कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध

 

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध  : 'मोकळा तास' म्हणजे शालेय जीवनातील एक आनंदाची पर्वणीच! “मी उदया येणार नाही हं!" असे सूतोवाच कधी एखादे गुरुजी करतात; तर-“अरे, आज अत्रे सर येणार नाहीत. त्यांच्या मेहुणीचे लग्न आहे.” अशी बित्तंबातमी एखादा वर्गमित्र आणतो तेव्हा या 'मोकळ्या तासा'ची पूर्वसूचना मिळते. पण एखादे दिवशी अनपेक्षितपणे असा 'मोकळा तास' मिळतो आणि मग आश्चर्य, आनंद अशा संमिश्र भावनेने 'ऑफ पीरियड' असा वर्गात एकच जल्लोष उठतो. मोकळ्या तासाला वर्गावर येणारे शिक्षक खिलाडू वृत्तीचे असले तर ते हे स्वागत हसत स्वीकारतात; पण असा अनुभव क्वचितच येतो. बहुतेक शिक्षक काही ना काही अभ्यासच घेत असतात.



खरे पाहता, मोकळ्या तासाला अभ्यास म्हणजे आमच्या हक्कावर आक्रमणच नाही का? मोकळा तास म्हणजे गप्पांचा तास असे आमचे गणित असते. अशा गप्पांतून आमचे जनरल नॉलेज'-सामान्य ज्ञान कितीतरी वाढते. माझ्या वर्गातील 'राजीव जोगळेकर' याला अशा मोकळ्या तासाला फार भाव असतो. कारण राजीवचे वडील शिकारी आहेत; त्यामुळे राजीवजवळ शिकारकथा, साहसकथा यांचा भरपूर साठा आहे. वर्गात आलेले शिक्षकही राजीवला एखादी चित्तथरारक शिकारकथा सांगण्याचा आग्रह करतात. मग राजीव कथा सुरू करतो. 

off period in school essay in marathi
off period in school essay in marathi


कथानिवेदनाची उत्कृष्ट कला राजूला लाभली आहे. राजूची कथा रंगू लागते तशी मुले तास विसरतात, वर्ग विसरतात, शाळाही विसरतात. राजूची कथा सुरू झालेली असते आणि आता सर्वजण जंगलात जाऊन पोहोचलेले असतात. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे असतात. श्वास रोखून धरलेले असतात. बिबट्या वाघ व शिकारी, परस्परांवर नेम धरून बसलेले असतात आणि तेवढ्यात घंटेचा टोला पडतो. गुरुजींसह सर्वांना तो तास संपू नये असे वाटत असते; पण नाइलाजाने राजूला कथा थांबवावी लागते. आणि मग कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी आम्हांला दुसऱ्या मोकळ्या तासाची वाट पाहावी लागते.



एखादा मोकळा तास म्हणजे विनोदाची मेजवानीच ठरते. आमच्या शाळेतील ‘भागवत सर' अशा मोकळ्या तासाला वर्गावर आले की ते स्वतःच काही विनोद सांगतात. मग एकापाठोपाठ एक विनोदांची, चुटक्यांची मुलांकडून मैफल झडते. प्रत्येक विनोद-श्रवणानंतर वर्गात हास्याचा कल्लोळ उठतो. काही काही विनोद तर इतके अफलातून असतात की हशाबरोबर बाकेही बडविली जातात. आपण शाळेत आहोत याचा विसर पडतो. अशा वेळी शेजारच्या वर्गातील शिक्षक आमच्या वर्गात डोकावतात; पण आम्हांला त्याची तमा नसते. असा हा मोकळा तास संपला की वाईट वाटते. पुन्हा मोकळा तास मिळावा आणि भागवत सरच वर्गावर यावेत अशी आम्ही मनोमन प्रार्थना करीत असतो.

एखादया मोकळ्या तासाला कोणीही सर वर्गावर येत नाहीत. मग काय विचारता, आमचेच राज्य चालू होते. वर्गप्रतिनिधी वर्गाची सूत्रे हाती घेतो तेव्हा वर वर वर्ग शांत दिसत असतो; पण आमच्या काही ना काही खोड्या चालूच असतात. बाकाखालची वया, पुस्तके, दप्तरे, खाण्याचा डबा, चपला इकडून तिकडे सरकविल्या जातात. कुणाच्या पाठीवर 'विकाऊ गाढवा'ची चिठ्ठी लावली जाते,


 तर कधी कुठूनतरी एखादा बाण येतो आणि मग कागदाच्या बाणांचा पाऊस पडतो. त्यातच कधीतरी नकलांचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग सर्व शिक्षकांच्या नकला घडू लागतात. वर्ग अक्षरशः डोक्यावर घेतला जातो. कधी याचे पर्यवसान शिक्षेतही होते; पण त्याचेही आम्हांला काही वाटत नाही. कारण मोकळया तासाची मजा पोटभर उपभोगलेली असते. 'मोकळा तास' हा शालेय जीवनातील 'ओयासिस', रम्य हिरवळ आहे हे खरेच!

टीप : वरील निबंध मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध  या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • shaletil aathvani essay in marathi
  • shaletil gamti jamti essay in marathi

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध



माझी आई मराठी निबंध  MAJHI AAI MARATHI NIBANDH 




नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आई मराठी निबंध मराठी (मोठा )बघणार  आहोत. या लेखामध्‍ये 6  पुर्ण  वेगवेगळे निबंध देण्‍यात आले आहे. या निबंधामधे आईचे आपल्‍या मुलाविषयी व्‍यक्त होणारे प्रेम व मुलांच्‍या फायद्यासाठी स्‍वता केलेला त्‍याग, आईचे मुलासोबत असलेल्‍या प्रेमळ नात्‍याचे वर्णन यात निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया माझी आई मराठी निबंधाला. 



आईपुढे स्वर्गाचीही महानता  कमी  पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही." माझी आईही अगदी अशीच आहे. 



आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला अभ्‍यास पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले. 

हे  निबंध पण वाचा  





mazi-aai-essay-marathi
mazi-aai-essay-marathi

मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्‍येत बिघडायची. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते.

 मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. (हे पण वाचा माझे बाबा मराठी निबंध)



ती स्वतः एम्. एस्सी.(M.Sc) असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी.(Ph.D) केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती.


माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते.


आई या शब्द साधा सरळ असुनसुध्दात त्यात पुर्ण जगाची माया ममता दडलेली आहे. बालपणापासुन लाडाने खाऊ पिऊ घालणारी आई ही साक्षात अन्न‍पुर्णा देवी आहे. आपण आजारी पडल्यावर आई रात्रभर जागुन आपली सेवा करत असते. आईचा स्वभावच वेगळा असतो ती कधी प्रेम करते तर कधी रागावते पण नेहमीच आपल्यात मुलांच्या भल्याचाच विचार करते . 



खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थांबतील.(मोफत वाचा 100 हुन अधिक मराठी निबंध)


आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईची माया मिळाली नसेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,


'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'


मित्रांनो तुम्‍हाला माझी आई मराठी निबंध हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. व आपण खाली दिलेले बाकीचे ३ निबंध वाचु शकता.  धन्‍यवाद .

MAJHI AAI MARATHI NIBANDH क्रंमाक २ 420 शब्‍दात

कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटले आहे की, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी।" खरं आहे ते! या मातेच्या प्रेमाला कशाची तुलना नाही. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे हया आईपुढे व्यर्थ आहेत. म्हणून तर जग जिंकलेल्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. 

स्वराज्यसंस्थापक शिवबाच्या जीवनातही मातेला सर्वश्रेष्ठ स्थान होते. मातेचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच आढळतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करता येत नाही. एखादी श्रीमंत आई आपल्या मूलाचे जेवढे लाड करील, त्याला जेवढ्या उंची किमती वस्तू आणून देईल तेवढया भारी वस्तू गरीब आई आपल्या लेकराला देऊ शकणार नाही. पण म्हणून काही तिच्या प्रेमाची प्रत कमी ठरणार नाही. 



मातृप्रेमाची अनेक उदाहरणे आपल्याला भोवताली नेहमी दिसत असतात. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला ती ओला-कोरडा तूकडा आधी भरविते. आपल्या लेकरासाठी आई केवढे साहस करू शकते याचा पुरावा म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज.

आई आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती जन्म देते एवढेच नव्हे तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती सर्वतोपरी सांभाळते. ती त्याला खाऊपिऊ घालून त्याचे संगोपन करते व त्याबरोबरच त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगून ती त्याचे मन फुलविते आणि मनाचा विकासही घडविते. 

मातेचा विशेष सहवास न लाभलेल्या बालकाला हया साऱ्या सौभाग्याला वंचित व्हावे लागते. शिवबा, विनोबा, बापूजी या साऱ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक नाना ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे." अपंग, मंदबुद्धी कसेही बालक असले तरी माता आपली माया पातळ करीत नाही. (हे पण वाचा आई संपावर गेली तर निबंध मराठी )

मातेच्या या श्रेष्ठत्वाची कसोटी लागते ती कुपुत्राच्या बाबतीत. कारण अशा दुर्गुणी मुलाचा वाली मातेशिवाय कोणी नसतो. घरीदारी सर्वत्र त्याला अपमान सोसावा लागतो. प्रत्यक्ष जन्मदाता पिताही त्याला घराबाहेर काढतो. अशा वेळी ती माता मात्र आपल्या कुपुत्रालाही जवळ करते. म्हणून तर कवी मोरोपंत म्हणतात

  • "प्रसाद पट झाकती परि परा गुरूंचे थिटे
  • म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे." 


आपल्या जीवनात अशी अनेक उपकारांची गाठोडी आपल्या मस्तकी असतात, त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. म्हातारपणी वृद्ध मातापित्यांची सेवा करणे ही काही अंशाने त्या ऋणांची फेड होईल. पण ती फारच थोडी. कारण तो आपल्या कर्तव्याचाच भाग असतो. काहीजण कृतघ्न होऊन ती फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात. 

म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमासाठी आसुसलेली असतात. ते त्यांना मिळाल्यास, त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. अनेकदा ‘अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीप्रमाणे आपल्याकडून मातेची महती ओळखली जात नाही. पण हे कृपाछत्र एव मोठे आहे. 

हे उपकार एवढे अगणित आहेत की सात वेळा काय, शंभर वेळा जन्मुुनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे की, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते आपल्यावर कृपाप्रसादाची खैरात करीत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. उगाचच नाही कवी म्हणत की, “आईसारखे दैवत साऱ्या जगतामधी नाही.

MAZI AAI ESSAY IN MARATHI क्रंमाक ३ 223 WORDS 


एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. आमच्या घरात भरपूर माणसे आहेत आणि ती एकमेकांशी 'नात्याच्या रेशमी धाग्यांनी ' जोडलेली आहेत. माझी आई ही या घराची कर्णधार आहे असे म्हणायला हरकत नाही. चाळीशी ओलांडलेल्या माझ्या आईचा या घरात प्रेमळ वावर आहे. माझ्या आजीचा आणि माझ्या आईचा एकमेकींवर पूर्ण विश्वास आहे व परस्परांमध्ये दाट जिव्हाळा आहे.

अशी ही माझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली, तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे, माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते. केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे, माझ्या आईचाच मोठा सहभाग आहे.

सुट्टीच्या दिवसांत आई घरातील सर्व मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवते. त्यातून स्वाभाविकच आमच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आईचे हस्ताक्षर उत्तम आहे. सुलेखन कसे करावे हे मला माझ्या आईनेच शिकवले. घरातील प्रत्येकाची आवडनिवड आईने लक्षात ठेवलेली आहे, त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर खूश असतो. नीटनेटकेपणा हा तिचा खास गुण आहे. त्यामुळे घरातल्या कुणालाही काही हवे असले की, त्याला माझ्या आईची आठवण येते आणि माझी आई त्याची नड तत्परतेने भागवते.

माझी आई उत्तम गृहिणी आहे. आल्यागेल्यांचे हसतमुखाने आतिथ्य कसे करावे, ते माझ्या आईकडुुन शिकावे. स्वंंयंंपाक करण्यात ती कुुशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला 'अन्नपूर्णा' असे संबोधून सतत कौतुक करत असतात. शेजारच्या सर्व स्त्रिया अडीनडीला माझ्या आईकडे धावत येतात व आई त्यांना शक्य ती सर्व मदत करते. सदा हसतमुख असणारी ही माझी आई आमच्या घरची 'लक्ष्मी' आहे, असे सारेजण म्हणतात ते उगाच नाही!

तुम्‍हाला हे lekhan (लेखन) कार्य कसे वाटले हे कमेंट करून सांगु शकता. हा निबंध 4th std to 10 std पर्यत उपयोगात येऊ शकतो. 


माझी आई निबंध मराठी क्रंमाक (essay on mother in marathi) ४ 273 शब्‍दात


कवी यशवंतांनी आईची महत्‍व सांगताना म्हटले आहे, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!' अगदी खरे आहे ते ! मातेचे प्रेम अतुलनीय आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे या जन्मदेपुढे व्यर्थ आहेत. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे. महाराष्ट्राचे स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते.



मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरवते. प्रसंगी अपत्याच्या वात्सल्यापोटी माता आपल्या प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज!



माता आपल्या लेकरासाठी काय करत नाही? ती त्याला जन्म देते. एवढेच नव्हे, तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनांचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते. ती त्याचे संगोपन करते, त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगन ती त्याचे कसमकोमल मन फुलवते. त्यावर सुसंस्कार घडवते. शिवबा, विनोबा, बापूजी यांसारख्या थोर व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक माता ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे."



 मातेचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करणे, ही काही अंशाने त्या ऋणांची फेड म्हणता येईल. खरे तर तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. काही कृतघ्न करंटे ही फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आसुसलेले असतात. तसे झाल्यास ते त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते.


मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. ते आपल्यावर सदैव कृपाप्रसादाची खैरात करत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतो, 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामधि नाही.' त्‍यामुळे majhi aai maza adarsh (माझी आई माझा आदर्श आहे )


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   आईचे माहात्‍म सांगाणारा हा निबंध शेअर करून तुम्‍ही आई या नावाला उच्‍च स्थान प्राप्‍त करून द्या 
.


निबंध 5 

सूर्यकिरणांच्या स्पर्शान कमळं उमलावीत तशीच मातेच्या वात्सल्य स्पर्शान बालकाची जीवनकळी उमलते. आकाशाहून अथांग अन् सागराहून विशाल असे जीवनाचे धडे ती बालकाला शिकविते. माता बालकाचे सर्वस्व आहे. पहिला स्पर्श, पहिली नजर यात बालक व माता दोघे गुंफले जातात. त्यांचं अनंत नातं सुरू होतं. जन्मानंतर संस्काराची शिदोरी माता बाळाला देते. जगात पावलो पावली येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्याची, ध्येय गाठण्याची चिकाटी ती बाळाला देते .अपयशातून परत यश गाठण्याचा मार्ग ती त्याला दाखविते. मज वाटते,

आई म्हणजे विश्वातलं सर्वोच्च सुख आहे. नयनाचा दिवा व तळहाताचा पाळणा करून बालकाचे संगोपन फक्त तीच करू शकते.  तिच्या प्रेमात भेदभाव नाही. रायगडावरील 'हिरकणी बुरूज' वात्सल्यप्रेममय आईचे प्रतीक आहे. अपत्यासाठी प्रसंगी प्राणाचेही मोल द्यायला आई तयार असते. कष्ट व त्याग तिच्या रक्तातच आहे. परोपकार , त्याग, सहनशीलता, संयम, अपार माया या बळावर ती मार्गक्रमण करते. 

'आई' ही दोनच अक्षरे. 'आ' म्हणजे 'आत्मा' आणि 'ई' म्हणजे 'ईश्वर'. आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाफ म्हणजे आई. मुलांना उत्तम संस्कार , उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य देण्यासाठी आई धडपडत असते. ती हळवी आहे, प्रसंगी वज्राहूनही कठीण आहे. गरजू, वृद्ध , दुःखी लोकांचा ती आधार आहे. बालकाचे सहस्त्र अपराध ती पोटात घालते व त्याला योग्य मार्गदर्शन करते.

काळ बदलत चालला आहे. 'चूल - मूल' या मर्यादेतून आता आई अधिक प्रगल्भ झाली आहे. ती स्वतः सुशिक्षित, सुसंस्कृत, युगंधरा झाली आहे. विज्ञान , वैद्यकीय क्षेत्रातील्या नवीन घडामोडींची ओळख तिला होत आहे. साहजिकच अधिक सुजाण माता उत्कृष्ट शिल्पकार ठरली आहे. बालकाचं मूर्तिमंत शिल्प घडविण्यात ती मग्न झाली आहे.


मुकेपणाने असंख्य काव्ये आई जगते. तिच्या अणूंचे मोल करताच येत नाही. तिला सुख - समाधान देणे हे अपत्याचे पहिले कर्तव्य आहे. जिजाऊंनी शिवबा घडविला. मातृप्रेम जपलेही शिवबांनी. जन्मदात्री व शिक्षणदात्री अशा आईची सर कोणालाच येत नाही. प्रेम , सुसंगती , मित्रत्व , मार्गदर्शन, आदर्श हे सारं आईकडूनच मिळतं.


आज या मातेला वृद्धपणी वृद्धाश्रमाचा मार्ग दाखविणारे महाभागही आहेत. जिने जन्म दिला, जिने दुनिया दिली , जिने जीवन दिले, जिने घर दिले, तिला 'बेघर' करू नका . 'न ऋण जन्मदेचे फिटे!' तिच्या दुधाची शपथ आहे प्रत्येकाला की तिच्या प्रेमाची कदर करा. या जीवनात तिचा आदर्श अवलंबून जीवनाचे मार्गक्रमण करा. 



निबंध 6 

जगातील सर्वात पवित्र व सर्वश्रेष्ठ नात्याला 'आई' म्हणून संबोधतात. 'आई' ह्या शब्दाला अत्यंत पवित्र शब्द म्हणून मान्यता आहे. आईची थोरवी कित्येक कवींनी आपल्या शब्दात व्यक्त केली. कित्येक लेखकांनी आईविषयी भरभरुन लिहले. आईची महती आहेच तेवढी की प्रत्येकाने आपला वेगळा अनुभव लिहावा. प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्व वेगळे आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखात पहिल्यांदा आठवणारे नाते हे आईचे असते. माता,माय,जननी, जन्मदा, जन्मदात्री,मा, अशी अनेक संबोधनेआईकरिता आहेत. तिची थोरवी पुढील काही ओळींनी स्पष्ट करण्याच्या प्रयत्न मी सुद्धा करु इच्छितो.


लेकरांची छत्रछाया असणारी आईच त्यांचा कायापालट करु शकते. परिवाराचा आनंद अबाधित ठेवण्यासाठी ती दिवस रात्र झटत असते. चंदनाचे लाकूड झिजून इतरांना जसे सुगंध देते त्याचप्रमाणे आई सुद्धा स्वतः झिजून परिवाराला आनंद देत असते. स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून परिवाराला आनंदी ठेवण्याचा ती प्रयत्न करते. परिवाराच्या सुखात आणि दु:खात दुःख मानणारी ती केवळ आईच असते.


वात्सल्य, प्रेम, ममता, माया आणि करुणेने भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आई. आई म्हणजे,
प्रेमाचा झरा , लहान थोरा ,पुरवी घरा, निरंतर। घरासाठी, घरातील सर्व सदस्यांसाठी सतत प्रेमाचा झरा सुरु ठेवणारी आई स्वत:ला हरवून कुटुंब सदस्यांची काळजी घेत असते. सर्वांच्या चुका क्षमा करणारी, इतरांचे ऐकून घेणारी आई. तिचे हृदय सागरापेक्षाही अथांग असते 

पहाटेपासून सुरु होणारी आई तुझी दिनचर्या रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवणारी आई तू कामाने थकून जातेस. परंतु कुटुंबातील सर्वांच्या गरजा भागविण्यात तू थकवा सुद्धा निमुटपणे सहन करतेस आणि या कामाच्या मोबदल्यात तुला कोणतीही अपेक्षा नसते. म्हणून हे आई,
“धन्य तुझी कृती, नि:स्वार्थी वृत्ती, जगात कीर्ती,सदासर्वदा। कर्तव्याची जाण,आरामाचे न भान ,जगी तुझा मान, युगानुयुगे।"

जगातील सर्व संपत्ती एकवटून आईच्या चरणी अर्पण केली तरी तिने केलेल्या उपकाराची परतफेड करणे शक्य नसते. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम हीच आईची संपत्ती असते. घराला घरपण आणणारी, कोणतीही अपेक्षा करीत नाही.


धन संपत्तीची तीला अपेक्षा नसते, फक्त प्रेमाची तिला भूक असते। घराला मंदिर बनविणारी आई, काट्यातून नंदनवन फुलविणारी आई वात्सल्याची खाण असणारी आई तुला माझे कोटी कोटी प्रणाम!

टीप : वरील निबंध माझी आई या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • beautiful marathi essay on mother

माझी आई मराठी निबंध | MAJHI AAI MARATHI NIBANDH

एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi 


एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi :"मला बोलू दया. माझा आवाज बंद करू नका. कारण मी आता शेवटचे क्षण मोजत आहे. आज सकाळचे ते भीषण क्षण मी विसरू शकत नाही. असा कोणता गुन्हा मी केला होता की मला हे एवढे शासन झाले! खरंच सांगते. अहो, मला अजन जगायचे होते. माझ्या सुपूत्रांची मला अजन सेवा करायची होती. पण या आडदांड जगाने मला ‘राम म्हणण्याची वेळ आणली हो! पुढे एस. टी. बस म्‍हणाली.

“तसे माझे वय काही फार झाले नव्हते. माझा जन्म होऊन पुरती पाच वर्षेही झाली नाहीत. हा जन्म, हे रूप घेण्यासाठीही मला अतोनात कष्ट साहावे लागले. लोखंडी घणाचे प्रहार व धगधगत्या अग्नीचे चटके; सारे मी सहन केले. कशासाठी? केवळ तुमच्यासाठी. माझ्या लालचुटूक रंगावर मी खूष होते. 'रस्ता तेथे एस्. टी.' हेच मुळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य. त्यामुळे या लहानशा आयुष्यातही मी महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळला. गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून धावले. खडबडीत दगडी रस्ते पार केले, उंच सरळ चढण चढले आणि तेवढीच उतरलेही. अनेक घाटांतून अवघड वळणे घेत घेत आयुष्य काढले.

st-bus-essay-in-marathi
st-bus-essay-in-marathi
"हे सारे मी कोणासाठी करीत होते? तर माझ्या गरीब देशबांधवांसाठी. श्रीमंतांजवळ स्वतःची वाहने असतात. मनात आले की ते केव्हाही कोठेही जाऊ शकतात. पण खेडोपाडी राहणारे अनेक गरीब लोक असतात, त्यांच्या प्रवासाची चिंता कोणी करावी? या लक्षावधी माणसांची सेवा करावी हेच माझे जीवनध्येय होते. एकदा एक गरीब खेडूत दुसऱ्या एका प्रवाशाला म्हणत होता, '


अरे आपण कुठे गरीब आहोता ही दोन-अडीच लाखांची लाल एस्. टी. आपलीच नव्हे का!' तेव्हा मला अगदी धन्य धन्य वाटलं. मी आणि माझ्या इतर शेकडो भगिनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाऊन पोहोचलो. त्यामुळे खेड्यांचा विकास होऊ लागला. ज्या खेड्यांचा बाहेरच्या जगाशी संबंधच येत नव्हता ती मागासलेली होती. तेथील मालाला बाजारपेठ दिसत नव्हती. हे सारे प्रश्न आमच्यामुळे सुटले. आपल्यामुळे माणसाचे जीवन सुसहय होत आहे हे पाहून कष्टाचे काही वाटत नव्हते.

"त्यावेळीही एक गोष्ट मनाला डाचत होती. हे प्रवासी इकडे तोंडाने 'आमची गाडी' म्हणायचे, पण गाडीची स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करायचे नाहीत. एस्. टी. आपलीच म्हणून जेथे बसायचे तेथेच घाण करायचे. सकाळी छानपैकी न्हाऊन माखून आलेल्या माझे रात्रीपर्यंत रूप पाहण्यासारखे व्हायचे. शेंगांची टरफले, केळ्यांच्या साली अशी गलिच्छ आभूषणे मला नित्य बहाल केली जायची.


 माझा उपयोग करणारे लोक माझी खुशाल मोडतोड करायचे. कुठलाही संघर्ष, संप उभा राहिला की आमच्यावर दगडांचा मारा. कधी कधी जाळपोळही सहन करावी लागे. मला चालविणारे चालकही अनेक. काही काही इतक्या निर्दयपणे माझ्याशी वागणूक करीत की, त्यामुळे माझी गात्रेच खिळखिळी होत. देखभाल, तेलपाणी यांबाबत तर निराशाच होती. तरी 'सेवा हाच माझा धर्म' असल्याने वर्षातील तीनशे दिवस तरी मी रस्त्यावर धावत असे."

“आज हाच रस्ता माझी मृत्युभूमी ठरला. मी रोजच्याप्रमाणे धावत होते. चालकही चांगला होता. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला बक्षीस मिळाले होते. पण एका बेजबाबदार ट्रकचालकाने आपला रस्ता सोडला आणि तो सरळ माझ्या अंगावरच चालून आला. माझे तुकडे तुकडे झाले दोन्ही गाड्यांचे चालक आणि कित्येक प्रवासी मृत्युमुखी पडले. कोणत्याही दुरुस्तीपलीकडे मी आता आहे. या क्षणी मला एकच प्रश्न ग्रासतो आहे, यात माझी चूक कोणती? माझ्या सेवाव्रताला हेच फळ का? कोण देईल माझ्या या प्रश्नांची उत्तरे?

टीप : वरील निबंध एस. टी. बसचे आत्मवृत्त या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते


  • Bus Essay in marathi

एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi


माझी समाजसेवा मराठी निबंध | Samaj Seva Essay In Marathi


माझी समाजसेवा मराठी निबंध लिहीताना आठवण येते या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.माझ्या शाळेतील विषयाची इयत्ता आठवीत आल्यापासून 'समाजसेवा' हा माझा शालेय अभ्यासातील एक विषय झाला. या विषयाच्या पहिल्या तासिकेतच गुरुजींनी समाजसेवेची आवश्यकता, तिचे स्वरूप यांबद्दल माहिती सांगून अनेक समाजसेवकांची चरित्रे ऐकविली. तेव्हापासून माझ्या मनात एक स्फुल्लिग पडले की, आपणही समाजसेवा करावी. 

पण समाजसेवा कशी करावी या प्रश्नाने मी बेचैन झालो. मनात हेतू ठेवला की माणूस त्याच्या सिद्धीसाठी यत्न करतो. त्यानुसार रस्त्यात कुणी आंधळा माणस रस्ता ओलांडताना दिसला की मी धावत जाऊन त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करतो. तसेच कुणी पल्ला हुडकत असला की मी त्याच्या सेवेस हजर होतो. यात्रेच्या गर्दीत कूणाची मुले हरवली तर त्यांच्यासाठी मी धावून जातो. इतकेच काय पण यंदा उन्हाळ्यात मी आमच्या अंगणात एक माठ ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांना माठातील थंडगार पाणी देताना मला कृतार्थता वाटते. पण एवढ्याने मला समाधान नव्हते.

याहूनही काही भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा होती. ती संधी मला आयतीच लाभली. यंदाचे वर्ष शासनाने 'प्रौढ शिक्षण योजनेचे वर्ष म्हणून जाहीर केले. देशात निरक्षरता फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि जोवर मतदार निरक्षर आहे. तोवर या लोकशाहीला काही अर्थ नाही. म्हणून शासनाने प्रौढ शिक्षण योजने'चा धडाडी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यातील काही कामगिरी आमच्या शाळेकडे आली आणि तेथून ती आमच्याकडे आली. विशेष लक्षणीय अशी समाजसेवा करावयास मिळणार म्हणून आम्ही विलक्षण आनंदित झालो होतो.

Samaj Seva Essay In Marathi

Samaj Seva Essay In Marathi
 
या कार्यासाठी आमच्याकडे सोपविण्यात आलेली झोपडपट्टी गुरुजींनी आम्हांला दाखविली. मग आम्ही चौघेजण तेथे 'पूर्वमाहिती गोळा करण्यासाठी गेलो. दुपारच्या वेळी गेलो तर तेथे कोणी भेटणार नाही, हे लक्षात घेऊन आम्ही तेथे सायंकाळी गेलो. त्यावेळी कष्टाची कामे करून ते लोक परतले होते. २० ते ५० च्या वयोमर्यादेतील किती माणसे निरक्षर आहेत, याची माहिती आम्हांला हवी होती; 

पण अतिशय साशंक होऊन कोणतीही माहिती सांगण्यास त्यांनी नकार दिला. तेव्हा आम्ही नोकरीचे आमिष त्यांच्यापुढे ठेवले. मग ते थोडे थोडे बोलू लागले. अशा दोन-चार वेळा भेटी झाल्यावर त्यांना आमच्याविषयी थोडा विश्वास वाटू लागला. मग एका सणाच्या निमित्ताने आम्ही तेथील मारुतीच्या देवळात एक सास्कृतिक कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमातील लोकनाट्यात एका निरक्षराची सावकाराकडून झालेली पिळवणूक व त्यात त्याची झालेली वाताहत दाखविलेली होती. लोकनाट्यातील या निरक्षराच्या जीवनाचे ते विदारक चित्र त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते. त्यामुळे त्यांना ते खूपच आवडले.

पुढे आम्ही नित्यनियमाने त्या वसाहतीत जाऊ लागलो. कधी गोष्टी सांग, कधी गाणी म्हणन दाखव, कधी कीर्तन करून दाखव अशा नित्य नवीन मार्गाने आम्ही त्यांना रंजवीत होतो. अलीकडे ते सारेजण कामावरून परतले की जेवणे उरकून सरळ देवळात येत. त्यांच्याबरोबर महिला देखील येत. मनोरंजनाबरोबर त्यांना शिक्षण देणे हा आमचा हेतू होता. 

कधी कधी आम्ही त्यांना विविध माहितीपर बोलपटही दाखवीत असू. ते जी श्रमाची, मोलमजुरीची कामे करीत, ती प्रगत देशात यंत्रावर कशी चालतात हे पाहिल्यावर त्यांना गमत वाटली; पण त्याच वेळी त्याच्यातील एकाने मला सवाल टाकला, “पण काय हो, ही कामे यंत्राने झाली तर आम्ही बेकार नाही का होणार?" अशा तहेने त्यांच्यात विचारमंथन होऊन, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला होता. आता मोठी मोठी अक्षरे लावून ते वाचू लागले होते.

बरोबर दोन महिन्यांनी आम्ही त्यांच्या हातांत पाट्या दिल्या. आता ती राठ बोटे अक्षरे वळवु लागली. त्यासाठी आम्हांला व त्यांना देखील खूप कष्ट पडले; पण शिक्षण असाध्य राहिले नाही. आज आमची ही झोपडपट्टी शंभर टक्के साक्षर झाली आहे. त्यांनी बँकेत आपली खाती उघडून ते नियमितपणे पैसेही शिल्लक टाकतात. “या पोरांनी आम्हांला नवं जग दाखवलं," असे ते कौतुकाने म्हणतात व आपण साक्षर झाल्यावर दुसऱ्या एकाला तरी साक्षर करणार असा संकल्प सोडतात. याहून अधिक काय साधावयाचे असते समाजसेवेतून!

टीप : वरील निबंध माझी समाजसेवा मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



  • मी केलेली समाजसेवा मराठी निबंध
  • मी केलेली समाजसेवा निबंध
  • माझा समाजसेवेचा एक अनुभव मराठी निबंध

निबंध  2

माझी समाजसेवा मराठी निबंध | Samaj Seva Essay In Marathi



गेले दहा दिवस शहरात सार्वजनिक गणेशोत्सव रंगात आला होता. एकूण वातावरणावरून लक्षात येत होते की, 'गणेश-विसर्जनाची' मिरवणूक नक्कीच रंगणार. अनंतचतुर्दशीनिमित्त शाळेला दोन दिवस सुट्टी होती. 


त्याआधी वर्गात सूचना आली की, ज्या विदयार्थि-विदयार्थिनींना सामाजिक कार्य करायची इच्छा आहे, त्यांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी तलावावर उपस्थित राहावे. ही संधी सोडायची नाही, असा विचार करून मी तलावावर गेले. तलावाजवळ काही समाजसेवक, समाजहितचिंतक उभे होते. 


त्यांनी आमची ओळख करून घेतली व आम्हांला आमच्या कार्याचे स्वरूप सांगितले. माझ्या हातात एक फलक दिला होता. त्यावर लिहिले होते की 'निर्माल्यकलशात निर्माल्य टाका'. चार वाजल्यापासून विसर्जनासाठी गणपती येऊ लागले. प्रत्येक मंगलमूर्तीबरोबर भक्तांनी वाहिलेले भरपूर निर्माल्य होते.


आम्ही विनंती केल्यावर लोक आपले निर्माल्य कलशात टाकत होते. काही लोक मात्र निर्माल्य पाण्यात टाकत होते. पोहायला येणारे काही स्वयंसेवक पाण्यात टाकलेले निर्माल्य लगेच बाहेर काढत होते. निर्माल्य-कलश भरला की चार स्वयंसेवक मिळून तो कलश ट्रकमध्ये रिकामा करीत होते. असे हे काम करताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.


काही तासांनंतर आम्हांला विश्रांती देऊन तेथे दुसरे स्वयंसेवक नेमण्यात आले. रात्र झाली. मिरवणुकीमुळे दमलेले सर्व शहर झोपी गेले. मग स्वयंसेवक आणि नगरपालिकेचे कामगार यांनी एकत्र येऊन शहर सफाईचे काम केले. रस्ते धुऊन स्वच्छ केले गेले.


थोडेसे खाल्ल्यावर आम्ही घराकडे
वळलो. समाजसेवा केल्याचे मला समाधान मिळाले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



[शब्दार्थ : विसर्जन- immersion of an idol. विसन. विसर्जन। संधीopportunity. त3. अवसर। फलक हेवने यावेai दूर.. किसी देवता पर चढ़ाया हुआ फूल। स्वयंसेवक- volunteers. स्वयंसेव.. स्वयंसेवक।]


माझी समाजसेवा मराठी निबंध | Samaj Seva Essay In Marathi

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध

Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh


दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध लिहीताना आठवण येते ती त्‍या वर्षी पडलेल्या दुष्‍काळाची,  त्‍या वर्षी राज्यातील पंधरा जिल्हयांत दुष्काळ जाहीर केला गेला होता. सातत्याने दुष्काळ पडण्याचे हे चौथे वर्ष होते. रखरखीत उन्हामुळे आणि पाण्याचा अंशही कोठे न राहिल्याने जमिनीला सर्वत्र भेगाच भेगा पडल्या होत्या. सगळीकडे दुष्काळी कामे सुरू केली गेली होती. त्या दुष्काळी कामांवरचा मुख्य अधिकारी म्हणून माझ्या वडिलांची नेमणूक झाली होती. त्यामुळे बाबांचा सतत दौरा चालू असे.


सुट्टीचे दिवस म्हणून मीही रिकामटेकडा होतो. सतत महिनाभर सुट्टी असल्याने दिवस अगदी कंटाळवाणे झाले होते. शेवटी एक दिवस बाबांच्या जीपमध्येच जाऊन बसलो. मला पाहून बाबा म्हणाले. “अरे, त कशाला येतोस? तेथे काहीही पाहण्यासारखे नाही. दुष्काळामळे सारा प्रदेश उजाड, भगभगीत झालेला आहे." पण आज मी ठरविलेच होते की आपण बाबांबरोबर जायचेच.

dushkal ek bhishan samasya marathi nibandh
dushkal ek bhishan samasya marathi nibandh

बाबा वाटेत दुष्काळाच्या तीव्रतेचे वर्णन करीत होते आणि जागोजाग त्याचे दर्शन घडतच होते. तृषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्ररश्मीकडे काकुळतीने पाहत होती. वाटेत लागणाऱ्या वस्त्यांतील हवालदिल माणसे, त्यांच्या हातापायांच्या झालेल्या काड्या, खपाटीला गेलेली पोटे, रिकामे गोठे दुष्काळाच्या लीला मूकपणे दाखवीत होते. एका ठिकाणी मोठे मोठे पक्ष घिरट्या घालताना दिसत होते. 

बाबा म्हणाले, “जनावर मेलेलं दिसतंय!" थोडे पुढे गेलो तर पक्ष्यांनी खाऊन उरलेल्या एका जनावराचा मोठा सांगाडा पडला होता. मनात आले, या अवर्षणरूपी असुरापुढे भेदभाव नाही. माणसे, जनावरे, पक्षी सारेच याला सारखे. माणसाला आपल्या विद्वत्तेचा केवढा गर्व; पण निसर्ग पुनः पुन्हा त्याला जाणीव करून देतो, “अरे तुझ्या जीवनाच्या साऱ्या नाड्या माझ्या हातात आहेत बघ!"

दुष्काळी काम म्हणून एका ठिकाणी रस्ता बांधण्याचे काम चालू होते. हजारो माणसे कामात गुंतलेली होती. त्यांतील काही खडी फोडण्याचे काम करीत होती. जीप थांबली आणि बाबा खाली उतरले; तशी दहा-बीस माणसे त्यांच्या पाया पडू लागली, क्षणभर मला प्रश्न पडला की अशी कोणती आगळीक झाली आहे या लोकांकडून? मग लक्षात आले की, ते बाबांकडे कामाची मागणी करीत आहेत. “साहेब, काम दया, पोटाला दया,” असे केविलवाण्या शब्दांत ते विनवीत होते. माणसांची ही दयनीय स्थिती पाहून माझे मन सुन्न झाले.

बाबा दुष्काळी कामाची पाहणी करीत होते. तेथील मुकादमाला आणि इतर अधिकाऱ्यांना कामाच्या प्रगतीबाबत विचारणा करीत होते. इतक्यात दूरवर काहीतरी गडबड झाली म्हणून आम्ही तेथे गेलो तर काम करणारी एक स्त्री बेशुद्ध होऊन पडली होती. ती स्त्री गरोदर असावी. तात्पुरत्या उपायाने ती शुद्धीवर येईना, तेव्हा तिला जवळच्या गावातील सरकारी दवाखान्यात न्यायचे ठरले. दुसरे काही वाहन नसल्यामुळे आमच्या जीपमधून न्यायचे ठरले. "हिचे नात्याचे कुणी आहे का येथे?" बाबांनी पुनःपुन्हा विचारले, पण कोणीही पुढे आले नाही. तेव्हा तेथील एक सामाजिक कार्यकर्ता जीपमध्ये बसला.

गाडी पुढे निघाली तेव्हा त्या साऱ्या दृश्याने मी अगदी हबकूनच गेलो होतो. पण खरा धक्का मला पुढेच बसला. दवाखाना आला तेव्हा त्या बाईला डॉक्टरच्या स्वाधीन करून आम्ही तेथील डाकबंगल्यावर गेलो तेव्हा तो समाजसेवक बाबांना म्हणाला, “दादासाहेब, तुम्हांला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुमच्या या कामावरचे मुकादम मजुरांना अत्यंत छळतात. 

त्यांना मिळणाऱ्या चार-पाच रुपये मजुरीतील प्रत्येकी एक-एक रुपया हे राक्षस कापून घेतात. मजुरांना देण्यात येणाऱ्या धान्यापैकी माप-माप काढून घेतात आणि हजारो रुपये कमावतात. पण हे गरीब लोक परिस्थितीने एवढे हवालदिल झाले आहेत की ते त्यांच्याविरुदध काही बोल शकत नाहीत. आता ही जी बाई बेशुद्ध पडली तिचा नवरा तेथे कामावर होता. पण रोज बुडेल म्हणून त्याने आपली ओळख दिली नाही वा तो बाईबरोबर आलाही नाही.”

हे सारे ऐकून माझे मन अगदी सुन्न झाले. वाटले, दुष्काळाने माणसाला केवढे हे निष्ठूर बनविले आहे!

टीप : वरील निबंध दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • दुष्काळ एक समस्या निबंध
  • दुष्काळ एक आपत्ती निबंध मराठी
  • दुष्काळ एक भीषण समस्या निबंध मराठी
  • पाण्याचा दुष्काळ निबंध मराठी
  • dushkal padla tar marathi nibandh
  • dushkal che parinam marathi nibandh

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध | Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी | My Favourite Book Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो तुमचे स्‍वागत आहे आमच्‍या ब्‍लॉगवर. आज आपण  माझे आवडते पुस्तक निबंध मराठी बघणार  आहोत. या निबंधामध्‍ये लेखकाने आपल्‍या आवडत्‍या पुस्तकाचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी लिहीताना आठवण येते ती उन्‍हाळ्याच्‍या  सुट्टीची, दरवर्षी वर्षी सुट्टी लागली की मी माझ्या आवडत्या छंदाचे लाड पुरवून घेतो. म्हणजे मी 'ग्रंथालयाचा सभासद' होतो आणि मनसोक्तपणे पुस्तके वाचून काढतो. सुट्टीतील माझ्या या अवांतर वाचनावर कुणाचा आक्षेप नसतो. 

उलट आई कौतुकाने सांगते, “आमच्या बाळ्याचा सुट्टीत काही त्रास नसतो. तो आणि त्याची पुस्तके." खरोखर पुस्तके असली की वेळ कसा जातो ते कळतही नाही. या वर्षी मी अनेक पुस्तके वाचली. या सर्व पुस्तकांत एका पुस्तकाने माझ्या मनात कायमचे स्थान मिळविले आहे. ते पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांचे 'जेव्हा माणूस जागा होतो ."

 या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता, म्हणून ते वाचावयाचे असे मी ठरविले होते पण ग्रंथालयात मला त्या पुस्तकासाठी क्रमांक लावून काही दिवस थांबावे लागले. जेव्हा ते पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि वाचावयास सुरुवात केली तेव्हा त्या पुस्तकाचे शेवटचे पान वाचल्यानंतरच मी ते खाली ठेवले. नंतरही दोन वेळा मी ते पुस्तक वाचले.

'जेव्हा माणूस जागा होतो...' ही काही एखादी कादंबरी नाही, किंवा काव्यसंग्रहही नाही. तरी देखील ते पुस्तक आपल्या मनाला भिडते. कारण ती एक सत्यकथा आहे. एका वसाहतीची ती हृदयस्पर्शी कहाणी आहे. या पुस्तकाची लेखिका प्रस्तावनेतच सागून टाकते की, ती काही स्वतः नाणावलेली लेखिका नाही. तरी पण हे पुस्तक उत्कृष्ट उतरले आहे. कारण त्या कादंबरीतील क्षणन् क्षण लेखिका स्वतः जगली आहे.

maze avadte pustak nibandh in marathi
maze avadte pustak nibandh in marathi

लेखिका गोदावरी परुळेकर यांचे बालपण व शिक्षण पुण्यात पार पडले. पण कॉ. परुळेकरांबरोबर राजकीय-सामाजिक कार्य करताना त्यांना या डोंगरकपारीतील आदिवासींची व्यथा जाणवली; त्यांची गुलामावस्था पाहिली म्हणून त्यांनी त्यांच्यातील माणूस जागा केला. या आपल्या साऱ्या कामगिरीचा वृत्तान्त त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे-अगदी साध्या, सोप्या, रसाळ भाषेत.

आदिवासींचे जीवन किती कष्टप्रद आहे, हे सांगताना त्यांनी कोंड्याची भाकर व अंबाडीच्या भाजीचे केलेले वर्णन आपल्याला खूप काही सांगून जाते. चहा कसा करतात हेही त्या वारल्यांना माहीत नव्हते. 'लग्नगडी' व 'वेठीच्या आसा'चा फेरा या परंपरागत रूढी म्हणजे जमीनदारांच्या निपुणतेचा पुरावाच आहे. लेखिकेला पहिले काम करायचे होते ते आदिवासींच्या मनातील दुबळेपणा काढून टाकायचे. वर्षानुवर्षांचा जुलमी छळ अंगवळणी पडल्यामुळे ते दुबळे झाले होते;

 त्यांचा आत्मविश्वास हरवला होता. लेखिकेने त्यासाठी त्यांना संघटित केले. त्यांच्यातील आत्मविश्वास फुलविला. पुस्तकाच्या अखेरीस हाच आदिवासी ‘खऱ्या अर्थाने माणूस' होऊन जमीनदारांच्या विरुद्ध बंड करावयास उभा ठाकलेला आपल्याला दिसतो.

या पुस्तकाची विशेषता मला जाणवली ती अशी की, समाजातील हा प्रश्न इतका महत्त्वाचा असूनही समाजातील बहुसंख्यांना त्याची काही माहितीही नव्हती. आदिवासींची पिळवणूक चालते असे आम्ही ऐकतो, बोलतो; पण ही पिळवणूक किती अमानुष रीतीने चालते, कशी चालते याची खरीखरी कल्पना हे पुस्तक आपल्याला आणून देते. आदिवासी हा अशिक्षित आहे. 

अंधश्रद्धेत गुरफटलेला आहे असे आपण मानतो; पण त्याच्या मनातील माणूसही मोठा आहे हेही आपल्याला येथे दिसते. पकडवॉरन्ट असलेली गोदामाई त्यांच्या घरी आली तेव्हा तिला पोहोचविण्यासाठी या आदिवासींनी आपल्या प्राणांची बाजी लावली. कधी त्यांनी तिला आपली 'म्हातारी माय' मानली; तर कधी तिला आपली 'माहेरवाशीण' बनविली

'जेव्हा माणूस जागा होतो...' या पुस्तकाला बक्षीस देऊन सरकारने एका परीने लेखिकेचाच यथोचित गौरव केला आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे. आणि म्हणूनच ते माझे विशेष आवडते आहे.

टीप : वरील निबंध माझे आवडते पुस्तक निबंध मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  • mi vachalele pustak marathi nibandh
  • mla aavdlele pustk
  • mala award lele pustak nibandh

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी | My Favourite Book Essay In Marathi

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay



NIBANDH 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे, आज आपण शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay या विषयावर निबंध  बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 5 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.
शाळेच्‍या पहील्‍या दिवसाची उत्‍सुकता सर्वानाच असते तेथील वातावरण, इमारत परिसर हे सर्व पहील्‍या दिवशी नवीनच असते, त्‍या परीस्‍थीतीसोबत जुळवुन घेण्‍यात वेगळीच गंमत असते अश्‍याच प्रंसगाचे वर्णन या निबंधात करण्‍यात आले आहे. चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.    

जीवन म्हणजे एक लांबलचक प्रवासच आहे. आगगाडीतल्या प्रवासासारखा ! अनेक वळणं येतात या प्रवासामध्ये! माझ्या आयुष्यातही असंच एक वळण आलं होतं दहा वर्षांपूर्वी. त्यावेळी मी ६ वर्षांची होते. बालमनाची नाजूक अवस्था! स्वच्छंदपणे मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यालाही लाजवेल असं आयुष्य वहात होतं. 

असं माझं अल्लड अवखळ बालपण उपभोगत होते मी ! अन् एके दिवशी 'शाळेत जायचं' हे वारं आमच्याही घरात शिरलं. मुळात मी खूप घाबरले. कारण खूप काहीबाही ऐकलं होतं ना शाळेबद्दल ! तरी आईने नवीन कपडे आणले. बाबांनी बूट आणले. नवीन डबा, वॉटरबॅग, नवीन दप्तर! अन् आमची स्वारी तयार होऊन बाबांचं बोट धरून शाळेत निघाली. 

पण! पण माझं सारं स्वातंत्र्य हिरावून घेणारा होता तो क्षण ! त्या इवल्याशा मनामध्ये भीती अन् आश्चर्य यांचं भांडण  चाललं होतं. प्रथम मला नेलं ते हेडमास्तरांकडे. त्यांना पाहून मला बागुलबुवाची आठवण झाली. माझं नाव विचारल्यावर मी तत्परतेनं सांगितलं. नाव नोंदणी झाली आणि बाबांनी मला माझ्या वर्गात (की कोंडवाड्यात) सोडलं. तिथे आमच्या बाई उभ्या होत्या. किती गोड! हसऱ्या! त्यांच्या त्या नजरेनंच माझ्यात वर्गात पाऊल टाकण्याचं धैर्य झालं. 

पण वर्गात माझं स्वागत झालं ते बावरलेल्या चेहऱ्यांनी आणि हुंदक्यांनी ! काहींनी तर तारसप्तकात सूर लावला होता. झाडाच्या फांदीवर चिमण्या बसाव्यात तशी पोरे बाकावर एकमेकाला बिलगून बसली होती. भित्र्या डोळ्यांनी ससा बघतो तशी आजूबाजूला बघत होती तर काही बांधावरचे कोवळे गवत उघड्या वाऱ्यात कापते ना तशी थरथर कापत होती! थोड्याच वेळात मीही त्यांच्यातलीच बनून गेले.

आता प्रथमच माझी नजर आजूबाजूला गेली. तो काय, मज्जाच मज्जा! मण्यांची खेळणी, चेंडू, ठोकळे, आणखीन बरंच काही. सगळं खेळून आम्ही दमलो. मग मधली सुट्टी झाली. डबा खाल्ला. मग होता झोपायचा तास! मला खूप आवडला. मी मात्र झोपले नाही. किलकिले डोळे करून मजा पाहावी म्हटलं तर सगळी मुले पण माझंच जणू काही अनुकरण करत होती. मग आमच्या बाई परत वर्गात आल्या. त्यांनी आम्हाला खूप छान गोष्ट सांगितली. ससा आणि कासवाची. मी एकदम खूष होऊन गेले शाळेवर! सर्वांत जास्त झोपेच्या तासावर! 

पण काही असो! शाळा जरी मला आवडली तरी सवय नसल्यामुळे कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं अन् घंटेनं तुरुंगवास संपल्याची आठवण करून देताच मी एखाद्या बऱ्याच वर्षाच्या कैद्याप्रमाणे सुसाट बाहेर पळाले. आनंदाने चेहरा फुलला होता. बघते तो काय, फाटकापाशीच आईवडील! माझ्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. 

असं माझ्या आयुष्यातलं पहिलं वळण! पण आज मी अशा वळणावर उभी आहे की जिथून विशाल भविष्यकाळाचं क्षितीज पसरलंय, ज्याला कधी अंतच नाही. महाविद्यालयीन शिक्षण माझी वाट पाहत आहे. परंतु आज मात्र मला वाटतं की तो माझा शाळेतला पहिला दिवस म्हणजे माझ्या उज्ज्वल भविष्यकाळाची एक सुंदर रम्य पहाट होती की जिच्यावर भीती आणि आनंद यांची मिश्रित प्रभा फाकली होती.
 


SHALETIL MAZA PAHILA DIVAS
SHALETIL MAZA PAHILA DIVAS

मित्र-मैत्रिणींनो तुमच्‍या जिवनातील शाळेतील पहील्‍या दिवसाचा अनुभव कसा होता हे कमेंट जरूर कळवावे . Shalecha Pahila Divas In Marathi Essay हा निबंध तुम्‍हाला नक्‍की आवडला असेल अशी आशा करतो. खालील क्रमांक २ चा निबंध वाचण्यास  विसरू नका  धन्‍यवाद. 

NIBANDH 2 

माझे बालपण, माझे बालपण अगदी खेडेगावात गेल्यामुळे बालोदयान, शिशुविहार, के. जी. वगैरे शिक्षणक्षेत्रातील पांढरपेशी प्रकार माझ्या वाट्याला कधी आलेच नाहीत. चांगली पाच वर्षे पूर्ण होऊन सहावे लागल्यावर मला शाळेत घालण्यात आले. मे महिन्यात माझा जन्मदिवस असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ शकलो.  त्या घटनेला इतकी वर्षे होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जसाचा तसा उभा आहे.


माझा शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाहून ठरविण्यात आला होता. भल्या सकाळीच आमचे गुरुजी आले. थोड्या प्रमाणात होमहवन करण्यात आले आणि मग मी आईवडिलांच्या दृष्टीने शाळेत जाण्यास पात्र ठरलो. तोपर्यंत शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुषीत होतो.


घरात चालणाऱ्या विविध समारंभांपैकी हाही एक काहीतरी समारंभ असावा, असे मला वाटत होते. वरणापुरणाचे जेवण झाले. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायांतील चप्पलही नवी कोरी होती. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सिल या नवेपणाच्या धुंदीत बाबांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा येऊन पोहोचलो ते मलाच कळले नाही.



एका जुन्या वाड्यात आमची शाळा होती. एका मोठ्या दालनात दोन-दोन वर्ग भरले होते. दोन दालनांत मिळून चार वर्ग होते; आणि दोन गुरुजी शाळा सांभाळत होते. बाबांनी मला गुरुजींच्या स्वाधीन केले आणि बाबा परत फिरले तेव्हा खरोखर मला ब्रहमांड आठवले. बाबांशी बोलताना जो गुरुजींचा आवाज मधाळ वाटत होता, तो बाबांची पाठ फिरल्यावर एकदम कठोर झाला आणि कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतली.


ते पाहून मला कापरेच भरले. गुरुजी शरीरयष्टीने धिप्पाड होते. डोक्यावरच्या टोपीतून त्यांची शेंडी बाहेर डोकावत होती. खरे पाहता, त्यांची ती शेंडी पाहून मला हसूच येत होते; पण हसण्याचे धाडस नव्हते. उकडत असूनही गुरुजींनी कोट घातला होता. तेव्हापासून माझी पक्की समजत झाली होती की, गुरुजी म्हटले म्हणजे त्यांच्या अंगावर कोट हवाच! मुंबईला प्रशालेत आल्यावर मात्र ही समजूत पुसली गेली.


आमचे हे गुरुजी एकाच वेळी दोन वर्ग सांभाळत होते. एरवी वानराप्रमाणे उड्या मारणारे आम्ही पंचवीसजण गुरुजी वर्गावर आले की शेळीसारखे बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत चौथीच्या वर्गाला गणित घालत होते, तर पहिलीच्या मुलांना शब्द घालत होते. एकाही अक्षराची अदयापि मला ओळख नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या बावन्न पिढयांचा उद्धार केला असावा.


तीन-चार तास एका जागी बसण्याची मला सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी माणसे! भीतीने माझ्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाह लागल्या; तसे मास्तर कडाडले, "रडायला काय झालंय?" आता फक्त छडीच मारायची उरली होती. डोळयांतले पाणी मी पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरवू लागलो.या घटनेला आज बरीच वर्षे होऊन गेली, तरी तो शाळेतील पहिला दिवस मी विसरू शकत नाही. त्याच छडीच्या धाकाखाली शाळेतील चार वर्षे पार पडली आणि पाचवीसाठी मी शहरात आलो.




मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

shalecha pahila divas in marathi Essay


 वाढदिवस आणि सणांच्या व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण दिवस असे असतात जे आपण विसरू शकत नाही. प्रथमच शाळेत जाणे लहान मुलांसाठी खूप रोमांचकारी असते. त्याचा प्रभाव बालकाच्या मनावर पडतो.
जरी मी आज आठवीचा विद्यार्थी असलो तरी शाळेच्या पहिल्या दिवसाचा विचार येताच मन उत्साहित होते. माझी बहीण शारदा मंदिरमध्ये त्यावेळी शिकत होती. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. माझ्या आई बाबांनी मला पण त्याच शाळेत घालण्याचा निश्चय केला. जेव्हा मी पाच वर्षांचा झालो तेव्हा माझे नाव त्या शाळेत दाखल करण्यात आले.


पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळीच आईने मला लवकर उठविले. नित्यकर्मे आटोपल्यावर स्नान करून बरोबर सहा वाजता मी तयार झालो. दूध आणि नाश्ता केला. मी आवडीने शाळेचा गणवेश घातला. नवे बूट मोजे, दफ्तर पाहून मी उत्साहित झालो. माझ्या वडिलांनी मला आणि बहिणीला कारमध्ये बसवून शाळेत नेले.
शाळेची इमारत तीन मजली असून सुंदर होती. बाहेरच्या फाटकावर खाकी गणवेश घातलेला चौकीदार होता. वडिलांनी मुख्य फाटकाजवळ कार उभी केली आणि आमच्यासह शाळेत प्रवेश केला. 



माझी बहीण तिच्या वर्गात निघून गेली. वडिलांनी मला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले. तिथे बरीच मुले आपल्या आई वडिलांबरोबर आलेली दिसली. मुख्याध्यापक क्रमाक्रमाने प्रत्येकाला बोलावीत होते व त्यांच्या प्रवेशअर्जावर सह्या करीत होते. मला पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला. माझा वर्ग तळमजल्यावरच होता. वर्गात प्रवेश केल्यावर तिथे २०/२५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित असलेले दिसले. माझ्या बहिणीची मैत्रीण सुधा, हिची लहान बहीण पण होती. ती मला लगेच 'हॅलो'" म्हणाली. 


माझ्या वर्गशिक्षिकेने मला तिच्या जवळच पहिल्या ओळीत बसविले. दोन तासांनंतर मधल्या सुट्टीची घंटी वाजली. सर्व मुले दफ्तर भरून व बंद करून बाहेर आली मी पण त्यांच्याबरोबरच बाहेर पडलो. माझी बहीण आधीच माझ्या वर्गाबाहेर आली होती. नंतर आम्ही डबा खाल्ला. सुट्टी संपल्यावर सगळी मुले आपापल्या वर्गात गेली.


पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिकेने आम्हाला शाळेचे नियम समजावून सांगितले. पाठ्यपुस्तकांची यादी दिली. पाढे शिकविले. मला कविता म्हणावयास सांगितली व त्यानंतर खुश होऊन मला शाबासकी दिली. साडेबारा वाजता शाळा सुटली. माझी बहीण धावतच माझ्या वर्गाजवळ आली. आम्ही दोघे शाळेच्या बाहेर आलो. फाटकापाशी आमची आई वाट पाहत उभी होती. नंतर आम्ही तिघे रिक्षाने घरी आलो.
असा हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस. मी कितीही मोठा झालो तरीही हा दिवस माझ्या कायम लक्षात राहील.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 4

shalecha pahila divas marathi nibandh


शाळेतला पहिला दिवस ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मृती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी  मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो, तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या, परस्परविरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या - पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरखून गेलो होतो आणि त्याचवेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत, म्हणून खंतावलो होतो


थोडा चिंतेनेसुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील ? वर्गातील मुले कशी असतील ? ती माझ्याजवळ कशी वागतील ? हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का ? झेपेल का ? असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते, तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी - संस्कृत, ऑलजिब्रा जास्त विषयांचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. थोडक्यात मनःस्थिती काहीशी शब्दातीतच होती.



पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नांव विचारीत होते. माझी पाळी आली. मी गांगरलो - गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नांव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. मास्तर एकदम ओरडले. तत् पप् काय करतोस ? खणखणीत आवाजात बोल ! मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे,  सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला, खणखणीत स्वरात बोलायचं. 


पहिला तास संपला. मगाचचे सर गेले आणि दुसरे सर आले हे बघून मला अचंबाच वाटला. आले ते फाड-फाड इंग्रजीतूनच बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. “मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास ?" पण हे सर चांगले होते. अगदी खेळकरपणे ते शिकवीत होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले 'मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही. तुमचं सामान्यज्ञान वाढविणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. 



आपलं व्यक्तिमत्त्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे.' मी दुसरा धडा गिरवला. आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुटी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्षं या शाळेत शिकत आहोत, अशा थाटात ते वागत होते. माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने 'तू काय आणलं आहेस डब्यात ?' असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो. सर्वांजवळ सलगीने वागायचं.


मधल्या सुटीत मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली. काही बंडखोर वाटली. काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मुकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याचवेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. आपण मुलांजवळ जपून वागायचे. चांगल्या मुलांचीच संगत धरायची. वाईट मुलांची संगत टाळायची.
 

मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही. आम्हालाच पाढे विचारले. संख्या वाचायला सांगितल्या, शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे, वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला...


शेवटचा तास पी.टी.चा -शारीरिक शिक्षण. तिथेसुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले. आणि मग नांवे विचारली. पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली, तेव्हा मी माझं नांव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले "शाबास ! असा आवाज पाहिजे खणखणीत."
एकूण काय, पहिला दिवस चांगला गेला. मला वाटतं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार ते ठरवतो. मला धीर आला. खात्री पटली. माझं शालेय जीवन चांगलं जाणार - खणखणीत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद
टीप : वरील निबंध शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • mazya shalecha pahila divas in marathi
  • marathi nibandh shalecha pahila divas in marathi
  • shalecha pahila divas nibandh marathi madhe
  • majha shalecha pahila diwas nibandh
  • sayesha pahila divas marathi nibandh

निबंध 5

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay


ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी जरा भव्य वाटणाऱ्या दिडीतून मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो. 


तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या, परस्परविरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या - पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरखून गेलो होतो आणि त्याचवेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत, म्हणून खंतावलो होतो. 


थोडा चिंतेनेसुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील ? वर्गातील मुले कशी असतील ? ती माझ्याजवळ कशी वागतील ? हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का ? झेपेल का ? असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते, तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी - संस्कृत, ऑलजिब्रा जास्त विषयांचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. 


थोडक्यात मनःस्थिती काहीशी शब्दातीतच होती.  पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नांव विचारीत होते. माझी पाळी आली. मी गांगरलो - गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नांव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. 


मास्तर एकदम ओरडले. तत् पप् काय करतोस ? खणखणीत आवाजात बोल ! मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे, पण मास्तरांच्या शेऱ्यानंतर सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला, खणखणीत स्वरात बोलायचं.



पहिला तास संपला. मगाचचे सर गेले आणि दुसरे सर आले हे बघून मला अचंबाच वाटला. आले ते फाड-फाड इंग्रजीतूनच बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. "मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास ?" पण हे सर चांगले होते. 


अगदी खेळकरपणे ते शिकवीत होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले 'मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही. तुमचं सामान्यज्ञान वाढविणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. आपलं व्यक्तिमत्त्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे.' मी दुसरा धडा गिरवला.



आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुटी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्षं या शाळेत शिकत आहोत, अशा थाटात ते वागत होते. 


माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने 'तू काय आणलं आहेस डब्यात ?' असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो. सर्वांजवळ सलगीने वागायचं.



मधल्या सुटीत मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली. काही बंडखोर वाटली. काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मूकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याचवेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. 


आपण मुलांजवळ जपून वागायचे. चांगल्या मुलांचीच संगत धरायची. वाईट मुलांची संगत टाळायची. मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही. आम्हालाच पाढे विचारले. 



संख्या वाचायला सांगितल्या, शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे, वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला. शेवटचा तास पी.टी.चा -शारीरिक शिक्षण. तिथेसुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले. आणि मग नांवे विचारली. 



पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली, तेव्हा मी माझं नांव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले "शाबास ! असा आवाज पाहिजे खणखणीत." एकूण काय, पहिला दिवस चांगला गेला. 


मला वाटतं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार ते ठरवतो. मला धीर आला. खात्री पटली. माझं शालेय जीवन चांगलं जाणार - खणखणीत.



भास्कराचार्यांसारखे थोर गणिती आपल्या देशात होऊन गेले. सर्व जगाला '0' ची देणगी आम्ही दिली. पण हे वैयक्तिक पातळीवर झाले. सांघिक असे काही घडले नाही. अखिल देशाला ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात रॉकेटसारखी झेप घ्यायला लावील असा शिक्षणतज्ज्ञ भारतात निपजला नाही, हे खेदाने नमूद करावे लागते..


चिपळूणकर, टिळक, आगरकर, आपटे-कर्वे अशी देशाला शिक्षण क्षेत्रात पुढे आणण्यासाठी झटणारी मंडळी होऊन गेली. महात्मा फुल्यांनी तर आपल्याला -

विद्येविना मती गेली । 

मतीविना गती गेली ।।

गतीविना वित्त गेले | 

वित्ताविना शुद्र खचले ।। 




असा मंत्र दिला. पण एवढ्या प्रचंड देशात शिक्षित फारच थोडे झाले आणि सुशिक्षित तर त्याहूनही थोडे झाले.
आपलं दुर्भाग्य असं की लॉर्ड मेकॉलेच्या तोडीचा शिक्षणतज्ज्ञ स्वतंत्र भारताला कधी लाभला नाही. मेकॉलेने आपल्याला युरोपीय भाषा आणि युरोपीय शास्त्रे शिकवायला सुरुवात केली आणि साऱ्या हिंदुस्थानचा कायापालट झाला.


इंग्रजांनी दिलेल्या शिक्षणाने, त्यांचे राज्य चालवायला मदत करणारे कारकून तयार केले. हे सत्य आहे; पण त्याच शिक्षणातून आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी प्राणपणाने लढणारी माणसं निर्माण झाली, हेही सत्य आहे.



ज्वालांच्या झोतावर स्वार होऊन, आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या ब्रिटिश साम्राज्यावर धडका देऊन ते खिळखिळे करून टाकणारे सशस्त्र क्रांतिकारकही त्याच शिक्षणातून निर्माण झाले, हेही सत्य आहे. सध्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीचे वारे वहात आहेत. 


कित्येक भारतीय जागतिक पातळीवर ताऱ्यासारखे चमकत आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्याची सोनपहाट लवकरच फटफटणार आहे, याचीच ही प्रसादचिन्हे आहेत.

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay

माझे बालपण मराठी निंबध | Majhe Balpan Marathi Nibandh

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो माझे बालपण मराठी निंबध या निबंधामध्‍ये बालपणीच्‍या रम्य प्रसंगाचे वर्णन केले आहे बालपणीचे मित्र, दिवस दिवसभर खेळलेले खेळ, परीक्षा झाल्‍यानंतर असलेला दिनक्रम या गोष्‍टी वाचल्‍यानंतर तुम्‍हाला तुमचे बालपण आठवल्‍याशिवाय राहणार नाही. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझे बालपण मराठी निंबध सुरूवात करताच बालपणातील खुपश्‍या गमतीदार ताज्‍या होतात. शालांत परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन घरी आलो आणि मला हलके हलके वाटू लागले. गेले दोन-चार महिने मी अभ्यासाने अगदी झपाटून गेलो होतो. आता मी संपूर्ण मोकळा झालो होतो. सुट्टीतील वेळ घालविण्यासाठी बाबांनी अनेक पर्याय माझ्यापुढे ठेवले होते; पण ते सारे मला नकोसे वाटत होते. एकदम मला आठवला तो आमचा वाडा-बालपण जिथे घालविले तो वाडा.

तो वाडा आमचा होता, म्हणजे माझ्या आजोबांचा होता. बाबांना कधीच त्याच्याविषयी आपलेपणा वाटला नाही. म्हणून तर आजी-आजोबांच्या पश्चात बाबांनी तो वाडा विकला आणि हा प्रशस्त बंगला बांधला, पण त्या वाड्यातील मजा हया बंगल्यात कधीच अनुभवता आली नाही. वाड्याचे आम्ही मालक होतो आणि शिवाय इतर दहा भाडेकरू होते; पण बंगल्यात येईपर्यंत मला हे कधी माहीतच नव्हते. कारण वाड्यात दहा चुली पेटत होत्या, तरी सर्व माणसे एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे वागत होती. त्यामुळे बालपणी वाड्यात हुंदडताना कधी कोठे हा आपला, तो परका असे जाणवलेच नाही.

त्यावेळी या वाड्यात माझे दहा-बारा सवंगडी होते. सकाळी सूर्य वर आला की आमच्या खेळाला सुरुवात होत असे. आम्ही खेळात इतके रमून जात असू की, कशाचे म्हणून आम्हांला भान राहत नसे. मग आठ वाजता गोखले गुरुजींची हाक आली की पुढच्या ओटीवर 'शिकवणी' सुरू व्हायची; पण या खाजगी वर्गालाही वाड्यातील सगळी मुले येत असत. गोखले गुरुजी अगदी तन्मयतेने शिकवीत असत. त्यामुळे दोन तास अभ्यास झाला तरी कंटाळा येत नसे. जेवणे उरकली की वाड्यातील सगळेजण मिळून शाळेला जात असू. संध्याकाळी खेळानंतर कवितागायनाने वाडा नुसता दुमदुमून जायचा.

majhe balpan marathi nibandh
majhe balpan marathi nibandh

सुट्टीच्या दिवसांत तर वाड्यातील त्या बालपणाला आगळा रंग यायचा. सकाळच्या वेळी विहिरीवर पोहणे, दुपारी अंगण खेळांनी दुमदुमवून टाकणे, संध्याकाळचे फिरायला जाणे आणि रात्री भुताखेतांच्या गप्पा मारणे हा कार्यक्रम ठरलेलाच. सुट्टीमध्ये पाहुणेमुलांची भर असे. मग उन्हाळा म्हणून अंगणात अंथरुणे पडत. भेळ, आंब्याचा रस, आइस्क्रीम असे बेत आखले जात. दरवर्षी वाड्यातील कोणाकडे तरी कार्य निघेच. मग ते कार्य त्या घरापरतेच मर्यादित न राहता संपूर्ण वाड्याचेच होत असे. सगळी बालसेना त्या कार्यात एकजुटीने रंगलेली असे.

अशा त्या आगळ्यावेगळ्या आनंदात मी केव्हा मोठा झालो हे मला कळलेच नाही. आज मात्र जाणवते की
'अहा ते सुंदर दिन हरपले

मधुभावांचे वेड जयांनी जीवाला लाविले.' 
बालपणातील त्या दिवसांचे वर्णन करावयास कवयित्री शांता शेळके यांच्या या पंक्तींचा आधार घ्यावा लागेल
'अवनी गमली अद्भुत अभिनव जिये सुखाविण दुजा न संभव घरी वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले॥'


मित्रांनो बालपण एकदा मिळाल्‍यानंतर कधीही न मिळणारी गोष्‍ट आहे. बालपणातील ते रम्‍य क्षण कोणीही विसरू शकत नाही. तुम्‍ही तुमच्‍या बालपणातील झालेल्‍या खट्याळ गोष्‍टी कमेंट करून सांगु शकता माझे बालपण मराठी निंबध हा तुम्‍हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगावे.

निबंध 2

my childhood essay in marathi


बालपण म्हणजे जीवनातील सकाळ, जीवनातील वसंत ऋतू, साऱ्या जीवनाला जो प्रसन्न, प्रफुल्लित बनवतो. या वसंतऋतूत प्रत्येक कळीला फुलायचा मोह होतोच! माझ्या जीवनाची कळीही अशीच जन्मली, उमलली-आनंदपुरात !  खरोखरच तिथे आनंदाचा पूर वाहत होता. लहानपणी आम्ही एका मोठ्या वाड्यात राहायचो. 

आमचा वाडा-शांतीसदन! परंतु आम्ही सर्व मुलांनी या वाड्याला अगदी 'अशांती सदन'च बनवून टाकलं. सूर्यदेव उगवल्यापासून ते निरोप घेईपर्यंत आम्ही जो धुडगूस घालायचो...सीता, गीता, संजय, सुनील, पप्पू... आठवतायत ह्या बालमूर्ती... 'बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती!' आठवतोय, चिंचा काढण्यासाठी पाटलांच्या मळ्यातील चिंचेच्या झाडावर चढलेला समीर! कैऱ्या खाल्ल्या म्हणून माळ्याकडून मार बसलेला बंडू! टिपऱ्यांच्या खेळात सतत भांडणारी अबोली-अगदी विरोधाभासच! नंतर रोज सकाळी आम्ही सर्व जण हातात हात घालून शाळेत जायचो. 

शिस्तीने थोडीशी चुणूक दाखवायला सुरुवात केली. गुरुजींचा प्रेमळ हात पाठीवरून आजही फिरतोय असंच वाटतं. दुपारी घरी यायचो, जेवायला. अन् एकदा का जेवण झालं की घराबाहेरच धूम ठोकायचो. मग विहीरीवर पोहायला जायचो. आमच्या वाड्यातील काकांचा मुलगा ‘अभय' खूप भित्रा होता. त्याला विहिरीत उतरायला लावायचंच असं एकदा आम्ही सर्वांनी ठरवलं. 'अभय' असूनही त्याला पाण्याचं मात्र भय वाटत असे. आम्ही असंच काहीतरी सांगून त्याला रमत गमत नेला, तो विहिरीच्या काठावरच आणून उभा केला.

खाली पाण्यात संजय, अजय होतेच. वरून गर्जना झाली-बजरंगबली की जय! अन् 'अरे, मेलो मेलो ! वाचवा, वाचवा!... 'असं म्हणणाऱ्या अभयच्या बटुमूर्तीनं थेट जीवनाला आलिंगन दिलं. इतकं, की त्याच्या प्रेमभारानं तो गुदमरू लागला. संजय, अजयनी त्याला वर आणलं. दोन महिन्यातच अभय-निर्भय तर बनलाच पण पट्टीचा पोहणाराही !

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी मात्र आमचं पाऊल उंबरठ्याच्या आतच असे. हात-पाय-तोंड धुवून आम्ही सर्वजण परवचा म्हणायचो, अन् मग आम्हाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगायचे-बुद्धिसागरकाका !
किती छान होते ते दिवस !... फुलपाखरालाही लाजवेल असे ते स्वच्छंदी जीवन... मनाला षड्रिपूंचा स्पर्शही झाला नव्हता. जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता, नवलाई म्हणजेच जीवन होते. ते माझं बालपण म्हणजे अवखळपणे वाहणारा निर्मळ झराच! 'बाळपणीचा काळ सुखाचा आठवतो घडी घडी' असं म्हणता म्हणता,

'अहा ते सुंदर दिन हरपले,
मधुभावांचे वेड जयांनी जीवा लावले,' 

असं म्हणण्याची पाळी आली आहे. बालपणानंतर तरूणपण आलं, वृद्धत्वही डोकावू लागेल, परंतु जीवनातील वसंत ऋतू मात्रा माझ्या हातातून निसटला आहे. पण काळाची गती कोणाला रोखता आली आहे ? तो पुढे धावणारच ! मग आणि म्हणूनच प्रौढत्वातही बालपणाला जपणं, एवढंच आज माझ्या अन् तुमच्या हातात आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

ramya te balpan composition in marathi



हिरवे हिरवे गार गालिचे, 
हरिततृणांच्या मखमालीचे।
त्या सुंदर मखमालिवरती,
 फुलराणी ही खेळत होती।। 


बालकवींची ही हरिततृणांची मखमल आणि या मखमलीवरती खेळणारी फुलराणी ! शून्यातून विश्वात आलेली ! नवनिर्मात्याच्या निर्माण कार्यातील नवनिर्मितीच म्हणावे तिला ! मग ते हिरवे गार गालिचे असोत की बाभळीचे काटे, उजाड डोंगरवाट वा रखरखते ऊन, परंतु या सर्वांचा मनसोक्त, मनमुराद


आनंद - सुख अनुभवून अलौकिक-असामान्य परिपूती साधणारा ही फुलराणी म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण मग तो बालपणीची चिमुकली पावले टाकणारा काळ असो वा तारुण्याचा मखमली चादर असो हे सर्व अनुभवणारी एक समृद्ध अभिव्यक्तीच नव्हे काय ? 



मनोमयी विश्वातील प्रत्येक व्यक्तिरेखा कमी-जास्त प्रमाणात का होईना पण विश्वाच्या प्रत्येक इवल्याशा कोपऱ्यात सुखाची झालर शोधत असते, कारण तिला हवे असतात ते सुंदर दिन ! बालपणीच्या निरागस बोबड्या बोलांचे, किशोरावस्थेतील त्या अद्भुत बदलांचे व यौवनातील सुखद स्वप्नांचे ! ते सर्वच दिन ! ते सुखद दिन ! आज कुठेतरी हरपलेले ते सुंदर दिन !


सौंदर्यनिर्मितीच्या कर्तृत्वातून सौंदर्यशीलता फुलते, असे कवी कुसुमाग्रजांनी समजावून सांगितले आहे. 'जीवन' हा शब्दच सुंदर, संपन्न व सार्थ आहे आणि हे जीवन जगण्याची कला जाणणारा कलाकार हा जीवनाचा भाष्यकार ठरतो. 


कसेतरी रडतकुढत जीवन रेटणे म्हणजेच जीवन जगणे नव्हे. जगणे म्हणजेच जीवनाला अर्थ प्राप्त करून देणे होय, आणि या अर्थातच बालपण, किशोरावस्था, यौवन व प्रौढत्व वा वृद्धत्वाचेही मर्म सामावलेले असते. 


नदीच्या प्रत्येक टप्प्यातील - प्रत्येक वळणावरील अनुभवांतून साकारलेला समुद्र म्हणजेच जीवन होय. पण या मनमुराद कल्पना, ते स्वातंत्र्य, नी चंचलता, निरागसता व खळखळत्या पाण्यासारखी अवखळता असे ते दिन आजच्या या जागतिकीकरण, प्रदूषण, दहशतवाद व यांसारख्याच अनेक वादांमध्ये हरविल्याची संवेदना कुठेतरी सतत जाणवत राहते.


आज जीवनात प्रचंड अस्थिरता, अशांतता, अनिश्चितता भरतीच्या उफाळलेल्या सागरात सापडलेल्या नावेप्रमाणे हेलकावे खाते आहे. सिमेंटच्या जंगलात मार्ग शोधता शोधता आबालवृद्ध अनेक ठिकाणी ठेचाळत आहेत.

स्वतःचे स्वत्वममत्व विसरलेली आजची आधुनिक स्त्री पाश्चात्त्यीकरणाच्या नावाखाली उगाचच गल्लीबोळांतून फिरताना दिसते आहे. या सर्व अंदाधुंदीत, संवेदनशील मनुष्य मात्र आमराईतील आंबे चोरून खाण्याचे ते दिन,


परकरात बोरीचे गुच्छ जमविण्याचे ते दिन, सागरी वाळूत दिवसभरात एकदा तरी जाणे कित्येकवेळा पण किल्ले बांधण्याचे ते दिन, त्या व अशा सुखद दिनाच्या पायऱ्या वर्तमानकाळाच्या उंबरठ्यावर बसून मोजतो आहे. 


कारण आजच्या आधुनिकतेच्या व उद्योगीकरणाच्या गलबलात त्याची दृष्टी संवेदनशील वृत्ती अधू होत चालली आहे. या परिस्थितीत त्याला भविष्यातील अंधकार स्पष्ट दिसतो आहे.


जीवनाच्या वाटेवर, पाऊल टाक जपून। पायात रुतण्यासाठी काटे आहेत टपून॥ या व अशा परिस्थितीतही आजचा रसिक मात्र गुलमोहराची ती मनोहारी स्वप्न, स्पर्शाची ती सुखद अनुभूती, पापण्याच्या अर्धकलमामध्ये त्या सुंदर दिनांच्या आठवणी जपून ठेवणार आहे.कारण तो खराखुरा रसिक आहे. 


जीवनाच्या वाटेवरील प्रत्येक अनुभव तो निर्मिकाची भेट म्हणून जपून ठेवणार आहे. कारण या आठवणींशिवाय जीवनात रस नाही. रूप तर येणारच नाही मग रंग कुठला भरणार ? हे ती जाणून आहे. आणि म्हणूनच हरपलेल्या त्या सुंदर दिनांच्या आठवणी आजचा हा रसिक हृदयाच्या पिंपळावर कोरून ठेवणार आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


टीप : वरील निबंध माझे बालपण या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • majhe balpan prasang lekhan marathi

माझे बालपण मराठी निंबध | Majhe Balpan Marathi Nibandh