bhukamp grastache manogat nibandh | भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. मानवी जिवन हे संकटानी भरलेले असते त्यात कधी कोणते संकट येईल हे सांगता येत नसते या निबंधामध्ये अश्याच एका संकटाचा म्हणजे भुंकपाचा सामना केलेली व्यक्ती त्याचे मनोगत स्वरूपात त्यांनी अनुभवलेले भुंकपाचे संकट व्यक्त करते त्यावर त्यांनी कशी मात केली हे या निंबधात सविस्तर सांगीतले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
![]() |
bhukamp-grastache-manogat-nibandh |
निबंध 1 (450 शब्दात)
एके दिवशी वर्गशिक्षिका वर्गात आल्या व म्हणाल्या, “आज आपण निबंध लिहायचा." मुलांनी “विषय कोणता, विषय कोणता," असा एकच कुजबुजाट केला. त्यातच त्यांनी विषय जाहीर केला – भूकंप ! ' भूकंप' हा शब्द उच्चारताच माझ्या बाजूलाच बसलेला माझा मित्र स्वप्निल कावराबावरा झाला. माझ्या नजरेने हे तत्क्षणी हेरले. मधल्या सुट्टीत मी त्याला त्याबद्दल बोलते केले, तेव्हा तो व्याकूळ होऊन सर्व आठवणी सांगू लागला…
“भूकंप हा शब्द ऐकला तरी मला गलबलून येते. कारण मी स्वतः भूकंप अनुभवला आहे. भूकंप झालेल्या गावातूनच मी आलो आहे. आमचं गाव अगदी साधंसुधं खेडेगाव आहे. दिवसभर शेतात राबायचे, दोन वेळचं साधंसं जेवण घ्यायचं आणि रात्री गाढ झोपी जायचं, हाच गावाचा मुख्य दिनक्रम. एके दिवशी आम्ही असेच शांतपणे झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर अचानक जमीन थरथरली... फक्त काही सेकंदच ! आणि काही कळायच्या आत झाडे, घरेदारे धडाधड कोसळली... अनेक गुरेढोरे, माणसे सगळी घरांखाली गाडली गेली.
काही मिनिटांनी सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. रडणे, ओरडणे, मदतीसाठी पुकारणारे यांनी अवघा अवकाश व्यापून टाकला. ढिगारे उपसण्याचे असहाय प्रयत्न करण्यात, आपली माणसे शोधण्यात सकाळ उजाडली... आणि सर्वांसमोर उद्ध्वस्त वास्तव लख्ख प्रगटलं. प्रचंड मोठ्या नांगराने कोणीतरी जमीन नांगरावी, त्याप्रमाणे सगळी जमीन खणल्यासारखी दिसत होती.
सर्व घरे, वाडे उद्ध्वस्त झाले होते. मोठमोठी झाडेसुद्धा मुळापासून उपटून आडवी झाली होती. जी घरे माणसांना आजपर्यंत आश्रय देत होती, त्या घरांखालीच अनेकजण गाडले होते. काही जणांचे हात तुटले होते; पाय तुटले होते. कित्येकजण जबर जखमी होऊन विव्हळत पडले होते. कित्येक मृतदेह इतस्ततः पसरले होते. प्रत्येक घरात मृत्यूने थैमान घातले होते. कुणी कुणाला सावरायचं? कुणी कुणाचे अश्रू पुसायचे?
" त्यानंतर झालेल्या हालांना तर पारावारच उरला नाही. भूक लागल्यावर खायला काहीच नव्हते. आमच्या वाडीवरची एकुलती एक विहीर उद्ध्वस्त झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकटच उभं राहिलं.
औषधोपचाराविना अनेकजण तळमळत होते. आम्ही सर्वजण भुकेने व्याकूळ झालो होतो. रस्ते उखडलेले, झाडेझुडपे कोसळून पडलेली... त्यामुळे गावाबाहेरचे लोक आमच्यापर्यंत पोहोचायला संध्याकाळ उजाडली. तेव्हा कुठे आम्हांला खायला पहिला घास व पाण्याचा पहिला घोट मिळाला. हळूहळू सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. आम्हांला दूर मोकळ्या जागेत एकत्र केले. रडून रडून दमल्यावर आम्ही रात्री उघड्या माळरानावरच झोपी गेलो.
" नंतरच्या दिवसापासून मात्र दूरदूरचे अनेकजण आमच्यासाठी मदत घेऊन येऊ लागले. विविध वस्तू, कपडे, अन्नधान्ये यांची मदत सुरू झाली. तात्पुरते तंबू उभारून आमची राहण्याची सोय केली गेली. आम्हांला घरे बांधून देण्याच्या बातम्या येऊ लागल्या. बरीच मदत आली, हे खरे. पण मदतीतला मोठा वाटा गावातल्या मातब्बर लोकांनी व दांडगाई करणाऱ्यांनी बळकावला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही गावकरी तर आजही उघड्यावर पडले आहेत.
“भूकंपाच्या आठवणी आल्या की, अजूनही माझं मन गलबलतं. माझी आई या भूकंपामुळे धरणीच्या कुशीत विसावली. माझा धाकटा भाऊ जबर जखमी होऊन काही दिवसांनी देवाघरी गेला. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझी बहीण, आजी आणि बाबा गावी कष्ट करून कसेबसे पोट भरत आहे. माझ्या मामाने मला इकडे बोलावून घेतले, म्हणून तर मी या शाळेत शिकायला येऊ शकलो आहे.
"नको रे बाबा ! त्या भूकंपाच्या आठवणी नकोत ! त्या आठवणींनी आजही माझ्या जीवाचा थरकाप होतोय."
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . खालील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2 (350 शब्दात)
सारा गाव देवीच्या कुशीत विसावला होता. दिवसाभराची कामं झाली होती. जमिनीची, नोकरीची कामं; कुणाचं लग्न, कुणाचा वाढदिवस कुणाचं काय कुणाचं काय... भुकंप आला आणि... होत्याचे नव्हते झाले सूर्य उगवायचा होता; अंधारातच “धडाइ धूडम्” “गडगडगड" आवाज घुमले. घरे हालली; भांड्यांची भांडणे झाली, दरवाजांचे आवाज आले..... अंधाराचा महासागर, गगनाला चिरणाऱ्या किंकाळ्या, उघडण्याआधीच कायमचे मिटलेले डोळे... सूर्योदयापूर्वीच जीवनाचा सूर्यास्त झाला. माझ्या सर्व नातेवाईकांबरोबर ४० हजार आयुष्ये गिळून हा भूकंप दैत्य शांत झाला.
जिवन हे चांगल्या प्रवासासमान असते पण उद्या काय होईल याबद्दल काही सांगता येत नसते .पाप वाढते तेव्हा धरणीकंप होतो असे म्हणतात मग आम्ही काय पाप केलं होतं ? की आम्ही ४० हजारांनीच मिळून फक्त पाप केलं होतं ? मग आम्हाला ही शिक्षा का?
राहिलेल्या उजाड जीवनाचे मी करू काय ? आईवडील, बहीणभाऊ सारे गेले. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली तुटलेल्या कमरेची माझी आई. फुटलेल्या डोक्याने आईला बिलगलेली बाहुलीसारखी बहीण, भींतीखाली दोन्ही पाय गमावुन निजलेले वडील, ढिगाऱ्यात हरवलेला भाऊ.... डोळ्यांसमोरून हलवा हे दृश्य.... नाहीतर मी वेडा होईन.
क्षणात गाव पुसलं गेलं. जगाला जाग आली. सहानुभूतीची लाट उसळली. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला सरकार, स्वयंसेवी संस्था धावल्या. गावाला युद्ध छावणीचे रूप आले. अन्न, पाणी, दूध, वस्त्रे, औषधे, निवारे तंबू सर्व वाटले गेले. सर्वधर्मी प्रार्थना झाल्या. पुनर्वसनाची चक्रे फिरू लागली. माणुसकीचे दर्शन झाले.
हळूहळू सर्व ठीक होईल. लोक आपल्या विश्वात रमून जातील. हे सारं विसरूनही जातील. विस्मृतीच्या वरदानावरच माणसाचं जीवन सुसह्य होतं. परदुःख शीतल पण ज्याचं जळतं त्याचं काय ?... मदतीच्या खैरातीवर कां आयुष्य काढायचे ? -
उध्वस्त जपानकडून स्फूर्ति घ्यायला हवी. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारायचीय. जखमा विसरून कामाला लागायचे आहे.
"उष:काल होता होता काळरात्र झाली पुन्हा आता आयुष्याच्या पेटवा मशाली"
सारं सुरळीत होईल. पण एक नक्की, जेव्हा केव्हा ३० सप्टेंबर तारीख कलेंडरवर दिसेल तेव्हा मनात वादळं निर्माण होतील; आणि डोळ्यातुन अश्रुंच्या धारा वाहु लागतील.
bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध
![]() |
bhaji-vikretyache-manogat-marathi-nibandh |
रोज ठरावीक वेळी 'दादा, भाजी' अशी आरोळी कानावर येते. विनायक एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा आमच्या वसाहतीत रोज भाजीची गाडी घेऊन येतो. विनायकचे वागणे आदबशीर व नम्र असते. त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला आहे. एकदा या विनायकला मी बोलते केले. मुद्दाम त्याला संध्याकाळी बोलावून घेतले आणि त्याची माहिती विचारली.
"दादा, मी आठवी नापास आहे,' विनायक सांगत होता. "आठवी नापास झालो आणि शाळा सोडली, तेव्हाच माझा बाबा वारला आणि घरासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली. पूर्वी हीच गाडी माझा बाबा फिरवत असे, तेव्हा गमतीने मी त्याच्याबरोबर फिरत असे, म्हणून या कामाची मला माहिती होती.
“भाजी आणण्यासाठी मला भल्यापहाटे मोठ्या मंडईत, घाऊक बाजारात जावे लागते. भाजी खरेदी झाली की माझी गाडी लावतो. काही गिहाईकांनी काही खास भाज्या आणायला सांगितलेल्या असतात. त्या मी अगदी आठवणीने आणतो आणि मग आमचा शहराकडे प्रवास सुरू होतो. मोठी मंडई तशी गावापासून खूप दूर आहे. त्यामुळे चालायचे खूप श्रम होतात. त्याच वेळी मन साशंकही असते. 'एवढी भाजी आज विकली जाईल ना?' कारण भाजी हा नाशिवंत माल आहे. पण बहुधा सगळा माल संपतो.
"या व्यवसायात खूप पायपीट करावी लागते. पण अनेक ग्राहकांशी माझे एवढे प्रेमाचे नाते निर्माण झाले आहे की, त्या पायपिटीचे मला काही वाटत नाही. कित्येक आजींना मी त्यांच्या घरात भाजी पोचवतो. मग त्या प्रेमाने मला चहापाणी देतात. संक्रांतीला आठवणीने तिळगूळ देणाऱ्या अनेक ताई-माई आहेत. कुणाकडे काही कार्य असले की, ते भाजीची भलीमोठी यादी देतात.
"काही त्रासदायक, कटकटी ग्राहकही भेटतात. पण मी कोणाशी वाद घालत नाही. त्यामुळे खटके उडत नाहीत. संध्याकाळचा वेळ मला मोकळा असतो. त्यावेळी मी वाचन करतो. रोजची वृत्तपत्रे वाचतो. साने गुरुजींची पुस्तके मला खूप आवडतात. माझे घर व्यवस्थित चालेल एवढे पैसे सध्या मला मिळतात. पण मी यात समाधानी नाही.
"एक छोटासा गाळा घेणार आहे. त्यामुळे दुपारनंतर मी तेथे भाजी विकू शकेन. पण काही झाले तरी मी माझी सकाळची फेरी सोडणार नाही; कारण त्यामुळे मला खूप स्नेहीसोबती मिळतात.'' विनायकच्या विचारांनी मला मनोमन आनंद झाला.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
padkya killyache atmavrutta marathi nibandh | पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
बाळांनो, तुम्ही आज सहज सहल म्हणून इथे आलात तरी मला कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू ! पण, काय देऊन मी तुमचं स्वागत करू ? काय दाखवू?
" अवघे झाले जीर्ण शीर्ण अन् सुन्न झाल्या दिशा खूप सोसले आता झाली मूक माझी भाषा......" हे माझे ढासळलेले बुरूज, ह्या पडक्या भिंती, जमीनदोस्त झालेले महाल आणि कोठया. हे पाहून तुम्हाला 'मी' समजणारच नाही रे !
३५० वर्षे तरी झाली असतील माझ्या वयाला ! मोगल साम्राज्य हिंदु राष्ट्रावर आक्रमण करायला शिवशिवत असतानाच तेजस्वी सूर्य श्रीशिवाजी महाराजांनी गणाजी बंडोला आज्ञा केली माझ्या उभारणीची ! साताऱ्याच्या पूर्वेकडून शत्रूच्या फौजा रोखण्यासाठी ह्या डोंगरावर माझी नेमणूक झाली. महाराजांचा शब्द ! तो झेलला गणाजी बंडो आणि बंदेअलीनं. जिवाचं रान करून चार महिन्यांत मला बाळसं आणलं.
बंदेअलीनं माझी अंतर्गत रचना केली. पूर्वेला नगारखाना, आत मध्यभागी खलबतखाना, बाजूला दरबार मंडपी, कोपऱ्यात मुदपाकखाना, उत्तर-दक्षिणेला टेहळणी बुरूज, जनानी, मर्दानी महाल, अश्वपागा, मावळ्यांसाठी छोटी घरं, पाण्याचं तळं अन् सहज न दिसणारं दारूगोळ्याचं कोठार ! उभारणीचा इतिवृत्तान्त सादर होताच महाराज प्रसन्न झाले. गणाजी बंडो आणि बंदेअलीला सोन्याची भेट महाराजांनी दिली...! आदिलशहा नित्य कुरापती काढतच होता.
![]() |
padkya-killyache-atmavrutta-marathi-nibandh |
म्हसवडवरून त्याच्या फौजांचा तळ उठला अन् सूर्यास्ताला गडाच्या क्षेत्रात आला. ५०० ची कुमक माझ्या पोटात होती. दत्ताजी सुभेदार, माझा किलेदार, यानं इशारा केला आणि माझ्या बुरुजावरून प्रथमच तोफांचे गोळे शत्रुसैन्यावर आग ओतू लागले. पहिल्यावहिल्या लढाईनं माझ्या अंगात थरार भरला... वीरश्रीचा ! या अचानक हल्यानं शत्रुची पळापळ झालेली मी नेत्रांनी पाहिली. पश्चिमेकडे निघालेले ते वाघ शेळी होऊन पूर्वेला पसार झाले. माझं काम मी चोख बजावलं !...आणि मग किती लढाया, किती संग्राम केले, गणतीच नाही.
ती वीरश्री, तो 'हर हर महादेव 'चा घोष... ' दीन दीन' करत झालेली शत्रची दीनवाणी अवस्था...कधी मलाही जखमा झाल्या, पण एका प्रसंगानं साऱ्या भरून निघाल्या...घडलं ते असं... कर्नाटक विजय मिळवून महाराज परतत होते. गोंदावल्यापाशी अंधारून आले. सैन्य थकलेले, महाराज माझ्यापाशी मुक्कामाला आले. त्यांचा पदस्पर्श झाला...आणि अंगावर रोमांच आला...मनाच्या गाभाऱ्यात शेकडो घंटा निनादल्या.
उभ्या आयुष्यात महाराज एकच रात्र माझ्यापाशी होते. पण कित्येक शतके पुरेल असं चैतन्य मला देऊन गेले. म्हणूनच आजवर मी आहे. जखमाही भरल्या. अल्प मुक्कामातही महाराजांनी मारुती मंदिर स्थापण्याची सूचना दत्ताजीला केली. मावळतीला ते आजही आहे. तो काळ गेला...महाराज गेले....मराठे, पेशवे बुडाले...जग पुढे धावले. माणसाने आकाश हाती घेतले...आणि...आणि माझी गरजच संपली. डोक्यावरून हल्ले झाले तिथे मी कसा लढणार ? मी दुर्लक्षिला गेलो. जवळची माणसे निघून गेली...सुसाट वारा, ऊन, पाऊस खात एकाकी मी ढासळू लागलो. मनानं तर मी महाराज गेले तेव्हाच खचलो, आता शरीरानेही...
आता कोणी तुमच्यासारखे येतात तेव्हा मनावरची धूळ उडते. तुम्हीही थोडे भूतकाळात जाता. 'अरेरे!... जतन केलं पाहिजे' म्हणता...निघून जाऊन कामात गुंतता. माझ्या आवारामध्ये मात्र सुसाट वारा घोंघावत राहतो आणि रातकिडे किरकिरत राहतात...
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला व जिर्ण झालेल्या गडकिल्यांचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी काय केले पाहीजे हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद.
Essay on parrot in marathi | पोपट मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोपट मराठी निबंध बघणार आहोत. मानव प्राणी हा नेहमी आंनदाच्या शोधात असतो. त्यासाठी तो वेगवेगळे छंद जोपासतो. आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जातो. त्याला मनपसंत असलेले खाद्य पदार्थ खातो. पण मानवाचा सर्वात मोठा आनंद हा स्वतंत्र होण्यात आहे. त्यासाठी तो प्रंसगी युध्दही करतो. पंरतु इतर प्राण्यांच्या स्वतंत्रतेविषयी विचारही करत नाही. जसे उदाहरण द्यायचे झाल्यास पोपटाचे देता येईल. निबंधातील पोपटाने स्वता त्यांचे मनोगत स्पष्ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
मी पिंजऱ्यातला पोपट. आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही माणसे तुमच्या आनंदासाठी आम्हांला पकडता, घरी आणता आणि पिंजऱ्यात ठेवता. पण आम्हांला काय वाटत असेल, याचा विचार तुम्ही माणसे करत नाहीत. हेच बघा ना! या घरात आज अनेक वर्षे मला पिंजऱ्यात ठेवलेले आहे. ही घरातील माणसे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला आवडणारे पदार्थ खायला देतात. माझ्यासाठी खास पेरू आणतात. माझे नेहमी कौतुक करतात. येणाऱ्या पाहुण्यांपुढे माझे प्रदर्शन करतात. मला नवे नवे शब्द बोलायला शिकवतात. पण मला खरोखरीच काय हवे आहे, ते हे लोक समजून घेत नाहीत.
![]() |
Essay on parrot in marathi |
मला स्वातंत्र्य हवे आहे. अगदी सोन्याचा पिंजरा असला, तरी तो मला नकोसा वाटतो. मला रानात मुक्तपणे विहार करायचा आहे. माझ्या भाऊबंदांबरोबर मला मोकळ्या आकाशात उडायचे आहे. मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, तुम्ही माणसे स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी झगडता, युद्धही करता; मग आमचे स्वातंत्र्य मात्र कसे हिरावून घेता?
मला आता या पिंजऱ्यातून मुक्त करा. मी तुम्हांला रोज भेटायला येईन.
मित्रांनो तुम्हाला पोपट मराठी निबंध हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता.
व खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्यवाद .
मित्रांनो तुम्हाला पोपट मराठी निबंध हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .
नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi
झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्मकथनात्मक मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi
झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्मकथनात्मक मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi : एकदा काय गंमत झाली, आमच्या अकरा मजली उत्तुंग ‘गिरनार'जवळची झोपडपट्टी बोलू लागली. अहो, अगदी चक्क एखादया फडा वक्त्यासारखी ती आपले विचार मांडू लागली. वेळ होती रात्रीची. 'गिरनार' अगदी शांत झोपला होता-मऊ, मऊ फोमच्या गादयांत गोड गुलाबी स्वप्ने पाहत. त्याला कशाचा पत्ताच नव्हता.
![]() |
zopadpatti bolu lagte tevha essay in marathi |
या झोपडपट्टीचे तसेच झाले होते. बरेच दिवस मनात साचलेली 'दु:खे' तिला आता कुणाला तरी सांगायची होती. तिने गिरनारला हाका मारल्या तेव्हा उषाकिरण जागी झाली आणि नवलाईने ऐकू लागली. “अरे गिरनार, तू आणि तुझी मैत्रीण उषाकिरण, माझ्याकडे तिरस्काराने बघता. माझ्या ओंगळ रूपामुळे तुमचे सौंदर्य डागाळते असे तुम्हांला वाटते. पण, तुमचा हा उलटा न्यायच नाही का? अरे सांगा, या जागेवर आधी कोण होते, तुम्ही की मी? माझीच जागा बळकावून तुम्ही मला दूर करू पाहता.
गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या) मराठी निबंध आत्मकथनात्मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi
गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या) मराठी निबंध आत्मकथनात्मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi : “मित्रांनो, या तुमच्या समारंभात आज मला भाषण करण्याची संधी हवी आहे. मला ओळखलेत ना तुम्ही ! अहो, तुमच्या या समारंभातील मी सम्राज्ञी आहे. आज दोन दिवस येथे हे प्रदर्शन चालू आहे. या गुलाबपुष्प प्रदर्शनातील सम्राज्ञी ठरलेली मी एक गुलाबकळी. या प्रदर्शनात मी पहिला क्रमांक मिळविला आहे. तो मान तुम्हीच मला दिलात. हजारो फूलांतुन माझी निवड झाली आहे. त्या निमित्ताने माझ्या मालकिणीचाही गौरव झाला आहे.“माझ्या मालकिणीचे श्रेय मी मान्य करतेच. कारण तिने घेतलेल्या निगराणीमुळेच मलो आजचे हे सौंदर्य प्राप्त झाले आहे. दिवसातील बराच वेळ ती आमच्यासाठी खर्च करते. त्यासाठी ती बरेच वाचन करते, संशोधन करते आणि त्यामुळेच अनेकदा माझ्या मालकिणीला गुलाबपुष्प प्रदर्शनात बक्षिसे मिळतात. तिचा छंद आज तिचा ध्यास झाला आहे.
![]() |
Gulab Fulache Manogat Essay In Marathi |
“आज आमच्या हजारो जाती तयार करण्यात आल्या आहेत. पण सर्वच जाती सुगंधी नाहीत. नाना आकार, नाना रंग. मित्रांनो, आजवर आम्हांला अनेक गौरव लाभले. पंडितजींच्या कोटावरील लाल गुलाब हा विश्वप्रेमाचा संदेश देत होता. आज गुलाबपुष्पांचा छंद विश्वव्यापी झाला आहे. त्यामुळेच जगभर ठिकठिकाणी आमची प्रदर्शने भरविली जातात.
“या सगळ्यात एक खंत आहे की हे माझे वैभव फक्त काही मूठभर लोकांचीच मिरासदारी झाली आहे. गुलाबाचा छंद जोपासणे म्हणजे चिक काम आहे. त्यामुळे गोरगरीब याकडे वळतही नाहीत. कालपासून मी पाहते, एवढी मंडळी माझे सौंदर्य पाहून गेली पण त्यांत एकही श्रमिक नव्हता, झोपडपट्टीतील एकही मूल नव्हते.
- fulache manogat nibandh marathi
- fulanchi atmakatha nibandh in marathi
- fulanchi atmakatha essay in marathi language
- fulache atmavrutta essay in marathi language
- fulache atmakatha essay in marathi
गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्मकथनात्मक मराठी निबंध
![]() |
gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi |
“आता हे गावकुसाबाहेरील जगही जागे व्हावयास लागले आहे. येथील काही मुले शहरात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांच्यातला माणूस जागा झाला आहे. ते आपल्या लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ लागले आहेत. गावाने दिलेले फाटके कपडेच तराळाने घातले पाहिजेत, नवीन कोरे कपडे अंगावर चढवायचे नाहीत, ही वर्षानुवर्षे चालत आलेली समजूत ते पुसू पाहत आहेत.
मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्मकथनात्मक | Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi
chaha che atmavrutta in essay in marathi
- चहाचा जुना परिचय
- दिवसाची सुरुवात
- चहा चीनमधून आला
- लागवडीची पद्धत
- अनुकूल वातावरण व जागा
- कारखान्यात होणारे संस्कार
- सर्वत्र मागणी
- श्रीमंत, गरीब
- बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
- सर्वांना उत्तेजन देतो
- तरी टीका
- जीवनात चहाला आगळे त्त्व.
- mi chaha boltoy nibandh in marathi
एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक| Eka Putlyache Manogat Essay In Marathi
दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक | Darveshache Manogat Essay In Marathi
भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक
![]() |
Autobiography of An Old temple in Marathi essay |
स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्मकथनात्मक
स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्मकथनात्मक : “अरे अज्ञ मुलांनो, जरा इकडे लक्ष दया. मला बोलू दया. माझे डोळे तुमचे हे सहस्र अपराध पाहन आता थकले आहेत. ओळखलंत ना मला! मी आहे तुमची 'स्वातंत्र्यदेवता.' आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत असे तुम्ही केवढे अभिमानाने सांगता. तेव्हा क्षणभर मी रोमांचित होते, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या तुम्हांला पाहिले ना की, मी व्यथित होते.
![]() |
swatantratechi kaifiyat essay in marathi |