शब्दचित्रामक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शब्दचित्रामक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi

                                                                        मराठी निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maze avadte shikshak nibandh in marathi बघणार आहोत. या ३ निबंधामध्‍ये लहानपणातील शाळेतील प्रसंग वर्णन केेले आहे. विद्यार्थ्‍यांना कश्‍याप्रकारे शिकविले पाहीजे याचे उदाहरण सुध्‍दा या निबंधात दिले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

मराठीचा पहिलाच तास ! गोडबोले सरांनी वर्गात पाऊल ठेवलं आणि माझी कळी खुलली. सरांविषयी इतकं ऐकलं की कधी त्यांचा तास येतो असं मला झालं होतं. 'मराठी शिकवण्यात त्यांचा हात धरणारं कोणी नाही' अशी त्यांची ख्याती ! पण ते दहावीलाच शिकवायचे, त्या वर्षी प्रथमच नववीला आले होते.


Maze-Avadte-Shikshak-Nibandh-In-Marathi
Maze-Avadte-Shikshak-Nibandh-In-Marathi


आत्यंतिक आदराने मी त्यांच्याकडे पाहात होतो . पायात चपला, हिरवट रंगाची पैंट, पांढरा शर्ट, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात अंगठी, गौरवर्ण, पिंगट बोलके डोळे, कोरीव मिश्या, मुख्य म्हणजे अतिशय प्रसन्न हसणं
हजेरी सुरू झाली. “ आपटेऽ...” " येस्स सरऽ!” पहिल्याच हजेरीला सरांनी वर बघितलं. मिस्किल हसले, “ मुलांनो! तास मराठी मग उत्तर इंग्रजीतुन का रे. 

माहीत आहे मराठीचा गोडवा आणि शक्ती ?" त्यांनी हजेरी बाजूला ठेवून मग अमृताची बरसात केली. 'माझा मराठाचि बोलु कवतुके..' अशी । मराठी भाषा, तिचं सौंदर्य, पावित्र्य, आवश्यकता, थोरवी, ...अशा काही रसाळपणे सांगितल्या की तासाची घंटा झाली तेव्हा कळलेच नाही की वेळ कुठे निघुन गेला.

त्यांना मी नेहमी ' गोडबोले सरच' म्हणायचो गोडबोलें सरांची वाट आम्ही नेहमीच आतुरतेनं पाहात असू. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. त्यांनी पुस्तक हाती कधी धरलंच नाही. धड्यावरचे प्रश्न लिहून दिलेच नाहीत. धडा घरून वाचून यायला सांगायचे आणि वर्गात तो धडा ज्यांनी लिहिला त्यांची माहिती, का लिहिला, कुठल्या मनःस्थितीत लिहिला ही पार्श्वभूमी, ज्यातून तो धडा घेतला त्या पुस्तकाची माहिती, धड्याचा आशय, त्यातील सौंदर्य, तसे समान दाखले -इतर पुस्तकातले, जीवनानुभव, तत्त्वज्ञान, मार्गदर्शन...असं करत करत तो धडा व्हायचा.

मराठीतल्या साऱ्या अलंकारांनी आम्ही सारे नटलो. ' गोडबोले सर' कधी रागवायचे नाहीत. तास कधी बुडवायचे नाहीत. अंगात ताप  असताना शिकवलेलं मी पाहिलंय, आम्हीही कधी तास चुकवायचो नाही. त्यांच्या वाणीत जादूच तशी होती ! ते शिकवत असताना ज्ञानेश्वर, नामदेव, गिरीश, पाडगावकर, लोकहितवादी, गोरे, अत्रे, फडके...हे सारे त्यांच्या रोजच्या बैठकीला असतात असे वाटायचे. इतर विषयांचा द्वेष त्यांनी कधी केला नाही. 

इंग्लिश मीडियमची लाट पाहून ते खंतावायचे. म्हणायचे " अरे ! आपल्या आईची सेवा आपण नाही केली तर इतर कोणी येऊन करणार आहे का ? आपली आजी संस्कृत, अगोदरच रानोमाळ भटकते आहे.
 
दहावीच्या निरोप समारंभाचे वेळी सर गोडबोल्यांनी केलेलं भाषण शिल्प होऊन मनात बसले आहे. ते म्हणाले, "आता तुमच्या दिशा बदलतील...भाषा बदलतील ....आचार बदलतील...विचार बदलतील...माणसं कपडे बदलतात...राहायची घरं बदलतात, पण आपलं कुलदैवत नाही बदलत, पिढ्यान् पिढ्या तेच ठेवतात. तसं तुम्ही तुमचं मराठीपण, मराठी भाषा हे कुलदैवत, या बदलत्या काळातही अभंग, अखंड ठेवा हीच इच्छा !...शुभास्ते पंथानः सन्तु !"

मराठीवर असं सपाटून प्रेम करणाऱ्या आणि आम्हालाही आमच्या न कळत करायला लावणाऱ्या सा गोडबोलेंना मी कशी विसरेन ? आजही माझ्या अभ्यासिकेत मराठी साहित्याचा पुस्तक ठेवा, त्यांचीच आठवण म्हणून, साठवण केलेला तुम्हाला दिसेल!
 


मराठी निबंध 2

आवडते शिक्षक म्हणताच मला आठवतात ते आमचे जाधव सर. जाधव सर हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ आवडतेच नव्हेत; तर वंदनीय आहेत.

केवळ माझेच नव्हे; तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विदयार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर ! किंबहुना या शाळेतील विदयार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटले की, ते जाधव सरांच्या हटकून आठवणी काढतात..

जाधव सरांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आहे. उंच शरीरयष्टी, आणि प्रसन्न चेहरा. सरांचा पोशाख अगदी साधा, पण स्वच्छ. कधी कधी ते खादीचा लांब सदरा घालतात; तेव्हा तर ते एकदम रुबाबदार दिसतात. त्यांनी कधी भडक रंगाचे कपडे घातलेले मला आठवतच नाही. सिनेमातल्या ढंगाचे फॅशनेबल कपडे त्यांच्या अंगावर कधी दिसले नाहीत. या स्वच्छ व साध्या पोशाखावरूनही पाहणाऱ्याला सरांच्या स्वच्छ व निर्मळ अंतःकरणाची आणि निष्कलंक चारित्र्याची लगेच साक्ष पटावी.

जाधव सर आम्हांला विज्ञान व गणित विषय शिकवतात. या विषयांत त्यांचा हातखंडाच होता. विज्ञान विषय कठीण व कंटाळवाणा आणि गणित तर भीतिदायक ! पण जाधव सरांचे कौशल्य असे की, हे विषय आम्हांला कधी कंटाळवाणे वाटले नाहीत वा त्यांची भीतीही वाटली नाही.

घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेत घेत ते सहज अभ्यासाकडे वळत. एकदा विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते 'दही लावण्या'चे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलईसारखे होण्यासाठी विरजण कसे लावतात, हे सांगता सांगता बॅक्टेरिया म्हणजे काय, त्यांचे स्वरूप कसे असते, त्यांचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातील माहितीकडे ते केव्हा वळले, कळलेच नाही. 

एकदा घरातील फ्युज गेल्यावर त्यांना वितळतार मिळेना, तेव्हा वायरमधील साधी तार लावून वीजप्रवाह कसा सुरू केला, हे त्यांनी आम्हांला वर्गात सांगितले. पण त्यानंतर लागलीच धावतपळत जाऊन वितळतार आणली आणि साध्या तारेच्या जागी ती बसवली. हे आपण का केले, नाही तर कोणता धोका होता, हे समजावून सांगता सांगता त्यांनी विजेचे वहन, त्याचे परिणाम इत्यादी बाबी अलगद आमच्या डोक्यात घातल्या.

 अनेकदा ते शास्त्रज्ञांच्या आयुष्यातले धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यायोगे अनेक सिदधांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत. जाधव सर गणितातील अनेक प्रमेये शिकवताना गणितज्ञांच्या रंजक आठवणी सांगत. त्यामुळे प्रमेये आम्हांला कधी किचकट वाटलीच नाहीत.

विज्ञानप्रदर्शन हा तर जाधव सरांचा जिव्हयाळ्याचा विषय. आम्हा विदयार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनात भाग घ्यायला लावत. आम्हांला ते विषय नेमून देत. आम्हांला विचार करायला लावत; उपक्रम शोधायला लावत. या प्रयत्नांत त्यांचे मार्गदर्शनही असे. त्यामुळे आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांच्या ऐटीत विज्ञानातील उपक्रम सादर करीत असू.

आता दहावीचे वर्ष संपत आले आहे. माझ्या मनात सारखे येत आहे की, विज्ञान-गणिताची गोडी लावणारे जाधव सरांसारखे शिक्षक यानंतर मला भेटतील का? ... माहीत नाही. मात्र मला मनापासून वाटते की, यापुढे कदाचित असे सर मिळतील, न मिळतील; पण जाधव सर आम्हांला मिळाले, हे आमचे केवढे भाग्य !


 मराठी निबंध 3
माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi : हो, हो. आपटे गुरुजी हेच आमचे प्रिय गुरुजी आहेत. केवळ प्रियच नव्हेत, तर ते वंदनीयही आहेत. आमच्या गावातील या शाळेत जे जे विदयार्थी गेल्या तीस वर्षांत शिकुन  गेले त्या सर्वांचे आपटे गुरुजी हे एक आदरणीय स्थान आहे. किंबहुना या शाळेतील माजी विदयार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटतात तेव्हा ते 'गुरुजी' म्हणून ज्यांचा उल्लेख करतात, तो आपटे गुरुजींचाच असतो. 

केवळ 'गुरुजी' म्हटले की एकमेकांना उमगते की आपल्याला कुणाविषयी बोलायचे आहे. या शाळेत अनेक मुख्याध्यापक आले आणि गेले; पण सर्वांच्या मनात ठसले ते आपटे गुरुजीच. सर्व विदयार्थ्यांच्या तोंडी एकच नाव आणि ते म्हणजे 'आमचे गुरुजी-आपटे गुरुजी.'

 माझे पाचही भाऊ याच शाळेचे विदयार्थी, आज माझे हे पाचही भाऊ नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने दूरवर राहतात, ते जेव्हा जेव्हा काहीही निमित्ताने घरी येतात तेव्हा आपटे गुरुजींचा विषय निघाला नाही असे होत नाही. कारण आपटे गुरुजी हे कुणा एकटया-दुकटयालाच प्रिय नव्हते तर ते सर्वांचेच आवडते गुरुजी होते आणि आजही आहेत.

गुरुजींचे व्यक्तिमत्त्वही उठावदार आहे. उंच, तेजस्वी गौर वर्ण आणि प्रसन्न चेहरा. त्यामुळे ज्यांनी एकदा गुरुजींना पाहिले ते त्यांना विसरू शकत नाहीत. ते नेहमी ताठ चालतात अगदी साठीला येऊन पोहोचले तरी त्यांना कोणीही पाठीत किंचितही वाकलेले पाहिले नाही. काळ कितीही बदलला तरी गुरुजींच्या पोशाखात बदल नाही. दोन्ही बाजूंनी काचा मारलेले पांढरे शुभ्र धोतर, लांब नेहरू शर्ट आणि पांढरी शुभ्र गांधी टोपी. हे साधेच कपडे इतके स्वच्छ आणि टापटिपीचे असतात की पाहणाऱ्याला गुरुजींच्या स्वच्छ निर्मल अंतःकरणाची त्वरित साक्ष पटावी. 

त्यांनी खादीची टोपी डोक्यावरून कधीही काढली नाही पण तरीही ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत  नाहीत. किंबहुना राजकारणापासून ते सदैव दूरच राहिले. तरी पण देशात आणि विश्वात घडणाऱ्या सर्व घडामोडींची झूचक माहिती आपटे गुरुजींना असते, हे अनेकदा त्यांच्याशी बोलताना लक्षात येते. ते मोकळया वेळेत विदयार्थ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा करत असतात. त्यांच्या बोलण्यात कधीही कोणांबद्दल द्वेष आढळून येत नाही.

शास्त्र, गणित हे गुरुजींचे विषय. त्या विषयांचे ते पदवीधर आहेत. त्या विषयांतील अदययावत माहिती जाणून घेण्यास ते नेहमीच उत्सुक असतात. इतर गोष्टींत काटकसर करून गुरुजी शास्त्रविषयक अनेक नियतकालिके व पुस्तके विकत घेतात. शालेय जीवनात ज्या वर्गांना, ज्या इयत्तांना शास्त्राध्ययनासाठी आपटे गुरुजी लाभत ते वर्ग भाग्यवान ठरत असत. शाळेच्या वेळाबाहेर गुरुजींबरोबर आम्ही शास्त्रातील कित्येक गोष्टी शिकलो, कित्येक उपकरणे, कित्येक शास्त्रज्ञ यांची ओळख करून घेतली.

जोवर आपटे गुरुजी शाळेत होते तोवर वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या प्रदर्शनात शास्त्रविभागाच्या प्रदर्शनात काहीतरी वेगळेपणा असेच व त्याबद्दल सर्वांना उत्सुकता वाटे. याला कारण काहीना काही नवे करावे ही आपटे गुरुजींची ओढ. आपटे गुरुजी अध्यापक असले तरी  त्यांच्यातील विदयार्थी फार मोठा आहे. गुरुजींना चाहणारा विदयार्थिवर्ग तर अफाट आहे. 

आजही आपल्या जुन्या विदयार्थ्यांशी ते स्नेहाचे संबंध ठेवून असतात. त्यांचे अनेक विदयार्थी आता शास्त्रविषयाच्या वेगवेगळया शाखांत मोठ्या पदांवर आहेत. ते कधी गावात आले की आपटे गुरुजींकडे आवर्जून जातात. इतर वेळी गुरुजींचा पत्रव्यवहार चालूच असतो. त्यांचा एक विदयार्थी अणुशक्तिकेंद्रात उच्च पदावर आहे. गुरुजींना अणुशक्तिकेंद्र दाखविण्यासाठी त्याने त्यांना खास मुंबईला नेले होते.

परवाच मला गुरुजी रस्त्यात भेटले तेव्हा म्हणाले, “काय पिंटू, सुट्टीत मुंबईला येणार ना? मी जाणार आहे." माझा प्रश्नांकित चेहरा पाहुन तेच म्हणाले, "अग तुझ्या दादाचे पत्र आले आहे; तो ‘सागरसम्राट'वर आहे ना
असे आहेत हे आमचे सर्वांचे आपटे गुरुजी. एक जातिवंत शास्त्रशिक्षक आणि आमचे खरेखुरे मित्रच.वरील निबंध माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | my favorite teacher essay in marathi