मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile Shap Ki Vardan Marathi nibandh बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्या या क्रांतीकारी उपकरणाचे फायदे व आरोग्यावर होणारे तोटे सांगीतले आहे.मोबाईलमुळे मानवी जिवनात काय बदल झाले व त्याचा उपयोग कसा करून घेता येईल याविषयी सविस्तरपणे माहीती सांगीतली आहे चला तर मग सुरू करूया निबंधाला .आपली मित्रमंडळी, नातेवाईक, घरातील माणसे यांच्याशी जिवाभावाच्या दोन गोष्टी बोलणे दुरापास्त झाले आहे. यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या इतर व्यक्तींपासून दुरावत चालला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होत आहे. व्यक्तीला निवांतपणे स्वत:कडेही पाहायला वेळ राहिलेला नाही. आजकाल मोबाईलमध्ये गेम खेळने नेहमीची गोष्ट झाली आहे. त्यातच PUBG (Player Unknown's Battle grounds.) या गेमने धुमाकुळ घातला आहे. मुले तहान भुक विसरून हा गेम खेळतात त्यामुळे त्यांंच्या अभ्यासाकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
Mobile Shap Ki Vardan |
'गणपती दूध पितो' यांसारख्या अंधश्रद्धात्मक अफवा मोबाईलमुळेच जगभर पसरतात. भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठीही या उपकरणाचा उपयोग गुन्हेगारांनी केल्याचे उघड झालेले आहेच. हे सर्व पाहिले की, हा मोबाईल शाप तर नाही ना, असे मनात आल्यावाचून राहत नाही.
आपण कोणाशीही चटकन संपर्क साधू शकत असल्यामुळे आपली कामे भराभर होऊ शकतात. विदयार्थ्यांनाही लहानसहान शंकांचे निरसन करून घेण्यासाठी हे साधन खूप उपयुक्त ठरते. यामुळे अभ्यासाचा, कामांचा वेग वाढला आहे. वेळेचा अपव्यय कमी झाला आहे. आपल्याला हवी असलेली व्यक्ती कामात गुंतलेली असेल, तर आपण एस्एम्एस् पाठवू शकतो. आधुनिक काळातील गतिमान जीवनाशी हा मोबाईल सुसंवादी आहे.
मित्रांनो तुम्हाला brahman dhwani shap ki vardan marathi nibandh हा कसा वाटला हे कमेंट करून शांगु शकता , तुम्ही मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी कोणते उपाय उपयोगात येतील हे सांगु शकता यामुळे आमच्या इतर वाचकांना तुमच्या सल्याचा उपयोग होऊ शकेल, धन्यवाद .
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- भ्रमणध्वनीचा (स्मार्टफोन) शोध हा एक महान शोध
- खूप दुष्परिणाम
- दूरध्वनीवर सतत
- बोलत राहणे
- भोवतालापासून तुटलेपण
- SMS चे खूळ-वाईट उपयोग
- बदनामीसाठीही
- अंधश्रद्धा पसरवण्यासाठी
- परीक्षेतील गैरव्यवहार वाढण्यास मदत
- बॉम्बस्फोट
- परंतु खूप उपयुक्त
- कोणाशीही, कुठेही, कधीही संपर्क
- कामाचा वेग वाढला
- वेळेचा अपव्यय कमी
- शाळकरी मुले व वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी
- अडचणींच्या वेळी तर देवदूतच
- गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही उपयोगी
- चांगले-वाईटपण वापर करणाऱ्यावर अवलंबून.