोडले, नंतर त्या कबूल झाल्या. गांधीजी खजूर आणि शेळीचे दूध या साध्या गोष्टींवर अखेरपर्यंत जगले.

सत्ता, संपत्ती यांच्या विनाशक स्पर्धेत बापूजी केव्हाही अडकले नाहीत. द. आफ्रिकेतून परत येताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते कोणत्याच सत्तेच्या पदावर राहिले नाहीत तर निर्वासितांच्या सेवेसाठी रुजू झाले. त्यांचे स्वतःचे अक्षर चांगले नव्हते. पण ते म्हणत वाईट अक्षर हे अपूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.

अशा या केवळ भारतापुरतेच नाही तर साऱ्या जगात महान ठरलेल्या बापूजींना आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिनाचा हीरक महोत्सव साजरा करताना आमचे शतशः प्रणाम...

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi

दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध बघणार  आहोत.  कोणत्यारही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परीणाम दिसण्यास सुरूवात होतात, दूरचित्रवाणी शाप ठरू शकेल अश्या प्रसंगाचे वर्णन या निबंधात केले आहे आणि दूरचित्रवाणी वरदान ठरण्यापसाठी काय केले पाहीजे  याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला. 


दूरचित्रवाणीचा प्रसार मुख्यतः शहरांतून मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तरीही काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. असे का बरे?

दूरचित्रवाणीच्या प्रलोभनातून काही धोके जरूर संभवतात. शहरात जागेची समस्या फारच बिकट असल्याने, विशेषत: चाळीतील व झोपडपट्टीतील लोक दूरदर्शनवरील कार्यक्रम अगदी जवळून पाहत असल्यामुळे, त्याचा त्यांच्या दृष्टीवर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी लहान जागेत खूप माणसे तासन्तास बसतात, हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातक आहे. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या विविध वाहिन्यांवरील चित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली, ग्रंथवाचनाला पारखी झाली. टीव्हीवर कार्यक्रम पाहताना कुणी पाहुणे आले, तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही.

दूरचित्रवाणीवरील बहुसंख्य कार्यक्रम हे चित्रपटांवर आधारित असतात. त्यामुळे युवावर्ग त्या आभासामागे धावतो व वास्तवाला पार विसरून जातो. विविध कार्यक्रमांतून जाहीर केलेली मोठमोठ्या किमतीची बक्षिसेही त्याला स्वप्ननगरीत नेतात आणि प्रामाणिक प्रयत्नांचे व कष्टांचे महत्त्व त्याला वाटेनासे होते.

वास्तविक पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. खेड्यांतील शेतकऱ्याला, मजुराला त्यांच्या विविध उपयुक्त अशा व्यवसायांचे ज्ञान देता येईल, आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा यक्षप्रश्न उभा आहे. हा प्रश्न सोडवण्यास दूरचित्रवाणीची मोलाची मदत होईल. ज्ञानप्राप्तीत केवळ ऐकण्‍यापेक्षा , पाहणे व ऐकणे अधिक परिणामकारक ठरते. 'दूरदर्शन'मध्ये तर पाहणे व ऐकणे दोहोंचाही समन्वय आहे. या साधनांच्या मदतीने साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो.


तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध खेळांच्या स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे घरी आरामात बसून घेता येतो. हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले रामायण, महाभारत हे ग्रंथ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले ते दूरचित्रवाणीमुळेच ना!

अशा या दूरचित्रवाणीला शाप समजून दूर लोटणे योग्य होणार नाही. मात्र दूरचित्रवाणीचे कोणते कार्यक्रम पाहायचे याबददल कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांनी तारतम्याने विचार करणे आवश्यक आहे. अभ्यासाला पूरक ठरणारे कार्यक्रम विदयार्थ्यांनी अवश्य पाहावेत.

'आधी अभ्यास, मग मनोरंजन' हे पथ्य मात्र दूरदर्शनवरील इतर कार्यक्रमांच्या बाबतीत अवश्य पाळावे. असे झाल्यास दूरदर्शन आपल्याला मोठे वरदानच ठरणार आहे, यात शंका नाही.

 



Television A Bane Or Boon Essay In Marathi
Television A Bane Or Boon Essay In Marathi




मित्रांनो तुम्हाला दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi कसा वाटला हे कमेंट करून कळवा.  भारताला प्रगतीशील समृध्द  राष्‍ट्र बनविण्यातसाठी व दूरचित्रवाणीच्या वापराबद्दल जनजागृती होण्याासाठी हा निबंध आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करा . धन्यवाद 

Nibandh 2 

"अग नीता, तू आहेस तरी कोठे?" नीताच्या आईच्या शब्दांत संताप अगदी ओथंबला होता. “अग, उदया तुझी परीक्षा आणि तू बसली आहेस टी. व्ही. वरचा चित्रपट पाहत." पहिली पाच मिनिटे नीताने लक्ष दिले नाही, पण आईचा सूर चढला, तेव्हा नीता त्या गर्दीतून उठली, मोठ्या नाखुषीनेच. कारण तिच्या आवडत्या नटनट्यांचा चित्रपट चालू होता. नीताच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून नीताच्या बाबांनी दूरचित्रवाणी  आणण्याचे टाळले; पण नीता शेजारीपाजारी जाऊन टी. व्ही. पाहतेच.

  आता हे दुसरा प्रसंग  पाहा. टी. व्ही. वर काहीतरी रंगतदार कार्यक्रम चालला आहे. आईबाबा त्यात रंगले आहेत; तरी घरातील बाबांच्या शिस्तीमुळे मोहन व मुग्धा आपल्या खोलीत अभ्यास करीत आहेत. सातव्या इयत्तेतील मोहनला नफ्यातोट्याचे गणित अडले. खूप प्रयत्न करूनही सुटेना तेव्हा तो वही-पुस्तक घेऊन आईकडे गेला आणि ते उदाहरण सोडवून देण्यासाठी विनवणी करू लागला. “थांब रे बाबा, आता मध्येच नको तुझी कटकट,” टी. व्ही. पाहणाऱ्या आईसाहेब कडाडल्या. मोहन हिरमुसल्या तोंडाने खोलीत परतला. पण त्याचे अभ्यासात लक्ष लागेना. या प्रसंगांतील नीताच्या आईला व छोट्या मोहनला दूरचित्रवाणी ही नक्कीच शाप वाटेल.

दूरचित्रवाणीची लोकप्रियता ही आपल्या देशात वाढतच  आहे,  पण आजही तिचा संचार  मोठमोठ्या शहरांतूनच आहे. अदयापिही ती खेडोपाडी पोहोचली नाही तोच काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. तिचे तोटेच अधिक भासू लागले आहेत. दूरचित्रवाणीच्या आकर्षणातून काही धोके संभवतात. आजकाल त्याची चर्चा वृत्तपत्रांतून होत असते. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक लहानसहान खोल्यात T.V. ठेवतात व कमी अंतरावरून  चित्र पाहिले जाते. त्याचा दृष्टीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. हा परिणाम काही वर्षांनी लक्षात येईल. दुसरी गोष्ट अशी की, लहान जागेत खूप माणसे तासन् तास बसतात हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातकच आहे.

शनिवारी, रविवारी टी. व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांमुळे मुले क्रीडांगण विसरली. टी. व्ही. वर कार्यक्रम पाहताना कुणी पाहणे आले तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही. मित्रमंडळींशी मोकळ्या गप्पा मारण्याऐवजी बहुसंख्य लोक टी. व्ही. वर नजर लावून बसतात. ज्यांच्याकडे टी. व्ही. संच असतो त्यांना कार्यक्रम पाहावयास येणाऱ्यांकडून विविध त-हेचे त्रास होतात. दूरचित्रवाणी ही ज्ञान व मनोरंजन या दोन्ही उद्दिष्टांसाठी काम करीत असते; पण आज लक्षात घेतला जातो तो भाग केवळ मनोरंजनाचा. त्यामुळे आज अनेकांना दूरचित्रवाणी शाप वाटते. काहींच्या मते दूरचित्रवाणीमुळे समाजातील आर्थिक विषमतेची दरी फार मोठी झाली आहे.

ठराविक रंगाचा चष्मा लावून पाहणाऱ्यांना सर्व वस्तू त्याच रंगाच्या दिसणार. त्यामुळे दूरचित्रवाणीचे तोटे उगाळणाऱ्यांना तोटेच दिसणार. खरं पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी साधन आहे. त्यासाठी दूरचित्रवाणी अगदी खेडोपाडी जाऊन पोहोचली पाहिजे. किंबहुना तिची तेथेच अधिक गरज आहे. खेड्यातील शेतकऱ्याला, मजूराला ती विविध क्षेत्रांतील ज्ञान देईल आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यास दूरचित्रवाणीची फार मोठी मदत होईल. 

ज्ञानप्राप्तीत ऐकण्‍यापेक्षा पाहण्‍याचा मोठा वाटा असतो. केवळ ऐकण्यापेक्षा जे आपण पाहतो ते आपल्या स्मरणात अधिक राहते; अनेक कलावंतांना आपण पूर्वी फक्त चित्रपटांतून पाहत होतो; त्यांना आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीत पाहू शकतो. साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो. विदयार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध त हेच्या खेळांतील स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे साधता येतो. पण त्यासाठी योग्य नियोजन मात्र हवे. 

उलट विदयार्थ्यांपुढे पालकांनी असा दंडकच ठेवावा की अभ्यास पूर्ण झाला तरच चित्रपट पाहावयास मिळेल. आपल्याबरोबर आपल्या घरातील चाकरमाणसे, शेजारची गरीब माणसे यांना दूरचित्रवाणी पाहावयास सहभागी केले तर आर्थिक विषमतेमुळे निर्माण होणारी दरी थोडी कमी होईल.


Nibandh 3

दूरदर्शन (टी. व्ही.): शाप की वरदान? 


अंध धृतराष्ट्राजवळ बसून युद्धभूमीवरील घडामोडी पाहण्याची 'दिव्यदृष्टी' एकट्या संजयला होती. परंतु स्थलकालाचे बुरूज फोडून जगातील कोणतीही गोष्ट, घडामोडी घरबसल्या दाखविण्याची जादू दूरदर्शनने केली आहे. जॉन लॉग बायर्डने दूरदर्शनचा शोध लावून सर्व जग आपल्या छोट्या खोलीत आणले. दूरदर्शनचा शोध अमेरिकेत १९२६ साली जरी लागला असला तरी प्रत्यक्ष भारतात यायला त्याला १९५८ साल उजाडले व रंगीत रूप धारण करायला १९८२ साल.



 सध्या एकंदरीत दूरदर्शनवर (T.V.) 200 पेक्षा जास्त चॅनल्स सुरू झाले आहेत. या 'इडियट बॉक्स'नं खरोखरच सर्वांना वेडं केलं आहे.मुक्त व्यापारी धोरणाचा परिणाम दूरदर्शनवर निखळ, शुद्ध मनोरंजनाचे, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम दाखविण्याऐवजी हिंसा, विकृती यांचे दर्शन मोठ्या प्रमाणात घडविणारे कार्यक्रमच जास्त दिसू लागले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये दूरदर्शनविषयी जबरदस्त आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, समाजसेवक यांना दूरदर्शनच्या दूरगामी होणाऱ्या दुष्परिणामांची भीती वाटू लागली आहे.



 मुले अभ्यास करत नाहीत, बाहेर खेळायला जात नाहीत, खात नाहीत, त्यांचे डोळे बिघडले, इत्यादी तक्रारी तर ऐकायला मिळतातच, परंतु दूरदर्शनवरील कार्यक्रमातून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण पाहिल्यावर भारतीय संस्कृती' नष्ट होईल की काय, या विचाराने सुशिक्षित लोक धास्तावले आहेत. त्यामुळे उत्तम शैक्षणिक मूल्यं असलेलं हे दृक्श्राव्य साधन ‘शाप' वाटू लागलं आहे.


दूरदर्शनवर ज्ञान व माहिती देणारे कार्यक्रम असतात.  दूरदर्शनवर बालांसाठी, प्रौढांसाठी तसेच युवकांसाठी, महिलांसाठी व ग्रामीण भागातील लोकांसाठी खास कार्यक्रम असतात. दिवसभर कष्ट करून आल्यावर 'दूरदर्शन' म्हणजे एक "दिलासा'च वाटतो.


 परंतु या दूरदर्शनचे नकळत वाईट परिणाम झाले. 'रामायण' टी. व्ही.वर लागायचं त्या काळात आजारी माणसाला 'रिक्षा' किंवा 'टॅक्सी'ही मिळायची नाही. किंवा टी. व्ही.वर चांगला कार्यक्रम लागला असला, की आलेल्या पाहुण्यांशी बोलायलाही लोक तयार नसतात. टी. व्ही.मुळे प्रौढांचे व मुलांचे वाचन कमी झाले. मुलांचा संध्याकाळचा खेळ व प्रौढांचे सायंकाळचे फिरणे बंद झाले. 


ध्वनिप्रदुषण वाढले. केबल टी. व्ही. तर पालकांना डोकेदुखी वाटू लागली. मुलांची मित्रमंडळी कमी झाली. बुद्धिबळासारखे खेळ खेळण्यास पार्टनर मिळू शकत नाही, अशा तक्रारी ऐकू येऊ लागल्या. डोळ्यांवर वाईट परिणाम झाले. एवढेच काय, एखादा दिवस टी. व्ही. बंद ठेवला तर घरात करमत नाही.



वातावरण उदास होते. या झालेल्या सर्व दुष्परिणामांना स्वीकारूनही असं म्हणावं लागेल, की गेल्या तीस वर्षांत टी. व्ही.ने फार मोठी सामाजिक, शैक्षणिक कामगिरी बजावली आहे. टी. व्ही.मुळे अभ्यास होत नाही,' ही गोष्ट तितकीशी खरी नाही. कारण गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांनीही आम्ही टी. व्ही. बघत होतो,' असे मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे. 


टी. व्ही.मुळे अंधश्रद्धा कमी झाल्या. वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण झाला. कुटुंबनियोजनाचा सोपा उपाय जनतेला समजला. बालकांच्या आरोग्याचे रक्षण होऊ लागले. पॉझिटिव्ह हेल्थ शो' व 'योगा' या कार्यक्रमामुळे आरोग्यविषयक जाणीव निर्माण झाली. 


टी. व्ही.वरील बातम्या व इतर क्रीडा-विषयक सामने पाहून आंतरराष्ट्रीय खेळाडू लोक पाहू शकले. भौगोलिक ज्ञान व सामान्य ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. एवढी महान कामगिरी टी. व्ही.द्वारे होत असताना टी. व्ही.ला 'शाप' म्हणणे बरोबर होईल का?


टी. व्ही.चे वाईट परिणाम टाळायचे असतील तर पालकांनी, कुटुंबप्रमुखांनी कंबर कसली पाहिजे. टी. व्ही.वरील कार्यक्रमांची निवड केली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवून दिले पाहिजे. त्यात टी. व्ही. पहाण्यासाठी वेळ ठेवला पाहिजे. 'बातम्या,  वर्ल्ड धिस वीक'सारखे कार्यक्रम मुलांसमवेत आपण पाहिले पाहिजेत. 



शैक्षणिक कार्यक्रमांबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण केली पाहिजे.  एखाददुसरी चांगली सिरियलही आवर्जुन मुलांसह पाहावी. परंतु टी. व्ही.वरचे सर्व कार्यक्रम आपण पाहिलेच पाहिजेत, नाहीतर ते कार्यक्रम फुकट जातील असा गैरसमज करून घेऊ नये. 


काय पहावे? किती पहावे? केव्हा पहावे? यांचे भान ठेवल्यस टी. व्ही. देवदूत वाटेल. टी. व्ही.चा उपयोग फक्त मनोरंजनासाठी केल्यास जीवन विलासी बनते. दिवास्वप्न पहाणे, कल्पनाविश्वात रमणे, वास्तवतेला सामोरं जाण्याची असमर्थता निर्माण होणे हे दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे टी. व्ही.वरील सर्वच कार्यक्रम पहाणे हिताचे नाही याची जाणीव पालकांना हवी व ती त्यांनी मुलांमध्ये निर्माण केली तर भावी पिढी प्रक्षोभक, हिंसाचारी, भोगवादी, विलासी न होता सदाचारी, ज्ञानी, देशाबद्दल व मानवतेबद्दल प्रेम बाळगणारी, राष्ट्रीय एकात्मता जपणारी, वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणारी एक सुजाण पिढी निर्माण होईल. मग दूरदर्शन एक वरदान किंवा देवदूत वाटेल!

दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi


स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी बघणार  आहोत. या निबंधात  स्वच्छतेचे महत्‍व  व त्‍याचे फायचे ,   स्वच्छतेसाठी सरकार करत असलेल्‍या उपाययोजना, स्वच्छतेविषयी नागरीकांनी उचलण्‍याची पावले याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला. 
निबंध मराठी क्रमांक 1 (391 शब्‍दात)
माझी आजी नेहमी सांगत असे की, 'हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे.' केवढा मोठा अर्थ आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येते. पण आपण हे कधीच लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही.

वैयक्तिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही, तर त्वचारोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही, तर दात किडतील. केसांची स्वच्छता राखली नाही, तर केसांत उवा होतील.
व्यक्तिगत स्वच्छतेइतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालये हवीत. तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते. म्‍हणुन ही नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहीजे. 

आपण सर्वांनी आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत तर असतोच पण आपण जेव्‍हा आपल्‍या परीसराची काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल कारण प्रत्येक व्यक्ती परीसराच्‍या  स्वच्छता करत असेल तरच आपला देश स्वच्छ होईल . घरात स्‍वच्‍छता राखण्‍याचे फायदे पण भरपुर आहेत,घरात स्वच्छता ठेवल्‍याने  आपण आजारी पडणार नाही. मनही प्रसन्न राहील. 

जर आपण घरात अस्‍वच्‍छता ठेवली तर अनेक प्रकारचे किटक जसे झुरळ, डास आपल्‍या घरात शिरून रोगराई पसरविण्‍याचे काम करतात. व परीणामी आपण आजारी पडतो त्‍यात आपले पैसे व वेळ दोन्‍ही वाया जातात. घरात स्‍वच्‍छता असली व घरात एखादा पाहुणा आल्‍यास तो घरातील स्‍वच्‍छता पाहुन खुप खुष होतो. पण जर का घराता स्‍वच्‍छता नसेल तर ती अस्‍वच्‍छता  कोणालाच आवडणार नाही.  स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या परीसर स्वच्छ करणे. स्वच्छता हा मानवाचा आवश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की जिथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते.

swachata che mahatva marathi nibandh
 swachata che mahatva marathi nibandh 


काही लोकांचे मत असे असते की स्वच्छता  करणे हे सरकारचे काम आहे म्‍हणुन ते स्‍वत: काहीच करत नाहीत आणि सर्व जबाबदारी सरकार सोडुन मोकळे होतात. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्‍य वाढुन रोगराई वाढण्‍यास मदत होते. प्रत्येक भारतीयांने आपआपल्या वैयक्तीेक पातळीवर स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला पाहीजे. तरच मोहीम सफल होण्यास मदत होईल. आजही ६० टक्‍याहुनही अधिक लोक बाहेर शौचास जाणे या सवयीमुळे विविध प्रकारच्‍या आजारास कारणीभुत ठरत आहेत. चांगल्या आरोग्यासाठी शरीराची स्वच्छता खूप महत्वाची असते. शरीरात घाण आणि रोग नेहमीच एकत्र राहतात त्‍यामुळे शरीर निरोगी आणि आजारांपासून दुर  ठेवण्यासाठी स्वच्छता खुप महत्‍वाची ठरते.
अनेक थोरामोठ्यांनी, गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. आता शासनानेही सर्वत्र नरेंद्र मोदींजीचे स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्यामुळे गावाचा, पर्यायाने देशाचा विकास होईल.


निबंध मराठी क्रमांक 2 (520 शब्‍दात)
प्रसिध्‍द म्‍हण आहे की स्‍वच्‍छता ईश्‍वरासमान आहे.  या ओळी आपल्‍याला खुप काही व्‍यक्‍त करून जातात ते म्‍हणजे स्‍वच्‍छता स्‍वस्‍थ जिवनाचा आवश्‍यक भाग आहे. स्वच्छता आणि आरोग्य एकमेकांशी संबधीत असतात. तुम्‍ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढे निरोगी राहाल. स्वच्छतेचे महत्‍व समजुन घेऊन आपण स्वच्छतेबद्दल जनजागृती केली पाहीजे. ज्‍याप्रमाणे मानवी जिवनात अन्‍न , वस्‍त्र आणि निवारा गरजेचे आहे तितक्याच प्रमाणात स्वच्छतेला महत्‍व दिले गेले पाहीजे . कारण अस्वच्छता साथीच्‍या रोगांना आमंत्रण देते.

साथीच्‍या रोगांना प्रसार करण्‍यास व वाढ होण्‍यास अस्वच्छता मदत करते. जर प्रत्‍येकाने घर व घराजवळील परीसर स्वच्छ ठेवल्‍यास आपण संपुर्ण देश स्वच्छ करून घातक रोगांना दुर ठेवु शकतो. स्वच्छतेचे महत्‍व जाणुन घेतल्‍यामुळेच स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्‍यात आली आहे. या मोहीमेमुळे देशात स्वच्छता राहुन नागरीकांचे आरोग्य सुधारूण आपल्‍या देशाची प्रगती होण्‍यास मदत होईल. स्वच्छ भारत मोहीमेमध्‍ये काही ठळक कामे करण्‍यात आली आहे. त्‍यातिल काही पुढील प्रमाणे सांगता येईल.

  • पुरेश्‍या प्रमाणात प्रमाणात शौचालय बांधण्‍यात येत आहेत.
  • ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छतेचे महत्‍व पटविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्‍यात येत आहेत.
  • शहरातील प्रदुषण नियंत्रित करण्‍यासाठी प्रदुषण कायद्यात आवश्‍यक ते बदल करण्‍यात येत आहेत .
  • स्वच्छता कशी ठेवावी त्‍याचे महत्व काय याचे ज्ञान सामान्‍य नागरीकांना साध्‍या सरळ सोप्‍या भाषेत देण्‍यात आले .
  • स्वच्छतेची जबाबदारी फक्त महानगरपालीकेच्‍या सफाई कारगाराचीच नसुन ती आपल्‍या सर्वाचीच आहे याबद्दल जनजागृती करण्‍यात आली .
  • स्वच्छतेतुन प्रगत व निरोगी राष्‍ट्र निर्मिती कशी होईल याचे मार्गदर्शन करण्‍यात आले.
  • पिण्यााचे शुध्द पाणी पोहचविले जात आहे. 

स्वच्छता ही एक अशी चांगली सवय आहे की ज्‍यामुळे आपण चांगले शारीरीक व मानसिक आरोग्य प्राप्‍त करू शकतो. सर्वच पालक आपल्‍या मुलांना लहानपणी चालणे शिकवतात, कारण ही गोष्‍ट त्‍यांना आयुष्‍यभर उपयोगी येत असते. लहान मुलांमध्‍ये कोणतीही गोष्‍ट लवकर शिकण्‍याची क्षमता असते म्‍हणुन लहान वयापासुनच त्‍यांना स्वच्छता आपल्‍यासाठी किती महत्‍वाची आहे यांची तार्किक चर्चा केली पाहीजे. व स्वच्छतेचे महत्‍व पटवुन दिले गेले पाहीजे. 

जर पालकांनी मुलांना प्रोत्‍साहीत केले तर ते स्वच्छतेची चांगली सवय सहजतेने लावु शकतील. जेवनाच्‍या आधी हात धुणे, रोज अंघोळ करणे यासारख्‍या सवयीचे फायदे समजावुन सांगीतले गेले पाहीजे.  स्वच्छता एक वेळा करून उरकुन टाकण्‍याचे काम नाही , स्वच्छतेला आपल्याला दैनदीन जिवनात उपयोगात आणायला पाहीजे. गांधीजींनी म्‍हटल्‍याप्रमाणे स्वच्छता हिच सेवा आहे . देशाला व आपल्‍याला आज स्वच्छतेची गरज आहे. कारण अस्वच्छतेमुळे अनेक नागरीक रोगांचे बळी ठरत आहेत . त्‍यामुळे स्वच्छतेकडे गंभिररित्‍या लक्ष देऊन आपला व आपल्‍या राष्ट्राचा विकास साधुन घेतला पाहीजे.  

देशात पर्यटन व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी स्वच्छता हा एक चांगला मार्ग आहे . कारण भारतातील अस्वच्छता कोणत्‍याही पर्यटकाला आवडणार नाही. आपल्याला भारत देशांची प्र‍तिमा उंचावण्‍याची ही एक संधी आहे. येणारा प्रत्‍येक पर्यटक भारतातील सौदर्य व परीसरातील स्वच्छता पाहुन त्‍यांचे मन प्रसन्‍न राहील्‍या शिवाय राहणार नाही. आरोग्याची तुलना संपत्‍ती बरोबर केली जाते आणि आरोग्य प्राप्‍तीसाठी आपण आपल्‍या सभोवतालाच्‍या परीसरासोबतच आपले शरिर व मन पण स्वच्छ ठेवले पाहीजे , मन स्वच्छ ठेवण्‍यासाठी ध्‍यान धारण व योगासने करणे आवश्‍यक आहे . स्वच्छता हे फक्‍त सरकारचे काम नाही ती सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. आणि ती आपण चांगल्‍या प्रकारे पार पाडुन भारताचे नाव संपुर्ण विश्‍वात उंच करू व भारताच्‍या प्रगतीत मोठी भर घालु  यात काडीमात्र शंका नाही. 

मित्रांनो तुम्‍हाला स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh कसा वाटला हे कमेंट करून कळवा.  भारताला प्रगतीशील समृध्‍द राष्‍ट्र बनविण्‍यासाठी व स्वच्छतेबद्दल जनजागृती होण्‍यासाठी हा निबंध तुम्‍हाच्‍या मित्र परीवारा सोबत शेअर करा . धन्‍यवाद 

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh

मराठी निबंध  Marathi Nibandh


  1. शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi (nibandh in marathi 12th) 


    शाळा आपल्‍या बालपणातील महत्‍वाचा भाग असतो. शालेय जिवनात केलेल्‍या गंमतीदार आठवणी असा हा काळ कोणीही विसरू शकत नाही.या निबंधात निरोप समारंभातील आधीचा काळ व निरोप समारंभातील घडलेल्‍या गोष्‍टीचे वर्णन केले आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. marathi nibandh
    marathi nibandh
    वसंत सर्व  ऋतुंचा राजा  मराठी  निबंध | vasant essay in marathiया निबंधामध्‍ये वसंत ऋतुचे गुणगाण केले आहे. वसंत ऋतुमध्‍ये पर्यावरणात होणारे बदल सांगीतले आहे. पशु पक्षी कश्‍याप्रकारे आनंदीत होतात हे दाखविले आहे.पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  1.  स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh
    या निबंधामध्‍ये स्वच्छतेचे महत्‍व सांगीतले गेले आहे. स्वच्छते अभावी होणारे नुकसानदेखील सांगीतले गेले आहे.भारत सरकार राबवित असलेल्‍या उपाययोजना व नागरीकांनी कोणती पावले उचलली पाहीजे याचे मार्गदर्शन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  2. एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay
    शेतकरी विश्‍वाचा अन्‍नदाता आहे. पण या अन्नदात्याची कश्‍याप्रकारे पिळवणुक होते व  तो नैर्सगिक व सरकारी संकटा‍त कसा भरडला जातो याचे वर्णन केले आहे. या संकटावुन स्‍वताला काढण्‍यासाठी तो आपली व्‍यथा इतरासमोर मांडत आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.


  1. माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi
    प्रत्‍येक व्‍यक्ती आपआपला छंदातुन आनंद प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करत असते. कुणी निसर्ग भ्रमंती करते. कुणी पोस्‍टाची तिकीटे जमा करते. कुणी पुस्‍तकांना आपला मित्र बनवते. या निबंधात अश्‍याच एका छंदाचे वर्णन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi
    बाबासाहेब, आता तुम्ही हवे होता ! बघा ना, तुमच्या मुलांनी काय काय मिळवले आहे. कुणी एखादया राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, तर कुणी विदयापीठाचा कुलगुरू, कुणी देशाचा उपराष्ट्रपती, तर कुणी प्रत्यक्ष राष्ट्रपती. बाबासाहेब हेच तुम्हांला हवे होते ना !

    तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर खपलात त्याच तुमच्या अनुयायांनी खूप प्रगती केली आहे. त्यांनी शिकावे. अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडावे, म्हणून तुम्ही धडपडलात, शाळा काढल्यात, महाविदयालये काढलीत. 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था काढली. त्याला आज सुमधुर फळे आली आहेत. बाबासाहेब, हे पाहायला तुम्ही हवे होता !

    बाबासाहेब, तुम्ही नेहमी आम्हांला सांगत होता की 'वाचाल तर वाचाल'. त्याचा पुरेपूर प्रत्यय आज आला आहे. तुमच्या सांगण्यानुसार जे वाचायला शिकले त्यांनी खूप वाचले आणि मग त्यांनी स्वतः लिहायला सुरुवात केली. समाजाकडून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या ज्यांचे दमन झाले होते. त्यांनी धडपड करून आपली प्रगती साधली. त्यामागे तुमचीच प्रेरणा होती. मग या मंडळींनी आपल्या सुखदुःखाचे अनुभव शब्दांत मांडले.

    जीवनाची कठीण वाट तडवताना' बसलेल्या ठेचा त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. अशा या आगळ्यावेगळ्या पण वास्तववादी साहित्याने आज मराठी सारस्वताचे भांडार समृद्ध झाले आहे. आज सर्व मराठी भाषिकांनी त्या साहित्याला गौरवले आहे. कित्येकांच्या पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ' आमचा बाप आणि आम्ही ' या पुस्तकाने तर  स्वदेशाच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. जगातल्या अनेक भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. बाबासाहेब, तुमच्या या लेकरांनी केलेली ही प्रगती पाहायला आज तुम्ही हवे होता !

    हे झाले दलित समाजाबददल. परंत बाबासाहेब तम्ही फक्त दलितांसाठीच कार्य केले. असे नाही. तुमच्या डोळ्यासमोर फक्त दलित समाज नव्हता; तर अखंड समर्थ भारत होता. या देशातील प्रत्येकाला उन्नत आयुष्य मिळावे, असा तुमचा ध्यास होता. त्यासाठी जगात कोणत्याही देशाला लाभली नाही, अशी अजोड घटना तुम्ही लिहिलीत. या देशाला तुम्ही मार्ग दाखवलात.

    त्याच मार्गाने जात असल्यामळे आज आपला देश देदीप्यमान अशी प्रगती करीत आहे; जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आपल्या अवतीभवतीचे पाकिस्तान, बांगलादेश व अन्य शेकडो देश दुःखदैन्याच्या कर्दमात रुतले आहेत. तुमच्यासारखी विशाल दृष्टी व अंतःकरण असलेला घटनाकार त्यांना लाभला नाही. आम्ही भारतमातेचे पुत्र किती भाग्यवान की, तुमच्यासारखा महामानव आम्हांला नेता म्हणून लाभला !

    खरे तर, तुम्ही फक्त दलितांचे, फक्त भारतीयांचेच नव्हे, तर अखिल मानवजातीचे उद्धारकर्ते आहात ! तुम्ही दाखवलेल्या मार्गाने जाऊन आम्ही भारतीय आज जगभर कशी पताका फडकवत आहोत, हे पाहायला तुम्ही हवे होता ! एक खरे की, भारतात अजूनही दीनदलित, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन दारिद्र्यात होरपळत आहेत. आज आपला देश त्यांच्याही उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तुम्ही असता, तर हे प्रयत्न अधिक वेगाने झाले असते. आपल्या समाजातील दुबळी अंगे अधिक वेगाने बलशाली करता आली असती.

    आम्ही या क्षणी तुम्हांला ग्वाही देतो की, तुमची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दाखवलेल्या मार्गाने आम्ही निष्ठेने प्रयत्न करीत राह आणि या देशात मानवतेचे साम्राज्य निर्माण करू !   Dr Babasaheb Ambedkar निबंध २   पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा

मराठी निबंध marathi nibandh

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज जलसंकट हे जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या बनली आहे. “पाणी” निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमुल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपुन वापर न केल्‍यामुळे मानवजाती पुढे जलसं‍कट उभे ठाकले आहे . याच्‍यासाठी समाजात,शाळा,महाविद्यालयामध्‍ये पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेचे महत्‍व पटवुन जनजागृती केली गेली पाहीजे. चला तर मग  या निबंधाला सुरूवात करूया 

सर्व प्राणिमात्रांच्या जीवनात पाणी हे फार महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन. पण शहरातील लोकांना पाण्याची किंमत कळत नाही. ते लोक पाणी जपून वापरत नाहीत. खूप पाणी वाया घालवतात. खेड्यापाड्यांतील स्त्रियांना दूर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. त्यांचे कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळ्यात नदया, विहिरी आटतात. त्या वेळी लहानशा वाटीने खड्ड्यातील पाणी भरणारी मुले पाहिली की, जीव तडफडतो.

पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्यामुळेच माणसाला त्याची किंमत कळत नाही. पाण्याची टंचाई ही आता जगभर निर्माण झाली आहे. कारण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी फार खाली गेली आहे. माणसाने जंगले नष्ट केली, बांधकाम केले. त्यामुळे जमिनीत जेवढे पाणी मुरायला हवे, तेवढे मुरत नाही. म्‍हणुन पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेवर भर दिला गेला पाहीजे.

सुदैवाने आपल्या देशात विपुल पाऊस पडतो. पण हे पाणी समुद्रात वाहून जाते. आता हे पाणी आपण जमिनीत जिरवायला हवे, साठवायला हवे. त्यासाठी तळी, बंधारे किंवा धरणे बांधली पाहिजेत. म्हणजे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना व नदयांना बारमहा पाणी राहील. झाडे जगतील. जंगले वाढतील. शेती चांगली होईल, माणूस सुखाने जगेल.  


पाणी हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. पाण्याशिवाय जीवन ही कल्पनाच शक्य नाही. पाण्यावरच सर्व सजीवसृष्टीचे जीवन सुख समृद्धी अवलंबून आहे.  सध्या पाणी प्रश्नाबाबत जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे एप्रिल महिन्यात आयोजित केले जाणारे 'जल संपत्ती दिन' या निमित्त आपल्या देशात जे साक्षरता अभियान राबविले जात आहे. 'पाणी वाचवाल तर वाचाल' हा नव्या युगाचा महामंत्र आहे.

प्रयोगशाळेत पाणी बनविता येते परंतु सर्वांची गरज पुरवेल इतके नक्कीच नाही. आज जगात पाण्यावरून संघर्ष पेटलेले दिसतात.  क्योटो इथे झालेल्या  जागतिक जलपरिषदेतील अहवालात हा इशारा देण्यात आला आहे  की या पुढील युद्धे ही पाणी वाटपाबाबत किंवा पाण्याच्या तुटवड्यावरून होतील.  आपल्या सर्वांचा प्रमुख जलस्रोत म्हणजे 'पाऊस' ज्याचे अनिश्चित आगमन, उपलब्धी प्रमाण ही समस्या सतत भेडसावत  असते.

त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन ही समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. पाणी, लोकसंख्या आणि जमीन यांचा त्रिकोण जमविणे आवश्यक आहे.  युनिसेफने महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांच्या जलसर्वेक्षणाबाबत दिलेल्या अहवालात  या राज्यांना पिण्याच्या पाण्याची व उपलब्धतेची प्रमुख टंचाई भासण्याचा इशारा दिला आहे.

समस्यांचे मूळ कारण म्हणजे वाढते उद्योगीकरण, लोकसंख्येचा भस्मासुर, जंगलाची अवैध तोड यामुळे जलचक्राचे नियमन, पर्यावरणाचे संतुलन, वन्य प्राण्यांची कमी होणारी संख्‍या इ. समस्या ठळक रूपाने स्पष्ट होऊ लागल्या. पूर व दुष्काळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान व प्रचंड जीवितहानी दरवर्षी होत असते. भू-गर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. त्यामुळे ४०० फुटापर्यंतसुद्धा कूपनलिका कोरड्या ठणठणीत असतात. पुरोगामी महाराष्ट्रात ७५ तालुके अवर्षण प्रवणग्रस्त आहेत. दिवसेंदिवस हा आकडा फुगतच चालला आहे.

Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh
Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh


जलसंवर्धन व जलप्रदूषण या आणखी दोन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. वाढते उद्योगिकरण त्यातून होणारे सांडपाणी, रासायनिक प्रदूषके, नागरी वस्तीचा सांडपाण्याचा लोट यामुळे पाण्यात प्रदूषणाचा उच्चांक झाला आहे.  याबाबत जंगलांचे संवर्धन करणे,त्यांचे संरक्षण करणे आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्‍पना चांगल्‍या प्रकारे राबवायला पाहीजे.

ही काळाची गरज बनली आहे. 'वनश्री तेथे धनश्री' त्या प्रमाणेच वनश्री तेथे जलश्री याबाबत उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. सर्व जलस्रोत, नद्या यांचा उगम बहुतांशी जंगलातच होतो. त्यामुळे वनांची बेसुमार व अवैधरीत्या तोड रोखणे गरजेचे आहे. तसेच डोंगर उतारावर वृक्षांची लागवड करून जमिनीची होणारी धूप रोखणे महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर, शेती करण्याचे आधुनिक पद्धतींचा वापर नगदी पिके उदा. ऊस यासारख्या पिकांवर संशोधन व कमी पाण्यात येणारी पिके यावर भर देणे, सध्या मोठ्या धरणांनी निर्माण केलेले प्रश्न हे फायद्यापेक्षा तोट्याचेच जास्त आहे. तेव्हा नद्यांवर छोटी-छोटी धरणे बांधून नदीचा प्रवाह जिवंत ठेवणे ज्यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार राहील.

 भूजल पातळी टिकण्यास मदत होईल. ग्रामीण भागात विहीर पुनर्भरणासारखे कार्यक्रम राबवणे, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम हाती घेणे. छोटे-छोटे नाले, बंधारे बांधणे 'गाव तेथे तळे' या संकल्पना साकारणे, ओढे, नाले यावर बांध घालणे इ. प्रमुख उपाययोजना या समस्यांवर सांगता येतील. जेणेकरून विविध प्रकारच्या जमिनीमध्ये पाणी जिरण्यास मदत होईल.

कारण पावसाचे पडणारे पाणी जमिनीत किती प्रमाणात मुरते व बाष्पीभवनाद्वारे किती पाणी वर बाष्पाच्या रूपात उडून जाते; याबाबत अजून कोणालाही अचूक सांगता आलेले नाही. त्यामुळे पाण्याचा एक एक थेंब या धरणीमातेच्या 'उदरात जिरवणे व भूजलपातळी सुधारणे' या गोष्टी आपल्या हातात आहे.


हवा, जल, प्राणी, वन, मानव ही पर्यावरणाची परस्परावलंबी साखळी अबाधित ठेवणे गरजेचे आहे. या साखळीतील प्रत्येक कडीचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे, तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि या निसर्गाची जैव विविधता टिकून राहील. आज हजारो सपुष्प वनस्पती, शेकडो प्राणी, पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पाणी आणि निसर्गाच्या दरबारात चुकीला क्षमा नाही. याचे प्रत्यंतर 'ग्लोबल वॉर्मिंग, कॅटरीना, रीटा, त्सुनामी' या प्रलयांमधून आपण भोगत आहोत.

आज पाण्याला कितीतरी महत्त्व आले आहे. कारण पृथ्वीतलावर साधारण ७५% पाणीसाठा हा आकडा किती फसवा आहे? हे आपल्याला पुढील संदर्भावरून लक्षात येईल. त्यांपैकी फक्त २% पाणी गोड आणि त्यातील १-१.२५%  पाणी पिण्यासाठीशेतीसाठी योग्य आहे.

 तेव्हा पाण्याचा अवास्तव वापर करणे किती चुकीचे व मूर्खपणाचे आहे हे आपल्या लक्षात येते. पाणी संपत्ती असून तिचा पर्याप्त वापर केला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रात हिरवे बाजार, राळेगण सिद्धी, दरेवाड, नायगाव, काळदरी ही गावे जल धोरणांचा योग्य पाठपुरावा करून ती कृतीत आणून विकास प्रक्रियेच्या दिशेने घोडदौड करीत आहेत आणि त्यात सातत्य राखत आहेत. जर या गावांना हे शक्य होत असेल तर ते आपल्याला का शक्य नाही?

 यासाठी आवश्यक आहे ती आत्मविश्वास, एकोपा व दृढनिश्चयाची. जलसमस्या ही शासनाची नसून माझी आहे. माझ्या गावाची आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. पुढील प्रत्येक विकास कार्यात जनतेला सहभागी करून घेणे क्रम प्राप्त ठरेल आणि जनतेचा पुढाकार व शासन त्यात सहभागी या धोरणाचा अवलंब केला पाहिजे.

समाजसेवक हजारे, डॉ. विलासराव साळुखे, राजस्थानचे जोहडवाले (पाणीवाले) डॉ. राजेंद्र सिंग यांनी आपल्यासमोर आदर्श उभे केले आहोत. जलसाक्षरता चळवळ वाडी वस्तीवर पोहोचवून पाण्याचे जतन म्हणजे पाण्याची निर्मिती या सूत्राचा प्रचार केला पाहिजे. जलसंवर्धन व जलसंरक्षणासाठी केलेले कायदे याबरोबर जनसहभाग वाढलाच पाहिजे. किंबहुना जनसहभाग हा जलसंवर्धनाचा मूलमंत्रच आहे.  असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्‍याच बरोबर पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सवोच्‍च महत्‍व देऊन राबवली गेली पाहीजे तरच जलसंवर्धन होण्‍यास मदत होईल. 


वरील निबंधावरून आपल्‍याला समजुन येईल की जलसंकट किती भिषण समस्‍या आहे व त्‍यावर कोणत्‍या उपाययोजना केल्‍या पाहीजेत. तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून सांगा तसेच जलसंवर्धन आणि पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण संपुर्णपणे यशस्‍वी करण्‍यासाठी व जनजागृती करण्‍यासाठी एक शेअर जरूर करा.  

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh